आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • How Omicron Breaks Delta Record | Divya Marathi Explainer |Omicron Breaks Corona First Wave And Second Wave Daily New Cases Record In Just Two Days

दिव्य मराठी एक्सप्लेनर:कोरोनाच्या ताजा आकडेवारीने मोडला पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा विक्रम; एकाच दिवशी 44.6 टक्क्यांनी वाढली कोरोना रुग्णांची संख्या

अभिषेक पाण्डेय19 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या ताजा आकडेवारीने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे विक्रम मोडले आहेत. गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा वाढत आहे. 30 डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, 24 तासांत देशभरात 13,154 नवीन रुग्ण सापडेल. दोन दिवसांपूर्वीच नवीन रुग्णांची संख्या 6358 एवढी होती. अर्थातच नवीन रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली.

याच दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या देशात वाढून 950 झाली. तसेच नवीन व्हेरिएंट आता 22 राज्यांमध्ये पोहोचले आहे. मुंबई आणि दिल्लीत सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भीती निर्माण करणाऱ्या या आकडेवारीची तुलना आम्ही कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेशी केली.

पहिल्या दोन लाटांपेक्षा अधिक झपाट्याने वाढतेय संख्या

गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या प्रमाणाने दोन्ही लाटांमध्ये वाढत्या रुग्णांचा रेकॉर्ड मोडला आहे. फक्त 28 आणि 29 डिसेंबर रोजीच देशात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वेगाने वाढत असल्याचे दिसून आले. पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या रोज 40-40% ने वाढत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 27 डिसेंबर रोजी कोरोनाच्या 6358 नवीन रुग्णांची भर पडली. 28 डिसेंबर रोजी 9195 नवीन रुग्ण सापडले. अर्थात कोरोना रुग्णांची संख्या 45% वाढली. 29 डिसेंबर रोजी सापडलेल्या नवीन रुग्णांचा आकडा पाहिल्यास तो तब्बल 13,154 झाला. अर्थात आदल्या दिवशीच्या तुलनेत यात 43% वाढ झाली आहे.

दोन दिवसांमध्ये ज्या वेगाने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे ती 2020 च्या सुरुवातीला आलेल्या कोरोनाच्या दोन्ही लाटांचा विक्रम मोडणारी संख्या आहे.

दुसरी लाट सुरू असताना 31 मार्च 2021 रोजी 72,144 रुग्ण आणि 1 एप्रिल 2021 रोजी 81,444 रुग्ण सापडले होते. त्यावेळी रुग्ण वाढण्याचा वेग सरासरी 35% आणि 13.5% टक्के होता.

भारतात 29 डिसेंबर 2021 रोजी समोर आलेल्या रुग्णांची संख्या पाहता देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या वाढून 3,48,22,040 झाली आहे. सोबतच कोरोनामुळे एकूण मृतांचा आकडा आता 4,80,860 झाला आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसचे 82,402 रुग्ण उपचार घेत आहेत.

नवी दिल्ली आणि मुंबईत भीतीदायक परिस्थिती

 • देश आणि राज्याच्या राजधानीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. या दोन्ही शहरांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे.
 • दिल्लीत मंगळवारी सापडलेल्या 496 नवीन रुग्णांची संख्या बुधवारी 923 झाली. 30 मे 2021 नंतर ही सर्वात मोठी दैनंदिन आकडेवारी आहे.
 • तत्पूर्वी दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट वाढून 1.29% झाला. याबरोबरच दिल्ली प्रांतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या वाढून 14 लाख 45 हजार 102 झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे दिल्लीत 25,107 जणांचा मृत्यू झाला.
 • महाराष्ट्र आणि मुंबईत सुद्धा कोरोनाचा वेग वाढला आहे. मुंबई बुधवारी 2510 नवीन रुग्ण सापडले होते. हा आकडा गेल्या अनेक महिन्यांच्या तुलनेतील विक्रमी दैनंदिन आकडा आहे.
 • मुंबईत 20 डिसेंबर रोजी कोरोनाचे 283 रुग्ण सापडले होते. 10 दिवसांत नवीन रुग्ण सापडण्याच्या वेगात 80% वाढ झाली. यापूर्वी 8 मे 2021 रोजी मुंबईत 2678 रुग्ण सापडले होते.
 • मंगळवारी मुंबईत 1377 नवीन रुग्ण सापडले होते. यासोबतच आता मुंबईत कोरोनाच्या सक्रीय संक्रमितांची संख्या 8060 झाली आहे.

अनेक राज्यांमध्ये वाढली रुग्णसंख्या

 • केवळ दिल्ली आणि मुंबईतच नव्हे, तर इतर राज्य आणि शहरांमध्ये सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 2172 तर बुधवारी 3900 नवीन कोरोना रुग्ण सापडले.
 • केरळमध्ये मंगळवारी 2474 तर बुधवारच्या दिवशी 2846 नवीन संक्रमित सापडले. पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी 752 तर बुधवारी 1089 जणांना कोरोनाची लागण झाली.
 • कर्नाटकात मंगळवारी 356 रुग्ण तर बुधवारी 566 रुग्ण सापडले आहेत. गुजरातमध्ये मंगळवारी 394 तर बुधवारी 548 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली.
 • झारखंडमध्ये मंगळवारी 155 तर बुधवारी 344 रुग्ण सापडले. हरियाणात याच दोन दिवसांमध्ये अनुक्रमे 126 आणि 217 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ओमिक्रॉनने चिंता वाढवली

देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण 2 डिसेंबर रोजी कर्नाटकात सापडला होता. एका महिन्यात देशभरात हे संक्रमण 22 राज्यांमध्ये पोहोचले. देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के केवळ दिल्ली आणि मुंबईत आहेत. सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय फ्लाइट याच ठिकाणी उतरतात.

देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 961 झाली आहे. यात दिल्लीतील 263 आणि महाराष्ट्रातील 252 जणांचा समावेश आहे.

ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या इतर राज्यांमध्ये गुजरात (97), राजस्थान (69), केरळ (65), तेलंगणा (62), तामिळनाडू (45), कर्नाटक (34), आंध्र प्रदेश (16) आणि हरियाणा (12) असे रुग्ण आहेत.

दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसाठी ओमायक्रॉनला जबाबदार धरले जात आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोनाच्या नवीन रुग्णांपैकी 46% ओमायक्रॉन रुग्ण आहेत.

देशात कोरोनाच्या सुनामीचा धोका?

 • भारतात एप्रिल-मे 2021 मध्ये डेल्टा व्हेरिएंटने कोरोनाची दुसरी लाट आणली होती. यात दैनंदिन 4 लाख कोरोना रुग्ण सापडत होते. IIT कानपूरच्या प्राध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे, ओमायक्रॉन व्हेरिएंटने भारतात कोरोनाची तिसरी लाट जानेवारी-फेब्रुवारीत येईल.
 • निती आयोगाने नुकतेच सांगितले होते, की ब्रिटन आणि फ्रान्समध्ये ज्या वेगाने ओमायक्रॉनचा फैलाव होत आहे, त्यानुसार भारतात रोज 13 ते 4 लाख रुग्ण दैनंदिन आढळू शकतात. गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा वेग जसा वाढला, त्यानुसार हीच भीती खरी ठरताना दिसून येत आहे.
 • जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा जगात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची सुनामी येणार असा इशारा दिला आहे. भारतात सध्या 61 टक्के प्रौढांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरीही अजुनही देशात मोठ्या लोकसंख्येला ओमायक्रॉनचा धोका आहे.
बातम्या आणखी आहेत...