• Home
  • Dvm originals
  • How to avoid scams; View the domain name of the website, install ad blocker and stop infringing ads

दिव्य मराठी विशेष / घोटाळ्यापासून कसा बचाव करावा; वेबसाइटचे डोमेन नेम पाहा, अॅड ब्लॉकर इन्स्टॉल करा व माहिती चोरणाऱ्या जाहिराती रोखा

  • साथरोगात इनबॉक्स, फोन व इतर उपकरणांवर हल्ल्याची शक्यता वाढते, तज्ञांचे मत

दिव्य मराठी

May 20,2020 10:05:00 AM IST

नवी दिल्ली. (ब्रायन एक्स. चेन)

कोरोना विषाणू साथरोगात अनिश्चितकालीन वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ऑनलाइन ठकांसाठी ही मोठी संधी आहे. बेरोजगारांना सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. एखाद्या बँक अथवा सरकारी अधिकाऱ्यांचा फोन आल्यास आपणास विश्वास बसतो. पण या स्कॅमपासून व हॅकिंगपासून आपला बचाव करायचा आहे.

बनावट वेबसाइटमुळे भले-भले खातात धोका

> यूआरएल चेक करा: बनावट वेबसाइट सरकारी अथवा बँकेच्या वेबसाइटसारखीच दिसते. डोमेन नेममुळे बनावटपणा उघड होऊ शकतो. येथे.comवा .org वा gov.in तर नाही, हे तपासून पाहा.

>अॅड ब्लाॅकर इन्स्टाॅल करा :

खासगी माहिती गोळा करणाऱ्या जाहिरातीपासून सावध रहा. अॅड ब्लाॅकर इन्स्टॉल करा.


वर्क फ्रॉम होम करताय...

> नेटवर्क सिक्युरिटी : कॉम्प्युटरप्रमाणे वाय-फाय राऊटर सुरक्षित असावा. याचे लेटेस्ट व्हर्जन असावे. पासवर्ड स्ट्राँग हवा.

> खासगी व ऑफिसची सिस्टिम वेगळी हवी :

वर्क फ्राॅम हाेममुळे कर्मचारी खासगी काॅम्प्युटर, ई-मेल अॅड्रेस अथवा मेसेजिंग अॅप वापरतात. तुमचे उपकरण व अॅप कंपनीचे नेटवर्क सिक्युरिटी सुरक्षित नसेल तर कंपनीची सिस्टिम, इंटरनेट अकाऊंट व सॉफ्टवेअरवर काम करायचा

ई-मेल व टेक्स्ट मेसेज पाठवणाऱ्यास तपासा

: खरा व बनावट ई-मेल अॅड्रेसमध्ये एक-दोन कॅरेक्टरचा फरक असतो. अशा प्रकारे स्कॅम टेक्स्टचे फोन क्रमांक १० पेक्षा जास्त असतात.

>चेक करा, क्लिक करू नका :

अनोळखी लिंकवर क्लिक करणे अथवा उत्तर देणे टाळा. अनेक लिंकवर माऊसचा कर्सर नेल्यास पेजवर प्रिव्ह्यू दिसतो. संशयित पेजला स्पॅम मार्क करा.

फसव्या कॉलपासून असा करा बचाव

> फाेन ठेवा आणि पुन्हा फोन करा: काॅलरवर संशय असेल तर कॉल कट करून पुन्हा ग्राहक सेवा केंद्रावर जाणून घ्या.

X