आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट:50 वर्षांचा पुरावा द्यावा कसा, 73 व्या स्वातंत्र्यदिनी धनगरांची फरपट

दीप्ती राऊत | नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उघड्यावरचं जगणं वाऱ्यावर, मेंढ्यांच्या कळपामागे ऑनलाइन शिक्षणाचं मातेरं, ना रेशन - ना घरकुल

स्वतंत्र भारत पाऊणशेव्या वर्षात प्रवेश करताना वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या गोमा शिंगोडेंना प्रश्न पडलाय की, ५० वर्षांचा रहिवासी पुरावा आणायचा कुठून? नांदगाव तालुक्यातील कासारीच्या माळरानावरच्या धनगरवाड्यात यांची हयात गेली. मेंढ्यांचा कळप घेऊन रानोमाळ भटकणाऱ्या शिंगोडे कुटुंबाची ही तिसरी पिढी. गजाननच्या नावावर रेशन कार्ड नाही, तर यशचा शाळेत प्रवेशही नाही. निवडणुकीच्या रिंगणात धनगर आरक्षणाचा भंडारा उधळणाऱ्या महाराष्ट्रातील धनगरवाड्यांवरील हे भयानक चित्र.

आठ महिन्यांची भटकंती व चार महिन्यांचे माळरानावर उघड्यावरचे जगणे यापासून सुटका झालेली नाही. त्यांच्या जगण्यात फरक पडलेला नाही. उलट प्रश्न वाढले. धनगर आरक्षणाच्या निमित्ताने आदिवासी विरुद्ध धनगर असा संघर्ष उभा राहिल्याने माळरानावर पाल टाकण्यासाठी वनहक्क समित्या विरोध करू लागल्याचे ते सांगतात. कधी गावकऱ्यांचा विरोध तर कधी वनखात्याचा. यामुळे राहायचं कुठे हाच त्यांच्यासाठी गहन प्रश्न बनला आहे. रानमाळावर झोपड्या उभारल्या तरी उघड्यावरच्या मेंढ्या कधी लांडग्या-बिबट्यांच्या शिकार होतात, कधी साथीच्या रोगांना बळी पडतात, वाड्याचे कारभारी सीताराम मदने सांगत होते... उघड्यावरच्या या संसारात सर्वाधिक हाल महिलांचे आणि अंधारमय भविष्य मुलांचे.

माळरानावरचं जगणं अन‌् ऑनलाइनचं मातेरं

भटकंतीमुळे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे कठीण असल्याचे कासारीचे शिक्षक आशुतोष हाटकर सांगतात. उघड्यावरच्या वाड्यांवर वीजच नाही तिथे ऑनलाइन शिक्षण पोहोचवायचं कसं हा त्यांच्यापुढचा आताचा यक्षप्रश्न.

राष्ट्रीय धनगर समाज समितीचे प्रदेश अध्यक्ष बापू शिंदे आकडेवारी मांडतात

> २० कोटी धनगर देशात

> २१ पोटजाती महाराष्ट्रात

> १३ मतदारसंघांत निर्णायक

बातम्या आणखी आहेत...