आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना काळात तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी:मुले शाळेत जाऊ शकत नाहीत आणि मित्रांनाही भेटू शकत नाहीत; घरबसल्या चिडचिडी झाली आहेत, तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्यांची काळजी कशी घ्यावी ?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यासंदर्भात भास्करने बालरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञांशी बातचीत केली आणि कोविडच्या दुष्परिणामांपासून मुलांना कसे वाचवता येईल हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

सात वर्षांची रेशू अनेकदा घराबाहेर पडण्याचा आग्रह धरते, पण तिचे पालक दार बंद ठेवतात. ती बर्‍याच वेळा खिडकीतून डोकावते. तिच्या शेजारी राहणा-या अंशिकाशी दारातूनच बोलते. रेशू आणि अंशिका लांबूनच एकमेकींना आपली खेळणी दाखवतात आणि मग एकत्र खेळण्याचा आग्रह धरतात, पण दोघींचे पालक त्यांना घराबाहेर पडू देत नाहीत. यामुळे नोएडामध्ये राहणा-या या दोन्ही मुली अतिशय चिडचिड्या झाल्या आहेत. असेच काहीसे चित्र भारतातील जवळजवळ सर्वच घरात दिसत आहेत. कोरोना महामारीमुळे लहान मुले घरात बंदिस्त झाली आहेत.

कोरोनामुळे शाळा बंद आहेत आणि मुलांना त्यांचे क्लासेस ऑनलाइन करावे लागत आहेत. 5-16 वर्षे वयोगटातील मुले शाळेतच त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे धडे शिकतात. पण आता ते त्यांच्या घरात कैद झाले आहेत. त्यांचे जीवन मोबाइल किंवा लॅपटॉप स्क्रीनभोवती गुरफटले गेले आहे. ते आपल्या मित्रमैत्रिणींना भेटू शकत नाहीयेत किंवा प्ले ग्राऊंडवर जाऊन खेळू शकत नाहीयेत. याचा परिणाम केवळ त्यांच्या मानसिक क्षमतेवरच नाही कर फिजिकल फिटनेस आणि सामाजिक कौशल्यांवरही होतोय.

यासंदर्भात भास्करने बालरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञांशी बातचीत केली आणि कोविडच्या दुष्परिणामांपासून मुलांना कसे वाचवता येईल हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

डॉ. रितु गुप्ता चाइल्ड अँड एडोलेसेंट हेल्थ एक्सपर्ट आहेत. त्या म्हणतात की, मुले शाळेत जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या मित्रांनाही भेटू शकत नाहीत. त्यांच्या शारिरीक हालचालीदेखील घरापर्यंत मर्यादित झाल्या आहेत. याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि वाढीवरही होत आहे. मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. मुलांना आनंदी आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी पालकांनी घरातील वातावरण सकारात्मक राखणे सर्वात महत्वाचे आहे.

डॉ. रितु म्हणतात, 'पालक हे मुलांचे आदर्श असतात, ते जे करतात त्याचे लहान मुले निरीक्षण करतात. पालकांनी घरात असे काहीही करू नये ज्याचा मुलांवर नकारात्मक परिणाम होईल. घरात असल्याने मुले चिडचिडी होत आहेत. त्यांना जे करायचे आहे ते त्यांना करता येत नाहीये, अशा परिस्थितीत ते बर्‍याचदा चिडचिडे होतात आणि विचित्र गोष्टी करण्यास सुरवात करतात.'

मुलांना जुन्या किस्से कहाणी सांगा
पालकांची अशी अपेक्षा असते की, मुलांनी अभ्यास करावा, वाचन करावे, शिस्तीत राहावे. परंतु मुलांना स्वतंत्र राहायला आवडतं, त्यांना धमाल-मस्ती करायची असते. अशा परिस्थितीत मुले चिडचिडी होतात. पालकांनी त्यांची मनःस्थिती समजून घ्यायला हवी. मुलांशी रागात बोलू नये. जेव्हा जेव्हा पालक आणि मुले एकत्र असतात, त्या क्षणांना आनंदी बनवायला हवे. पालकांनी मुलांना जुन्या कथा सांगाव्या, असे केल्याने मुलांजवळ या कठीण काळातील ही सुंदर आठवणी राहतील.

डॉ. रितु म्हणतात, "पालक मुलांना समजून घेण्याऐवजी त्यांना रागवतात, ज्यामुळे घरातील तणाव वाढत आहे. मुलांची स्थिती पालकांनी समजून घेतली पाहिजे. घरात मुलांसोबत खेळणे, नृत्य करणे, योग करणे किंवा जंपिंग सारखे इनडोअर गेम खेळायला हवे. यामुळे बाँडिंग वाढेल आणि त्यामुळे हॅपी हार्मोन्स निर्माण होऊन तणाव कमी होईल.'

डॉ. रितु पुढे म्हणतात, 'मुलांजवळ करायला जास्त काही नसते. अशावेळी आयांनी घरकामात मुलांना सहभागी करुन घ्यायला हवे. यामुळे दोन चांगल्या गोष्टी होतील - पहिली म्हणजे पालक आणि मुलांमधील बाँडिंग वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये शेअरिंग इज केअरिंग ही भावना निर्माण होईल. सामाजिक अंतर यामुळे मुले आपल्या मित्रांपासून दुरावली आहेत. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना त्यांच्या त्यांच्या वयाच्या मुलांशी बोलण्याची परवानगी दिली पाहिजे.'

कोविडमुळे घरातही नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. एखाद्याला झालेला कोरोना संसर्ग किंवा नातेवाईक, ओळखीच्या लोकांमध्ये झालेल्या कॅज्युअल्टी यामुळे घरातील वातावरणावर परिणाम होतो. मोठे यातून स्वतःला सावरु शकतात, परंतु मुलांवर झालेला परिणाम हा दीर्घकाळ राहतो.

त्यांच्या मते, 'जर पालक तणावात असतील, चिंताग्रस्त असतील, घाबरले असतील तर त्याचा मुलांवरही परिणाम होईल. मुलांमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण होते. परंतु जर पालक शांत असतील आणि धैर्याने एखाद्या कठीण परिस्थितीला सामोरे जात असतील तर मुले देखील प्रेरणा घेतील. मुले शांत राहून आव्हानांना सामोरे जाऊन परिस्थिती हाताळण्यास देखील शिकतील. पालकांनी मुलांना परिस्थिती कशा हाताळायच्या आणि त्यापासून पळ काढू नये हे मुलांना शिकवायला हवे. या क्षणांमुळे मुलांमध्ये आयुष्यभरासाठी कौशल्य विकसित होईल.'

दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा स्क्रीन टाइम शून्य असावा
डॉ.अमित गुप्ता हे नेत्रतज्ज्ञ आहेत. ते म्हणतात की, आपण आउटडोअर अॅनिमल आहोत. आपले डोळे दूरवरचे बघण्यासाठी आहेत. परंतु सध्याच्या काळात आपण इंडोअर आहोत. त्यामुळे आपले डोळे जड पडतात. डोके जड होते. यामुळे चष्मा लागण्याची शक्यताही वाढते. यावेळी पालकांनी मुलांच्या आयसाइटची विशेष काळजी घेतली पाहिजे.

मुले ऑनलाईन वर्ग करतात, त्यानंतर मोबाईल किंवा टीव्हीवर गाणी किंवा कार्टुन पाहतात. यामुळे त्यांचा स्क्रीन वेळ खूप वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा स्क्रीन टाइम शून्य असावा. पालकांनी या वयोगटातील मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायला हवे, परंतु आजकाल अगदी एक वर्षापासूनची मुले मोबाइल पहात आहेत.

ते म्हणतात, “दोन वर्षाखालील मुलांचा स्क्रीन टाइम शून्य असावा. 2-5 वर्षांच्या मुलांचा स्क्रीन टाइम एक तास असावा, तो देखील पालकांच्या देखरेखीखाली. 5 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले 1-3 तास स्क्रीन वापरू शकतात. जी मुले ऑनलाइन वर्ग करीत आहेत त्यांना याव्यतिरिक्त मोबाइन वापरु देऊ नये.'

'पण कटु सत्य हे आहे की बर्‍याच वेळा पालक त्यांच्या सोयीसाठी मुलांना फोन देतात. जर पालक मुलांकडे लक्ष देऊ शकत नसतील, त्यावेळी ते मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाइल देतात. यामुळे मुलांना मोबाइल फोन वापरण्याची सवय होत आहे.'

डॉ. अमित म्हणतात, 'मुलांना मोबाईल स्क्रीनपासून दूर ठेवणे आणि त्यांची दृष्टी जतन करणे ही पालकांची जबाबदारी आहे. बाजारात बरीच ब्लू लाइट असलेले चष्मे उपलब्ध आहेत, जी डोळ्यांची दृष्टी वाचविण्याचा दावा करतात, परंतु अशा गॅझेटचा प्रत्यक्ष परिणाम होत नाही. पालकांनी मुलांना इतर गोष्टी गुंतवायला हवे, जेणेकरुन त्यांचा मोबाइल वापर कमी होईल.'

डॉ. अमित म्हणतात, 'मोकळा वेळ मिळाल्यावर मुलांना बाल्कनी किंवा टेरेसवर घेऊन जावे, त्यांना तेथून लांबच्या गोष्टी दाखवाव्या. यामुळे त्यांना दूरवरचे बघण्याची सवय होईल. मुलांनी किमान दोन तास आउटडोअर अॅक्टिव्हिटी करायला हवी. हे छतावर खेळून देखील होऊ शकते.'

रुटीननुसार मुलांना जेवण द्या
साई महिमा, डाइटीशियन आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट आहेत. त्या म्हणतात की, पालकांनी आपल्या मुलांना तेवढेच खाऊ घालावे, जेवढे ते खाऊ शकतील. दर दोन तासांनी त्यांना थोडे थोडे खायला द्या. त्या सांगतात, 'तुमच्या मुलाची तुलना इतर मुलांशी करु नका. असे कधीही म्हणू नका की ते मूल इतके खातो आणि तू काहीच खात नाही. एक रुटीन बनवा, ज्यात मुलाला थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खायला द्या. उदाहरणार्थ, जर आपण दररोज आंघोळ करुन मुलाला काहीतरी खायला दिले तर ते त्याचे स्वतःच एक रुटीन होईल आणि त्याला आंघोळ करुन नाश्ता करण्याची सवय लागेल. ही एक निरोगी सवय आहे.'

त्या सल्ला देताता की, पालकांनी मुलांची जेवणाची वेळ फन टाइम बनवावी. जसे, त्यांना जेवू घालताना एक कहाणी सांगावी. मुलांकडून जेवणाचे ताट सजवून घेऊ शकता. तुम्ही ताटात कसे जेवण वाढता, हे मुलांसाठी खूप महत्त्वाचे असते. हेल्दी पदार्थ खाण्याचे फायदे मुलांनाही सांगा. त्यांना सांगा की गाजर खाणे डोळ्यांसाठी आणि ड्रायफ्रुट खाणे हे मेंदुसाठी किती फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात, मुलांना आंब्याचे पन्नं, टरबूजचा रस आणि ताक यासारख्या थंड पेय द्या. हे त्यांना हायड्रेटेड ठेवेल आणि त्यांना आवश्यक पोषक तत्व देखील मिळतील. डॉ. साई महिमा म्हणतात की, लॉकडाऊन दरम्यान, निरोगी अन्नाची सवय लावून पालक विविध शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून मुलांना वाचवू शकतात.

बातम्या आणखी आहेत...