आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशीभविष्य:टॅरो आणि अंकशास्त्राद्वारे जाणून घ्या, या आठवड्यातील तुमचे राशिभविष्य

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्र राशीनुसार आणि टॅरो कार्डस् तसेच न्युमरोलॉजीतून समजून घ्या सर्व 12 राशींसाठी कसा राहिल हा आठवडा.
साप्ताहिक राशीभविष्य पं. मनीष शर्मा, टॅरो कार्ड दिव्या चुघ आणि न्युमरोलॉजी डॉ. बबीना बोहरा यांच्याकडून...

सप्ताहारंभी चंद्र द्वादश असल्याने काही अडचणी येऊ शकतात. उत्पन्न कमी असेल आणि अडचणी जास्त असतील. कामात अनावश्यक विलंब होईल. मंगळवारपासून सर्वकाही ठिक व्हायला लागेल. चिंता मिटतील. गुरूवारी अतिआत्मविश्वासात असू शकतात. सांभाळून रहावे. शनिवारी बहुप्रतीक्षित कामात यश मिळू शकते.
टॅरो
शुभ रंग -
गडद निळा
शुभ अंक - 8
टॅरो कार्ड - Strength
काही लोक तुमच्या कामात अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. भेटीगाठी, सादरीकरणाचा काळ असेल, जो भविष्यात लाभदायी ठरेल. काही नवे शिकण्याच्या संधी मिळतील. डोळे बंद करून लोकांवर विश्वास ठेऊ नका. विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करावी लागेल. काही कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचे ओझे मनावर राहिल. प्रवास करू नका.

आठवड्याचा प्रत्येक दिवस उत्पन्न देणारा असेल. यात वृद्धीही होत राहिल. भाग्य अनुकूल राहिल. प्रत्येक कामात यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी चंद्र राशीत आल्याने चंद्र मिळून प्रबळ लाभ देणारा योग होईल. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. एखादे नवे काम करायला मिळेल.
टॅरो
शुभ रंग -
पांढरा
शुभ अंक - 5
टॅरो कार्ड - 5 of wands
काही नकारात्मक परिस्थिती निर्माण होतील, त्यामुळे मन अशांत अस्थिर राहिल. कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या वादामुळे नुकसान संभवते. तुमच्या कामाची प्रखरता आठवड्याच्या शेवटी समोर येईल. कला, संगीत आणि साहित्याशी निगडीत लोकांना कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. विद्यार्थी, युवकांचे मन अतिरिक्त छंदांमध्ये लागेल.

सुरुवातीला काम जास्त असेल. उत्पन्नही चांगले राहिल. वडिलांचे सहकार्य मिळेल. विरोधी शांत राहतील. कार्यस्थळी मोठे यश मिळवाल. मंगळवार आणि बुधवारी चंद्र अनुकूल राहिल्यने पैशाची कमी भासणार नाही. तसेच काम आधीच्याच गतीने सुरू राहिल. शुक्रवारी सकाळपासून प्रतिकूलता मिळेल.
टॅरो
शुभ रंग - हलका स्लेटी
शुभ अंक - 4
टॅरो कार्ड - 4 of swords
आरोग्याच्या समस्या दैनिक कामात अडथळा ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत राहिल पण कोणत्या तरी प्रकारचे भय मन विचलित करेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांत सहभागी व्हाल. काही कायदेशीर प्रकरणे निकाली निघतील. नवे ऑफिस, घर किंवा फार्महाऊसचे उद्घाटन शुभ होईल.

आत्मविश्वासासह बौद्धिक क्षमतेत वृद्धी होईल. कामात मन लागेल. भाग्य साथ देईल. प्रवास सुखाचा होईल. मंगळवारी अचानक काम वाढू शकते. बुधवारचा दिवस धार्मिक कामात जाईल. गुरूवारही व्यस्ततेचा असेल. शुक्रवार आणि शनिवारी पैशांची आवक वाढेल.
टॅरो
शुभ रंग - बदामी
शुभ अंक - 6
टॅरो कार्ड - Lovers
जोडीदाराचे सहकार्य मिळेल. जुन्या कायदेशीर प्रकरणांत सकारात्मक निकाल समोर येतील. विद्यार्थ्यांची अभ्यास आणि विद्यापीठाशी निगडीत कामे वेगाने पूर्ण होतील. काही नवे व्यावसायिक करार किंवा भागीदारी करणे भविष्यात लाभदायी ठरेल. नकारात्मक विचार आणि परिस्थितींपासून दूर राहा.

अष्टम चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला निश्चित मिळणाऱ्या उत्पन्नात अडसर आणू शकतो. मंगळवारी दुपारनंतर सुधारणा होईल. बुधवारी स्थिती पुन्हा तुमच्या बाजुने होईल. उत्पन्नात वाढ होईल. शुक्रवारी भाग्याची साथ मिळेल. सहकार्य मिळेल आणि उत्पन्नही वाढेल. शनिवारी कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
टॅरो
शुभ रंग - गुलाबी
शुभ अंक - 2
टॅरो कार्ड - 2 of wands
खूप व्यस्ततेचा आठवडा राहिल. कुटु्ंबात नव्या सदस्याच्या आगमनाचे वृत्त मिळू शकेल. व्यापाऱ्यांना नव्या लोकांच्या सोबतीने कामाच्या विस्ताराच्या संधी मिळतील. कार्य प्रणालीत नाविन्य आणि कुशल कर्मचाऱ्यांची निवड होईल. आरोग्याविषयी हलगर्जीपणामुळे काही आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.

चंद्राच्या पूर्ण दृष्टीने शक्तीशाली व्हाल आणि आर्थिक आधारही मजबूत होईल. लगेच एखाद्या चल-अचल संपत्तीच्या स्वरुपात लाभ मिळण्याची स्थिती असेल. मंगळवारी दुपारनंतर वाणीवरील नियंत्रण हटू शकते. शुक्रवारी दुपारी वेळ पुन्हा तुमच्या बाजूने होईल.

टॅरो
शुभ रंग - करडा
शुभ अंक - 6
टॅरो कार्ड - 6 of wands
अनेक कामांची जबाबदारी तुमच्यावर येईल. व्यवहार कौशल्याने तुम्हाला नव्या कामात यश मिळेल. उद्योजक आपले ध्येय पूर्ण करु शकतील. आनंदाचे वातावरण राहिल. जुन्या योजना व्यवस्थितपणे चालतील. आठवड्याच्या शेवटी उच्च अधिकाऱ्यांकडून काही दबाव जाणवेल.

आठवड्याच्या सुरुवातीला गरजेच्या वस्तुंसाठी पैशांची तडजोड करावी लागेल. मन खिन्न राहिल. मंगळवारी दुपारनंतर आराम मिळेल. कामात वेग राहिल आणि पैशांची प्राप्तीही होईल. शुक्रवारी स्थिती पुन्हा अस्थिर होईल. कामात गती येणार नाही. अनावश्यक खर्च होतील, तणावही राहिल.

टॅरो
शुभ रंग - फिक्कट पिवळा
शुभ अंक - 5
टॅरो कार्ड - King of cups
कार्यक्रमांत खास आतिथ्य, मान-सन्मान संभवतो. एखाद्या ज्येष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल. निकटवर्तीयांचे विश्वासपात्र बनाल. पती-पत्नीमध्ये तणावाची स्थिती बनेल. जुनी प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे योग अचानक येतील. कोणत्याही व्यसनाचे सेवन आणि स्वार्थी संगतीपासून या आठवड्यात दूर राहा.

सामान्यपेक्षा चांगली स्थिती आहे. मंगळवारपर्यंत एखादे मोठे काम होण्याची शक्यता आहे. पैशाची आवक चांगली राहिल. संततीकडून सहकार्य मिळेल आणि न्यायालयीन कामांमध्ये यश मिळेल. बुधवार आणि गुरूवारी अडचणी येऊ शकतात. शुक्रवारी वाद होऊ शकतात. शनिवार सर्वात चांगला दिवस राहिल.

टॅरो
शुभ रंग - फिक्कट जांभळा
शुभ अंक - 3
टॅरो कार्ड - Empress
नोकरी सोडून मनाजोगे काम करण्याची इच्छा वाढेल. तुमच्या समोर नव्या संधी समजून घेणे आणि मिळण्यासाठी उपयुक्त वेळ आहे. वैयक्तिक जीवनातील काही तणाव कमी होतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. बिघडलेल्या संबंधांत प्रेम वाढेल. व्यापाराशी निगडीत व्यवस्थापनात मार्गदर्शन देण्याचे काम वाढेल. या आठवड्यात बदल चांगला राहिल.

आठवड्याच्या सुरुवातीला चतुर्थ चंद्रामुळे आर्थिक मंदी राहू शकते. कामात मन लागणार नाही. मंगळामुळे स्थिती पुन्हा अनुकूल होईल. हा वेळ यश वाढवणारा असेल. उत्पन्नात वृद्धी होईल आणि संततीकडून सुख मिळेल. शुक्रवार आणि शनिवारी एखादा विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

टॅरो
शुभ रंग - फिक्कट गुलाबी
शुभ अंक - 2
टॅरो कार्ड - 2 of swords
या आठवड्यात मन आणि मेंदू तुम्हाला कोड्यात टाकतील. तुम्हाला व्यावसायिक कामांऐवजी वैयक्तिक कामांना प्राधान्य द्यावे लागेल. तुमची प्रतिभा उच्च अधिकाऱ्यांसमोर नक्कीच येईल. काही लोक तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. सावधान राहा. सुनियोजित प्रयत्नांतून तुमची सर्व कामे पूर्ण करा.

हा वेळ एखादे मोठे यश मिळवण्याचा आहे. सहकाऱ्यांकडून सन्मान मिळेल आणि कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. भावंडांकडून सहकार्य मिळेल. संततीच्या यशामुळे आनंद मिळेल. बुधवार आणि गुरुवारी कामातील गती कमी होईल, पण नुकसानीची शक्यता नाही. योजना यशस्वी होतील. शुक्रवार आणि शनिवारही चांगला राहिल.

टॅरो
शुभ रंग - खाकी
शुभ अंक - 7
टॅरो कार्ड - 7 of swords
एकाच वेळी अनेक कामांचा दबाव तुमच्यावर येईल. सर्व कामे बारकाईने आणि समजूतदारपणे करावी लागतील. प्रेम संबंधांचा तुमच्यावर प्रभाव राहिल. एखाद्या चुकीच्या निर्णयाला बळी पडू शकता. बचतीत अडचणी येतील. आर्थिक गुंतवणूक आणि निर्णय पूर्ण विचार आणि सल्ला-मसलत करून घेणे योग्य आहे. प्राधान्यांच्या निवडीत अडचणी राहतील.

विरोधकांकडून ध्येयापासून लक्ष हटविण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. सांभाळून राहा आणि दृढ निश्चयासह पुढे व्हा. कोणतीही अडचण येणार नाही. कुटुंबाची साथ मिळेल. बुधवार आणि गुरुवार सर्वात महत्वाच्या कामात यश मिळण्याचे दिवस असतील. शुक्रवार आणि शनिवारी किरकोळ अडचणी येऊ शकतात.

टॅरो
शुभ रंग - आकाशी निळा
शुभ अंक - 4
टॅरो कार्ड - Queen of wands
या आठवड्यात तुमचे मनोबल मजबूत राहिल. योग्यता सिद्ध करण्यासाठी संघर्षरत राहाल. अहम् ईर्ष्येपासून दूर राहावे लागेल. मनाजोगी कामे होणार नाही, पण अडचणींवरील तोडगा लवकर मिळेल. महिलांचे वर्चस्व वाढेल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा.

चंद्राच्या गोचरमुळे धन येण्याचा योग आहे. हा वेळ सर्व प्रकारे अनुकूल राहणार आहे. प्रत्येक बाजूने सहकार्य मिळेल तसेच शुभवार्ता मिळतील. मंगळवार दुपारपासून शुक्रवार सकाळपर्यंत कुटुंबाच्या सोबत राहण्याची संधी मिळेल. शनिवारी पराक्रम श्रेष्ठ राहिल. कामात यश मिळेल.

टॅरो
शुभ रंग - गाजरी
शुभ अंक - 3
टॅरो कार्ड - World
पती-पत्नीच्या नात्यात तीव्रता वाढेल. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रगतीचा काळ आहे. नवी नोकरी, प्रमोशन, कामाचे कौतुक होईल. एखाद्या कौटुंबिक व्यक्तीच्या सहकार्याने तुमचे थांबलेले काम सुरू होईल. दस्तावेजाशी संबंधित कामांत वेळ जाईल. जुने दिलेले कर्ज मिळेल. आर्थिक संकट दूर होतील.

डॉ. बबीना बोहरांकडून न्युमरोलॉजीतून समजून घ्या येणारा आठवडा कसा राहिल...

हा आठवडा संमिश्र राहिल. आठवड्याची सुरुवात प्रतिकूल राहू शकते. तुम्हाला अनुचित गोष्टींवर खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे सावधान राहा आणि सर्व प्रकारचे वाद आणि अवैध कामांपासून वाचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही कुठे काम करत असाल, तर वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसोबत तुमचे काही गैरसमज होऊ शकतात. हा आरामाचा आठवडा नाही म्हणून आळस झटकून काम करणे तुम्हाला सदैव स्मरणात ठेवावे लागेल. अन्यथा तुम्हाला याची किंमत मोजावी लागू शकते. कौटुंबिक पातळीवर आई-वडिल आणि जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते.

आठवड्याच्या सुरुवातीला अचानक आणि अनावश्यक खर्च होऊ शकतो. किंबहुना, या आठवड्यात करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात काही अडथळे येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. तुमचे मित्र आणि इतर तुम्हाला फसवू शकतात. ते दिलेले आश्वासन पाळतील. पैशाचा ओघ राहणार नाही. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. कुटुंबातील सदस्यांची वृत्ती सौहार्दपूर्ण राहणार नाही. खराब आरोग्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आध्यात्मिक चर्चा, योग आणि ध्यान यांचा विचार करा. ते तुम्हाला खूप मदत करू शकते. या आठवड्यात सहावी इंद्रिय जास्त काम करेल. स्वतःसाठी जास्त वेळ घालवा.

आठवड्याची सुरुवात उत्तम राहील आणि तुम्हाला वरिष्ठ आणि अधिकारी यांची मर्जी प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत कोणतीही अडचण दिसत नाही. तुम्ही खूप आरामात असाल. तुमचे मित्र आणि कुटुंबातील सर्व सदस्य तुम्हाला त्यांचा सर्वोत्तम पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही शेअर बाजारात असाल तर हा आठवडा भाग्यवान आहे. अचानक आणि अनपेक्षित लाभ संभवतात. परंतु, आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे कारण तुम्हाला अचानक काही तणाव आणि मानसिक चिंता निर्माण होऊ शकते.

सर्व बौद्धिक आणि मानसिक व्यायाम/संवाद क्रियाकलापांसाठी हा एक उत्कृष्ट आठवडा आहे. तुम्‍ही तुमच्‍या कर्मचार्‍यांशी तसेच तुमच्‍या नियोक्‍तासोबत चांगले व्यवहार कराल. या आठवड्यात तुम्हाला अधिक उदास वाटू शकते. तुम्हाला संसर्ग आणि ताप यासारख्या काही आरोग्य समस्या देखील येऊ शकतात. तुमचे लक्ष कार्याच्या परिणामकारकतेवर अधिक असावे. या आठवड्यात तुमचा कल तुमच्या आरोग्य आणि आरोग्याशी संबंधित बाबींकडे अधिक असेल.

तुमचे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्हाला अधिक खोडकर मूड देखील जाणवेल. सर्व मानसिक क्रियाकलापांचा पाठपुरावा करण्यासाठी हा एक उत्कृष्ट आठवडा आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला प्रेम आणि जीवनसाथीशी संबंधित सर्व बाबींमध्ये सक्रिय व्हायला आवडेल. तुम्हाला या आठवड्यात चांगला वेळ घालवण्याची तीव्र इच्छा देखील जाणवेल आणि या उद्देशासाठी तुम्ही बाहेर फिरायला जाण्याची योजना देखील करू शकता. तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर नवीन प्रेमप्रकरणाचीही चिन्हे आहेत. मुलांशी तुमचे संबंध खूप चांगले असू शकतात आणि या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे योग्य सहकार्य मिळेल. तथापि, किरकोळ वाद संभवतात. तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास मिळेल. व्यवसाय, करिअर आणि आर्थिक बाबींसाठी हा आठवडा चांगला राहील. तुमची प्रतिष्ठा आणि कीर्ती नक्कीच वाढली आहे. प्रेम आणि रोमान्ससाठी देखील हा एक अद्भुत आठवडा आहे. तुम्ही कुणाला शोधत असाल तर तुमचा शोध संपेल. कमाईचे नवीन स्रोत ओळखण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

अनपेक्षित आणि प्रचंड खर्च येणार आहेत. घरगुती जीवन तणाव आणि अडथळ्यांनी भरलेले असेल. यामुळे तुम्ही तुमची मानसिक शांती आणि एकाग्रता गमावू शकता. या आठवड्यात तुमच्यासाठी काही अनपेक्षित अडथळे निर्माण होऊ शकतात. तुम्ही पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन डीलची अपेक्षा करत असाल, तर तुम्हाला या क्षेत्रात काही अप्रिय बातम्या ऐकायला मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या, तुम्हाला कोणतीही महत्त्वाची चांगली बातमी मिळणार नाही. टाळता येण्याजोग्या आणि क्षुल्लक मुद्द्यांवर तुमचे तुमच्या जोडीदाराशी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. जे क्रीडा, मनोरंजन, शेती, ई-कॉमर्स व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना चांगले परिणाम मिळतील.

आठवड्याची सुरुवात तुमच्या अनुकूल होणार आहे. या आठवड्यात तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या अनेक यश मिळवाल. तुमची इच्छा पूर्ण होऊ शकेल. तुम्ही निश्चितपणे नवीन लोकांच्या संपर्कात याल, जे तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात तुम्हाला मदत करू शकतात. खरं तर, यश तुमच्या दारात आहे आणि फक्त तुमची वाट पाहत आहे. तुम्ही उशीर करू नका, जा आणि ते मिळवा. तथापि, कौटुंबिक जीवनासाठी हा काळ अनुकूल नाही. वाद आणि गैरसमज शक्य आहेत. प्रेम आणि रोमान्ससाठी योग्य वेळ नाही. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल.

कौटुंबिक जीवन आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये, या आठवड्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, अचानक आलेल्या त्रासामुळे तुम्ही तणावग्रस्त आणि उदास राहू शकता. तुम्ही वादात अडकू शकता. मानसिक त्रास संभवतो. जोडीदार, पालक, भावंड, सहकारी आणि मित्र यांच्याशी तुमचे संबंध बिघडतील. प्रियजनांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहणार नाहीत. आकस्मिक आणि भारी खर्चही संभवतो. आपण नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणार असाल तर ते पुढे ढकलले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...