आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टडिलिव्हरी बॉयवर पाळीव कुत्र्याचा हल्ला:तिसऱ्या मजल्यावरून मारावी लागली उडी, कुत्रा चावला तर मालक तुरुंगात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात राहणाऱ्या शोभना यांनी स्विगीमधून जेवण ऑर्डर केले होते. डिलिव्हरी बॉय रिझवान पार्सल घेऊन पोहोचला. रिझवान शोभना यांना पार्सल देत असताना त्यांच्या जर्मन शेफर्डने अचानक त्याच्यावर हल्ला केला.

रिझवान यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी टेरेसवर धावले. तिसर्‍या मजल्यावर कुत्राही त्यांच्या मागे धावला. कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी डिलिव्हरी बॉयला छतावरून उडी मारावी लागली. आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पाळीव प्राण्याने अनोळखी व्यक्तीवर असा हल्ला केल्याची ही पहिलीच घटना नाही. म्हणूनच आज कामाची गोष्टमध्ये आपण समजून घेऊयात की, कुत्रा फक्त लहान मुलाप्रमाणे घरात पाळणे आवश्यक नाही तर त्याला योग्य प्रशिक्षण देणे देखील आवश्यक आहे.

आमचे तज्ञ विष्णू दत्त त्रिपाठी, सचिव, Kennel club, फैज मोहम्मद खान, ब्रीडर आणि डॉग वर्तन तज्ञ आणि वीरेश शर्मा, डॉग ट्रेनर, वर्तन विशेषज्ञ हे आहेत.

वरील ग्राफिकमध्ये लिहिलेला मुद्दा दिल्लीच्या उदाहरणाने समजून घेऊया…

1957 च्या डीएमसी कायद्यानुसार म्हणजेच दिल्ली महानगरपालिका कायद्यानुसार कुत्रा घरी ठेवण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. ज्यासाठी कुत्र्याला रेबीजची लस दिली पाहिजे. लस दिल्यानंतरच कुत्र्याची नोंदणी केली जाईल. यासाठी दिल्लीतील लोकांना 500 रुपये फी भरावी लागते.

डीएमसी कायद्यानुसार कुत्र्यांची नोंदणी एक वर्षासाठी वैध आहे. एक वर्षानंतर मालकाला त्याच्या कुत्र्याच्या नोंदणीचे नूतनीकरण करावे लागते.

खालील 10 कुत्र्यांच्या जाती भारतातील कुटुंब आणि मुलांसाठी सुरक्षित आहेत

  1. लॅब्राडोर (Labrador)
  2. गोल्डन रिट्रीव्हर (Golden Retriever)
  3. पग (Pug)
  4. जर्मन शेफर्ड (German Shepherd)
  5. बीगल (Beagle)
  6. पोमेरेनियन (Pomeranian)
  7. ग्रेट डेन (Great Dane)
  8. शिह त्जू (Shih Tzu)
  9. पूडल (Poodle)
  10. डॉबरमन (Dobermann)

भारतीय घरांमध्ये पाळले जाणारे वर नमूद केलेले काही कुत्रे परिचित तसेच आक्रमक असतात. म्हणूनच त्यांना प्रशिक्षण देताना काही गोष्टींची काळजी घ्या...

जर्मन शेफर्ड: लॅब्राडोर नंतर हा सर्वात जास्त आवडणारा कुत्रा आहे. ते समजूतदार, हुशार आणि अतिशय निष्ठावान आहेत, परंतु त्यांचा स्वभाव देखील आक्रमक आहे.

  • त्याला दररोज फिरायला घेऊन जा जेणेकरून तो इतर लोकांना भेटू शकेल. अनोळखी लोकांना पाहून ते पटकन आक्रमक होतात. म्हणूनच इतरांना भेटणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
  • जेंव्हा तुम्ही त्याला काही खायला द्याल आणि तो ते खाण्यासाठी उडी मारतो किंवा धक्के मारतो, तेव्हा तुम्ही ताबडतोब हात मागे घ्या. आणि त्याला फटकारले पाहिजे. त्याची ही सवय तुमचे नुकसान करू शकते.
  • जेव्हा कुत्रे आनंदी असतात तेव्हा ते तोंडाने तुमचे हात पाय चावतात, यालाच प्ले बिटिंग म्हणतात. जेव्हा जेव्हा तुमचा कुत्रा असे करतो, तेव्हा तुम्ही त्याच्या गळ्यात बांधलेल्या पट्ट्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवा आणि त्याला असे न करण्याची सवय लावा.

पोमेरेनियन: लॅब्राडोर प्रमाणे, ते मैत्रीपूर्ण असतात, परंतु काही परिस्थितींमध्ये आक्रमक असू शकतात आणि चावण्याचा प्रयत्न देखील करू शकतात. जसे-

  • कशालातरी घाबरल्यावर
  • मोठ्या आवाजामुळे घाबेरला तर
  • अनोळखी लोकांवर भुंकण्यामुळे
  • आजारी असेल किंवा दुखापत झाली तर

जर पोमेरेनियन आक्रमक असेल तर खाली लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण करा…

  • खेळताना काही पोमेरेनियन पंजा मारतात किंवा आक्रमक होतात. अशा परिस्थितीत खेळणे थांबवा. जेणेकरून त्याचे वागणे योग्य नाही हे त्याला कळते.
  • जेव्हा तो आक्रमक असतो तेव्हा त्याच्याशी बोलणे थांबवा आणि शांत व्हा. थोड्या वेळाने तो स्वतःच शांत होईल.
  • त्याला हट्टी होऊ देऊ नका. त्याला बाहेर घेऊन जा, पण जर पाऊस पडत असेल किंवा खूप ऊन असेल तर त्याला घरात खेळण्याची सवय लावा. यामुळे, तो कोणत्याही गोष्टीसाठी आक्रमक होणार नाही.

डॉबरमन: ही एक अतिशय सक्रिय, हुशार, निष्ठावान आणि सतर्क जाती आहे, परंतु ती आक्रमक देखील आहे.

  • जर तुम्हाला बुद्धिमान डॉबरमॅन हवा असेल तर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ निश्चित करा. संध्याकाळ, सकाळ किंवा दुपार.
  • जर तुम्ही वेळेत काही फेरफार केल्यास ते आक्रमक होऊ शकतात.
  • आपल्या कुत्र्याला जास्त शिस्त लावू नका, ते त्याला आक्रमक बनवू शकते.

लॅब्राडोर: ही कुत्र्याची सर्वात मैत्रीपूर्ण आणि परिचित जात आहे. ते आक्रमक नसतात, परंतु काही लोकांचे लॅब्राडॉर कधीकधी आक्रमक होतात. यामागे कारणे आहेत.

  • जर लॅब्राडोरला दुखापत झाली असेल आणि त्यांना वेदना होत असतील. त्यामुळे ते आक्रमक होऊ शकतात.
  • जर ते अंधाऱ्या खोलीत बंदिस्त असतील तर ते आक्रमक होऊ शकतात.
  • म्हणूनच तुमच्या कुत्र्याला अंधाऱ्या खोलीत एकटे बांधू नका, दुखापत झाल्यास त्याच्यावर उपचार करा. त्याच्याबरोबर खेळा, त्याला हलवा आणि त्याला व्यायाम करायला लावा.

शहरांमध्ये आजकाल बरेच लोक अपार्टमेंटमध्ये राहतात आणि पाळीव प्राणी ठेवतात. अशा लोकांनी हे pet laws किंवा पाळीव प्राणी कायदे जरूर वाचावेत...

  • Resident Welfare Association अपार्टमेंटमध्ये पाळीव प्राणी ठेवण्यास बंदी घालू शकते.
  • पाळीव प्राण्यांनी घाण केल्यास पाळीव प्राण्याच्या मालकांला स्वच्छ करण्याचे सांगता येते.
  • Apartment Owner Associations पाळीव प्राण्यांची घाण साफ करण्यासाठी कोणताही दंड आकारू शकत नाहीत.
  • कुत्र्याचे भुंकणे हा त्याचा स्वभाव आहे. यामुळे कुत्र्यावर बंदी घालता येत नाही.
  • कुठे फिरायला नेले तर गळ्यात पट्टा घालून ठेवा. पाळीव प्राण्यांसाठी लिफ्टवर बंदी घातली जाऊ शकत नाही.

आता अशा काही परिस्थितींशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया, ज्यामध्ये लोक अनेकदा फसतात किंवा अडकतात…

परिस्थिती 1

लिफ्टमध्ये, पायऱ्यांवर, शेजारच्या काकू-काकांच्या घरी किंवा कुठेही पाळीव कुत्र्याने चावण्याचा प्रयत्न केला तर ते कसे टाळायचे?

ब्रीडर आणि कुत्रा वर्तन तज्ञ फैज मोहम्मद खान अशा परिस्थितींसाठी सल्ला देतात की……

  • काही लोक कुठेही पाळीव कुत्रा पाहून म्हणतात की ओ मॉय गॉड, द डॉग इज सो क्यूट आणि लगेच त्याच्याकडे जातात. त्याच्या कपाळाला हात लावतात. असे अजिबात करू नका. प्रथम मालकास विचारा की, त्यांचा कुत्रा फ्रेंडली आहे का.
  • लिफ्टमध्ये किंवा कुठेही कुत्रा पाहून अचानक उडी मारू नका. असे केल्याने, त्याला असे वाटू शकते की, आपण त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत आहात.
  • सशक्त व्यक्तीने कुत्र्याला फिरायला किंवा फिरायला घेऊन जावे, म्हणजेच घरातील लहान मुले किंवा वडीलधारी व्यक्तींसोबत तुमच्या पाळीव कुत्र्याला बाहेर पाठवू नका.

पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी सल्ला

वीरेश शर्मा, डॉग ट्रेनर, बिहेवियर स्पेशालिस्ट, दिल्ली यांच्या मते, पाळीव कुत्रा इतरांना चावू नये याची काळजी कुत्र्याच्या मालकाला घ्यावी लागते.

  • मालकांनी त्याच्या कुत्र्याला सामाजिक होण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  • त्याला फिरायला लावा, लोकांशी बोलायला लावा. जेणेकरून जेव्हा तो कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भेटतो तेव्हा तो घाबरून चावण्याचा प्रयत्न करत नाही.
  • कुत्र्याला फिरायला घेऊन जा, लिफ्टमध्ये घेऊन जा किंवा कुठेही घेऊन जा, पण तो सुटणार नाही अशा पद्धतीने बांधा.
  • मालकाने कुत्र्याला जवळ ठेवावे. त्याची दोरी खूप सैल सोडू नका.

परिस्थिती 2

रस्त्यावर, मुख्य रस्त्यावर किंवा कॅम्पसच्या आत भटका कुत्रा धावला किंवा चावण्याचा प्रयत्न केला तर कसे पळायचे?

फैज मोहम्मद खान यांच्या मते, जर तुम्ही बाईकवर असाल तर तेथून वेगाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. थांबल्यामुळे तो हल्ला करू शकतो. देशातील प्रत्येक कुत्र्याच्या मूडची हमी देऊ शकत नाही.

भटक्या कुत्र्यांना स्थलांतरित करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यांचा बर्थ कंट्रोल करा. त्यासाठी भरपूर निधी येतो.

चालताना अशी परिस्थिती उद्भवल्यास घाबरून पळण्याची चूक करू नका. आत्मविश्वासाने तिथून बाहेर पडा. जर कुत्र्यांनी तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर ओरडा किंवा त्यांना दगडांनी घाबरवा. बहुतेक कुत्रे याने दूर जातात. तसे झाले नाही तर दुसऱ्या मार्गाने जा किंवा परत जा. हाच सुरक्षित मार्ग आहे. एखाद्याच्या मदतीने थोड्या वेळाने तेथून बाहेर पडा.

परिस्थिती-3

तुमच्यासोबत एक लहान मूल आहे किंवा तुम्ही एकटे आहात आणि कुत्रा चावला, तर काय करावे?

डॉ. साद अस्लम खान यांच्या मते...

  • जर सोबत तुम्हाला मूल असेल तर त्याला घरी घेऊन जा. जर तुम्हाला कुत्रा चावला असेल तर तुम्हीही घरी जा.
  • नळाचे पाणी सोडा आणि कुत्रा चावलेली जागा धुवा.
  • यामुळे रक्त गोठणार नाही. कुत्रा चावल्यामुळे शरीरात प्रवेश केलेला विषाणू मोठ्या प्रमाणात बाहेर येईल.
  • थोड्या वेळाने त्या जागेवर साबण लावून पाण्याने धुवा. रक्त बाहेर येऊ द्या. हे 15-20 मिनिटे करा.
  • आता तो भाग स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि कोणत्याही प्रकारची क्रीम लावू नका.
  • थेट जवळच्या डॉक्टर किंवा आरोग्य केंद्रात जा. डॉक्टरांकडून उपचार करा.
  • जर तुम्ही कुत्र्यावर लक्ष ठेवू शकत असाल तर 10 दिवस ठेवा. जर त्याला रेबीज झाला तर तो 10 दिवसात मरेल. नाही तर तो जिवंत असेल.
  • कुत्र्याच्या मृत्यूबद्दल डॉक्टरांना कळवा. ही गोष्ट उपचारात उपयोगी पडेल.

प्रश्न : कुत्रे पाळताना कोणती खबरदारी घ्यावी?

उत्तर: खालील 7 सावधगिरी बाळगा-

  1. त्याच्या झोपेपासून ते खाण्यापर्यंतची जागा स्वच्छ ठेवावी.
  2. पिण्यासाठी नेहमी ताजे पाणी द्या, यामुळे तो लवकर आजारी पडणार नाही.
  3. आपल्या कुत्र्याला वेळोवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तपासा.
  4. कुत्र्याचे वजन उंची आणि जातीनुसार असावे.
  5. त्याने आळशी होऊ नये, यासाठी त्याने व्यायाम करणे आवश्यक आहे.
  6. त्याच्याशी संवाद साधा, यामुळे तुमचा आणि तुमच्या कुत्र्यामध्ये चांगला संबंध निर्माण होईल.
  7. त्यांचे केस आणि नखे नेहमी कापून घ्या.

कुत्रा खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा

  • पाळीव प्राण्यांच्या दुकानाऐवजी कुत्रा ब्रीडरकडून कुत्रा विकत घ्या.
  • शुद्ध जातीचा कुत्रा घ्या, संकरित कुत्रे धोकादायक असतात.
  • क्लब प्रमाणपत्र आणि मायक्रो चिप तपासा, हे त्याचे कौटुंबिक इतिहास काय आहे आणि तो मानवांसाठी सुरक्षित आहे की, नाही हे सांगते.
  • लसीकरणाची काळजी घ्या. योग्य आहार द्या, कुत्र्याला अंधारात ठेवू नका, त्याला लोकांची सवय लावा.
  • महापालिकेचे प्रमाणपत्र लोक ठेवत नाही, पण ठेवायला हवे.

अखेरसी पण महत्तवाचे

रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न देणाऱ्या लोकांना फैज मोहम्मद खान सल्ला देतात की, त्यांनी रस्त्यावरच्या या कुत्र्यांना अन्न देऊ नये. त्यापेक्षा घरात पाळीव कुत्र्याप्रमाणे ठेवा आणि त्याला खायला द्या. कारण तुम्ही लहानपणी त्यांना अन्न देता. मग ते मोठे झाल्यावर त्या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला रस्त्यावरचे कुत्रे आवडत असतील तर त्यांना रस्त्यावर सोडू नका तर त्यांना प्रेमाने घरी ठेवा.

कामाची गोष्टमध्ये आणखी काही लेख वाचा:

IRCTC च्या ट्विटर हँडलवर पोस्ट केले ट्रेनचे तिकीट:खात्यातून गहाळ झाले 65,000 रुपये, ही चूक तुम्ही करू नका

तुम्हाला प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर ट्विट करण्याची सवय असेल तर सावध व्हा. ट्विट करणे चुकीचे नाही, पण चुकीच्या पद्धतीने आणि घाईने ट्विट करणे तुम्हाला धोक्यात आणू शकते. वास्तविक मुंबईच्या एम एन मीना यांना भुज येथे जायचे होते. त्यांनी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन तिकीट बुक केले. मीनाला आरएसी तिकीट मिळाले. आयआरसीटीसीच्या ट्विटर हँडलला टॅग करत त्यांनी त्यांच्या सीटबद्दल काही माहिती विचारली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 65 हजार रुपये गायब झाले. पूर्ण बातमी वाचा...

TTE ने लाथा मारल्या:आपत्कालीन स्थितीत तिकीट मिळाले नाही किंवा द्वितीय श्रेणीत चढले तर अधिकार कोणते?

ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करण्याबाबत काय नियम आहेत, आपत्कालीन परिस्थितीत तिकीट खरेदी करता येत नसेल तर काय करता येईल हे जाणून घेणार आहोत. यासह, अशा प्रकरणांमध्ये तुमची तक्रार कशी नोंदवायची याची माहिती तुम्हाला मिळेल. पूर्ण बातमी वाचा...

झोपेत गुदमरून मृत्यू:बंद खोलीत शेकोटी पेटवल्याने विषारी वायू रक्तात मिसळण्याची शक्यता, निष्काळजीपणामुळे धोका

थंड हवामानात शेकोटी, शेगडी किंवा हीटर लावणे सामान्य आहे. यामुळे नक्कीच उबदार वाटते, परंतु थोडासा निष्काळजीपणा जीव धोक्यात आणू शकतो. यामुळे गुदमरल्यासारखे होऊ शकते. कामाची गोष्टमध्ये आपण शेकोटी किंवा सिगडीबद्दल बोलूयात, जाणून घ्या कोणत्या प्रकारचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरतो. पूर्ण बातमी वाचा..

बातम्या आणखी आहेत...