आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • I Could Not See, Accepted Every Challenge, Lived Happily And Overcame Life's Challenges; The Story Of Blind Shrikant Who Set Up A Company Worth Rs 500 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणा:मी पाहू शकत नव्हतो, प्रत्येक आव्हान स्वीकारले, आनंदी राहून आयुष्यातील आव्हानांवर केली मात; 500 कोटींची कंपनी उभी करणारे दृष्टिहीन श्रीकांत यांची कहाणी

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नशीब वगैरे काहीही नसते, मानवी प्रयत्नांतूनच आपले नशीब घडते - श्रीकांत

माझा जन्मच आव्हानांसह सुरू झाला. मी प्रत्येक आव्हान स्वीकारले. त्यामुळे मार्ग सोपा झाला. १९९१ मध्ये आंध्र प्रदेशच्या सीतारामपुरममध्ये शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. मी जन्मत: दृष्टिहीन होतो.

तिसरीत असताना शाळेतून काढण्यात आले. त्यामुळे मी हैदराबादच्या अंध शाळेत गेलो. तिथे दहावीपर्यंत टॉपर होतो. दहावीनंतर सायन्सला प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. मी शिक्षिकेच्या मदतीने कोर्टात गेलो आणि जिंकलो. मी ९२% गुणांसह १२ वी उत्तीर्ण झालो आणि राज्य शिक्षण मंडळात सायन्स घेऊन १२ वी उत्तीर्ण झालेला पहिला दृष्टिहीन विद्यार्थी ठरलो. १२ वीनंतर अमेरिकेच्या एमआयटीत प्रवेश मिळाला. परतल्यावर हैदराबादच्या एका लहान खोलीतून कंपनी सुरू केली. २३ व्या वर्षी मी बोलँट कंपनीचा सीईओ झालो. आता २९ वर्षांचा आहे. ही कन्झ्युमर फूड पॅकेजिंग कंपनी ५०० कोटींची आहे. तिथं ७०% लोक दिव्यांग आहेत. ‘भास्कर’ने ५ वर्षांपूर्वी श्रीकांत यांच्याशी संवाद साधला होता तेव्हा कंपनीचे मूल्य ५० कोटी रुपये होते.

नशीब वगैरे काहीही नसते, मानवी प्रयत्नांतूनच आपले नशीब घडते

> नशीब वगैरे काहीही नसते, माणसालाच सर्व प्रयत्न करावे लागतात. देव प्रत्येकाला पाया देतो, पण आपले नशीब आपल्यालाच बनवावे लागते.

> लोक ‘नाही’ म्हणायचे, तर मी ‘हो’ म्हणत असे. लोकांचे टोमणे आणि नकारात्मकतेचे रूपांतर मी संधीत केले.

बातम्या आणखी आहेत...