आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Idea Came From YouTube, Started Packing Spices From One Room In The House, Now Earning 45 Thousand Every Month

आजची पॉजिटिव्ह बातमी:यूट्यूबवर व्हिडिओ पाहून सुचली आयडीया, शेजाऱ्यांकडून उधार पैसे घेऊन घरीच सुरू केला मसाले पॅकिंगचा व्यवसाय; दर महिन्याला कमवतात 45 हजार रुपये

जयपूर22 दिवसांपूर्वीलेखक: अक्षय बाजपेयी
  • कॉपी लिंक

जयपूरच्या अमित कुमार पारीक यांच्याकडे कोणतेच काम नव्हते. पैसे कसे कमवावे, याच विचारात अमित कुमार असायचे. यादरम्यान त्यांनी घरा शेजारी असलेल्या पवन पारीक यांच्या किराणा दुकानात मसाल्याचे पॅकेट पाहिले. त्या पॅकेटला पाहून अमित पवनला नेहमी म्हणायचे, यार मी या मसाल्याच्या मार्केटिंगचे काम सुरू करतो. यासोबतच अमित यूट्यूबवर व्यवसाय करण्याच्या विविध पद्धती पाहायचे. यादरम्यान त्यांना कामकाजी डॉटकॉम नावाच्या एका यूट्यूब चॅनेलवर मसाले पॅकिंगचे काम दिसले. अमितने चॅनेलमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल केला. त्यानंतर समोरुन त्यांना या कामाची संपूर्ण माहिती देण्यात आली आणि सोबतच जयपूरमध्ये ब्लिस्टर पॅकिंग मशीन सप्लाय करणाऱ्याचा नंबर दिला.

अमित त्या सप्लायरकडे गेल्यावर कळाले की, ही पॅकिंग मशीन 65 हजार रुपयांची आहे. या मशीनमध्ये एका तासात सव्वाशे ते दिडशे पॅकेट तयार होतात. अमितने सर्व माहिती घेतली होती, त्यांच्याकडे सप्लायरचे नंबर आणि कामाचे स्वरुप माहित होते. पण, अडचण होती ती, पैशांची. अमितकडे फक्त 10 हजार रुपये होते. यानंतर त्यांनी आपले नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे उसणे घेऊन मशीन विकत घेतली. मशीनसोबत कम्प्रेशरदेखील आले. आता पॅकिंग मटेरियल खरेदी करायचे होते. यात ब्लिस्टर (ज्यात मटेरियरल भरले जाते) आणि त्याला पॅक करण्यासाठी पेपरची गरज होती. यानंतर अमित यांनी आपल्या मुलाच्या नावे हे पेपर प्रिंट केले.

एका पेपरची प्रिंटिंग कॉस्ट 2 रुपए 55 पैसे होती. तर, एका ब्लिस्टर शीटची किंमत साडे चार रुपये होती. इथे परत एक अडचण आली, ती म्हणजे मॅन्युफॅक्चररने म्हटले की, 4-4 हजार पीसची ऑर्डर द्यावी लागेल, तेव्हाच काम मिळेल. अमित यांनी परत काही मित्रांकडून पैशांची मदत घेतली आणि 30-35 हजारांचे सर्व सामान खरेदी केले. अशा प्रकारे काम सुरू करण्यापूर्वी 90-95 हजार रुपयांचा खर्च आला.

आता पॅकिंग मशीन आणि पेपर आणला होता, पण त्यासाठी लागणारे मटेरियल आणले नव्हते. अमित यांनी लवंग, इलायची, सुंठ, काळी मिर्ची, बदाम, किशमिशसारखे प्रोडक्ट्स पॅक करण्याचा विचार केला. मटेरियलमध्ये अमितची मदत त्यांचा शेजारी अग्रवाल यांनी केली. त्यांनी अमितला किती मटेरियल भराचे आणि कसे भरायचे याची संपूर्ण माहिती दिली. यानंतर अमित यांनी घरीच पॅकिंगचे काम सुरू केले. यात अमितला त्याच्या आई-वडील, मुलगा आणि पत्नीने मदत केली.

प्रोडक्ट विकण्यासाठी मार्केटमध्ये गेले नाही

विशेष म्हणजे अमित आपले प्रोडक्ट्स विकण्यासाठी कधीच मार्केटमध्ये गेले नाही. त्यांनी फक्त आपल्या आसपासच्या लोकांना सांगितले की, माझ्याकडे प्रोडक्ट आहेत आणि कुणाला मार्केटिंग करायची असेल, तर सांगा. सुरुवातील एक-दोन सेल्समन आले. सेल्समनसोबत त्यांनी 10 रुपये कमीशन ठरवले. अमित यांनी सांगितले की, मी पॅकेट अशा पद्धतीने तयार केले, ज्यामुळे मला 5-7 रुपयांचा आणि डोअर टू डोअर जाणून पॅकेट विकणाऱ्या सेल्समनला 10 रुपयांचा फायदा होईल. सुरुवातीच्या 2-3 महिने शंभर सव्वाशे पॅकेट विकल्या गेले, नंतर हळू-हळू याची संख्या वाढली. लॉकडाउमध्ये खूप काम मिळाले, पॅकेटची संख्या चारशेपर्यंत गेली.

अमित यांनी सांगितले की, मागील दिड वर्षापासून सरासरी 40 ते 45 हजार रुपये महिना कमाई होत आहे. अमित यांनी आता भांडे धुवायचे स्क्रबर बनवण्याची मशीनदेखील घेतली आहे. याची पॅकिंग मसालेच्या मशीनने होते. ज्यांच्याकडून उधार पैसे घेतले, त्यांचे पैसे परत केले. आता अमित यांच्याकडे स्वतःची मशीन आहे. आता मटेरियल मार्केटमध्ये जाणे सुरू झाले आहे.