आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊन काळात चेकपोस्टवर बंदोबस्तावर असताना शहराबाहेर असलेल्या पालावर लक्ष गेले. दोन वेळच्या भाकरीसाठी गावोगावी फिरणारा हा भटका समाज आजही शिक्षणापासून वंचित आहे. त्यामुळेच समाजातील या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहाेचावे अशी इच्छा महिला पोलिस कर्मचारी संगीता ढोले यांना झाली. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी पालावरच्या या मुलांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले.
वाशीम, शेलूबाजार फाटा, शहराजवळील भागात दिसणारे हे पाल पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणाऱ्या समाजाचे. पोलिस दलातील कर्तव्य बजावून फावल्या वेळेत ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य त्या करीत आहेत. दररोज सकाळी ८ ते १० असे दोन तास त्या पालावरील सुमारे ३० मुला-मुलींना शिकवतात. पोलिस खात्यात लॉकडाऊनदरम्यान चेकपोस्टजवळ असलेल्या पालावर संगीता यांचे लक्ष गेले आणि तिथे असलेल्या अशिक्षित शाळाबाह्य मुलांना पाहिल्यानंतर त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन स्वखर्चाने त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचे ढोले यांनी ठरवले. मुलांना अक्षरओळख होऊन आता बाराखडी, एबीसीडीचीही ओळख झाली. शमुलांना शिक्षण मिळाल्याने हा समाज सुधारेल, अशी आशा पालकांना लागली. विशेष म्हणजे संगीता ढोले यांनी शैक्षणिक साहित्यावर आजपर्यंत ५० हजार रुपये खर्च केले आहेत.
सहा महिन्यांपासून मुलांना ज्ञानदान
संगीता ढोले ही मागील सहा महिन्यांपासून मुलांना ज्ञानदान करत आहे. आम्ही सर्व तिच्यासोबत असून तिला वेळोवेळी मदत करण्याची तयारी आहे. - योगिता भरद्वाज, ठाणेदार, शहर पोलिस ठाणे
मुले शिक्षण घेऊन स्वावलंबी होतील
ढोले या रोज येतात व आमच्या मुलांना शिक्षण देतात. आमचे आयुष्य तर गावोगावी भटकंती करण्यातच गेले. पण ढोलेंच्या प्रयत्नामुळे त्यांना अक्षराची ओळख चांगल्या प्रकारे होईल. -शेषराव चव्हाण, पालक. संगीता ढोलेंच्या
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.