आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • If US Presidential Election Is Fair And Russia Does Not Intervene, Then Trump's Defeat Is Certain: Prof Alan Listman

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर मुलाखत:अमेरिकेची राष्ट्रपती निवडणूक नि:पक्ष झाली आणि रशियाने हस्तक्षेप केला नाही तर ट्रम्प यांचा पराभव निश्चित : प्रा. लिस्टमॅन

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रपती निवडणुकीत रिगन ते ट्रम्प यांच्यापर्यंत केली होती अचूक भविष्यवाणी

अमेरिकेची निवडणूक नि:पक्ष झाली अन् रशियाने हस्तक्षेप केला नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित आहे, हे म्हणणे आहे प्रा. अॅलन लिस्टमॅन यांचे. ते ४० वर्षांपासून अमेरिकेच्या निवडणुकीची अचूक भविष्यवाणी करत आहेत. अमेरिकी निवडणूक आणि त्यांच्या भविष्यवाणीच्या मॉडेलवर लिस्टमॅन यांच्याशी रितेश शुक्ला यांनी चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेचा संपादित भाग...

> तुम्ही प्रथमच भविष्यवाणीत जर-तर हे शब्द का वापरले ?

होय, ते खरे आहे. रिगन यांच्यापासून ट्रम्पपर्यंत ९ राष्ट्रपतींबाबत मी अचूक भविष्य वर्तवले होते, तेही जर-तरशिवाय. माझी भविष्यवाणी वैज्ञानिक मॉडेलवर आधारित आहे. तीत सुशासनाशी संबंधित १३ मानकांवर उमेदवारांचे परीक्षण होते. अमेरिकेच्या निवडणुकीत सुशासनाची कमतरता प्रचारापासून वेगळी केली जाऊ शकत नाही. पण ही निवडणूक वेगळी आहे.

> ही निवडणूक वेगळी का वाटते?

अमेरिकेत नेहमीच सत्ताबदल शांततेत झाला आहे. मतदारांनी कधीही दबावात मतदान केले नाही. कुठल्या देशाचा हस्तक्षेपही नसतो. पण २०२० ची निवडणूक त्याला अपवाद ठरू शकते.

> तुमच्या १३ मानकांपैकी किती मानकांवर ट्रम्प उत्तीर्ण ठरत नाहीत?

१३ मानकांपैकी सहा मानकांवर उमेदवार उत्तीर्ण ठरत नसेल तर व्हाइट हाऊसमध्ये भूकंप येणे निश्चित आहे. या वेळी १३ पैकी ७ मानकांमध्ये ट्रम्प उत्तीर्ण ठरले नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांचा पराभव निश्चित आहे. २०१९ च्या अखेरपर्यंत ४ मानके ट्रम्प यांच्याविरोधात होती, ती आता ७ झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...