आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टवजन जास्त असेल तर आई होण्यात धोका:टाळायला असेल तर नातेवाईक, शेजारांचा नव्हे तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

काजल ही उच्च रक्तदाबाची रुग्ण आहे. यामुळे, तिला भेटणारा प्रत्येकजण सांगतो की, तुला आई बनण्यास त्रास होईल. आज दोन वर्षांनी तीची आणि स्नेहाची भेट झाली. स्नेहाला लहानपणापासूनच मधुमेह आहे, त्यामुळे गर्भधारणा न होण्याचा धोका जास्त होता. सहा महिन्यांपूर्वी तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला. एकंदरीत ही जास्त धोकायदाय गर्भधारणा आहे काय? हाय रिस्क प्रेग्नेंसीमुळे आईचा जीव जाऊ शकतो का, काजल आणि स्नेहाच्या या संवादातून समजून घ्या या सगळ्या गोष्टी...

स्नेहा- तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे गेलात का?

काजल- नाही अजून नाही.

स्नेहा- मग तुला कोणी सांगितले आहे की, तुझ्या गर्भधारणेला जास्त धोका असेल.

काजल - घरच्यांनी आणि मला हाय ब्लडप्रेशर असल्याचे माहिती आहे, कुटुंबातील अशा सदस्यांनी.

स्नेहा – मला पण डायबिटीज आहे, तुला आठवते का कॉलेज मध्ये देखील मी इन्सुलिन घ्यायचे. मुलाच्या जन्माच्या वेळी मी देखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. मग डॉक्टरांनी जे सांगितले तेच केले, तेच खाल्ले आणि आज माझे बाळ माझ्यासोबत आहे.

काजल - ते सर्व ठिक आहे, मला सांग हाय रिस्क प्रेग्नेंसी म्हणजे काय?

स्नेहा- जेव्हा एखाद्या महिलेला आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे गर्भधारणेमध्ये धोका असतो, तेव्हा त्याला जास्त धोका गर्भधारणा किंवा हाय रिस्क प्रेग्नेंसी असे म्हणतात.

 • या काळात महिलांना सामान्य गर्भधारणेपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते.
 • अशा स्थितीत बालकांनाही अनेक आजारांचा धोका असतो.
 • महिलांमध्ये, गर्भधारणेनंतरच्या स्थितीमुळे याचा धोका असतो.
 • काहींमध्ये गर्भावस्थेतील मधुमेह, एचआयव्ही, लठ्ठपणा यासारख्या समस्यांमुळे.

काजल- स्नेहा तु मला उच्च जोखमीच्या गर्भधारणेची लक्षणे सांगू शकतेस का?

स्नेहा- मला जास्त माहिती नाही, पण मी जेवढे माहिती आहे, तेवढे सांगते, त्या नंतर डॉक्टरांना भेटल्यावर सविस्तर माहिती मिळेल. कारण डॉक्टरांनी माझ्या बाबतीत सांगितले की, प्रत्येक गर्भवती महिलेला वेगवेगळी लक्षणे असू शकतात. मला खूप दिवसांपासून पोटदुखी, अस्वस्थता, ताप अशा काही समस्या होत्या. आपण तीच चूक करतो की, आपण डॉक्टरकडे जाण्याऐवजी शेजारी, नातेवाईक आणि मित्रांच्या सल्ल्यानुसार वागतो. मी तुला अशी चूक करू देणार नाही.

उच्च जोखीम असलेल्या गर्भधारणेमध्ये अकाली प्रसूतीचा धोका असतो का?

डॉ. वैशाली जोशी यांच्या मते, होय, प्री-मॅच्युअर डिलिव्हरीचा धोका उच्च जोखमीच्या गर्भधारणेत राहतो. जर बाळाचा जन्म 37 आठवड्यांपूर्वी झाला असेल तर त्याला प्री-मॅच्युअर डिलिव्हरी म्हणतात. इन्फेक्शन, हायपरटेन्शन, अ‍ॅनिमिया, गर्भाशयात जुळी मुलं, जास्त रक्तस्त्राव हे सर्व वेळेआधी प्रसूतीचे कारण बनू शकतात.

उच्च जोखमीची गर्भधारणा टाळण्यासाठी या 7 गोष्टी लक्षात ठेवाव्यात...

 • गर्भधारणेच्या प्रत्येक टप्प्यावर सावध राहा.
 • वेळेवर डॉक्टरांची तपासणी करून घ्या.
 • उच्च धोका असलेल्या गर्भधारणेच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
 • तुम्हाला उच्च रक्तदाब, थायरॉईड किंवा मधुमेह असल्यास, गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • तुम्ही आधीच कोणतीही औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
 • निरोगी जीवनशैली ठेवा, रात्री उशिरापर्यंत जागू नका.
 • दारू, सिगारेट यांसारख्या अमली पदार्थांपासून दूर राहा.

स्रोत- डॉ. रितू गोयल, स्त्रीरोगतज्ज्ञ, दिल्ली

उच्च जोखमीच्या गरोदरपणात नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?

डॉ. रितू गोयल म्हणाल्या की, होय, हे अगदी शक्य आहे. यासाठी आईला स्वतःची योग्य काळजी घ्यावी लागते. डॉक्टरांकडून वेळेवर तपासणी केली जाईल. जर तुम्हाला बीपी किंवा मधुमेह असेल तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, डाएट चार्ट फॉलो करा. मानसिक समस्या असल्यास विलंब न करता डॉक्टरांकडे जाण्यास अजिबात संकोच करू नका.

स्नेहा- हे समजून घ्यावे लागेल की उच्च जोखमीच्या गर्भधारणेसाठी वेगळे औषध नाही. डॉक्टरांनी दिलेला आहार जोखीम कमी करतो.

काजल- हो, आज मी तुला भेटले नसते तर मला फार काही कळले नसते.

स्नेहा- तु देखील वेळोवेळी डॉक्टरांकडे जा आणि सकारात्मक राहा.

काजल- हो आता मी प्रेग्नेंसीसाठी तयार आहे. मानसिक तणावापासून दूर राहीन.

स्नेहा- चल आता निघते आणि हो, लवकरच आनंदाची बातमी ऐकव.

अखेरीस पण महत्त्वाचे

नुकतीच मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका कॅन्सरच्या रुग्णाची हाय रिस्क डिलिव्हरी झाली. महिलेला कोलन कॅन्सर आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये इंदूरमधील एका खासगी रुग्णालयात कर्करोगावरील शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर डॉक्टर उपचारासोबतच नियमितपणे केमोथेरपी देत होते. तब्बल दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत महिला आणि बालक दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. डॉक्टरांनी तातडीची औषधे देऊन त्याला स्थिर केले आणि शस्त्रक्रिया केली. प्रसूतीनंतर, महिला आणि नवजात दोघेही निरोगी आहेत.

बातम्या आणखी आहेत...