आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • IIT, NIT Students Offer Free Online Tuition To Children Up To 12th Standard; Siblings With Engineering Started Tune With Friends

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवोन्मेष:आयआयटी, एनआयटीचे विद्यार्थी 12 वीपर्यंतच्या मुलांना मोफत देताहेत ऑनलाइन ट्यूशन; इंजिनिअरिंगला असलेल्या भावा-बहिणीने मित्रांसोबत सुरू केली ट्युऑन

अनिरुद्ध शर्मा | दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेईई, ऑलिम्पियाड, एनटीएसई या परीक्षांचीही करवून घेत आहेत तयारी
  • आठवड्यात 3 दिवस एक तासाचा क्लास, 50 विद्यार्थ्यांना लाभ

आयआयटी दिल्ली, मुंबई, गुवाहाटी आणि काही एनआयटीचे २५ विद्यार्थी रिकाम्या वेळेत ७ वी ते १२ वीपर्यंतच्या मुलांची मोफत ऑनलाइन ट्यूशन घेत आहेत. त्यांनी ट्युऑन नावाने वेबसाइट तयार केली आहे, तेथे इच्छुक विद्यार्थी नोंदणी करून कोणत्या विषयाची ट्यूशन हवी हे सांगू शकतात. वेबसाइटवर ७ वी ते १० वीपर्यंतच्या मॅथ्स आणि सायन्स तसेच ११ वी-१२ वीच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्यच्या मोफत ट्यूशनसाठी अर्जाचा पर्याय दिला आहे. त्याशिवाय जेईई, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्ससी ऑलिम्पियाड आणि एनटीएसई यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठीही मोफत कोचिंगची सुविधा आहे.

इंजिनिअरिंगला असलेले अभिषेक व अनिता भारती या भाऊ-बहिणीला महामारीच्या काळात गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची ही कल्पना सुचली. अभिषेक जादवपूर विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर अनिता पाटणा येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहे. त्यांनी देशातील विविध आयआयटी व एनआयटीत शिकत असलेल्या मित्रांशी चर्चा केली, त्यांनीही सहमती दर्शवली. त्यानंतर सप्टेंबरअखेरीस त्यांनी ट्युऑन वेबसाइट सुरू केली.

अभिषेकने सांगितले की, लॉकडाऊनमध्ये ज्युनियर्स व त्यांच्या पालकांच्या आग्रहावरून ऑनलाइन अॅपद्वारे वर्ग घेतल्याने आत्मविश्वास वाढला. आमच्यासोबत आयआयटी दिल्ली, मुंबई आणि गुवाहाटीसह विविध एनआयटीचे २५ मित्रही आले. आयआयटी दिल्लीतील प्रॉडक्शन इंजिनिअरिंगचा विद्यार्थी उत्कर्ष बन्सल याने सांगितले, ‘आम्ही सर्वजण रिकाम्या वेळेत मुलांना ट्यूशन देतोे आणि आमचा अभ्यासही करतो.’ तो एनटीएसईचा स्कॉलरही आहे.

आठवड्यात ३ दिवस एक तासाचा क्लास, ५० विद्यार्थ्यांना लाभ

नोंदणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याची एका विषयाची आठवड्यात तीन दिवस प्रत्येकी एक तासाचा क्लास घेतला जातो. एका क्लासमध्ये ५ ते ८ विद्यार्थी असतात. आयआयटी, जेईई, अॉलिम्पियाडच्या तयारासीठी वेगवेगळ्या बॅच आहेत. सध्या ५० विद्यार्थी मोफत ट्यूशन घेत आहेत.