आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Immunity Can Remain For Life After Vaccine In People Who Have Been Cured Of Corona, Booster Dose Will Not Be Needed

इम्युनिटीसाठी लस गरजेची:व्हॅक्सीन घेतल्यानंतर आयुष्यभर रोग प्रतिकारशक्ती राहू शकते चांगली, बूस्टर डोसची गरज भासणार नाही

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका वर्षापूर्वी कोरोना झालेल्या रुग्णांचा अभ्यास या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे

कोरोना झाल्यानंतर किती दिवस पुन्हा इंफेक्शन होणार नाही ? मी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत, किती दिवस मी सुरक्षित असेल ?

कोरोनाशी संबंधित या प्रश्नांची उत्तरे अमेरिकेने शोधली आहेत. काही दिवसांपूर्वीच सायंस जर्नल नेचरमध्ये छापून आलेल्या दोन अभ्यासांमध्ये सांगितल्यानुसार, कोरोनाविरोधात रोग प्रतिकारशक्ती कमीत-कमी एका वर्षापासून जास्तीत-जास्त आयुष्यभर राहू शकते. तसेच, ही इम्युनिटी व्हॅक्सीनंतर अजून चांगली होते.

कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांना बूस्टर डोसची गरज नाही

दोन्ही अभ्यासातून समोर आले आहे की, कोरोनातून ठीक झालेल्या आणि लस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोसची गरज नाही. पण, ज्यांना कोरोनाचे संक्रमण कधीच झाले नाही किंवा संक्रमण होऊनही रोग प्रतिकारशक्ती चांगली बनली नाही, अशांना बूस्टर डोसची गरज आहे. अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.एका वर्षापूर्वी कोरोना झालेल्या रुग्णांचा अभ्यास या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

अॅंटीबॉडीज व्हायरसला लक्षात ठेवणाऱ्या पेशी तयार करतात

-वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीचे जैक्सन एस टर्नर, एलिजावेता कालाइदिना, चार्ल्स डब्ल्यू गॉस यांच्या पहिल्या रिपोर्टनुसार, व्हायरसला लक्षात ठेवणाऱ्या पेशी बोन मॅरो म्हणजेच हाडांच्या आत स्पंजप्रमाणे टिशूमध्ये असते आणि गरज पडल्यावर शरीरात अँटीबॉडी तयार करते.

-बायोलॉजी रिसर्च वेबसाइट BioRxiv वर ऑनलाइन पोस्ट केलेल्या दुसऱ्या रिसर्चनुसार, B सेल्स नावाच्या या पेशी इन्फेक्शन झाल्यानंतर कमीत कमी 12 महीने अॅक्टीव्ह असते.

कोरोना संसर्ग किंवा लसीकरणानंतर बनलेली इम्यूनिटी अनेक दिवस राहते
यूनिव्हर्सिटी ऑफ पेंसिल्वेनियामध्ये इम्यूनोलॉजिस्ट स्कॉट हेन्सले सांगतात की, दोन्ही रिसर्च पेपर सतत समोर येत असलेल्या त्या रिसर्चशी मिळते-जुळते आहेत, जे सांगतात की, कोरोना इंफेक्शन किंवा लसीकरणातून तयार झालेली इम्युनिटी अनेक दिवस अॅक्टीव्ह असते.

B cells बूस्टर डोसशिवाय व्हायरसशी सामना करतात

न्यूयॉर्कच्या रॉकफेलर यूनिव्हर्सिटीच्या इम्यूनोलॉजिस्ट मिशेल नसनवेग सांगतात की, कोरोना इंफेक्शनमुळे आणि लसीकरणामुळे तयार झालेल्या B सेलमध्ये इथकी ताकत असते, की बूस्टर डोसशिवाय व्हायरसला नष्ट करू शकते. रॉकफेलर यांनी पेशींच्या मेमोरी मेचुरेशनवर अभ्यास केला आहे.

कोरोना न झालेल्यांना व्हॅक्सीननंतर बूस्टर डोसची गरज

डॉ. नसनवेग सांगतात की, नैसर्गिक रित्या तयार झालेली इम्युनिटी आणि त्याच्या जोडीने मिळालेली व्हॅक्सीनची पॉवर व्हायरसशी सामना करण्यास सक्षम आहे. पण, ज्यांना कधीच कोरोना झाला नाही, त्यांना व्हॅक्सीन घेतल्यानंतरही बूस्टर डोस घ्यावा लागेल. तेव्हाच त्यांच्यात हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते.

आयुष्यभर राहू शकतात अँटीबॉडीज

2007 मध्ये झालेल्या एका ऐतिहासिक अभ्यासातून समोर आले की, अँटीबॉडी अनेक दशके शरीरात राहू शकते. डॉ. नसनवेगच्या टीमने याला जवळून पाहिले आणि वेळेनुसार B cells कशाप्रकारे परिपक्व होतात,यावर अभ्यास केला. अभ्यासकांनी एका वर्षापूर्वी कोरोना झालेल्या 63 लोकांच्या रक्ताचा अभ्यास केला. अनेकांमध्ये एका वर्षानंतर माइल्ड सिम्टम आढळले. पण, त्यांना यामुळे जीवाचा धोका नाही.

बातम्या आणखी आहेत...