आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरपाकिस्तान लष्कराने सांडले त्यांच्याच नेत्यांचे रक्त:आधी पंतप्रधानांच्या छातीत नंतर बेनझीर भुट्टोच्या डोक्यात गोळी

नीरज सिंहएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

पाकिस्तानात लाँग मार्च काढणारे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 3 नोव्हेंबर रोजी हल्ला झाला. गोळी त्याच्या पायाला लागली आणि ते वाचले. या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानी लष्करावर केला जात आहे. कारण इम्रान यांना सत्तेवरून हटवल्यानंतर ते सतत पाकिस्तानच्या लष्कराला टार्गेट करत आहेत.

पाकिस्तानी लष्करावर आरोप करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. 71 वर्षांपूर्वी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या हत्येत पाकिस्तानी लष्कराचे नाव पुढे आले होते. त्याच वेळी, 2007 मध्ये बेनझीर यांच्या हत्येप्रकरणी, जनरल परवेझ मुर्शरीफ, जे स्वत: पाकिस्तान लष्कराचे प्रमुख होते, त्यांनी लष्कराचा हात असल्याचे मान्य केले होते. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही आज पाकिस्तानमधील राजकीय हत्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या हत्यांचे आरोप लष्करावर लावण्यात आले होते....

लियाकत अली खान : प्रेक्षकांनी भरलेल्या सभागृहात छातीत गोळी झाडली

काय सुरू होते

ही घटना 1947 मधील आहे. भारताचे दोन तुकडे झाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी लियाकत अली खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनले. लियाकत हे महंमद अली जिना यांनी केलेली निवड होते. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीरमधील युद्ध आणि बलुचिस्तानमधील संघर्षानंतर लियाकत अली यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले.

लियाकत अली आणि पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिना यांच्यातील संबंध 1947-48 या काळात बिघडू लागले. वरिष्ठ लष्करी नेतृत्व आणि स्वतः जिना यांनी लियाकत सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान, 1948 मध्ये जिना यांचे निधन झाले. जिनांनंतर लियाकत आता मुस्लिम लीगचे सर्वात मोठे नेते बनले.

1949 च्या उत्तरार्धात आणि 1950 च्या सुरुवातीस लियाकत यांना धार्मिक अल्पसंख्याकांच्या समस्येचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरे युद्ध होऊ शकते, असे वाटत होते. अशा वेळी लियाकत अली खान भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भेटले. यानंतर 1950 मध्ये लियाकत-नेहरू पॅक्टवर करार करतात. हा करार भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी होता.

5 ऑगस्ट 1947 रोजी कराचीमधील गव्हर्नर जनरल हाऊसच्या मैदानावर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर स्वाक्षरी करताना लियाकत अली खान.
5 ऑगस्ट 1947 रोजी कराचीमधील गव्हर्नर जनरल हाऊसच्या मैदानावर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर स्वाक्षरी करताना लियाकत अली खान.

इथूनच लियाकत अली आणि पाकिस्तानी लष्करात मतभेद निर्माण होऊ लागले. लियाकत्या यांचा कल भारताकडे झुकलेल्या मुत्सद्दीपणामुळे पाकिस्तानी लष्कराचा एक भाग संतप्त झाला होता. जिना यांच्या मृत्यूनंतर त्यांना सत्तेवरून दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पाकिस्तानचे चीफ ऑफ जनरल स्टाफ मेजर जनरल लष्कराच्या काही जनरलांनीही सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. त्याला रावळपिंडी षडयंत्र म्हणून ओळखले जाते. यानंतर लियाकत यांची मुस्लीम लीगवरील पकडही कमकुवत झाली.

हल्ल्याचा दिवस

तो 16 ऑक्टोबर 1951 चा दिवस होता. ठिकाण होते रावळपिंडीचे कंपनी गार्डन. मुस्लिम लीगची बैठक होणार होती. 1 लाखाहून अधिक लोकांची गर्दी जमली होती. सभेच्या ठिकाणी प्रमुख वक्ते येण्याची वाट पाहत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि मुस्लिम लीगचे नेते लियाकत अली खान मंचावर आले. जमाव टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करत होता. लियाकत यांच्या स्टेजसमोरच व्हीआयपी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था होती.

लियाकत यांनी बोलण्यासाठी माईक धरला आणि म्हणले की, ‘ऐ मेरे हमबिरादरो’. त्यानंतर जमावातून एकामागून एक दोन गोळ्या झाडल्या गेल्या . सभेत काही सेकंद शांतता पसरली. यानंतर गोळ्यांचा आवाज ऐकून चेंगराचेंगरी होते. पण मारेकऱ्यांच्या निशाणावर दुसरे कोणी नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान होते. सुरक्षा कर्मचारी काही करतील तो पर्यंत गोळ्या लियाकत अली यांच्या छातीत घुसल्या होत्या. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर सुरक्षा दलाच्या गोळ्यांनी मारेकरीही जागीच ठार झाला.

मृत पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या मृतदेहाजवळ बेगम राणा लियाकत अली खान (उजवीकडे)
मृत पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या मृतदेहाजवळ बेगम राणा लियाकत अली खान (उजवीकडे)

सैन्यावर संशयाचे कारण

 • पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ताबडतोब जाहीर केले की लियाकत यांचा मारेकरी सईद अकबर खान बाबरकझाई हा अफगाणिस्तानचा रहिवासी होता. मात्र, हत्येचे कारण सांगण्यात आले नाही.
 • त्याच वेळी, अफगाण सरकारने ताबडतोब प्रत्युत्तर दिले की, अकबरचे नागरिकत्व देशविरोधी कारवायांमुळे आधीच काढून घेण्यात आले होते आणि फाळणीपूर्वी, ब्रिटीश सरकारने त्याला ा उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतात (आता खैबर पख्तूनख्वा) निर्वासित दर्जा दिला होता.
 • काही दिवसांनंतर, NYT च्या एका कथेत सांगितले की पाकिस्तान सरकार अकबरला दरमहा 450 रुपये पोटगी देखील देत होते.
 • मारेकरी लियाकत अली यांच्या स्टेजसमोरच त्यांच्या सुरक्षेत उपस्थित असलेल्या सीआयडीच्या राखीव खुर्च्यांवर बसलेला होता, वास्तविक त्याचा आणि CID चा काहीही संबंधित नव्हता.
 • लियाकत यांना गोळी लागताच मारेकरी अकबरला जिवंत पकडण्याऐवजी गोळ्या घालून ठार केले गेले.
 • ऑगस्ट 1952 मध्ये, या घटनेच्या तपासात सामील असलेला एक प्रमुख अधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक नवाबजादा एतजाजुद्दी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
 • हा अपघात झाला तेव्हा लियाकत अली खान यांच्या मृत्यूशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे घेऊन ते कराचीला जात होते. पण हा पुरावाही जळून राख झाला.

बेनझीर भुट्टो: डोक्यात गोळी झाडल्यानंतर हल्लेखोराने स्वत:ला उडवले

काय सुरू होते

2007 मधील घटना आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो 8 वर्षांपासून अमेरिकेत निर्वासित जीवन जगत होत्या. त्यानंतर 25 सप्टेंबर 2007 रोजी बेनझीर यांना पाकिस्तानमधून फोन आला. त्यांना पाकिस्तानात परत ने येण्याची फोनवरून ताकीद दिली जाते. परत आल्यावर त्यांना काही झाले, तर जबाबदार त्यांचीच राहिल असे सांगण्यात आले.

वास्तविक, हा फोन करणारे दुसरे कोणी नसून पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ होते. तीन आठवड्यांनंतर बेनझीर पाकिस्तानात परतल्या. याआधी बेनझीर भुट्टो दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या, पण देशाच्या लष्कराने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन त्यांच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढले होते.

हल्ल्याचा दिवस

तो 27 डिसेंबर 2007 हा दिवस होता. रावळपिंडीच्या लियाकत बागेत 10 हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती. दुपारी 3.30 वाजता पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या अध्यक्षा बेनझीर भुट्टो रॅलीला संबोधित करण्यासाठी येथे पोहोचल्या. बेनझीर यांनी अर्धा तास रॅलीला संबोधित केले. भाषण संपताच संपूर्ण परिसर बेनझीर जिंदाबाद आणि बेनजरी वजीरे आझमच्या घोषणांनी दुमदुमून गेला.

बेनझीर भुट्टो डिसेंबर 2007 मध्ये लियाकत बाग, रावळपिंडी येथे रॅलीला संबोधित करताना.
बेनझीर भुट्टो डिसेंबर 2007 मध्ये लियाकत बाग, रावळपिंडी येथे रॅलीला संबोधित करताना.

भाषण संपवून सायंकाळी 5 वाजता बेनझीर त्यांच्या लँडक्रूझर गाडीत बसल्या. बेनझीर भुट्टो यांच्या गाड्यांचा ताफा नुकताच निघायला लागला होता की, याचदरम्यान मोठ्या संख्येने समर्थक लियाकत बाग गार्डनच्या गेटवर पोहोचले आणि ढोल ताशांच्या गजरात बेनझीर भुट्टो यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. गर्दी पाहून बेनझीर उभ्या राहिल्या आणि कारच्या आपत्कालीन हॅचमधून त्यांचे डोके आणि खांदे दिसत होते.

बेनझीर भुट्टो 27 डिसेंबर 2007 रोजी त्यांच्या हत्येपूर्वी त्यांच्या कारमध्ये समर्थकांना अभिवादन करत आहेत.
बेनझीर भुट्टो 27 डिसेंबर 2007 रोजी त्यांच्या हत्येपूर्वी त्यांच्या कारमध्ये समर्थकांना अभिवादन करत आहेत.

दरम्यान, कारच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीने पिस्तूल काढले. तेवढ्यात एक सुरक्षा रक्षक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण काही सेकंदात तीन गोळ्या झाडल्या जातात. गोळी थेट बेनझीर यांच्या डोक्यात लागली. बेनझीर कारच्या सीटवर कोसळल्या. त्या खाली पडताच आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवले. या हल्ल्यात बेनझीरसह 25 जणांचा मृत्यू झाला होता.

27 डिसेंबर 2007 रोजी बेनझीर यांना गोळ्या घालण्यापूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्लेखोर गोळीबार करण्यात यशस्वी झाला होता.
27 डिसेंबर 2007 रोजी बेनझीर यांना गोळ्या घालण्यापूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्लेखोर गोळीबार करण्यात यशस्वी झाला होता.
हल्ल्यानंतर तालिबानी दहशतवाद्याने बॉम्बस्फोट करून स्वत:ला देखील उडवले.
हल्ल्यानंतर तालिबानी दहशतवाद्याने बॉम्बस्फोट करून स्वत:ला देखील उडवले.

सैन्यावर संशयाचे कारण

 • वास्तविक बेनझीर भुट्टो यांच्या हत्येत पाकिस्तानी तालिबानचा हात असल्याचे सांगितले जाते. पण 2017 मध्ये एका मुलाखतीत, पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कबूल केले होते की कदाचित बेनझीर भुट्टो यांच्या हत्येत इस्टॅब्लिशमेंटचा हात होता. पाकिस्तानात इस्टॅब्लिशमेंटचा वापर लष्करासाठी केला जातो.
 • त्याच मुलाखतीत, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, बेनझीर यांच्या हत्येसंदर्भात काही अराजक घटक पाकिस्तानी तालिबानच्या संपर्कात आहेत का, तेव्हा मुशर्रफ यांनी उत्तर दिले, हे शक्य आहे. कारण आपला समाज धार्मिक दृष्ट्या दुभंगलेला आहे. असे लोक त्याच्या हत्येचे कारण बनू शकतात.
 • माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्यावरही भुट्टो यांना पुरेशी सुरक्षा न दिल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करणारे सरकारी वकील चौधरी झुल्फिकार अली यांची 2013 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

पाकिस्तानमध्ये राजकीय हत्या सामान्य बाब, आणखी काही प्रकरणे पाहा...

मुर्तझा भुट्टो आणि शाहनवाझ भुट्टो: बेनझीरच्या भावांपैकी एकाला गोळ्या घालून, दुसऱ्याला विष दिले

मुर्तझा भुट्टो.
मुर्तझा भुट्टो.

बेनझीर भुट्टो यांचा मोठा भाऊ मीर मुर्तझा भुट्टो यांचीही सप्टेंबर 1996 मध्ये कराचीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुर्तझा यांच्या पत्नी आणि मुलांनी बेनझीर भुट्टो आणि त्यांचे पती आसिफ अली झरदारी यांच्यावर ही हत्या केल्याचा आरोप केला होता. 1985 मध्ये बेनझीर भुट्टो यांचे दुसरे भाऊ शाहनवाज भुट्टो यांची फ्रान्समध्ये विषप्रयोग करून गूढ परिस्थितीत हत्या करण्यात आली होती.

उमर असगर खान : माजी मंत्री सासरच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले

उमर असगर खान
उमर असगर खान

पाकिस्तानचे माजी मंत्री उमर असगर खान 2002 मध्ये गूढ परिस्थितीत सासरच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले होते. पोलिसांनी दावा केला होता की उमर असगर यांनी आत्महत्या केली होती, परंतु पोस्टमॉर्टम अहवाल आणि पुरावे हत्येकडे लक्ष वेधतात.

सलमान तासीर: आसिया बीबीला माफी देण्याबाबत बोलल्याने सुरक्षा रक्षकाने गोळी झाडली

सलमान तासीर.
सलमान तासीर.

4 जानेवारी 2011 रोजी पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांची त्यांच्या सुरक्षा रक्षक मुमताज कादरी याने इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्यावर गोळी झाडण्यात आली तेव्हा ते बाजारात त्यांच्या कारमध्ये होते.

तासीर यांनी ईशनिंदा केल्याप्रकरणी दोषी असलेल्या आसिया बीबी या ख्रिश्चन महिलेला माफी देण्याची मागणी केली. ईशनिंदा केल्याप्रकरणी आसिया बीबीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसिया बीबीला भेटण्यासाठी सलमान तासीर तुरुंगात देखीले गेले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण ईशनिंदा कायद्याबद्दलची त्यांची विरोधी वृत्ती होती असेही म्हटले जाते.

शाहबाज भट्टी : ईशनिंदा कायद्याविरोधातील ख्रिश्चन मंत्र्याची गोळ्या झाडून हत्या

शाहबाज भट्टी
शाहबाज भट्टी

मार्च 2011 मध्ये पाकिस्तानचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री शाहबाज भट्टी यांची तालिबानी बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. भट्टी यांचा वादग्रस्त ईशनिंदा कायद्याला विरोध होता. या कायद्याविरोधात त्यांनी अनेकदा आक्षेपही व्यक्त केला होता. त्यांना आधीच जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. भट्टी हे पाकिस्तानातील ख्रिश्चन समुदायातील पहिले मंत्री होते.

युसूफ रझा गिलानी: कारवर गोळ्या झाडल्या, पण ते तिथे नव्हते

युसूफ रझा गिलानी.
युसूफ रझा गिलानी.

2008 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. यादरम्यान त्यांच्या कारवर हल्लेखोरांनी हल्ला केला. मात्र ते गाडीत नसल्याने बचावले. युसूफ रझा गिलानी 2008 ते 2012 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते.

परवेझ मुशर्रफ: तीनदा हल्ले झाले, प्रत्येक वेळी वाचले

जनरल परवेझ मुशर्रफ
जनरल परवेझ मुशर्रफ

माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनाही मारण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले पण ते बचावले. 14 डिसेंबर 2003 रोजी, मुशर्रफ यांच्या ताफ्याने रावळपिंडी ब्रिज सोडल्यानंतर काही मिनिटांत मोठा स्फोट झाला. 25 डिसेंबर 2003 रोजी मुशर्रफ यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते बचावले. 6 जुलै 2007 रोजी रावळपिंडी येथे त्यांच्या विमानावर सुमारे 36 राऊंड गोळीबार करण्यात आला तेव्हा मुशर्रफ पुन्हा एकदा बचावले.

बातम्या आणखी आहेत...