आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Imran Khan Vs No Trust Vote | Pakistan National Assembly No Confidence Motion Number Game । Pakistan Political Crisis

इम्रान रनआऊट झाले तर पुढे काय:पाकिस्तानी सत्तेचे कर्णधारपद कोणाला मिळेल आणि भारतावर काय होणार परिणाम? जाणून घ्या प्रत्येक पैलू

लेखक: आदित्य द्विवेदी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने 5 वर्षांचा नाबाद डाव खेळलेला नाही. आता यामध्ये विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांचेही नाव समाविष्ट होणार आहे. इम्रान खान यांना अजूनही 17 महिन्यांचा काळ क्रीझवर उरला आहे, परंतु विरोधकांनी नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव आणून त्यांना रनआऊट करण्याचे आवाहन केले आहे. या प्रस्तावावर 31 मार्चपासून चर्चा सुरू होणार होती, मात्र विरोधकांच्या गदारोळानंतर नॅशनल असेंब्लीचे कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, पाकिस्तानच्या कर्णधाराने बहुमत गमावले आहे का? आता पाकिस्तानच्या राजकीय खेळपट्टीवर कोणती 4 परिदृश्ये तयार होऊ शकतात? इम्रान यांच्या जाण्याने भारतावर काय परिणाम होईल?

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सध्याचे गणित

पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी 28 मार्च रोजी नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव मांडला होता. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 172 मतांची आवश्यकता आहे. ठराव मंजूर झाल्यास इम्रान सरकार पडेल. या प्रस्तावावर चर्चा सुरू होण्याआधीच इम्रान यांच्या बीएपी आणि एमक्यूएम-पी या मित्रपक्षांनी विरोधकांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे नॅशनल असेंब्लीतील मतांचे गणित खूपच रंजक बनले आहे.

नॅशनल असेंब्लीच्या आकड्यांच्या खेळावरून हे स्पष्ट झाले आहे की, अविश्वास प्रस्तावावर मतदानानंतर पाकिस्तानचे इम्रान सरकार पडू शकते. अशा परिस्थितीत हे जाणून घेऊया की, पाकिस्तानच्या राजकारणात कोणत्या 4 परिस्थिती निर्माण होत आहेत?

परिस्थिती-1: असेंब्ली भंग करून इम्रान लवकरच निवडणुका जाहीर करतील

इम्रान सरकारचा कार्यकाळ संपायला अजून 17 महिने बाकी आहेत, पण अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागू नये म्हणून ते लवकर निवडणुका जाहीर करू शकतात. इम्रान सरकारचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी या परिस्थितीकडे स्पष्टपणे लक्ष वेधले आहे. 24 मार्च रोजी पत्रकार परिषदेत शेख रशीद म्हणाले की, जे लोक कंपू बदलत आहेत त्यांनी लक्षात ठेवावे की देशात लवकर निवडणुकादेखील होऊ शकतात.

परिस्थिती-2: अविश्वास प्रस्ताव मंजूर होईल आणि देशाला नवा पंतप्रधान मिळेल

अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले तर इम्रान सरकार पडण्याची शक्यता अधिक आहे. या स्थितीत नवे सरकार स्थापन करण्याचा दावा मांडला जाणार आहे. नव्या पंतप्रधानपदासाठी पीएमएल-एनचे शाहबाज शरीफ यांचे नाव आघाडीवर आहे. ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. याशिवाय पीपीपीचे बिलावल भुट्टो झरदारी यांनाही नव्या सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. हे सरकार ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यकाळ पूर्ण करेल. त्यानंतर 60 दिवसांत निवडणुका होतील.

परिस्थिती-3: अविश्वास प्रस्ताव मंजूर होईल, परंतु नवीन सरकार सहमती होणार नाही

एक परिस्थिती अशीही असू शकते की, इम्रान सरकार पडेल, परंतु नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशी मते मिळणार न नाहीत. या स्थितीत नॅशनल असेंब्ली बरखास्त करून दोन महिन्यांत निवडणुका होतील. असेही होऊ शकते की नवे पंतप्रधान झाल्यानंतर 2023 पर्यंत थांबणार नाहीत आणि लवकर निवडणुका जाहीर करतील. तथापि, याची शक्यता अत्यंत कमी आहे.

परिस्थिती-4: राजकीय अस्थिरतेचा हवाला देऊन लष्करी राजवट

आपले सरकार पाडण्यामागे परकीय षड्यंत्र असल्याचे इम्रान वारंवार सांगत आहेत. एका गुप्त पत्राचा आधार घेऊन ते आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अस्थिर परिस्थितीचा संदर्भ देत पाकिस्तानी लष्करही सत्ता आपल्या हातात घेऊ शकते. या परिस्थितीची शक्यता खूपच कमी असली, तरी पाकिस्तानचा जुना ट्रॅक रेकॉर्ड पाहता हे अशक्यही नाही. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत चार वेळा तेथे लष्करी राजवट आलेली आहे.

इम्रान खान यांचे सरकार पडल्यास भारतावर काय परिणाम होईल?

पाकिस्तानातील इम्रान सरकार पडल्यामुळे भारतासोबतच्या संबंधांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार अर्शद युसूफझाई म्हणतात, 'यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पाकिस्तानचे मोठे निर्णय अनेकदा लष्कर आणि गुप्तचर संस्था घेतात. भारतासोबतचे संबंध असोत, अफगाण धोरण असो, चीनशी संबंध असोत, हे सर्व अनेकदा एस्टाब्लिशमेंट्सकडून केले जाते. सरकारच्या येण्या-जाण्याचा फारसा परिणाम होत नाही.

परराष्ट्र धोरण तज्ज्ञ शैलेंद्र देवळाणकर यांच्या मते, 'पाकिस्तानमधील सत्ताबदलाचा भारतावर परिणाम होणार नाही. याची दोन मोठी कारणे आहेत. प्रथम, भारताबाबत कोणतेही नवीन धोरण राबविण्यासाठी आघाडी सरकारला पुरेसा वेळ मिळणार नाही. दुसरे, तेथे खरी सत्ता पाकिस्तानी लष्कराच्या हाती आहे."

बातम्या आणखी आहेत...