आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • In Cuba, Vietnam, Somalia Also America Had To Step Back, Suffered Loss Of Life And Property And Slander Separately.

दगा देणारा अमेरिका:अफगाणिस्तान प्रमाणेच अमेरिकेने 19 वर्षांपुर्वी व्हिएतनाममधून काढला होता पळ, जाणून घ्या महासत्तेने सोमालिया आणि क्युबामध्ये कशी फिरवली होती पाठ

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या चार घटनांविषयी...

"तुम्ही एकतर आमच्या बरोबर आहात किंवा आमच्या विरोधात ..." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 21 सप्टेंबर 2001 रोजी 9/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर हे वक्तव्य केले आणि त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी अमेरिकन विमानांनी अफगाणिस्तानवर बॉम्बचा वर्षाव करण्यास सुरुवात सुरुवात केली. आज जवळजवळ 20 वर्षांनंतर याच अमेरिकेने अफगाणिस्तानातून पळ काढला आहे. काबूलसह जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या ताब्यात गेला आहे, ज्यांच्याविरोधात या महासत्तेने War on terror म्हणजेच दहशतवादाविरोधी युद्ध पुकारले होते.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे सामान्य अफगाणी इतका अस्वस्थ आहे की, काबूलवर तालिबानच्या ताब्यानंतर 3 हजारांपेक्षा जास्त लोक रात्रीच विमानतळात घुसले. लोक टेकऑफ करणाऱ्या विमानांमागे आणि पुढे धावू लागले. जणू एखाद्या बसमध्ये गर्दी होते तसे चित्र येथे दिसले. यावेळी तीन अफगाणी लोक विमानाच्या चाकांमध्ये लपून बसले होते. टेकऑफनंतर ते थेट जमिनीवर कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

विशेष गोष्ट अशी की, अमेरिकेने एखाद्या देशाला दगा दिल्याची ही पहिलीच वेळ नाहीये. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने किमान चार देशातून अशीच माघार घेतली होती.

अमेरिकेने अफगाणिस्तानपूर्वी व्हिएतनाम, क्यूबा आणि सोमालिया मधून कसा पळ काढला होता, त्याविषयी जाणून घेऊया...

1. व्हिएतनाम: सलग 19 वर्षे लढा देऊन अमेरिका देश सोडून निघून गेला

29 एप्रिल 1975 : 19 वर्षे भयानक बॉम्बस्फोट आणि आधुनिक शस्त्रे असूनही उत्तर व्हिएतनामच्या कम्युनिस्ट सैन्याबरोबरच्या युद्धात 58 हजार अमेरिकन सैनिक मारले गेले. युद्धाविरोधात अमेरिकेत निदर्शने सुरू झाली. अशा परिस्थितीत पॅरिस शांतता कराराच्या नावाखाली 1973 मध्ये अमेरिकन सैन्याने व्हिएतनाम सोडले. दोन वर्षांतच कम्युनिस्ट सैन्याने अमेरिका समर्थित दक्षिण व्हिएतनामची राजधानी सायगॉनमध्ये प्रवेश केला. तेथे अडकलेल्या अमेरिकन लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन दूतावासाजवळील एका इमारतीच्या छतावर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. पळून जाणाऱ्या अमेरिकन लोकांचे हे छायाचित्र महासत्तेच्या पराभवाचे प्रतीक बनले.

 • अमेरिकेने माघार घेतल्याची सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे व्हिएतनामचा किस्सा. अफगाणिस्तानातील सैन्याच्या संख्येच्या पाच पट आणि 19 वर्षांच्या भीषण बॉम्बस्फोटानंतरही अमेरिका कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनामला आपल्यासमोर झुकवू शकला नाही.
 • घरगुती दबावाखाली 1969 मध्ये राष्ट्राध्यक्ष बनलेले रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाममधून बाहेर पडण्याचा विचार केला. जानेवारी 1973 मध्ये अमेरिका, उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम आणि व्हिएतकाँग यांच्यात पॅरिसमध्ये शांतता करार झाला.
 • वास्तविक, या कराराच्या आड अमेरिकेला व्हिएतनाममधून आपले सैन्य मागे घ्यायचे होते. यानंतर व्हिएतनाममध्येही तेच घडले जे आज अफगाणिस्तानमध्ये घडत आहे.
 • 29 मार्च 1973 रोजी अमेरिकेच्या सैन्याने पूर्णपणे माघार घेण्यापूर्वी उत्तर व्हिएतनामने दक्षिण व्हिएतनामवर आक्रमण केले.
 • दोन वर्षांनंतर, 30 एप्रिल 1975 रोजी कम्युनिस्ट व्हिएतनामी सैन्याने सायगॉनमध्ये प्रवेश केला आणि उरलेल्या अमेरिकन लोकांना तेथून घाईघाईने पळून जावे लागले.
29 एप्रिल 1975 : व्हिएतनाममध्ये 20 वर्षांचा दीर्घ लढा हरल्यानंतर अमेरिकन लोकांना सायगॉन (आजचे हो ची-मिन शहर) मधून बाहेर जावे लागले. हॅलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी झाली. अगदी काबूल प्रमाणे. हजारो व्हिएतनाम नागरिक अमेरिकन दूतावासातून उड्डाण करण्यासाठी सज्ज असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी 14 फूट उंचीच्या भिंतीवर चढले.

 • सायगॉनला आज व्हिएतनामची राजधानी हो-ची-मिन शहर म्हणून ओळखले जाते. हो-ची-मिन कम्युनिस्ट व्हिएतनामचे सर्वात मोठे नेते होते.
 • व्हिएतनाम युद्धाची सुरुवात 1955 मध्ये मानली जाते. जिनेव्हा कराराअंतर्गत 1954 मध्ये उत्तर आणि दक्षिण व्हिएतनामची स्थापना झाली. एकीकृत व्हिएतनामसाठी दोन वर्षे निवडणुका होणार होत्या, ज्या कधीच झाल्या नाहीत.
 • कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनामचे नेतृत्व हो-ची-मिन यांनी केले होते, तर दक्षिण व्हिएतनामचे नेतृत्व कॅथोलिक राष्ट्रवादी नगो दीन्ह दीम यांनी केले होते.
 • 1955 मध्ये उत्तर व्हिएतनामने दक्षिणेविरुद्ध लष्करी जमवाजमव सुरू केली आणि साम्यवादाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने सैन्य पाठवण्यास सुरुवात केली. 1967 पर्यंत व्हिएतनाममधील अमेरिकन सैन्याची संख्या पाच दशलक्षांवर पोहोचली होती.
29 एप्रिल 1975 : सायगॉनवर उत्तर व्हिएतनामच्या ताब्यादरम्यान अमेरिकन मरीन हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी अमेरिकन आणि व्हिएतनाम नागरिकांनी पलायन केले. काबूलमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यापासून सायगॉनमधील अमेरिकेच्या पराभवाशी या घटनेची तुलना केली जात आहे. अमेरिकन लोकांचा एक मोठा वर्ग त्याला विरोध करत आहे. ते म्हणतात की, सायगॉनमधील अमेरिकेच्या अपमानापेक्षा ते अधिक अपमानजनक आहे.

2. क्युबा: वाईटरित्या पराभूत झाला अमेरिका, शेवटच्या क्षणी सैनिकांना हवाई दलाची मदत देण्यास नकार दिला

17 एप्रिल 1961 : फिडेल कॅस्ट्रोच्या तख्ता पलटनंतर अमेरिकेने सीआयएच्या माध्यमातून बे ऑफ पिग्जच्या मार्गाने हल्ला केला. यासाठी सीआयएने फिडेलच्या विरोधकांना प्रशिक्षण आणि शस्त्रे दिली. जमिनीवर हल्ला करण्यापूर्वी पाच अमेरिकन बी -26 बी विमानांनी बॉम्बस्फोट केले. क्यूबाने यातील तीन विमाने पाडली. योजनेनुसार, अमेरिकेला हल्लेखोरांना मदत करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात बॉम्बफेक करायची होती, पण हल्ला अयशस्वी झाल्याचे पाहून अमेरिका मागे हटली आणि लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

 • जानेवारी 1959 मध्ये कम्युनिस्ट क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांनी क्यूबाचा हुकूमशहा फुलगेन्सियो बतिस्ताची सत्ता पाडली.
 • नवीन कम्युनिस्ट सरकारने क्युबामध्ये खाजगी मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली. त्यापैकी बहुतेक उत्तर अमेरिकन लोकांची होती.
 • कॅस्ट्रोने लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांतींना शह देण्यास सुरुवात केली. त्यांनी अमेरिकेविरोधात उघडपणे बोलायलाही सुरुवात केली.अशा परिस्थितीत जानेवारी 1961 मध्ये अमेरिकेने क्युबाशी राजनैतिक संबंध तोडले.
 • याआधीही, अध्यक्ष आयजनहावर यांनी सीआयएला कॅस्ट्रोची सत्ता पाडण्यासाठी क्युबाच्या पळून जाणाऱ्या लोकांना प्रशिक्षण आणि शस्त्रे पुरवण्याची परवानगी दिली.
 • 15 एप्रिल 1961 अमेरिकेतील तीन विमानांनी क्युबाच्या हवाई तळावर बॉम्बहल्ला केला. क्युबाच्या वैमानिकांकडून ही विमाने उडवली जात होती.
 • 17 एप्रिल 1961 रोजी 1200 हून अधिक क्यूबाच्या सैनिकांनी क्युबाच्या बे ऑफ पिग्सद्वारे आक्रमण केले आणि अमेरिकन शस्त्रे, प्रशिक्षण आणि गरज पडल्यास हवाई मदतीचे आश्वासन दिले.
 • कॅस्ट्रोला या हल्ल्याची माहिती आधीच मिळाली होती. क्यूबाच्या हवाई दलाने हल्लेखोरांच्या बहुतेक नौका बुडवल्या.
 • आयजनहावर नंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन एफ केनेडी यांनी वचन दिल्याप्रमाणे शेवटच्या क्षणी हवाई सहाय्य देण्यास नकार दिला. अखेर 100 हून अधिक हल्लेखोर ठार झाले. सुमारे 1,100 जणांना अटक करण्यात आली.
17 एप्रिल 1961 : अमेरिकन हल्ल्याला विफल केल्यानंतर बे ऑफ पिग्सवर उपस्थित हल्लेखोरांच्या बोटीजवळ फिडेल कॅस्ट्रोचे सैनिक. कॅस्ट्रोला हल्ल्यापूर्वीच याची माहिती होती. त्याच्या सैन्याने आधीच या भागाला वेढा घातला होता. अमेरिकेचा प्रयत्न पूर्णपणे फसला. शेकडो हल्लेखोर एकतर मारले गेले किंवा पकडले गेले.

29 डिसेंबर 1962 : क्युबातून माघार घेण्याचा निर्णय घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि त्यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांनी बे ऑफ पिग्सच्या हल्यात सामिल 2506 ब्रिगेडसोबत मियामीच्या एका स्टेडिअमवर भेट घेतली होती. क्युबामध्ये रशियाच्या आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्यापासून आणि रशियाला यशस्वीरित्या रोखल्यानंतर केनेडी क्युबामधून पळून जाणाऱ्यांमध्ये आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत होते. यानंतरही अमेरिकेने कॅस्ट्रोला ठार मारण्याचे आणि त्याला सत्तेतून काढून टाकण्याचे आणखी पाच प्रयत्न केले, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

 • या घटनेनंतरच सोव्हिएत संघाने क्युबामध्ये आण्विक क्षेपणास्त्रे तैनात केली. यासंदर्भात समजताच अमेरिकन नौदलाने क्युबाला वेढा घातला.
 • सोव्हिएत क्षेपणास्त्र हटवले नाही तर अमेरिकेने आण्विक युद्धाची धमकी दिली. दोन्ही देश आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आले.
 • शेवटच्या क्षणी सोव्हिएत संघाने क्षेपणास्त्र काढून टाकण्यास सहमती दर्शविली आणि संकट टळले. याला क्युबन क्षेपणास्त्र संकट म्हणतात.

3. सोमालिया: अमेरिकेने मानवतावादी मिशन सोडले होते

3 ऑक्टोबर 1993: सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर खाली कोसळणे हे अमेरिकेच्या पराभवाचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. 3-4 ऑक्टोबर 1993 च्या रात्री, ही लढाई संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाठीशी असलेल्या अमेरिकन सैन्य आणि मोहम्मद फराह अदीदी यांच्या नेतृत्वाखालील सोमालियन बंडखोर सैन्यादरम्यान लढली गेली.

 • जानेवारी 1991 मध्ये आफ्रिकन देश सोमालियामध्ये अनेक जमातीविरोधी मिलिशिया, म्हणजे सशस्त्र बंडखोर गटांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सियाद बर्रे यांची सत्ता उलथवून टाकली.
 • सोमालिया राष्ट्रीय सैन्याचे सैनिक आपापल्या जमातींच्या सशस्त्र गटांमध्ये सामील झाले. सत्ता ताब्यात घेण्यासाठी संपूर्ण सोमालियामध्ये गृहयुद्ध सुरू झाले.
 • राजधानी मोगादिशूमधील मुख्य बंडखोर गट युनायटेड सोमालिया काँग्रेसही दोन गटांमध्ये विभागली गेली. यापैकी एका गटाचे नेते अली मेहदी मुहम्मद राष्ट्राध्यक्ष झाला. तर दुसरा गट मोहम्मद फराह अदीदी चालवत होता.
 • मानवतावादी संकट वाढत असताना, सोमालिया -2 (UNOSOM-2) मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ऑपरेशन अंतर्गत, सामान्य लोकांना अन्न आणि वैद्यकीय मदत सुरू करण्यात आली, परंतु अदीदीचा गट मार्गात येत होता.
 • अशा परिस्थितीत 3 ऑक्टोबर रोजी अमेरिकेने मोगादिशूतील एका घरातून अदीदीच्या दोन जवळच्या सहकाऱ्यांना पकडण्यासाठी लष्कराची टास्क फोर्स पाठवली.
 • हा हल्ला अमेरिकेसाठी मोठी समस्या बनला. मोहिमेदरम्यान बंडखोरांनी अमेरिकन लष्कराची दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडली.
1980 च्या सुरुवातीला, अमेरिकेने सोमालियामध्ये अन्न आणि मानवतावादी मदत उपक्रम सुरू केले. जेव्हा अमेरिका आली, तेव्हा तीमदत मानवतावादीच्या नावाखाली होती, पण लवकरच तिची सत्तेबद्दलची आवड दिसून येऊ लागली.
1980 च्या सुरुवातीला, अमेरिकेने सोमालियामध्ये अन्न आणि मानवतावादी मदत उपक्रम सुरू केले. जेव्हा अमेरिका आली, तेव्हा तीमदत मानवतावादीच्या नावाखाली होती, पण लवकरच तिची सत्तेबद्दलची आवड दिसून येऊ लागली.
 • मोहिमेदरम्यान 19 अमेरिकन सैनिकही मारले गेले. सुमारे 73 जखमी झाले. एकाला बंडखोरांनी पकडले. मोठ्या कष्टाने 11 दिवसांनी त्याची सुटका करण्यात आली.
 • ठार झालेल्या अमेरिकन सैनिक आणि वैमानिकांचे मृतदेह बंडखोरांच्या जमावाने रस्त्यावर ओढले. या सर्व क्रूर दृश्यांचे रेकॉर्डिंग अमेरिकन टीव्हीवर प्रसारित झाले.
 • रात्रभर चाललेल्या लढाईनंतर सकाळी संयुक्त राष्ट्र मिशन अंतर्गत तेथे तैनात पाकिस्तानी सैन्याने अमेरिकन सैनिकांना तेथून बाहेर काढले.
 • सोमालियातील मानवतावादी मदतीच्या संपूर्ण मिशनमधून अमेरिकेने माघार घेतली. त्याने आपले सर्व सैनिक मागे घेतले. यामुळे, संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदतीचे ध्येय सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात दिलासा देऊ शकले नाही.
 • अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेननेही अमेरिकेच्या पलायनावर टीका केली होती. आणि त्याने अमेरिकन सैनिकांना भ्याड म्हटले होते. यानंतर, 1994 मध्ये रवांडा येथे झालेल्या नरसंहारादरम्यान अमेरिका गप्प राहिली.
3 ऑक्टोबर 1993 च्या संपूर्ण रात्री अमेरिकन सैन्य आणि सोमालीया बंडखोरांमध्ये युद्ध झाले. बंडखोरांनी दोन अमेरिकन Sikorsky UH-60 Black Hawk हेलिकॉप्टर पाडले. या युद्धात 19 अमेरिकन सैनिक ठार झाले आणि 73 सैनिक जखमी झाले. या घटनेनंतर अमेरिकेचे धोरण बदलले आणि त्याने सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे मिशन मागे घेण्याचा निर्णय घेतला. छायाचित्रात, अमेरिकन सैनिक सोमालिया सोडून आपल्या देशात परतत आहेत.

4. अफगाणिस्तान: अमेरिकेची माघार, जीव वाचवण्यासाठी विमानाला लटकलेल्या 3 लोकांचा खाली पडून मृत्यू झाला

16 ऑगस्ट 2021: हा दिवस अफगाणिस्तानच्या इतिहासात नोंदला गेला आहे. याच दिवशी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवरही कब्जा केला. गेल्या 20 वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये लष्करी कारवाया करत असलेले अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला आहे. काबूल विमानतळावर हजारो असहाय लोकांची गर्दी जमली आहे. सोमवारी उडत्या विमानातून पडून 3 जणांचा मृत्यू झाला. हे अमेरिकन लष्कराचे मालवाहू विमान होते आणि काही लोक त्याच्या लँडिंग गिअरला लटकून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.

16 ऑगस्ट 2021: तालिबानच्या अधिपत्याखाली जगणे सोपे होणार नाही, हे अफगाणी लोक जाणून आहेत. म्हणून ते त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. लोक कसाबसा आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत.

16 ऑगस्ट 2021: तालिबानने राजधानी काबूलमध्ये प्रवेश करताच अमेरिकेने तेथील लोकांना तेथून बाहेर काढण्यास सुरुवात केली. फोटोमध्ये, चिनूक हेलिकॉप्टरमध्ये अमेरिकन नागरिकांना घेऊन जाणारे सैनिक. सोमवारी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना वीस वर्षांपूर्वीच्या दहशतवादावरील युद्ध संपल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यांनी अफगाण नेत्यांवर लढा न देता शरण आल्याचा आरोप केला.

बातम्या आणखी आहेत...