आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • In Home Isolation, Medication Vary According To The Severity Of The Symptoms And The Patient's Medical History

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यमराठी नॉलेज सिरीज:होम आयसोलेशनमध्ये लक्षणांची तीव्रता आणि रुग्णाच्या मेडिकल हिस्ट्रीनुसार औषधे बदलतात, डॉक्टरला विचारूनच औषधे घ्या

8 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • चार दिवसांत ताप उतरला नाही आणि ऑक्सिजन पातळी किंवा इतर मापदंडात गडबड असेल तर त्वरित डॉक्टरांशी बोला

कोरोनाच्या बहुतांश रुग्णांना आता होम आयसोलेशनमध्येच ठेवले जात आहे. पण त्याच्या योग्य पद्धती आणि रुग्णाच्या देखभालीसंदर्भात अनेक संभ्रम आहेत. प्रत्येक घरात आदर्श स्थिती नाही. याच विषयांवर ‘दैनिक भास्कर’चे पवनकुमार यांनी चर्चा केली. जाणून घ्या तज्ज्ञांचे मत...

डॉ. प्रा. नरेंद्र अरोरा (आयसीएमआरच्या कोविड-१९ कृती दलाचे सदस्य)

चार दिवसांत ताप उतरला नाही आणि ऑक्सिजन पातळी किंवा इतर मापदंडात गडबड असेल तर त्वरित डॉक्टरांशी बोला

होम आयसोलेशनचा प्रोटोकॉल काय आहे?
रुग्णासाठी वेगळी हवेशीर खोली असावी. रुग्णासाठी शौचालयाची वेगळी व्यवस्था असावी. रुग्णाने घराबाहेर जाऊ नये. सध्याची परिस्थिती पाहता घरातील इतर सदस्यांनीही घराबाहेर जाऊ नये. खूपच आवश्यक असेल तर मास्कशिवाय बाहेर पडू नये.

आज आदर्श स्थिती नसतानाही होम आयसोलेशन दिले जात आहे, मग बचाव कसा होणार?
आता संसर्ग हवेत आहे. अशा स्थितीत सरकारी क्वाॅरंटाइनपेक्षा होम आयसोलेशन उत्तम आहे. पण बहुतांश शहरी घरांत आदर्श स्थिती नाही. त्यामुळे इतर सदस्यांनीही घरात नेहमी मास्क घालावा, असे म्हटले जात आहे. शौचालय एकच असेल तर रुग्णाने शौचालय वापरल्यानंतर ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे. नंतर १० ते १५ मिनिटे इतर कोणीही शौचालयाचा वापर करू नये.

होम आयसोलेशनमध्ये रुग्णांनी कोणत्या आरोग्य मापदंडांकडे लक्ष ठेवले पाहिजे?
रुग्णाच्या तापाव्यतिरिक्त ऑक्सिजनचे प्रमाण तपासत राहावे. ऑक्सिजनचे प्रमाण ९४ पेक्षा कमी असेल तर विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त द्रवपदार्थ घ्या. संत्र्याचा रस आणि मूगडाळ कमीत कमी दोन वाट्या घ्यावी. ताजी फळे खावीत.

{होम आयसोलेशनमध्ये कोणती औषधे घ्यावी?

ही औषधे सध्या डॉक्टर देत आहेत-

 • लक्षणे असेपर्यंत
 • अॅजिथ्रोमायसिन ५०० एमजी, दिवसात एकदा.
 • झिंकोव्हिट रोज एक.
 • व्हिटॅमिन सीची गोळी दररोज एक.
 • कोमट पाण्याने गुळण्या, दिवसात तीन वेळा.
 • दिवसभरात ४ वेळा ऑक्सिजन पातळी तपासा.

त्याशिवाय

 • आयव्हरमेक्टिन १२ एमजी, ३ दिवस, दिवसात एक वेळा.
 • ताप असेल तर पॅरासिटामॉल, ६५० एमजी.

तथापि, रुग्णांमधील लक्षणांची तीव्रता आणि त्याच्या मेडिकल हिस्ट्रीनुसार औषधे बदलली जातात. कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्टरांना अवश्य विचारावे.

होम आयसोलेशनमध्ये चार दिवस औषधे घेऊनही ताप उतरला नाही, तर काय करावे?
संक्रमित व्यक्तीला बऱ्याचदा चार दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप राहू शकतो. शरीराचे इतर मापदंड ठीक असतील तर घाबरण्याचे कारण नाही. पण इतर मापदंडांत गडबड असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच इतर औषधे घ्यावीत.

घरातील इतर सदस्यांमध्ये लक्षणे नसल्यास ७ ते १० दिवसांनी कोरोना चाचणी करावी
{होम आयसोलेशन सुरू झाल्यानंतर किती दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करावी, यात पहिला दिवस कोणता धरावा, तपासणीसाठी नमुने दिल्याचा दिवस की चाचणी अहवाल आल्याचा दिवस?
औषधी संपल्यानंतर किंवा आजाराची लक्षणे नसल्यास तीन ते पाच दिवसांनी संसर्ग तपासण्यासाठी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करू शकता. यानंतर व्यक्ती बाधित नसल्याचे समजले जाते. केंद्र सरकारच्या नव्या प्रोटोकॉलनुसार संसर्गमुक्त होण्यासाठी आरटीपीसीआर आवश्यक केलेले नाही.

रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांनीही आरटीपीसीआर चाचणी करायला हवी का, केव्हा करावी?
घरातील दुसऱ्या सदस्यांनीही चाचणी करायला हवी. लक्षणे असल्यास लगेच करावी व लक्षणे न दिसल्यास बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याच्या सातव्या ते दहाव्या दिवसादरम्यान तपासणी करावी.

बाधित व्यक्तीच्या घरात जर वयस्कर व्यक्ती किंवा इतर आजारांनी ग्रस्त व्यक्ती असल्यास आणि कोरोना रुग्णासाठी वेगळी खोली नसल्यास काय करायला हवे?
अशा स्थितीत कोरोना रुग्णाला कोणत्याही स्थितीत क्वॉरंटाइन सेंटर किंवा दुसऱ्या आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवायला हवे. जर असे न केल्यास वयस्करांचा जीव धोक्यात टाकला जात आहे.

बाधित व्यक्तीसाठी वेगळे स्वयंपाकघर नसल्यास त्याला जेवण देताना काय काळजी घ्यायला हवी? त्याने वापरलेली भांडी कशी स्वच्छ करता येतील?
बाधित व्यक्तीसाठी वेगळ्या स्वयंपाकगृहाची गरज नाही. त्याची भांडीच फक्त वेगळी असावीत. बाधित व्यक्तीने त्याची भांडी स्वच्छ केल्यास जास्त चांगले, यासाठी प्रयत्न करायला हवेत. रुग्णाला घरातील कोणताही दुसरा सदस्य मास्क लावून योग्य अंतर राखून जेवण देऊ शकतो.

आता सांगितले जात आहे की, विषाणू हवेतून पसरू शकतो. अशात जर बाधित व्यक्ती एका खोलीत आयसोलेट असली तरी इतर सदस्यांना दुसऱ्या खोलीत संसर्ग होऊ शकत नाही का?
नक्कीच होऊ शकतो. आता विषाणू हवेतही काही काळ उपस्थित असतो. यामुळे कुटुंबातील दुसऱ्या सदस्यांनाही फक्त मास्कच नव्हे तर घरातही एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवायला हवे. ते सहज घेऊ नये, हाच बचाव आहे.

बातम्या आणखी आहेत...