आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टपेणमधील मूर्तीकारांचे गाव हमरापूर:इथल्या मूर्तींवर देशातील ३० लाख लोकांना रोजगार, वर्षाला बनतात ३ कोटी मूर्ती

लेखक: आशीष रायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कधी हमरापूरचे नाव ऐकले आहे का? कदाचित ऐकले असेल, पण हे गाव खूप खास आहे. १०० वर्षांपूर्वी इथे एका कारागिराने मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले. आता गावात दरवर्षी ३ कोटी मूर्ती तयार केल्या जातात. ८० ते ९० कोटींचा व्यवसाय आहे. ४१८ घरांच्या हमरापूरमध्ये ५०० वर्कशॉप आहेत. याला म्हणतात भारताचे गणपती मार्केट. चला तुम्हाला हे गाव फिरवून आणतो. हे गाव पुण्यापासून १२० किमी अंतरावर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आहे. गावात शिरताच रस्त्याच्या बाजूला असलेले गोदाम तुम्हाला दिसतात. अनेक दिवसांपासून सर्वांच्या बाहेर ट्रक उभे दिसतात. यात लहान-मोठ्या मूर्ती लोड केल्या जात आहेत. काम करणाऱ्या लोकांकडे पाहून कळते की त्यांना क्षणाचीही उसंत नाही.

मूर्ती खरेदीसाठी आलेल्या लोकांमुळे २ किमी लांब जाम
गावात जाण्यासाठी सुमारे १४ फुट रुंद रस्ता आहे. यावर दीड ते दोन किमी लांब जाम होता. यात फसलेले जास्तीत जास्त लोक मुंबई आणि आसपासच्या भागातून मूर्ती खरेदीसाठी इथे आलेले होते. मुंबईच्या कृपाळू गणेश मंडळाचे राजेश तांबे सांगतात. इथे मुंबईपेक्षा स्वस्तात मूर्ती मिळतात. म्हणून दरवर्षी इथूनच ते मूर्ती घेऊन जातात.
हमरापूरमधील मूर्तींना महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातूनही मागणी आहे.
गावचे सरपंच स्वतः वाहतूक कोंडी सोडवतात
अर्धा तास कोंडीत अडकल्यानंतर आम्ही गावातील मुख्य चौकात आलो. इथेही गाड्या अडकलेल्या होत्या. गावाचे सरपंच प्रदीप म्हात्रे चौकात उभे राहून वाहतूक कोंडी सोडवत होते. ते म्हणाले की, दोन वर्षांपासून कोरोनामुळे खूप कमी लोक मूर्ती घेण्यासाठी आले होते. यावर्षी आधीप्रमाणेच लोक येत आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे.
कोरोनामुळे गावाचे २५ ते ३० कोटींचे नुकसान झाले होते. या वर्षी ९० कोटींपेक्षा जास्त ऑर्डर मिळाल्या आहेत.

अमेरिका-ब्रिटनमध्येही जातात मूर्ती, म्हणून भारताचे गणपती मार्केट हे नाव
इथे तयार झालेल्या मूर्ती अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत जातात. जहाज किंवा विमानातून त्या पाठवल्या जातात. गावात एका हंगामात ३ कोटींपेक्षा जास्त मूर्ती बनतात. यामुळेच हे गाव गणपती मार्केट म्हणून ओळखले जाते.
गणपती मूर्तींमुळे मजूर झाले कोट्यधीश
हमरापूर गाव अलिबागपासून सुमारे ५८ किमी अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या १८२० आहे. प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती मूर्ती बनवण्याचे काम करतो. जास्तीत जास्त लोकांनी आपल्या घरातच गोदाम अन् वर्कशॉप बनवले आहे. गावातील श्रीराम पाटील १० वर्षांपूर्वी मुंबईत मजुरी करायचे.
तिथे उदरनिर्वाहासाठी अडचणी आल्यानंतर ते गावी परतले आणि मूर्तीच्या वर्कशॉपमध्ये काम करायला लागले. यादरम्यान त्यांना पारंपरिक मूर्तीऐवजी वेगळ्या मूर्ती बनवण्याची कल्पना सुचली. ५ वर्षांपूर्वी त्यांनी कुटुंबातील ६ सदस्यांच्या मदतीने वर्कशॉप सुरू केले. आता त्यांच्या मूर्ती अमेरिका, युएई, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियात जातात. यावर्षी कॅनडातूनही ऑर्डर मिळाली आहे.
इंजिनिअरींग सोडून मूर्ती बनवत आहेत दोन भाऊ
श्रीराम यांची दोन मुले रोहित आणि सागर पाटील या दोघांनी इंजिनिअरींग सोडून मूर्ती बनवण्याचे काम सुरू केले आहे. रोहित मेकॅनिकल इंजिनिअरींगचा डिप्लोमा होल्डर आहे तर सागर बीटेक आहे. दोघांनाही चांगली प्लेसमेंट मिळाली होती. पण त्यांनी नोकरी सोडून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले.
सरकारी नोकरीपेक्षा मूर्ती बनवण्याचे काम आवडले
रोहितच्या घरापासून काही अंतरावरच सतीश समेण भेटले. ते आधी बँकेत नोकरी करायचे. नोकरी सोडून ते मूर्ती बनवायला लागले. आता ते बँकेच्या वार्षिक पगारापेक्षा चार पट जास्त पैसे कमवत आहेत. त्यांच्यासोबत कुटुंबाचे इतर सदस्यही या कामात सक्रीय आहेत.

सतीश समेण यांचे संपूर्ण कुटुंब मूर्ती बनवण्यात पारंगत आहे. सतीश यांना हे काम सरकारी नोकरीपेक्षा चांगले वाटले.
सतीश समेण यांचे संपूर्ण कुटुंब मूर्ती बनवण्यात पारंगत आहे. सतीश यांना हे काम सरकारी नोकरीपेक्षा चांगले वाटले.

१०० वर्षांपासून मूर्ती बनवणारे कुटुंब
गावात १० हजार पेक्षा जास्त लोक मूर्ती बनवण्याचे काम करतात. यातील पंढरीनाथ गोविंद दाभाडेंचे कुटुंब १०० वर्षांपासून मूर्ती बनवण्याचे काम करत आहेत. ते १०० वर्षांपासून शाडू मातीपासून गणपती बनवतात. त्यांची चौथी पिढी या व्यवसायात आहे. त्यांचे नातू राकेश चंद्रकांत दाभाडे म्हणाले की, आजोबांनी वडिलांना शिकवले आणि वडिलांकडून मी शिकलो. माझी मुलेही हेच करत आहेत. कुटुंबातले १५ सदस्य हेच काम करत आहेत. आमच्या वर्कशॉपमध्ये १५० पेक्षा जास्त लोक काम करतात.

राकेश म्हणतात की, आजोबा फक्त मातीच्या मूर्ती बनवत होते. आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस जिप्समच्या मूर्ती बनवत आहोत.
राकेश म्हणतात की, आजोबा फक्त मातीच्या मूर्ती बनवत होते. आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस जिप्समच्या मूर्ती बनवत आहोत.

लग्नानंतर गिफ्टमध्ये मिळाली मूर्तीकला
राकेश यांच्या वहिनी शशिकला २० वर्षांपूर्वी लग्नानंतर या गावात आल्या होत्या. त्या म्हणाल्या लग्नानंतर गिफ्ट म्हणून कुटु्ंबाकडून मूर्तीकलेचा वारसा मिळाला. आधी थोडे वेगळे वाटले. पण नंतर शिकत गेले. आता मी बाप्पाच्या मूर्ती सजवण्यात एक्स्पर्ट झाले आहे.
शशिकला सांगतात की, ही कुटुंबाची परंपरा आहे. येणारी पिढीही ते पुढे नेईल. मुलांना डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवण्याचा विचार आम्ही कधीच केला नाही.

गावातील १० हजार आणि देशातील २५ ते ३० लाख लोकांना रोजगार
गावातील मूर्तीकारांची एक संघटना आहे. गणेश मूर्तीकार उत्कर्ष मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष अभय म्हात्रेंनुसार, मूर्ती साच्यात ओतणे, पॉलिश करणे आणि रंगांना फायनल टच देणे तसेच कृत्रिम आभूषणांनी सजवण्याचे काम वेगवेगळे लोक करतात. आमच्या हमरापूर गावात १० हजारपेक्षा जास्त लोक हा व्यवसाय करत आहेत.
वाहतूक आणि मूर्तींची देखभाल, विक्री करणाऱ्यांचा समावेश केला तर ही संख्या ३० हजार होते. संपूर्ण पेण तालुका आणि त्याच्या बाहेरचे लोक जोडले तर २५ ते ३० लाख लोकांचा उदरनिर्वाह गावात तयार होणाऱ्या मूर्तींवर होतो. यात केरळ, गुजरात आणि राजस्थानातील लोकांचाही समावेश आहे. हे लोक मूर्ती तयार करण्यासाठी नारळाच्या शेंडीपासून बनणारी काबल, शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस तयार करतात.

हमरापूर गावातील प्रत्येक कुटुंबातील कुणीतरी मूर्ती बनवण्याच्या व्यवसायाशी जोडले गेले आहे. अनेक कुटुंबांत तर अनेक पिढ्यांपासून हे काम सुरू आहे.
हमरापूर गावातील प्रत्येक कुटुंबातील कुणीतरी मूर्ती बनवण्याच्या व्यवसायाशी जोडले गेले आहे. अनेक कुटुंबांत तर अनेक पिढ्यांपासून हे काम सुरू आहे.

दिवसा नोकरी, रात्री मूर्तीची सजावट
गावातील एका वर्कशॉपमध्ये आम्हाला तेजस नाईक भेटले. तेजस १२ वर्षांपासून मूर्ती सजवण्याचे काम करत आहेत. ते दिवसा कंपनीत काम करतात आणि रात्री मूर्ती सजवण्याचे काम करतात. त्यांचे भाऊ आणि वहिनीही १०-१२ वर्षांपासून हेच करत आहेत.
शहरांच्या अंतरानुसार बदलतात मूर्तींच्या किंमती
मूर्तीच्या सजावटीनुसार मूर्तीची किंमत वाढून दीड लाखांपर्यंत जाते असे सरपंच प्रदीप म्हात्रे म्हणाले. इथे बनलेल्या मूर्ती मुंबई, सूरत, दिल्ली, मेरठसह दुसऱ्या शहरांत जातात, तेव्हा किंमतीत १५-२० टक्के वाढ होते. पेणमध्ये ५०० रुपयांत मिळणारी मूर्ती पुण्यात १५०० रुपयांची होते.

गावातील बहूतांश विद्यार्थ्यांनी फाईन आर्टसची केली निवड
हमरापुरातील साहिल ठाकूर फाईन आर्टमध्ये ग्रॅज्युएशन करत आहेत. साहिल म्हणाला की आम्ही पारंपरिक पद्धतीने मूर्ती तयार करतो. मी अॅनाटॉमी आणि कलर कॉम्बिनेशनचे शिक्षण घेऊन हा व्यवसाय पुढे नेऊ इच्छितो. साहिलप्रमाणेच गावातील अनेक विद्यार्थीही फाईन आर्ट करत आहेत.
साहिल म्हणाला की आमच्या वर्कशॉपमधून संगीतकार शंकर महादेवन यांच्या घरी मूर्ती जाते. अनेकदा महादेवन यांचा मुलगा सिद्धार्थ मूर्ती घेण्यासाठी वर्कशॉपमध्ये आला आहे.
एका वर्षात माल चौपट महाग
गेल्या वर्षी आम्ही १०० रुपयांत जो रंग आणत होतो तो या वर्षी १५० ते २०० रुपयांत मिळत आहे असे कृष्णा ठाकूर म्हणाले. फ्लोरोसेंट पावडरचे रेट ६०० रुपये किलोंवरून १ हजार रुपये किलो झाले आहे.
मूर्तीकार विद्याधर म्हणाले की ३० टक्के गणेश मूर्ती शाडू माती आणि ७० टक्के मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीसपासून तयार होतात. यावर्षी कच्च्या मालाचे दर चौपट वाढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...