आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • In The Second Wave, The Process Of Darshan And Donation Did Not Stop In Tirupati, In May, Even When Corona Was On The Pick, An Average Donation Of 30 Lakhs Was Received Every Day.

देशातील 3 मोठ्या मंदिरांचा अहवाल:मे महिन्यात जेव्हा दुसरी लाट शिगेवर होती तेव्हा तिरुपतीला दररोज 30 लाखांचे दान मिळाले, शिर्डीत दानात 83% घट, वैष्णो देवीच्या दर्शनाला कमी भाविक पोहोचले

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिरुपती मंदिर: दर्शन थांबले नाही, रोज लाखो रुपयांचे दान मिळाले

कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत आहे. सर्व गोष्टी सामान्य होत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. दररोज तीन ते चार लाख पॉझिटिव्ह प्रकरणे येत होती, पण आता त्यात घट होऊन केसेस 80 ते 90 हजारांच्या घरात आले आहेत. दुस-या लाटेमुळे तिरुपती बालाजी, शिर्डी साई मंदिर आणि वैष्णो देवी या मंदिराला मिळणा-या देणगीवर कसा परिणाम झाला, ते जाणून घेऊया.

तिरुपती मंदिर: दर्शन थांबले नाही, रोज लाखो रुपयांचे दान मिळाले
मार्च ते मे 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत देशात कोरोनाचे भयानक रुप सगळ्यांनी अनुभवले. लाखो लोकांचे प्राण गेले. देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली. परंतु या काळात आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन आणि दानाची प्रक्रिया सुरूच राहिली. निश्चितच कोरोनामुळे मंदिरात येणा-या भाविकांची संख्या कमी होती. एप्रिल-मे 2021 या काळात दररोज सरासरी 5००० लोकांनी येथे दर्शन घेतले आणि 50 लाख रुपयांहून अधिकचे दानही मिळाले.

तिरुपती मंदिर देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत, मंदिर 20 मार्च 2020 ते 7 जून 2020 पर्यंत पूर्णपणे बंद होते. तेव्हा कदाचित इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असेल की याकाळात मंदिराला मिळाले दान शून्यावर आले होते. गेल्यावर्षी मंदिराला मिळाले दान सुमारे 731 कोटी होते. जे 2019-20 च्या तुलनेत सुमारे 500 कोटींनी कमी होते.

3 मे ते 22 मे 2021 दरम्यान सर्वात कमी दान मिळाले
मे 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट शिगेला असताना देखील त्या काळात दोन ते चार हजार लोक दररोज दर्शनासाठी तिरुपती मंदिरात पोहोचले होते. एप्रिल 2021 मध्ये दररोज मिळणा-या दानाची रक्कम सुमारे 1 कोटी होती, परंतु 3 मे पासून कोरोनाच्या वाढत्या घटनांनंतर येथील भाविकांची संख्या मर्यादित होती. 3 मे ते 22 मे दरम्यान दररोज मिळणा-या दानाचा आकडा 30 लाखांवर आला. 13 मे रोजी सर्वात कमी देणगी मिळाली, जी केवळ दहा लाख रुपये होती, त्या दिवशी 4651 लोकांनी मंदिरात दर्शन घेतले. 23 मेपासून पुन्हा देणगीचे प्रमाण वाढले आणि ते सरासरी 40 लाखांच्या वर गेले.

जानेवारी ते मार्च या कालावधीत सरासरी 3 कोटींचे दान मिळाले
यापूर्वी, कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान ऑक्टोबर 2020 मंदिरात भाविकांचे दर्शन आणि देणगी देण्याची प्रक्रिया पुन्हा मुळ रुपात परतली होती. जानेवारी ते मार्च 2021 दरम्यान दररोज भेट देणा-या भाविकांची संख्या सुमारे 60 हजार होती आणि दररोजचे दान देखील 3 कोटी रुपये एवढे वाढले होते. 2021 एप्रिलची सुरुवातही तशीच राहिली. मात्र, तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट आली, यामुळे भाविकांची संख्या आणि देणगीचे प्रमाण कमी होऊ लागले होते.

शिर्डी साई मंदिर: 6 एप्रिलपासून बंद, दानात सुमारे 83% घट
देशातील भक्तांसाठी दुसरा सर्वात मोठा दरबार हा शिर्डींच्या साई बाबांचा आहे. शिर्डी साई मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी बघायला मिळते. हे दान मिळणा-या मंदिरांमध्ये पुढे आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान मार्च ते नोव्हेंबर या काळात मंदिर बंद राहिले. दुसर्‍या लाटेतही मंदिर 6 एप्रिल रोजी भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. या काळात मंदिराला मिळालेल्या देणगीत मोठी घट बघायला मिळाली. भाविकांसाठी साई मंदीरात दर्शन बंद झाल्याने वर्षाकाठी 262 कोटी रूपयांचे दान कमी झाले असल्याची माहिती साई संस्थानच्या अधिका-यांनी दिली. 2019 मध्ये 1.57 कोटी भक्तांनी दर्शन घेतले. मात्र 2020 मध्ये कोरोनाच्या प्रकोपामुळे मंदिर बंद करावे लागले. पहिल्या लाटेनंतर जेव्हा मंदिर उघडले तेव्हा 16 नोव्हेंबरपासून 21 डिसेंबरच्या दरम्यान 5.74 लाख भक्तांनी दर्शन घेतले. 2021 मध्ये 1 जानेवारीपासून 5 एप्रिल या काळात भक्तांचा आकडा जवळपास 62 हजारच होता.

कोरोनात 295 कोटी कमी मिळाले
साई बाबा ट्रस्टला कोरोना काळात 295 कोटी रुपये कमी मिळाले. ट्रस्टला 2018-19 वर्षी 428 कोटींचे दान मिळाले होते. या व्यतिरिक्त 24.79 किलो सोने, 428.55 किलो चांदी मिळाली. अशा प्रकारे 2019-20 वर्षी 357 कोटी रुपयांचे दान आले. 17.90 कोटी सोने आणि 357.49 किलो चांदी मिळाली. तर कोरोना काळात म्हणजेच 1 एप्रिल 2020 पासून 25 मे 2021 पर्यंत ट्रस्टला 62 कोटी दान ऑनलाइन प्राप्त झाले. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 295 कोटींचे दान कमी आले. टक्क्यांमध्ये पाहिले तर जवळपास 83% घट झाली आहे. जवळपास 14 किलो सोने आणि 295 किलो चांदीही कमी मिळाली. ट्रस्टच्या संपत्तीविषयी विषयी बोलायचे झाले तर 31 मार्च 2020 पर्यंत साई संस्थानची एकूण संपत्ती 3013 कोटी रुपये होते.

वैष्णो देवी मंदिर: भाविकांची संख्या सर्वात कमी
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जम्मूमधील वैष्णो देवी मंदिरात भाविकांच्या संख्येत ऐतिहासिक घसरण बघायला मिळाली. मात्र, मंदिरातील दर्शन बंद नव्हते. सामान्य दिवसात दररोज 20 ते 25 हजार भाविक येथे दर्शनासाठी येत होते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, ही संख्या दररोज केवळ 15 ते 50 भाविकांवर आली. पण आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. कोरोनाची प्रकरणे कमी होत चालल्यामुळे वैष्णो देवीच्या मंदिरात येणा-या भाविकांची संख्या वाढू लागली आहे. सध्या दररोज सुमारे एक ते दोन हजार भाविक मंदिरात पोहोचत आहेत.

वैष्णो देवी माता मंदिर देखील देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गणले जाते. एका आरटीआयनुसार मंदिराजवळ 1800 किलो सोने, 2000 कोटी रुपयांची ठेवी आणि सुमारे 4700 किलो चांदी आहे. लॉकडाउनपूर्वी आणि त्यानंतर मंदिराला किती दान मिळाले, याची आकडेवारी अद्याप प्रकाशित करण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...