आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरअर्शदीपला Wiki वर खलिस्तानी म्हणण्यामागे पाकिस्तान:कोणीही खोटी माहिती टाकू शकते? कोणाचे असते लक्ष?

अभिषेक पांडे/नीरज सिंग20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पेजवर छेडछाड करून त्याला खलिस्तानी म्हटले होते.

अर्शदीपच्या विकिपीडिया पेजची छेडछाड केल्याच्या प्रकरणानंतर केंद्राने विकिपीडिया अधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर मागवले आहे. अर्शदीपच्या घटनेनंतर प्रत्येकाला विकिपीडियाचे पान संपादित करण्याचे अधिकार देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या एक्सप्लेनरमध्ये, कोणीही विकिपीडियाचे पेज संपादित करू शकते की नाही, हे जाणून घ्या? विकिपीडिया हे कसे प्रतिबंधित करते? विकिपीडिया पृष्ठावरील बदलानंतर काय होते?

प्रश्न 1: अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पेजमध्ये काय झाले?

उत्तरः 4 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या आशिया कप सुपर-4 सामन्यात अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या डावाच्या 18व्या षटकात आसिफ अलीचा झेल सोडला. त्यानंतर भारताने हा सामना 5 विकेटने गमावला. या पराभवानंतर अर्शदीप सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. अर्शदीपच्या विकिपीडिया पेजसोबत छेडछाड करून त्याला खलिस्तानी असे लेबल लावण्यात आले होते. त्याचा देश 'खलिस्तान पंजाब' करण्यात आला आणि त्याचे नाव बदलून मेजर अर्शदीप सिंग लांगरा आणि मेजर अर्शदीप सिंग बाजवा असे ठेवण्यात आले. त्याच्या पेजवर भारताऐवजी खलिस्तान असे अनेक वेळा लिहिले गेले. मात्र, विकिपीडियाने अल्पावधीत ही त्रुटी दूर केली.

आता अर्शदीप प्रकरणावर नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारने विकिपीडिया चालवणाऱ्या विकिमीडिया फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. विकिमीडिया ही यूएस-आधारित ना नफा (नॉन प्रॉफिट) संस्था आहे. सरकारने विकिपीडियाला त्यांच्या पेजवर अर्शदीपबद्दल चुकीची माहिती कशी प्रकाशित झाली याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

प्रश्न 2: अर्शदीपच्या विकिपीडिया पेजशी छेडछाड प्रकरणात पाकिस्तानचे नाव का येत आहे?

उत्तर: वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की विकिपीडियाच्या संपादनाच्या या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेला तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेजारील देशाच्या नेटवर्कचा वापर करून हे संपादन करण्यात आले आहे.

अर्शदीपच्या विकिपीडिया पृष्ठाच्या संपादनाच्या पुनरावलोकनात असे दिसून आले की, खलिस्तानशी संबंधित पहिला संपादित वापरकर्ता पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनी लिमिटेड (PTCL) चे नेटवर्क वापरत होता. PTCL ही पाकिस्तानची सरकारी दूरसंचार कंपनी आहे.

रिपोर्ट्सनुसार, अर्शदीपचे विकिपीडिया पेज एडिट करण्यासाठी वापरण्यात आलेला आयपी अ‍ॅड्रेस, पाकिस्तान आर्मी आणि परवेझ मुशर्रफ यांच्याशी संबंधित माहितीही याच आयपी अ‍ॅड्रेसवरून एडिट करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) या कटामागे आहे. ISPR ही पाकिस्तानी लष्कराची मीडिया आणि जनसंपर्क युनिट आहे.

प्रश्न 3: विकिपीडिया पेज कोण संपादित करू शकते?

उत्तर: कोणीही विकिपीडिया पेज संपादित करू शकतो. वास्तविक, विकिपीडिया लेखांमध्ये उपशीर्षकाशेजारी संपादन बटण असते. या संपादन बटणावर क्लिक करून, एखादी व्यक्ती पृष्ठाच्या आवृत्तीपर्यंत पोहोचू शकते जिथून त्या लेखात बदल केले जाऊ शकतात.

विकिपीडिया लेखांमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी विकिपीडिया खाते असणे आवश्यक नाही. तथापि, ज्यांच्याकडे विकिपीडिया खाती आहेत त्यांना सामान्य वापरकर्त्यांपेक्षा काही फायदे मिळतात. विकिपीडियावर खाते तयार करण्याची लिंक विकिपीडियावरच उपलब्ध आहे.

विकिपीडियाचे 'सानुकूल-वापरकर्ता खाते' तयार करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्व प्रथम, ते तुम्हाला गोपनीयता आणि सुरक्षितता देते.

विकिपीडियाचे म्हणणे आहे की, नोंदणीकृत संपादकांची ओळख अज्ञाताने संपादन करणाऱ्यांपेक्षा अधिक गुप्त असते. तसेच, नोंदणीकृत वापरकर्त्यांची चांगली प्रतिष्ठा देखील त्यांच्या विकी कारकीर्दीत उपयुक्त ठरते.

प्रश्न 4: एकदा बदलले की कोणी ते तपासते का?

उत्तर: होय. तुम्ही विकिपीडियामध्ये केलेले कोणतेही बदल सर्वांना लगेच दृश्यमान होतात. मात्र, काही सुरक्षित बाजू देखील आहेत, म्हणजे सुरक्षा उपाय. विकिपीडियाचे पेजवर बदलाआधीचे पेजही दिसते. यात नवीन संपादीत पेजसह या आधीचे पेजही वाचवक आणि संपादन केलेल्या व्यक्तीला दिसते.

विकिपीडियाचे संपादक साइटवरील प्रत्येक बदलाचे निरीक्षण करतात. या काळात कोणताही बदल चुकीच्या पद्धतीने किंवा दुर्भावनापूर्ण रीतीने केल्याचे आढळल्यास ते पुन्हा जुने पेज कायम ठेवतात. याशिवाय, विकिपीडिया खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती काढून टाकण्यासाठी बॉट्सचाही वापर करतो. बॉट्स, ज्यांना वेब रोबोट किंवा इंटरनेट बॉट्स देखील म्हणतात, हे प्रोग्राम केलेले सॉफ्टवेअर आहेत, जे स्वयंचलितपणे प्रोग्राम केलेले कार्य करतात.

विकिपीडियानुसार - 'लेखात कोणीही बदल करू शकतो, पण आम्ही डोळे झाकून बसत नाही. काही वापरकर्ते इतक्या चुकीच्या गोष्टी लिहितात की, आम्हाला त्यांच्या संपादन अधिकारांवर बंदी घालावी लागते. काही माहिती इतकी हानिकारक असते की आम्ही ती त्वरित आणि कायमची काढून टाकतो.

प्रश्न 5: विकिपीडिया संपादन करत असलेल्या वापरकर्त्यांचा मागोवा घेऊ शकतो?

उत्तर: होय. तुम्ही तुमची ओळख लपवून बदल केला तरीही विकिपीडिया तुमच्या IP पत्त्यावरून तुम्ही कोण आहात हे शोधण्यात सक्षम आहे.

तुम्ही तुमचा IP अ‍ॅड्रेस बदलला किंवा नवीन घेतला तरी तुम्ही निवडलेल्या लेखांचे प्रकार किंवा तुमचा संपादन नमुना देखील तुम्हाला विकिपीडियाच्या संपादकांसमोर आणेल.

त्यामुळे पेजवर चुकीची माहिती जोडणे आणि त्यातून सुटणे अशक्य नसले तरी ते सोपेही नाही.

प्रश्न 6: चुकीची किंवा खोटी माहिती जोडणार्‍यांवर काय कारवाई होते?

उत्तर: अशा परिस्थितीत विकिपीडिया तुम्ही जोडलेली चुकीची माहिती काढून टाकेल आणि तुम्हाला त्या पेजची जुनी आवृत्ती दिसेल. अनेक प्रकरणांमध्ये ते तुमच्या संपादनाच्या अधिकारावर बंदी घालू शकतात.

यासाठी 5 टप्प्यांपर्यंत चेतावणी देण्याची प्रक्रिया आहे. जर विकिपीडियाला वाटत असेल की, तुम्ही चुकीच्या हेतूने संपादन करत आहात, तर तुम्हाला पहिल्या टप्प्यानंतर संपादन करण्यापासून रोखले जाऊ शकते.

वारंवार चुकीच्या संपादनासाठी वापरण्यात येणारे पाने संरक्षित केली जाऊ शकतात, याचा अर्थ प्रत्येकजण ती संपादित करू शकत नाही. विकिपीडिया म्हणते की, केवळ विश्वसनीय वापरकर्ते अर्ध-संरक्षित किंवा पूर्ण-संरक्षित पेज संपादित करू शकतात.

प्रश्न 7: विकिपीडिया संपादकांची भूमिका काय आहे?

उत्तर: विकिपीडियाच्या पानाची माहिती संपादित करण्यासाठी विकिपीडियाच्या संपादकांची एक टीम आहे. या संपादकांसाठी विकी पृष्ठावरील माहिती संक्षिप्त, अचूक आणि तटस्थ ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. तसेच, विकिपीडिया पानावर दिलेल्या माहितीच्या स्त्रोतांच्या अनेक लिंक्स दिल्या जातात.

विकिपीडिया स्वतः कोणत्याही माहितीसाठी लेख लिहित नाही, तर प्रत्येक माहितीसाठी वेगवेगळे स्त्रोतांचा हवाला देतो.

विकिपीडिया संपादकांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यात 'धाडसी व्हा पण निष्काळजी नको', 'तुमच्या वाचकांना जाणून घ्या', 'कॉपीराईटचे उल्लंघन करू नका', 'स्वतःची जाहिरात करने टाळा' आणि 'कोट' म्हणजे प्रत्येक माहितीचा स्रोत द्या.

प्रश्न 8: विकिपीडियाने अर्शदीप प्रकरणाबाबत काही पाऊल उचलले आहे का?

उत्तर: होय. विकिपीडियाने खबरदारी म्हणून अर्शदीपचे इंग्रजी विकिपीडिया पृष्ठ अर्ध-संरक्षित केले आहे. म्हणजेच, आता केवळ विश्वासार्ह वापरकर्ते ते संपादित करू शकतात, जेणेकरून पृष्ठाशी आणखी छेडछाड करता येणार नाही.

विकिमीडिया फाऊंडेशनने आयटी मंत्रालयाकडून उत्तर मागवण्याला दुजोरा दिला आहे. अर्शदीप सिंगच्या पृष्ठावरील चुकीची संपादन माहिती विकिपीडियावरुन काही मिनिटांतच काढून टाकली असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...