आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • India Approves Johnson And Johnson Vaccine. All You Need To Know About The Vaccine; News And Live Updates

एक्सप्लेनर:जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस व्हॅक्सीन गंभीर लक्षणांपासून संरक्षण करण्यास 85 टक्क्यांपर्यंत प्रभावी; ऑगस्टमध्ये उपलब्ध होऊ शकते लस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीने भारतातही चाचण्या घेतल्या आहेत का?

देशात गेल्या काही दिवसापासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत देशात 50 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण झालेल्यांपैकी काही लोकांनी लसीचे पहिले डोस तर काहीनी दुसरे डोस घेतले आहे. दिलासादायक बातमी म्हणजे भारताला आता सिंगल डोस व्हॅक्सीन मिळाली आहे. अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या या लसीला केंद्र सरकारने आपत्कालीन मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या लसीला जगभरातील अनेक देशात मान्यता मिळाली आहे.

या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक सिंगल डोस व्हॅक्सीन आहे. कंपनीने यापूर्वी ट्रायलसाठी अर्ज केले होते. परंतु, केंद्र सरकारने या चाचण्यांमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर कंपनीने 5 ऑगस्ट रोजी आपत्कालीन मंजुरीसाठी परवानगी मागितली होती. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी या लसीला आपत्कालीन परवानगीसाठी मंजुरी दिली आहे.

चला तर मग जाणून घेऊया या लसीबद्दल सर्वकाही... ही व्हॅक्सीन कसे काम करेल? किती प्रभावी राहील? भारतात कधी पर्यंत येईल? आणि या लसीचे वैशिष्ट्य काय? भारतात खाजगीत ही लस किती रुपयाला मिळेल?

सर्वात आधी लसीबद्दल जाणून घ्या?
अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने ही लस तयार केली आहे. विशेष म्हणजे ट्रायलमध्ये ही लस 66% प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. भारतात लसीचे उत्पादन हैदराबाद येथील कंपनी 'बायोलॉजिकल इ' करणार आहे. ही एक सिंगल डोस व्हॅक्सीन आहे. या लसीला डब्ल्यूएचओकडून मान्यता मिळाली असून सध्या 59 देशात याचा वापर केला जात आहे.

ही लस कसे काम करते?
जॉन्सन अँड जॉन्सनने या लसीला जॅन्सन (Ad26.COV2.S) असे नाव दिले आहे. ही एक व्हायरल वेक्टर लस असून कोव्हिशिल्डसारखी आहे. आपल्या शरिरातील सेलपर्यंत अँटीजन पोहोचवण्यासाठी एका व्हायरसचा वापर केला जातो. या लसीमध्ये कोरोना व्हायरसची जीन्स अॅडेनोव्हायरसमध्ये मिसळून तयार केली गेली आहेत. ही पेशी आपल्या शरीरात स्पाइक प्रथिने बनवते. ही प्रथिने नंतर रोगप्रतिकारक शक्तीला व्हायरसशी लढण्यास मदत करतात. जॉन्सन अँड जॉन्सनने अशाचप्रकारे इबोला लसदेखील तयार केली होती.

काय सांगतात चाचण्यांचे निकाल?
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने या लसीचे पहिले ट्रायल अमेरिका, जपान, नेदरलँड आणि बेल्जियममध्ये केले आहे. प्रत्येक टप्प्यात चाचणीची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली असून तिसऱ्या टप्प्यात कंपनीने 17 देशांमध्ये लस चाचण्या घेतल्या होत्या. विशेष म्हणजे कंपनीने जगभरातील 40 हजारांहून अधिक लोकांवर क्लिनिकल चाचण्या केल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या लसीचे 66 टक्के प्रभाव असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे, रुग्णालयात दाखल होण्यास प्रतिबंध करण्यासाठी ही लस 85% प्रभावी आहे.

कंपनीने भारतातही चाचण्या घेतल्या आहेत का?
कंपनीने एप्रिलमध्ये भारतात क्लिनिकल ट्रायल्ससाठी अर्ज केला होता. पण भारत सरकारने अमेरिका, जपान, युरोप, WHO ने मंजूर केलेल्या आणि प्रतिष्ठित लसी उत्पादकांना भारतात क्लिनिकल ट्रायल्समधून बनवल्या जाणाऱ्या लसींना सूट दिली आहे. यामुळे केंद्र सरकारने कंपनीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. याची माहिती आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विटरवरुन दिली.

जॉन्सन अँड जॉन्सन ही लस बाजारात येण्यापूर्वी 100 लोकांना लस दिली जाईल. त्यानंतर सतत 7 दिवस या लोकांवर लक्ष ठेवले जाईल. जर 7 दिवसात कोणताही दुष्यपरिणाम झाले नाहीतर सर्वांना ही लस दिली जाणार आहे.

भारतात आतापर्यंत किती लसींना मंजूरी मिळाली आहे?
देशात आतापर्यंत अनेक लसींना परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिलेली ही लस 5 वी असून यामध्ये कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक-व्ही आणि मॉडर्ना या लसींना मान्यता देण्यात आली आहे. भारतात ऑगस्टच्या अखेरीस ही लस बाजारात येईल असे सांगितले जात आहे.

आपल्याला किती डोस मिळेल?
जॉन्सन अँड जॉन्सन या लसीचे उत्पादन भारतात बायोलॉजिकल ई करत आहे. वेगवेगळ्या अहवालांनुसार, 'बायोलॉजिकल ई' ही कंपनी दरमहा सुमारे 70 कोटी डोस तयार करु शकते. सध्याच्या लसीव्यतिरिक्त आपल्याकडे दरमहा 7 कोटी अतिरिक्त डोस उपलब्ध असतील.

बातम्या आणखी आहेत...