आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • India China War Dead Bodies Of Jawans Were Lying In Tawang For 5 Months, Indians Called 'bearded Ghosts'

ग्राउंड रिपोर्टचीनी सैनिकांनी कुत्रे-माकडांनाही कापून खाल्ले:मृतदेह तवांगमध्ये 5 महिने पडून होते, भारतीयांना म्हणायचे 'दाढीवाले भूत'

आशिष रायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही जेव्हा सेला वरुन तवांगकडे निघालो तेव्हा कच्च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भारतीय जवानांचे मृतदेह विखुरलेले होते. काही मृतदेह जळाले, तर काही न जळलेले. कुत्रे, गरुड आणि इतर पक्षी त्यांना खात होते, किंवा खाल्ले होते. सेला ते जसवंतगडपर्यंत अनेक किलोमीटरपर्यंत हीच परिस्थिती होती. युद्ध संपून 5 महिने उलटून गेले होते आणि चिनी सैन्य परत गेले होते, हे मृतदेह घेण्यासाठी कोणीही आले नाही.

हे सांगताना 73 वर्षीय तुतुन थुन यांचा अजूनही थरकाप उडतो. ते सांगतात की, 'भारतीय लष्कराचे बूट पाहून आम्ही त्यांचे मृतदेह ओळखले. भारतीय सैनिक चामड्याचे बूट घालायचे, त्यांच्या सोलला खाली लोखंडी नाल लावलेली असायची.

चिनी सैनिकांनी विजय साजरा करण्याच्या नावाखाली आमचे कुत्रे, बकरी, माकडे, घोडे कापून खाऊन टाकले होते. त्यांनी तवांग ते बुमला या दूरध्वनी तारा आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचे काही भागही चोरले.

तुतुन पुन्हा प्रश्न उपस्थित करतात. 'चीन 22 दिवसांत इथून निघून गेला होता. ही प्रेत अशीच का टाकली गेली आणि ती नेण्यासाठी कोणी का आले नाही? मी अनेक वर्षे याचा विचार करत राहिलो, अजूनही विचार करतोय.

तवांगमध्ये राहणारे बहुतेक ज्येष्ठ नागरिक 1962 मध्ये झालेल्या चिनी हल्ल्याचे साक्षीदार आहेत. मात्र, त्यांची संख्या आता केवळ 6-7 आहे.
तवांगमध्ये राहणारे बहुतेक ज्येष्ठ नागरिक 1962 मध्ये झालेल्या चिनी हल्ल्याचे साक्षीदार आहेत. मात्र, त्यांची संख्या आता केवळ 6-7 आहे.

9 डिसेंबर 2022 रोजी तवांग सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचे प्रकरण थंडावले आहे असे दिसते, परंतु तुतुन थुन अजूनही चीनबद्दल घाबरलेले आहेत. चीनचे युद्ध धोरण या विषयी अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, 1962 प्रमाणे चीन फसवणुकीद्वारे युद्ध पुकारण्याच्या प्रक्रियेत असल्याचा इशाराही दिला आहे.

तवांगच्या लोकांना ते युद्ध आणि चिनी सैन्याची क्रूरता अजूनही आठवते. लोक म्हणतात की चिनी सैनिक भारतीयांना 'दाढीवाले भूत' म्हणायचे.

तवांगला आजही 1962 च्या जखमा आठवतात

सुमारे 60 वर्षांपूर्वी चीनने भारताचा पराभव तर केलाच, पण त्याचे सैनिक सीमा ओलांडून तेजपूरपर्यंत पोहोचले होते. या संपूर्ण परिसरात त्यांनी कहरही केला होता. भारतीय जवान शेवटच्या श्वासापर्यंत लढले, पण कडाक्याची थंडी, शस्त्रास्त्रांचा अभाव आणि अनुभव यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.

1960 मध्ये प्रथमच, सरकारच्या आदेशानुसार, सैन्य नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी म्हणजेच अरुणाचल प्रदेश हाताळण्यासाठी पोहोचले. त्यांना या क्षेत्राची माहिती नव्हती.
1960 मध्ये प्रथमच, सरकारच्या आदेशानुसार, सैन्य नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी म्हणजेच अरुणाचल प्रदेश हाताळण्यासाठी पोहोचले. त्यांना या क्षेत्राची माहिती नव्हती.

चकमकीनंतर सीमेवरील वातावरण जाणून घेण्यासाठी मी 16 डिसेंबर 2022 रोजी तवांगला पोहोचलो. या संघर्षामुळे 1962 चे युद्ध पाहिलेल्या जनतेच्या जखमा पुन्हा एकदा ताज्या झाल्या. मी जामघर येथील रहिवासी असलेल्या 73 वर्षीय तुतुन थुन यांना भेटलो. तुतुन हे सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) निवृत्त झाले आहेत. चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा ते केवळ 13 वर्षांचे होते.

तुतुन थुन यांच्या कडूनच ऐका, चिनी लोक आले तेव्हा तवांगची काय अवस्था होती

टुतुन सांगतात की, '1962 मध्ये ऑक्टोबर महिना होता आणि तवांगमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली होती. मी माझ्या वडिलांसोबत भातशेतीत काम करत होतो. माझ्या शेजाऱ्याने धावत येऊन सांगितले की, चीनने बोमिल खिंडीतून तवांगमध्ये प्रवेश केला आहे. गोळीबार सुरू झाल्यावर आम्ही ठरवले की, शेतात राहणे योग्य नाही. तवांगमध्ये राहणे धोक्याचे होते, त्यामुळे जवळपास 900 गावकरी एका ठिकाणी जमले आणि आम्ही भूतानच्या सीमेकडे चालायला लागलो.

आम्ही काही किलोमीटर अंतरावर चखमतजवळ आलो आणि आमचा सामना चिनी सैनिकांशी झाला. ते एका रांगेत हातात शस्त्रे घेऊन जात होते. सैनिकांची संख्या पाहून हे लक्ष्यात येते होते की, लाल कपड्याचा (लामांचा पोशाख) तिरस्कार करणारा चीन आता बुद्धाच्या भूमीवर कब्जा करणार आहे हे निश्चित आहे. यानंतर आम्ही छोटे छोटे गट करून हळूहळू पुढे जाऊ लागलो.

वाटेत आम्हाला भारतीय सैनिक भेटले तर आम्ही त्यांना लपवून ठेवले, चिनी सैनिकांनी त्यांना मारले असते

आठवणी सांगता-सांगता तुतुन भरकटून जातात, पण पुन्हा सांगायला सुरूवात करतात. थोडे पुढे गेल्यावर भारतीय लष्कराचे काही सैनिक दिसले. आम्हाला माहित होते की जर चिनी सैनिकांनी त्यांना पाहिले तर ते त्यांना ठार मारतील.

चिनी सैनिक सामान्य लोकांवर जास्त हल्ले करत नव्हते पण भारतीय सैनिकांना क्रूरपणे मारत होते. आम्ही त्यांना अन्न आणि कपडे दिले. तसेच त्यांच्या बंदुका लपवून त्यांना आमच्यात समाविष्ट करुन घेतले. तेही गावकरी झाले आणि आमच्याबरोबर भूतानला चालायला लागले. सुमारे 5 दिवसांनी आम्ही चखतम (भूतान बॉर्डर) येथे होतो.

22 दिवस उघड्यावर झोपले, झाडांवर उपाशी बसले भारतीय सैनिक

तुतुन पुढे सांगतात की, 'आम्हाला सीमेवर राहणे योग्य वाटले. इथून चिनी गोळीबार आम्हाला स्पष्ट दिसत होता. आमच्या अंगावरून तोफांचे गोळे जात होते. कडाक्याची थंडी होती, पण उघड्यावर झोपावे लागले. थंडीपासून वाचण्यासाठी आम्ही दगडांचा आडोसा घ्यायचो.

हळुहळु सर्व बाजूंनी पळून गेलेले लोक सीमेवर जमा होऊ लागले. जवळपास 22 दिवस आम्ही असेच उघड्यावर राहिलो. यावेळी भारतीय लष्कराचे जवान आमच्यासोबत गावकरी म्हणून राहत होते. त्यानंतर बोमडिलापर्यंत चीन आल्याचे कळले. आम्हाला इथून पुढे जाणेच योग्य वाटले.

घनदाट जंगल पार करून हजारो लोक बालमा येथे पोहोचले. तिथे आम्हाला आणखी काही भारतीय लष्करी जवान भेटले. त्यांच्याकडे देखील खायला काहीच नव्हते आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी कपडे नव्हते. आम्ही त्यांना आमच्यासोबत येण्यास सांगितले, ते आधी नाखूष झाले, पण नंतर त्यांनी होकार दिला. आम्ही जे काही खाऊ ते त्यांना खायला द्यायचो. वाटेत एका झाडावर भुकेने तहानलेले अनेक लष्करी जवान बसलेले दिसले.

चीनी परतले, पण तवांगला मृतदेहांचा ढीग बनवले

तुतुन सांगतात की, 'बरेच दिवस चालल्यानंतर आम्ही आसामच्या सीमेवर म्हणजे जोगतीनला पोहोचलो. एक भारतीय हेलिकॉप्टर आमच्या मदतीसाठी तिथे आले. त्यांनी आमच्यासाठी अन्नाची पाकिटे टाकली. यानंतर आम्ही लष्कराच्या छावणीत पोहोचलो आणि तेथे लष्कराच्या जवानांनी आम्हाला जेवण दिले. आमच्या सोबत असलेले सैनिक आता पुन्हा सैन्याच्या बटालियनमध्ये सामील झाले होते. तेथे काही दिवस राहिल्यानंतर आम्ही आसाममधील मंगळदेव येथे गेलो. तिथे शेतात काम करायचो आणि त्या बदल्यात काही पैसे मिळायचे.

जेव्हा आम्ही भारतीय सैन्याला घरी परतायचे असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांच्या वनटन (लष्कराचे वाहतूक वाहन) मध्ये बसवले आणि आम्हाला रूपा पुलाजवळ सोडले. इथून पायी चालत तवांगला निघालो. सेला ते तवांगपर्यंत भारतीय जवानांचे मृतदेह विखुरलेले होते, चिनी लोकांचा क्रूरपणा आमच्या डोळ्यांसमोर होता.

युद्धाच्या प्रत्यक्षदर्शींशी बोलून लिहिलेल्या '1962 व्हेन द माउंटन्स क्राईंग' या पुस्तकात तुतुन यांच्या विधानाला पुष्टी मिळते. सध्या तवांगचे माहिती आणि जनसंपर्क संचालक शर्मो नग्वांग चोइडार्क यांनी या पुस्तकात चीनच्या युद्धादरम्यान घडलेल्या घटनांबद्दल लिहिले आहे.

तवांगकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर अनेक किलोमीटर कुजलेले आणि जळलेले मृतदेह पडलेले होते. पुस्तकानुसार, न्यूकमडुंग आणि चाकू येथे सर्वाधिक भारतीय जवान शहीद झाले.

​​​​​​तवांगच्या लोकांना आमिष दाखवून चीनला सोबत ओढायचे होते 1962 च्या युद्धाचे साक्षीदार असलेले 71 वर्षीय लामा ताशी म्हणतात की, 'चिनी सैनिक गोळीबार करताना जसे पुढे जात होते, तसेच ते मागे रस्तेही बनवत होते. भारतात मोठ्या संख्येने सैनिक दाखल करून घेण्याचेही त्यांचे नियोजन होते.

तवांगवरील हल्ल्यानंतर त्यांनी स्थानिक लोकांचे फारसे नुकसान केले नाही. आमचे आणि त्यांचे चेहरे सारखे असून आपण भाऊ-बहीण आहोत, असे ते म्हणायचे. भारतीय दाढीवाले भुते आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत राहा. आम्हाला घाबरण्याची गरज नाही, असे चिनी सैनिक म्हणायचे.

तवांगच्या युद्धादरम्यान उपस्थित असलेले 80 वर्षीय तिशो कामा म्हणतात की, 'मी माझ्या घामाने तवांग वसवले आहे. चीनने फायर केलेले बॉम्ब मुख्य बाजारपेठेत पडत होते. चिनी हल्ल्यानंतर, मी माझे वडील आणि कुटुंबासह जंगलात लपून राहिलो, अनेक दिवस उपाशी आणि तहानलेला राहिलो. चीनी गेल्यानंतर आम्ही मिळून या शहरात पहिला रस्ता बांधला.

चिनी सैनिक साखर-मिठाचे आमिष दाखवून शेतात एकत्र काम करायचे

तवांगमधील देशातील सर्वात मोठ्या बौद्ध मठात मी तोंके उरु यांना भेटलो. 1962 चे दिवस आठवत ते म्हणाले की, 'ऑक्टोबरच्या शेवटी चीनने जिमितांगवर हल्ला केला. त्यावेळी भारतीय सैन्य कमकुवत होते आणि संख्याही कमी होती. चिनी सैनिक रात्रंदिवस पायी पुढे जात होते. त्यांनी आम्हाला काहीच सांगितले नाही, नाल्यात लपून बसाल तर तुमचे प्राण वाचतील, असे ते म्हणायचे. दिरममध्ये चिनी सैनिकांनी आपल्या सैनिकांना घेरून ठार मारल्याचे आम्हाला नंतर कळले.

यानंतर मी 74 वर्षांचे जिन-जा-ची भेटले, ज्यांनी भारत-चीन युद्ध स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. ते म्हणाले की, 'चिनी सैनिक म्हणायचे की, तुम्ही घरी राहाल तर सुरक्षित राहाल. मात्र, आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि जीव वाचवण्यासाठी आम्ही घरातून पळ काढला आणि बोमडिला येथे पोहोचलो. आम्ही भारतात जन्मलो आणि वाढलो, आज युद्ध झाले तर शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढू.

अवघ्या 8 दिवसात भारताचा पराभव झाला

23 ऑक्टोबर 1962 रोजी चीनने औपचारिकपणे भारताविरुद्ध युद्ध सुरू केले. चीन आणि भूतानमधील नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी (NEFA) सीमेवर चिनी सैन्याने जोरदार गोळीबार सुरू केला. हा भाग आज अरुणाचल प्रदेश आहे, ज्यावर चीन स्वतःचा दावा करत आहे.

तुतुन थुन सांगतात की, चीन एवढा गोळीबार करत होता की, रात्रीच्या वेळी देखील सकाळप्रमाणे उजेड दिसत होता. त्या युद्धात भारताचा अवघ्या 8 दिवसांत पराभव झाला होता. त्या युद्धात भारताचे एक हजाराहून अधिक सैनिक हुतात्मा झाले होते आणि शेकडो सैनिकांना चीनने कैद केले होते.

वास्तविक, युद्धाच्या 60 वर्षांनंतर, आता तशी स्थिती राहिलेली नाही. भारत आता मजबूत आहे आणि लष्कर देशाच्या प्रत्येक इंच भूमीचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असा विश्वास स्वत: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.

1962 मध्ये भारताचा चीनकडून यामुळे झाला होता पराभव...

1962 मध्ये भारताच्या पराभवाच्या कारणांबद्दल, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी सांगितले की ऑक्टोबर 1959 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी संसदेत सांगितले की, आता NEFA ला लष्कर सांभाळेल. यापूर्वी या क्षेत्राची जबाबदारी गृहमंत्रालयाकडे होती.

लष्कराला या भागाची कल्पना नव्हती आणि 1960 मध्ये भारतीय सैन्य पहिल्यांदा येथे पोहोचले. तिथे गेल्यावर लष्कर बंकरपासून छावणीपर्यंत खाण्यापिण्याची, कपडे, शस्त्रे, दळणवळण, बंदुका आणि रसद यांची व्यवस्था करत होते. आम्हाला मॅकमोहन रेषेची माहिती नव्हती. तसेच आमच्याकडे सीमा निश्चित करण्यासाठी अचूक नकाशे नव्हते.

आमच्याकडेही फार कमी सैन्य होते. पंडित नेहरूंनी लष्कराला सांगितले होते की, पाकिस्तानच्या सीमेकडे लक्ष द्या, आम्ही चीनची सीमा मुत्सद्दीपणे हाताळू. चीनच्या मुद्द्यावर सरकारकडे स्पष्टता नव्हती. चीनशी आपले युद्ध होणार नाही, असे त्यांना वाटत होते.

यानंतर चौथ्या डिव्हिजनला आणि सातव्या डिव्हिजनला तवांगच्या दिशेने जाण्यास सांगण्यात आले. त्या दिवसात खूप थंडी होती. रस्ते नव्हते, गरमीचे कोणतेही साधन नव्हते. अशा स्थितीत लष्कराला तयारीसाठी केवळ 6 महिने मिळाले.

निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी पुढे म्हणाले की, जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा देशातून होणारा अन्नपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळेच आपले सैनिक तेथे अनेक दिवस भुकेले तहानलेले लढले.

शहीद झाल्यानंतर अनेक महिने डोंगरात पडलेल्या सैनिकांच्या मृतदेहांचा प्रश्न निवृत्त लेफ्टनंट जनरल यांनीही मान्य केला. हे मृतदेह वेगवेगळ्या भागात विखुरलेले असल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. आमचे सैन्य कमी होते. युद्धक्षेत्रात चीनच्या तीन ब्रिगेड होत्या आणि आमच्याकडे फक्त एकच. अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकलो नाही आणि आमचा पराभव झाला.

या संदर्भात आणखी बातम्या वाचा..

जपान 90 वर्षांनंतर पुन्हा चीनवर आक्रमक:चीनला नष्ट करणारी घातक क्षेपणास्त्रे 3 लाख कोटी रुपयांना खरेदी करणार

1931 ची घटना आहे. जपानमध्ये रेल्वे मार्गावर स्फोट झाला. यात चीनचा हात असल्याचा दावा जपानच्या वतीने करण्यात आला. प्रत्युत्तर म्हणून जपानने चीनमधील मंचुरियावर हल्ला केला. चिनी सैनिकांना जपानी सैनिकांचा सामना करता आला नाही. नोव्हेंबर 1937 पर्यंत जपानने चीनचे शांघायही ताब्यात घेतले. जपानी सैनिकांचे पुढील लक्ष्य चीनची तत्कालीन राजधानी नानजिंग होते. डिसेंबर 1937 मध्ये जपानी सैन्याने नानजिंगवर आक्रमन केले. जपानी सैनिकांची आक्रमकता पाहून चिनी सैनिक पळून गेले.

नानजिंग शहराचा ताबा घेतल्यानंतर जपानी सैनिकांनी प्रचंड नरसंहार केल्याचे सांगितले जाते. एका अंदाजानुसार त्यावेळी अडीच ते तीन लाख लोकांचा बळी गेला होता. नानजिंग हत्याकांडाच्या आठवणीने चीनचे लोक अजूनही थरथर कापतात. नानजिंग हत्याकांडानंतर चीन पुन्हा एकदा जपानच्या निशाण्यावर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने पुन्हा एकदा चीनविरुद्ध शस्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. जपानने शुक्रवारी जीडीपीच्या तुलनेत संरक्षण बजेटमध्ये 2% वाढ केली आहे. पूर्ण बातमी वाचा...

बातम्या आणखी आहेत...