आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-दिल्लीवाले अफवा पसरवतात, तवांगला झेलावे लागते:टीव्हीवर युद्ध, पण LAC वर सर्व नॉर्मल; शहरातून टूरिस्ट गायब, बिझनेस ठप्प

लेखक: आशीष राय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीला दहा दिवस उलटले आहेत. तवांगमध्ये शांतता आहे, कोणतीही मोठी सैन्य हालचाल नाही आणि युद्धाची कसलिही चाहूल नाही. इथल्या लोकांना चिंता आहे की, पर्यटक तर निघून गेले. आता या हंगामातील नुकसान कसे भरून काढणार? सोनिया, दावा तशी आणि डेव्हिड रूक्षपणे सांगतात की, आम्हाला तर टीव्हीवरूनच या संघर्षाची माहिती मिळाली. युद्धाची अफवा दिल्ली-मुंबईतून उडते आणि आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात.

12 डिसेंबर रोजी ब्रेकिंग न्यूज आली होती की, तवांगमध्ये भारत-चीन सीमेवर म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यामध्ये 6-7 भारतीय जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गुवाहाटी येथील आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चिनी सैनिकांचे अधिक नुकसान झाल्याचा दावाही करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दावा केला की भारतीय लष्कराने चीनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. चीनबाबत देशभरात लोकांचा रोष उसळला. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त समोर येऊ लागले. अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, जे जुने किंवा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या युद्धाचा मागोवा घेत मी 17 हजार फूट उंचीवरील हाडे गोठवणाऱ्या थंडीत पोहोचलो.

तवांगला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मार्च ते सप्टेंबर, परंतु नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत पर्यटक येथे हिमवर्षाव पाहण्यासाठी येतात. चकमकीच्या वृत्तानंतर पर्यटक बुकिंग रद्द करून परतत आहेत.
तवांगला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मार्च ते सप्टेंबर, परंतु नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत पर्यटक येथे हिमवर्षाव पाहण्यासाठी येतात. चकमकीच्या वृत्तानंतर पर्यटक बुकिंग रद्द करून परतत आहेत.

गुवाहाटी विमानतळावर तणाव, तवांगपर्यंत सर्व बदलून गेले

या कडाक्याच्या थंडीत तवांगसारख्या दुर्गम भागात भारतीय सैन्य दलाचे जवान 365 दिवस 24 तास कर्तव्य बजावत आहेत. या झटापटीविषयी माझ्या तपासाची सुरुवात 14 डिसेंबर रोजी गुवाहाटी विमानतळावरूनच सुरू झाली. येथील विमानतळाच्या धावपट्टीवर मला सैन्याचे दोन कार्गो बोईंग सी-17 ग्लोबमास्टर दिसले.

मला गुवाहाटीहून पवनहंस हेलिकॉप्टरने तवांगला जायचे होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा सध्यासाठी बंद करण्यात आली आहे. चकमकीनंतर तवांगला 'नो फ्लाय झोन' घोषित करण्यात आल्याचे कारण स्पष्ट होते. त्यामुळे नागरिकांना तेथे हवाई मार्गाने जाणे शक्य नव्हते. विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव होता, ते कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करत होते.

मी 18 तास खर्च करून रस्ते मार्गाने तेजपूरहून ग्राउंड झिरो गाठण्याचा निर्णय घेतला. 15 डिसेंबरला वाटेतच, तवांगच्या आधी सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या सेला खिंडीजवळ सैन्याचा ताफा तवांगहून परतत असल्याचे मला दिसले. हे खूपच विचित्र होते, कारण वृत्तवाहिन्या सातत्याने तवांगच्या दिशेने लष्कराच्या हालचाली सुरु असल्याचे दाखवत होत्या.

लष्कराच्या ताफ्यात सामील असलेल्या सैनिकांना विचारले असता, ही नियमित हालचाल असल्याचे उत्तर मिळाले. एक सैनिक हसत हसत म्हणाला की, युद्ध फक्त टीव्हीवर आहे. 15 डिसेंबरला मला तेजपूरलाच थांबावे लागले, इथेही टीव्हीवरील युद्धाच्या चर्चा होत्या, पण जनजीवन सामान्य वाटत होते.

तवांगमध्ये एकही विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन नाही. येथून जवळचे विमानतळ आसाममधील तेजपूर आहे, जे तवांगपासून 317 किमी अंतरावर आहे.
तवांगमध्ये एकही विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन नाही. येथून जवळचे विमानतळ आसाममधील तेजपूर आहे, जे तवांगपासून 317 किमी अंतरावर आहे.

तवांगमध्ये शांतता होती, मुख्य चौकात एकच पोलीस होता

दोन दिवसांच्या प्रवासानंतर 16 डिसेंबरच्या संध्याकाळी जेव्हा मी तवांग शहरात पोहोचलो तेव्हा इथे सर्व काही नॉर्मल होते. तथापि इथे गरजेपेक्षा जरा जास्तच शांतता होती. दुकाने आणि उपाहारगृहे सुरु होती, पण गर्दी नव्हती. संपूर्ण शहरात फक्त जुना बाजार चौकातच एकच पोलिस दिसला.

17 डिसेंबरला सकाळी मी उठलो तेव्हा रस्त्यावर वाहने सामान्यपणे धावताना दिसली. काही पर्यटक बाजारात फिरताना आणि खरेदी करताना दिसले. इथे पोहोचल्यानंतर युद्ध तर दिसलेच नाही. पण पर्यटक नसल्याने स्थानिक लोक मात्र नक्कीच निराश दिसत होते.

मला वाटले की शहरातील परिस्थिती भलेही सामान्य असेल, परंतु सीमेवर नक्कीच हालचाल असेल. तवांगहून मी बुमला पासकडे जाऊ लागलो. समुद्रसपाटीपासून 15 हजार 200 फूट उंचीवर असलेला बुमला पास हा अरुणाचल प्रदेश आणि तिबेटच्या ल्होखा पासदरम्यानचा तो भाग आहे, जिथून चीनची सीमा दिसते.

सामान्य दिवसांत इथे पर्यटकांना येथे येण्याची परवानगी असते. एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त चिनी सैनिकही या पासपर्यंत येतात आणि दोन्ही देशांत फ्लॅग मीटिंगही येथे होते.

लष्कराच्या छावणीबाहेर कडक बंदोबस्त, पण विशेष हालचाल नाही

जसजसा मी उंचावर जात होतो तसतसे तापमान कमी होत होते. वाटेत गोठलेली झाडे आणि डोंगरावर दिसणारा बर्फ इथल्या खडतर हवामानाची कथा सांगत होता. या वाटेवर सैन्याच्या अनेक लहान-मोठ्या छावण्या दिसल्या. या छावण्यांबाहेर अतिशय कडेकोट बंदोबस्त होता. तरीही तेथे युद्धासारखी परिस्थिती असल्याची कोणतीही चिन्हे दिसली नाही. वाटेत एका ठिकाणी आमच्या वाहनाची रजिस्टरमध्ये नोंद करून मग आम्हाला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

मुख्य शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगडी बंकर बांधलेले दिसले. 1962 च्या युद्धात भारतीय लष्कराने या बंकर्सचा वापर केला होता. ते भग्नावस्थेसारखे दिसत होते. भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे बंकर आमच्या जवानांच्या शौर्याचे प्रतीक आहेत, त्यामुळे ते येथून हटवलेले नाहीत. सेना त्यांना हटवू देणार नाही.

तवांग शहराबाहेर असे अनेक बंकर बांधलेले आहेत. 1962 च्या युद्धात भारतीय सैनिकांनी त्यांचा वापर केला होता. 300 चिनी सैनिकांना ठार मारणारे रायफलमन जसवंत सिंह रावत 72 तास अशा बंकरमध्ये उभे होते.
तवांग शहराबाहेर असे अनेक बंकर बांधलेले आहेत. 1962 च्या युद्धात भारतीय सैनिकांनी त्यांचा वापर केला होता. 300 चिनी सैनिकांना ठार मारणारे रायफलमन जसवंत सिंह रावत 72 तास अशा बंकरमध्ये उभे होते.

चीनच्या सीमेजवळ जाण्यास अजूनही बंदी

आम्ही सलगपणे बुमला पासकडे जात होतो आणि वाटेत आम्हाला अनेक ठिकाणी लष्कराची वाहने आणि सैनिक दिसत होते. लष्कराने सध्या हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. मात्र, लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 12 डिसेंबर रोजी झालेल्या फ्लॅग मीटींगनंतर परिस्थिती सामान्य आहे.

सैन्याच्या जवानांनी मला कॅम्पसचे फोटो काढण्यापासून रोखले, म्हणाले - हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. यानंतर मी वाय जंक्शनवर पोहोचलो आणि सैन्याने मला पुढे जाण्यापासून रोखले. कर्तव्यावर असलेल्या एका शिपायाने ऑफ कॅमेरा सांगितले की 9 डिसेंबरच्या घटनेनंतर, येथून बुमला पासपर्यंत प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. येथून फक्त सैन्याची वाहनेच पुढे जाऊ शकतात.

युद्धाच्या वृत्तानंतर पर्यटनस्थळ रिकामे, भीतीने लोक परतले

यानंतर मी मार्ग बदलला आणि सांगेसर तलावाकडे निघालो. सुमारे 10 किमी चालल्यानंतर मी माधुरी तलावाजवळ पोहोचलो. तेथे उपस्थित स्थानिक लोकांनी सांगितले की, येथे बॉलिवूड चित्रपट 'कोयला'चे एक गाणे शूट करण्यात आले होते.

समुद्र सपाटीपासून 3,708 मीटर उंचीवर जेमिथांगजवळ असलेले हे सरोवर 1973 मध्ये झालेल्या भूकंपानंतर तयार झाल्याचे म्हटले जाते. सांगेसर तलाव हिवाळ्यात गोठतो. याठिकाणी आर्मीचे कॅन्टीन असून सामान्य दिवसांत येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. इथे पोहोचलो तेव्हा एक-दोनच लोक दिसले.

युद्धाच्या बातम्यांनी लोक नाराज, म्हणाले- व्यवसाय 40 टक्क्यांनी घटला

अंधार पडत होता, थंडी वाढत होती, म्हणून मी सीमेवरून पुन्हा तवांग शहराच्या दिशेने परतायला लागलो. दरम्यान, वाटेत एक छोटंसं किराणा दुकान चालवणाऱ्या हे मैसूला भेटलो. जेव्हा मी त्यांना युद्ध आणि तणावाबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या- 'भारत आणि चीनमध्ये युद्धसदृश परिस्थिती असल्याच्या बातम्या आल्यापासून पर्यटकांनी इथे येणे बंद केले आहे. इथे मोबाईल नेटवर्क नाही, कुणाशी बोलायचे असेल तर एक किलोमीटरचा डोंगर चढून जावे लागते.'

तवांगहून संगेसर तलावाकडे जाताना मलाही मोजकेच पर्यटक दिसले. संपूर्ण मार्गात कुठेही युद्ध किंवा तणावाची परिस्थिती असल्याचे दिसून आले नाही. शहरात पोहोचल्यावर तवांग मार्केट असोसिएशनचे सेक्रेटरी दावा ताशी यांना भेटलो. मीडियाचे नाव ऐकताच ते संतापले आणि म्हणाले- 'सीमेवर जे काही घडले त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

चीनने आपल्या देशात घुसखोरी केल्याचे प्रसारमाध्यमे सांगत आहेत. मात्र तसे काहीच नाही. मीडियाने अफवा पसरवल्यानंतर आमचा व्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे. पर्यटक 40% कमी झाले आहेत. बाजारपेठ रिकामी आहेत, वाहने उभी आहेत.'

टूर ऑपरेटर चिंतेत, भीतीपोटी लोक बुकिंग रद्द करत आहेत

तवांगमध्ये टूर ऑपरेटर म्हणून काम करणारे डेव्हिड सांथर म्हणाले- 'तणावाच्या बातम्या आल्यापासून दिल्ली, कोलकाता सारख्या शहरांतून फोन येत आहेत. येथे असे काहीही नाही, तरीही लोकांमध्ये घबराट आहे. येथे कोणताही हल्ला झालेला नाही आणि आम्ही पूर्णपणे सुरक्षित आहोत. भीतीपोटी अनेक जण दौरे रद्द करत आहेत.'

मार्केटमध्ये थोडे पुढे गेल्यावर मला टाकपा भेटले, जे टॅक्सी सेवेचे काम करतात. तेही खूप संतापले, म्हणू लागले – 'टीव्हीवर जे सांगितले जात आहे ते अतिशयोक्तीपूर्ण आहे. यावेळी बर्फ पाहण्यासाठी लोक येतात आणि सर्व हॉटेल्स फुल असतात. पण आता खालून कोणी येत नाही, जे आले होते तेही परतले आहेत.

गुवाहाटी, इटानगर, तेजपूर आणि कोलकाता येथून अनेक पर्यटक येथे येतात, मात्र आता या घटनेमुळे सर्व काही ठप्प झाले आहे. माझे 80% नुकसान झाले आहे. वर्षाच्या या वेळी भरपूर पर्यटक येत होते. मठातही गर्दी असायची. याठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना खूप गर्दी असायची, पण आता सगळे रिकामे आहे. हा सीझन सगळ्यांना उद्ध्वस्त करून गेला.'

तवांगच्या मार्केटमध्ये बॅग शॉप चालवणाऱ्या सोनम म्हणतात, 'सामान्यतः या सीझनमध्ये खूप पर्यटक येतात, पण सध्या मार्केटमध्ये शांतता आहे. सीमेवर जे काही घडले त्याचा आमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम झाला नाही.'

स्थानिक लोकांचे नुकसान झाले, पण चीनसाठी तवांग का महत्त्वाचे आहे...

आर्टिलरीचे निवृत्त महासंचालक पीआर शंकर सध्या आयआयटी मद्रासमध्ये एरोस्पेस विभागात प्राध्यापक आहेत. त्यांच्या एका शोधनिबंधानुसार, अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा मॅकमोहन रेषेवर आधारित आहे. ही पश्चिमेकडील भूतानपासून सुरू होते आणि पूर्वेला हिमालयाच्या पायथ्याहून पुढे जाते. शेवटी ती भारत, म्यानमार आणि चीन सीमेच्या ट्राय जंक्शनकडे वळते.

येथे अनेक क्षेत्र आणि ठिकाणे विवादित आहेत, ज्यावर भारत आणि चीनकडून दावा सांगितला जातो. या भागात, LAC च्या जवळ अनेक पास आहेत, जे 13 हजार ते 16,500 फूट उंचीवर आहेत. लष्कराच्या दृष्टिकोनातून हे पासेस अतिशय महत्त्वाचे आहेत.

याच ठिकाणी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे कामेंग क्षेत्र आहे, जे LAC वर भारत, तिबेट आणि भूतान ट्रायजंक्शनजवळ पश्चिम टोकाला आहे. या भागात खेंजेमन, बुम ला आणि तुलुंग ला हे पास आहेत. आणि त्यांना जोडणारे अनेक छोटे पासेस आहेत.

पूर्वेकडील यांगत्से हा असाच एक छोटा पास आहे जो बुम लाशी जोडण्यासाठी वापरला जातो. 1962 च्या युद्धात चिनी सैनिकांनी या मार्गांचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. जर चीनने LAC ला लागून असलेल्या यांगत्सेवर ताबा मिळवला तर ते आपल्या भूभागावर आणि हालचालींवर सहज नजर ठेवू शकतील. तसेच, लष्कराच्या मदतीने LAC ची स्थिती एकतर्फी बदलली जाऊ शकते.

चीनचा दावा – तवांग तिबेटचा भाग

पीआर शंकर यांच्या शोधनिबंधानुसार, तवांगवर दावा करण्यासाठी चीन इतिहासाचा विपर्यास करतो. ग्लोबल टाइम्सच्या अहवालात दावा केला आहे की 1681 मध्ये, 5 व्या दलाई लामा नगावांग लोबसांग ग्यात्सो यांनी तवांग मठ बांधण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून, तवांग हे मेन्यू क्षेत्राचे (जिथे तवांग जिल्हा आहे) राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. येथे तिबेटचे सरकारचे राज्य होते.

सहावे दलाई लामा सांगयांग ग्यात्सो यांचा जन्म तवांग येथे झाला. यामुळे तिबेटी लोक हे पवित्र स्थान मानू लागले. या आधारावरच चीन तवांगला तिबेटचा भाग मानतो. तवांग हा अरुणाचल प्रदेशचा भाग असल्याने तो संपूर्ण राज्यावर दक्षिण तिबेट असल्याचा दावा करतो.

2005 मध्ये, भारत आणि चीनमध्ये सीमा करार झाला होता. तेव्हा चीनने तिबेटचा भाग म्हणून अरुणाचल प्रदेशच्या कोणत्याही भागावर दावा केला नव्हता. दक्षिण तिबेटसारखे कोणतेही क्षेत्र यापूर्वी कधीही अस्तित्वात मानले गेले नाही. हे सर्व 2003 मध्येच सुरु झाले होते. जेणेकरून आता जे सुरु आहे, त्यासाठी व्यासपीठ तयार करता येईल. यामागे चीनचे विस्तारवादी धोरण होते.

अरुणाचल प्रदेश हडपण्याची चीनची योजना

चीनने तिबेट सीमेवरजवळील ज्या भागांवर दावा केला आहे त्यांच्यावर कब्जा करण्यासाठी सर्व राजकीय, राजनैतिक आणि लष्करी मार्गांचा अवलंब तो करेल. अरुणाचल प्रदेश ताब्यात घेण्यासाठी तो तिबेटच्या माध्यमातून सर्व ते लष्करी प्रयत्न करेल. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चीन भूतानवरही दबाव टाकेल.

भारताला गुंतवून ठेवण्यासाठी तो LAC चा वापर राजकीय आणि लष्करी दबाव बिंदू म्हणून करेल. तो आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतींचा वापर करेल. यात लहान चकमकींपासून ते मोठ्या युद्धांपर्यंत सर्व काही असेल. मात्र, हे सर्व भारत आणि चीनदरम्यानच्या सामरिक परिस्थितीवर आणि जागतिक वातावरणावर अवलंबून असेल.

चीन तवांगमध्ये 1962 ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे

कामेंग सेक्टरमध्ये चीनचा उद्देश तवांग ताब्यात घेण्याचा आहे. हे ऑपरेशन खेंजेमन, बुम ला आणि तुलुंग ला पासेसमधून केले जाईल. याचा तळ तिबेटचे ल्हासा शानान क्षेत्र असेल, जे LAC पासून सुमारे 125-150 किमी अंतरावर आहे. तवांग ताब्यात घेतल्याने चीनला तिबेटीयन बौद्ध धर्माशी थेट संबंध असलेल्या सर्व प्रदेशांना एकत्र करता येईल. त्यामुळे तिबेटवरील त्यांची पकड आणखी मजबूत होईल.

असे करून त्याला भारतालाही मोठा धडा शिकवायचा आहे. तथापि, अशी कोणतीही लष्करी हालचाल अत्यंत धोकादायक आहे. भारताशी युद्ध झाले तर ही लढाई उंच ठिकाणी लढली जाईल. यासाठी बरीच तयारी करावी लागेल आणि यश मिळण्याची शक्यताही कमी आहे.

यापूर्वी 2020 मध्ये चीनने भूतानच्या साकतेंग अभयारण्यावर दावा केला होता. हे अभयारण्य भूतानच्या पासामलंग आणि झाकारलंग व्हॅलीपासून 100 किमी अंतरावर आहे, ज्यावर चीन दावा करतो. हे ठिकाण तवांग ट्रॅकला लागून आहे. चीन तो दक्षिण तिबेटचा भाग म्हणून दाखवेल.

जर चीनने भूतानवर वरचढ ठरला आणि साकतेंगमधून त्याने मार्ग तयार केला, तर याचा अर्थ असा आहे की तो 1962 प्रमाणे तवांगमध्ये आपल्या डिफेन्सच्या मागून वेढा घालत आहे. त्यामुळे भारताला मोठा लष्करी धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, कोणत्याही मोठ्या हल्ल्यासाठी चीनला LAC वर मोठा तळ उभारावा लागेल. यांगत्से पोस्टवर चिनी सैन्याची कारवाई ही त्याची सुरुवात आहे.

यांगत्से पोस्टवर कब्जा करून चीनने एलएसीमध्ये कायमस्वरूपी बदल केले असते

यांगत्से पोस्ट ताब्यात घेण्याचा प्रयत्न हिवाळ्यात झाला, जेव्हा सैन्याची नियमित अदला-बदली सुरु असते. भारताच्या 50 सैनिकांच्या तुलनेत चीनने या पोस्टवर 200-300 सैनिक तैनात केले, म्हणजे भारताच्या एका सैनिकाच्या तुलनेत 6 सैनिक. या ऑपरेशनचे नियोजन चीनमध्येच सर्वोच्च पातळीवरच केले जाऊ शकते.

हे ऑपरेशन असे सांगून जस्टिफाय केले जाते की, चीन भारताच्या हद्दीतील आपला दावा मागे घेत आहे. जर त्याने या पोस्टवर कब्जा केला असता तर हिवाळ्यात ते आणखी अभेद्य केले असते. त्यानंतर चीनने LAC कायमस्वरूपी बदलली असती. यामुळे त्याला एक तळ मिळाला असता जिथून तो त्याचे ऑपरेशन पुढे नेऊ शकेल. संपूर्ण ऑपरेशन विजय म्हणून दाखवून भारताला एक कमकुवत राष्ट्र म्हणून दाखवले असते.

चिनी मीडियाचा दावा – डोंगजेंग भागात झटापट झाली, जिथे गेल्या वर्षीही चकमक झाली होती

तवांगमधील चकमकीनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तथापि, प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले - आमच्या माहितीनुसार, चीन-भारत सीमेवरील परिस्थिती स्थिर आहे. दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून सीमाप्रश्नावर संवाद कायम ठेवला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या सहमतीची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी, कराराच्या भावनेचे काटेकोरपणे पालन करावे आणि चीन-भारत सीमा भागात शांतता व शांतता राखावी, असे बीजिंगने नवी दिल्लीला आवाहन केले आहे.

त्याचवेळी, चिनी मीडियाने दावा केला आहे की, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ज्या ठिकाणी चकमक झाली ती जागा डोंगजेंग परिसरात आहे. ऑक्टोबर 2021 मध्येही येथे दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष झाला होता. हे ठिकाण बांगशांकोच्या पूर्वेस 25 किमी अंतरावर आहे. बांगशांको पास हा चीन आणि भारत यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रणाचा बिंदू आहे.

1962 च्या युद्धादरम्यान, पीपल्स लिबरेशन आर्मीने येथूनच तवांग ताब्यात घेण्यासाठी आक्रमण सुरू केले होते. याशिवाय तिबेटीयन बौद्धांच्या पवित्र मानल्या जाणार्‍या डोंगझेंगमध्ये एक धबधबाही आहे. तिबेटी बौद्ध गुरु पद्मसंभव यांनी येथे अभ्यास केला असे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...