आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'देशात जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, देशात भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत एक इंचही जमीन कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही.' अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे 9 डिसेंबर रोजी सकाळी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर गृहमंत्री डॉ. अमित शाह यांनी 13 डिसेंबरला अतिशय आक्रमक शैलीत हा दावा केला होता.
दुसरीकडे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही त्याच दिवशी संसदेत दावा केला की, चकमकीत भारतीय जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. एकाही जवानाला गंभीर दुखापत झालेली नाही.
या दाव्यांनंतरही सरकारने किंवा सैन्यानेही या चकमकीत जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची संख्या सांगितली नाही किंवा त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी केले नाही. या सैनिकांना गुवाहाटी येथील 151 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयाबाहेर शांतता आहे. तवांगमधील चकमकीनंतर या जवानांना तातडीने एअरलिफ्ट करून येथे हलवण्यात आले होते.
दिव्य मराठी नेटवर्कने गुवाहाटीमध्ये तपास केला असता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दाव्यावर 5 प्रश्न उपस्थित झाले:
1. जर सैनिक किरकोळ जखमी आहेत, तर त्यांच्यावर तवांग बेस कॅम्पवरच उपचार का केले गेले नाहीत, सामान्यतः लष्कराकडे उपचाराची सोय असते, किरकोळ जखमींवर उपचार करण्याची व्यवस्था लष्कराकडे नव्हती का?
2. जर सैनिकांची प्रकृती गंभीर नव्हती, तर त्यांना घाईने एअरलिफ्ट करून 440 किमी अंतरावरील गुवाहाटी बेस हॉस्पिटलमध्ये का आणण्यात आले? अरुणाचल प्रदेशात 181 मिलिटरी हॉस्पिटल टेंगा आणि 188 मिलिटरी हॉस्पिटल लिकाबली सारखी आर्मी बेस हॉस्पिटल्स आहेत.
3. ही चकमक 9 डिसेंबर रोजी सकाळी झाली आणि आज 15 डिसेंबर आहे. 6 दिवस उलटले, तरीही हे सैनिक रुग्णालयात का अॅडमिट आहेत? संरक्षण सूत्रांनी दिव्य मराठी नेटवर्कला हे कन्फर्म केले आहे की जखमी सैनिकांपैकी कोणालाही अद्याप डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.
4. सरकार, लष्कर किंवा रुग्णालय या सैनिकांचे हेल्थ बुलेटिन सार्वजनिक का करत नाहीत? जखमी जवानांची संख्या का सांगितली जात नाही?
5. 14 डिसेंबर रोजी तवांगच्या नावाने एक 2 वर्ष जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सरकार आणि लष्कराकडून याबाबत अधिकृत वक्तव्य का करण्यात आले नाही? तथापि, संरक्षण सूत्रांनी दिव्य मराठी नेटवर्कला पुष्टी दिली आहे की हा व्हिडिओ 9 डिसेंबर रोजी तवांगमधील चकमकीचा नाही.
आता वाचा राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले होते-
'9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये आमच्या सीमेवर घडलेल्या एका घटनेबद्दल मी सभागृहाला अवगत करू इच्छितो. 9 डिसेंबर 2022 रोजी, चिनी पीएलए सैन्याने तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात एलएसीमध्ये अतिक्रमण करून यथास्थिती एकतर्फीपणे बदलण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या प्रयत्नाला आपल्या लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. या बाचाबाचीत हाणामारीही झाली.'
'या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहेत. आपला एकही सैनिक मरण पावला नाही किंवा गंभीर जखमी झाला नाही. भारतीय लष्करी कमांडर्सनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पीएलएचे सैनिक त्यांच्या जागेवर परत गेले.
या घटनेनंतर, तेथील स्थानिक कमांडरने 11 डिसेंबर 2022 रोजी स्थापित व्यवस्थेअंतर्गत आपल्या चिनी समकक्षासोबत फ्लॅट मीटिंग घेतली आणि घटनेवर चर्चा केली. चिनी बाजूला अशा कृतीसाठी मनाई करण्यात आली आणि सीमेवर शांतता राखण्यास सांगण्यात आले. मुत्सद्दी पातळीवरही चिनसोबत हा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे.'
किरकोळ जखमा होत्या, मग तवांगमध्येच उपचार का केले नाहीत?
या चकमकीत सैनिकांना किरकोळ दुखापत झाली आहे, यावर शंका यामुळे घेतली जात आहे, कारण भारतीय लष्कर, SSB (सशस्त्र सीमा बल) आणि ITBP (भारतीय-तिबेट सीमा पोलीस) यांच्याकडे तवांगमध्ये उपचारासाठी पुरेशा सुविधा आहेत. तपासात असे समोर आले आहे की तवांगमध्ये SSB चे 10 खाटांचे रुग्णालय आहे, तर ITBP चेही 10 खाटांचे रुग्णालय आहे. याशिवाय तवांगमध्ये KDS (Khandu Dawa Sangmu) जिल्हा रुग्णालय देखील आहे.
तवांगमधील खिमरू गावाजवळ लष्कराचे स्वतः एक फील्ड हॉस्पिटल आहे ज्यामध्ये सुमारे 45 बेडची सुविधा आहे. या हॉस्पिटलमध्ये 4-5 डॉक्टर्स आणि तज्ज्ञ नेहमीच उपस्थित असतात. तवांगच्या SSBच्या सूत्रांनी दिव्य मराठीला सांगितले की, किरकोळ जखमींवर लष्कराच्या छावणीतच उपचार केले जातात.
जेव्हा परिस्थिती गंभीर असते तेव्हाच फील्ड हॉस्पिटल ते बेस हॉस्पिटलला रेफरल केले जाते. जर रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर त्याला प्रथम फील्ड हॉस्पिटलमध्ये स्टेबल केले जाते आणि नंतर बेस हॉस्पिटलमध्ये रेफर केले जाते. फील्ड हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स करण्यासाठी सुविधाही आहे.
तवांग आर्मी फील्ड हॉस्पिटलबद्दल गूगल सर्च केल्यावर अशा अनेक बातम्या सापडतात ज्यामध्ये या हॉस्पिटलमध्ये अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया केल्या जाण्याचा उल्लेख आहे. 10 मे 2020 रोजी घडलेल्या एका घटनेत, एका 26 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात 3 इंच जाड सळी घुसली होती. ती सर्जन लेफ्टनंट कर्नल रितेश शर्मा, डॉ. कुमार, डॉ. आशिष पाओ यांनी काढली होता. 3 मे 2018 रोजी झालेल्या आणखी एका घटनेत आर्मी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आई आणि मुलाचे प्राण वाचवले होते, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे.
काँग्रेस नेते म्हणाले - सरकार लपण्याचा प्रयत्न करत आहे
आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते देबाब्रत सेकिया यांनीही अशाप्रकारे सैनिकांना गुवाहाटीत आणण्यावर प्रश्न उपस्थित केले. सेकिया म्हणतात- 'जमिनी वास्तव हे आहे की चीन या क्षेत्रात आक्रमक होत आहे, घुसण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार सतत ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
चिनी सैन्याबरोबर शांतता चर्चा सुरू आहे, परंतु ते आक्रमक आहेत. सैनिकांना गुवाहाटीमध्ये आणल्याने हे सिद्ध होत आहे की त्यांच्या जखमा किरकोळ नाही. अन्यथा त्यांच्यावर तवांगमध्येही उपचार केले गेले असते.'
अरुणाचलचे मुख्यमंत्री आणि भाजप खासदार म्हणाले- मार खाणार नाही, चोख उत्तर देऊ
तवांगमध्ये भारत-चीन आमने-सामनेबाबत अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू म्हणाले- यांगत्से माझ्या मतदारसंघात येते आणि दरवर्षी मी जवानांना भेटतो. हे 1962 नाही. कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आमचे शूर सैनिक त्यांना चोख प्रत्युत्तर देतील. आमचे सैन्य विटेला दगडाने नव्हे तर लोखंडाने उत्तर देत आहे.
त्याचवेळी अरुणाचल पूर्वेतील भाजप खासदार तापीर गाओ म्हणाले की, आमचे सैनिक सीमेवरून एक इंचही हटणार नाही. चिनी सैनिकांनी सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू. आम्ही सीमेवर मार खाणार नाही, तर चोख प्रत्युत्तर देऊ.
अमेरिकेने म्हटले- चीन LAC वर सैन्य जमा करत आहे, चिथावणीही देत आहे
तवांग प्रकरणात अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी पॅट रायडर म्हणाले की, चीन चिथावणी देतो. अमेरिकेने पाहिले की चीन LAC जवळ सैन्य जमा करत आहे. येथे त्यांनी लष्करी पायाभूत सुविधाही तयार केल्या आहेत.
भारत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे आणि अमेरिका त्याचे समर्थन करते. आम्ही आमच्या मित्र देशांच्या सुरक्षेची खात्री निश्चित करू. कोणत्याही देशाने बळाच्या जोरावर आणि एकतर्फी सीमा बदलण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकेचा त्याला कडाडून विरोध आहे.
चिनी सैन्य म्हणाले- भारतीय जवानांनी चुकीच्या पद्धतीने सीमा ओलांडली
तवांग संघर्षावर 13 डिसेंबरलाच चीनचे वक्तव्यही आले आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, चीनने म्हटले आहे की - भारतीय सीमेवरील परिस्थिती स्थिर आहे. सीमेवर शांतता राखण्यासाठी आम्ही भारताला मदत करण्यास सांगितले आहे.
त्याचवेळी, चिनी आर्मी पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते लाँग शाओहुआ म्हणाले की, भारतीय सैनिकांनी चुकीच्या पद्धतीने सीमा ओलांडली आणि चीनी सैनिकांच्या मार्गात आले. त्यामुळे वाद वाढला. आम्ही व्यावसायिक पद्धतीने प्रत्युत्तर दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.