आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • India Coronavirus Death Toll Data; PM Narendra Modi Ex Chief Economic Advisor Krishnamurthy Subramanian Latest Study

एक्सप्लेनर:मोदींचे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले सुब्रमण्यम यांच्या अभ्यासात दावा - देशात कोरोनामुळे 49 लाख मृत्यू, हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे संकट

जयदेव सिंह14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

भारतात कोरोनामुळे होणा-या मृत्यूची संख्या नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा 10 पट जास्त असू शकते. हा दावा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संशोधन अहवालात करण्यात आला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या या अहवालानुसार, जून 2021 पर्यंत भारतात कोरोनामुळे 30 लाख ते 49 लाखांच्या घरात लोकांचा मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे अर्थशास्त्रज्ञ अरविंद सुब्रमण्यम यांचादेखील हा अहवाल सादर करणा-यांच्या टीममध्ये समावेश आहे. सुब्रमण्यम हे भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांच्या व्यतिरिक्त या संशोधनात आणखी दोन संशोधक सहभागी होते. या तिघांनीही वॉशिंग्टनस्थित सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे.

भारताच्या फाळणीच्या वेळेपेक्षा जास्त मृत्यू कोरोना काळात झाले
संशोधनात असे म्हटले आहे की, 1947 मध्ये भारताची फाळणी झाली तेव्हा दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र कोरोनामुळे लोकांना स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे.

हा दावा कोणत्या आधारावर केला गेला?
भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसाठी तीन गणना पद्धती वापरल्या गेल्या आहेत. यामध्ये सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टममधील माहिती, ज्यात जन्म आणि मृत्यूची नोंद असते, भारतात विषाणूचा प्रसार जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या ब्लड टेस्ट आणि जगभरात कोरोनामुळे होणा-या मृत्यूच्या दरावर आधारित आणि कंज्युमर पिरॅमिड हाऊसहोल्ड सर्व्हे (सीपीएचएस) च्या डेटाचा समावेश आहे.

संशोधकांनी प्रत्येक पद्धतीतील उणीवा देखील दाखवल्या आहेत. उदाहरणार्थ, कंज्युमर पिरॅमिड हाऊसहोल्ड सर्व्हेत मृत्यूचे कारण नमूद केलेले नाही. तर संशोधकांनी प्रत्येक मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. यासह, कोरोनापूर्वी मृत्यूच्या आकडेवारीचे विश्लेषण देखील केले गेले आहे.

केवळ भारतातच कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कमी सांगितली गेली का?

असे नाही. जगातील इतर देशांमध्येही कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे, परंतु भारतात वास्तविक आकडेवारी आणि नोंदविलेल्या संख्येमधील फरक अधिक आहे. देशातील 139 कोटी लोकसंख्या हे यामागील प्रमुख कारण आहे.

या अहवालावर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?
न्यूज एजन्सी APने वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे डॉक्टर जॅकब जॉन यांच्याशी या अहवालाविषयी बातचीत केली. डॉक्टर जॉन म्हणाले की, या अहवालात देशाच्या कमकुवत आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोनाच्या भयंकर परिणामाकडे कमी लक्ष दिले गेले आहे.

पहिल्या लाटेबद्दलही अहवालात काही सांगण्यात आले आहे का?

गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुमारे 20 लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, रिअल टाइममध्ये या मृत्यूंची नोंद न केल्यामुळे दुसरी लाट भीषण झाली. तसेही गेल्या काही महिन्यांपासून बर्‍याच राज्यांत कोरोनामुळे होणा-या मृत्यूची संख्या वाढली आहे. यात काही अशीही प्रकरणे आहेत, ज्यांची नोंद झालेली नाही.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही नवीन माहिती भारतात कोरोनाचा प्रसार अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करेल. यासह, हा अहवाल आल्यानंतर असे म्हणता येईल की, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कमी करुन सांगितली गेली आहे. नवीन आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, कोरोना विषाणू हा केवळ शहरांपुरता मर्यादित राहिला नाही. त्याचा ग्रामीण भागातही मोठा परिणाम झाला आहे. मात्र हे मृत्यू रोखता आले असते का? हा प्रश्न नक्कीच विचारला गेला पाहिजे.

मृत्यूच्या आकडेवारीसंदर्भात यापूर्वीही असा अहवाल आला आहे का?
दोन महिन्यांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने भारतात मृत्यूच्या अचूक संख्येचा अंदाज लावला होता. यासाठी त्यांनी डझनभराहून अधिक तज्ज्ञांची मदत घेतली. या तज्ज्ञांनी भारतातील महामारीला तीन परिस्थितींमध्ये विभागले - सामान्य स्थिती, वाईट स्थिती, अत्यंत वाईट स्थिती. अत्यंत वाईट स्थितीच्या अहवालात, संसर्गाच्या वास्तविक आकडेवारीपेक्षा 26 पट जास्त संक्रमणांचा अंदाज लावला गेला होता.

संसर्गामुळे मृत्यूचा दराचा अंदाजही 0.60 % ठेवण्यात आला होता. कोरोनाची दुसरी लाट आणि देशातील ढासळलेली आरोग्य यंत्रणा पाहता हा अंदाज वर्तविला गेला आहे. या परिस्थितीत 70 कोटी लोकांना संसर्ग झाल्याचा अंदाज आहे आणि 42 लाख लोक मरण पावले. मात्र, सरकारने हा अहवाल फेटाळला होता.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) चा एक अंदाज आहे की, जगात कोरोनामुळे होणा-या मृत्यूची संख्या अधिकृत संख्येपेक्षा 2 ते 3 पट जास्त असू शकते.

सरकारी आकडेवारी काय म्हणते?
सरकारच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, देशात कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 18 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. त्याच वेळी, 3 कोटी 12 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यावेळीसुद्धा दररोज सुमारे 40 हजार प्रकरणे येत आहेत. त्याच वेळी, दररोज सुमारे 500 मृत्यू होत आहेत.

सरकारनेही मृत्यूची अंडर-रिपोर्टिंग स्वीकारली आहे का?
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे अंडर रिपोर्टिंग झाले होते. यामागचे कारण असे की, राज्य सरकारे वेळोवेळी त्यांचा डेटा अपडेट करत असतात. गेल्या वर्षी 16 मे रोजी महाराष्ट्र आणि दिल्लीने मृत्यूची जुनी आकडेवारी जोडली. असे करणारे ही पहिली राज्ये होती.

16 मे 2020 रोजी महाराष्ट्रात 1409 मृत्यूची नोंद झाली होती. त्यापैकी 81 मृत्यू 16 मे रोजी झाले होते. उर्वरित 1328 ही जुनी आकडेवारी होती. ज्याची पूर्वी नोंद नव्हती. त्याच वेळी, 16 मे 2020 रोजी दिल्लीत 437 मृत्यूची नोंद झाली. यापैकी 344 मृत्यू उशिरा नोंदविण्यात आले.

मे 2020 पासून महाराष्ट्र सातत्याने जुन्या मृत्यूची नोंद करत आहे. दर 15 ते 30 दिवसांनी जुनी आकडेवारी अपडेट केली जाते. उदाहरणार्थ, 9 जून रोजी देशात पहिल्यांदाच 6 हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली होती, त्याच दिवशी महाराष्ट्रात 661 मृत्यूंपैकी 400 मृत्यू एका आठवड्यापूर्वी झाले होते, पण त्यांचा अहवाल मिळाला नव्हता. उर्वरित 261 मृत्यूंपैकी 170 मृत्यू गेल्या 48 तासांत झाले होते. त्यापैकी गेल्या एका आठवड्यात 91 मृत्यूमुखी पडले होते, ज्यांची नोंद यापूर्वी झाली नव्हती.

त्या दिवशी एकट्या बिहारमध्ये एकूण 3,951 मृत्यू नोंदवले गेले. या मृत्यूची नोंद यापूर्वी झाली नव्हती. परंतु, हे मृत्यू कधी झाले ते सांगण्यात आले नाही. बिहारमध्ये प्रथमच राज्य सरकारने मृत्यूचा आकडा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारीही देशात 3,998 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 3,656 मृत्यूची एकट्या महाराष्ट्रात नोंद झाली. यापैकी सोमवारी येथे कोरोनामुळे 147 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 3,509 जुन्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...