आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवणे भारताला महागात पडणार का?:आता 14 ऐवजी 7 दिवसांत संपणार चाचणीविना आयसोलेसनचा कालावधी; तज्ज्ञ म्हणाले - यामुळे वेगाने होईल कोरोनाचा प्रसार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर..

अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल सारख्या देशांनी कोविड-19 रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी कमी केल्यानंतर, भारताने देखील लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणांसाठी होम आयसोलेशन कालावधी 7 दिवसांचा केला आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यादरम्यान, अनेक तज्ज्ञ आयसोलेशन कालावधी कमी करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि संसर्गाचा आणखी प्रसार होण्याचा धोका व्यक्त करत आहेत.

चाचणीशिवाय होम आयसोलेशन संपवण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे का? यामुळे कोणते नुकसान होऊ शकते? अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांनी आयसोलेशन कालावधी का कमी केला? याविषयी जाणून घेऊया...

कसा होत गेला आयसोलेशनच्या नियमांमध्ये बदल
देशात पहिल्या लाटेत होम आयसोलेशन 14 दिवसांचे ठेवण्यात आले होते. तेव्हा होम आयसोलेशन संपण्यापूर्वी दोन निगेटिव्ह कोरोना चाचण्या आवश्यक होत्या. यानंतर, होम आयसोलेशनचा कालावधी 14 दिवस ठेवण्यात आला, परंतु अनिवार्य चाचणी काढून टाकण्यात आली. एप्रिल 2021 मध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये होम आयसोलेशन कालावधी 14 दिवसांवरून 10 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला होता. यासह, आयसोलेशन संपण्यापूर्वी चाचणीची अनिवार्यता देखील संपली.

आता 05 जानेवारी 2022 रोजी आलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वात आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणांसाठी होम आयसोलेशन कालावधी 10 दिवसांवरून 7 दिवसांवर आणला आहे. तसेच, 7 दिवसांनंतर होम आयसोलेशन संपण्यापूर्वी चाचणी करणे आवश्यक नाही.

आयसोलेशनमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल तरच 7 दिवसांनंतर होम आयसोलेशनचा काळ संपला असे मानले जाईल.

सर्वप्रथम अमेरिकेने आयसोलेशन कालावधी कमी केला होता

अमेरिका, ब्रिटननंतर भारतानेही आयसोलेशन कालावधी कमी केला

  • 23 डिसेंबर रोजीच, अमेरिकेने कोरोना संक्रमित आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी 10 दिवसांवरून 7 दिवसांवर आणला.
  • 27 डिसेंबर 2021 रोजी, अमेरिकेने सामान्य नागरिकांसाठी देखील आयसोलेशन कालावधी 10 दिवसांवरून 5 दिवसांवर आणला.
  • अमेरिकेच्या नॅशनल पब्लिक हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने आयसोलेशन कालावधी संपण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्याची शिफारस केलेली नाही.
  • अमेरिकेनंतर ब्रिटननेही कोरोना बाधितांसाठी होम आयसोलेशन 10 वरून 7 दिवसांवर आणले आहे.
  • त्याच वेळी, इस्रायलने लसीकरण केलेल्या लोकांसाठी आयसोलेशन रद्द केले आहे.

अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल सारख्या देशांनंतर देशाच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील 05 जानेवारी 2021 रोजी कोविड -19 संक्रमित लोकांसाठी होम आयसोलेशन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

  • आता लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी आयसोलेशन कालावधी 10 दिवसांवरून 7 दिवसांवर आणण्यात आला आहे. पहिल्या लाटेदरम्यान देशात आयसोलेशऩ कालावधी 14 दिवसांचा होता.
  • चाचणी पॉजिटिव्ह आल्यावर सलग तीन दिवस ताप नसेल तर फक्त सात दिवसांचा होम आयसोलेशन असेल.
  • संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या पण लक्षणे नसलेल्या लोकांना टेस्टिंग आणि आयसोलेशनची गरज नाही.

आरोग्य मंत्रालयाने आयसोलेशनचा कालावधी कमी करण्याचे शास्त्रीय कारण सांगितले नाही
आरोग्य मंत्रालयाने कोरोना आयसोलेशन कालावधी कमी करण्याचे कोणतेही विशेष कारण दिलेले नाही. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांच्या मदतीने भारतानेही आयसोलेशन कालावधी कमी केल्याचे म्हटले जात आहे.

आयसोलेशनचा कालावधी कमी करण्याबाबत, आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, गेल्या दोन वर्षांत जगात आणि भारतातही असे दिसून आले आहे की, कोविड-19 ची बहुतेक प्रकरणे एकतर लक्षणे नसलेली आहेत किंवा अतिशय सौम्य लक्षणे आहेत.

यापेक्षा वेगाने कोरोना पसरेल का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

चाचणीशिवाय होम आयसोलेशन कालावधी संपवण्याच्या निर्णयावर अनेक तज्ज्ञांनी टीका केली आहे आणि म्हटले की, यामुळे कोरोना अधिक वेगाने पसरण्याचा धोका निर्माण होईल. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत या निर्णयाला खूप विरोध झाला आहे आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे पाऊल विज्ञानापेक्षा अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे.

चाचणी न करता आयसोलेशनचा कालावधी संपवणे धोकादायक का आहे? तज्ज्ञ काय म्हणतात- जाणून घेऊया...

व्हायरसचा प्रसार जलद होईल

"परिणाम असा होईल की कमीत कमी काही लोक आयसोलेशनमधून लवकर बाहेर येतील, त्यामुळे संक्रमणाची शक्यता जास्त असेल आणि खरं तर कोविड -19 वेगाने पसरेल. आयसोलेशनमधून बाहेर पडल्यानंतर लोकांनी मास्क लावण्यासारखे उपाय करण्याची शक्यता कमी आहे.' — योनाटन ग्रॅड, असोसिएट प्रोफेसर, इम्युनोलॉजी अँड इंफेक्टिशियर डिसीज, हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, अमेरिका

रॅपिड टेस्टच्या अभावामुळे घेतलेला निर्णय

“अमेरिकेमध्ये रॅपिड टेस्ट किटचा पुरवठा नसणे हे देखील CDC ने आयसोलेशन कमी करण्याचे एक कारण आहे. अध्यक्ष जो बायडेन यांनी 50 कोटी रॅपिड टेस्ट मोफत देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते किती लवकर पुरवले जातील हे स्पष्ट नाही.' - CDC सोबत आयसोलेशनबाबत चर्चा करणारे एक अमेरिकन शास्त्रज्ञ

गोंधळात टाकणा-या गाइडलाइन
"या गाइडलाइन अधिक गोंधळात टाकणा-या आहेत. हे लक्षण नसलेल्या लोकांसाठी असले पाहिजे, जर तुम्हाला लक्षणे असतील तर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये.” -डॉ. मेगन रेनी, अकॅडमी डीन आणि इमर्जन्सी फिजिशियन, ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, अमेरिका

फक्त 29% संक्रमितच झाले आयसोलेट
अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे महामारी तज्ज्ञ डेनिस नॅश यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासानुसार, पूर्वीच्या संसर्गादरम्यान केवळ 29% लोकच आयसोलेट झाले होते. ते म्हणाले की, आयसोलेशन कालावधी कमी केल्याने अधिकाधिक लोक आयसोलेट होण्यास तयार होतील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

टेस्टिंग किट नसल्यामुळे धोरण बनवणे चुकीचे
“पाच दिवसांच्या आयसोलेशननंतर टेस्टिंग करु नये - टेस्टिंग किटचा पुरवठा नसल्यामुळे असे आहे का? तसे असल्यास, धोरण बनविण्याला काही अर्थच नाही." - डॅनिस नॅश, अमेरिकेतील एपिडेमियोलॉजिस्ट

भारतीय तज्ज्ञ काय म्हणतात?

भारतीय तज्ज्ञांनी देखील चाचणीविना 7 दिवसांनंतर आयोसेलशनचा कालावधी संपल्याने कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होण्याचा धोका व्यक्त केला आहे. आयसोलेशन कालावधी किमान 14 दिवसांचा असावा असे तज्ज्ञांचे मत आहे.

काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, चाचणीशिवाय आयसोलेशन कालावधी लवकर संपुष्टात आणल्याने ओमायक्रॉन व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले, "रुग्णाची निगेटिव्ह टेस्ट न येताच त्याला आयसोलेशन वॉर्डमधून कसे काढता येईल? रुग्ण इतरांमध्येही विषाणू पसरवू शकतो."

ते म्हणाले की, भारतातील लोक स्वयं-शिस्तीत राहत नाहीत आणि अनेक वेळा सेल्फ-आयसोलेशन नियमांचे पालन न केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा स्थितीत रुग्णाला लक्षणे नसली तरी त्याने 14 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे.

7 दिवसांच्या आयसोलेशननंतर विषाणू पसरण्याचा धोका संपतो का? असाच प्रश्न दिव्य मराठीने महामारी तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांना विचारला

  • डॉ लहरिया म्हणाले, विषाणूचा प्रसार होण्याचा धोका शून्य नसला तरी तो नक्कीच कमी आहे. आयसोलेशननंतरही एखादी व्यक्ती 90 दिवसांपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळू शकते, कारण काही व्हायरस त्याच्या शरीरात असू शकतात, परंतु इतरांना संक्रमित करण्यासाठी व्हायरसची संख्या पुरेशी नसते. म्हणून, इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी राहतो, परंतु संपत नाही.
  • आयसोलेशन कालावधी 7 दिवसांपर्यंत का कमी केला आहे? प्रत्युत्तरात, डॉ. लहरिया म्हणाले, “ओमायक्रॉनची लक्षणे 2-3 दिवसांत येतात आणि 3-4 दिवसांत विषाणू नष्ट होऊ लागतात. तर डेल्टा आणि इतर प्रकारांमध्ये लक्षणे दिसण्यासाठी 4-5 दिवस लागाचजे आणि ते संपण्यासाठी अधिक वेळ लागायचा. यामुळेच आयसोलेशनचा कालावधी 7 दिवसांवर आणण्यात आला आहे.
  • ते म्हणाले, "संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, आयसोलेशन कालावधी संपल्यानंतरही मास्क घालणे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे."