आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन दैनिकाचा दावा:भारतात कोरोनामुळे प्रत्यक्षात 42 लाख मृत्यू! 70 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता; न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये दावा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात कोरोना संक्रमित आणि त्यातून झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वाद सुरू आहेत. सरकारी आकडे आणि प्रत्यक्ष आकड्यांमध्ये फरक असल्याचे रिपोर्ट विविध ठिकाणी समोर आले. त्यातच आता न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये भारतातील कोरोना संक्रमण आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूवर धक्कादायक दावा केला आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, देशात कोरोनाने 2.69 लोक संक्रमित झाले. तर 3 लाख 7 हजारच्या जवळपास लोकांचा कोरोनाने बळी घेतला. प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा केवळ भारतातच नव्हे, तर जगात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचा आकडा प्रत्यक्षात 2 ते 3 पटीने अधिक असल्याचा अंदाज लावला आहे. त्यात भारतामध्ये कोरोनात मृत्यूची आकडेवारी प्रत्यक्षात अधिक असण्याची शक्यता जास्त आहे.

एमोरी विद्यापीठाच्या महामारी तज्ज्ञ संशोधक कायोका शियोडा यांनी सांगितले, की भारतात रुग्णालये कोरोना संक्रमितांनी भरले आहेत. कोरोनामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागांत कित्येक लोकांचा मृत्यू घरातच होत आहे. अशा प्रकारच्या मृत्यूंची अधिकृत आकड्यांमध्ये नोंद होत नाही. भारतात प्रयोगशाळा सुद्धा कमी आहेत. मृत्यूचे खरे कारण शोधणे कठीण असते. कोरोना महामारी येण्यापूर्वी सुद्धा भारतात प्रत्येक 5 मृतदेहांपैकी 4 मृतदेहांची वैद्यकीय चाचणी होत नव्हती.

तज्ज्ञांच्या मदतीने तयार केला रिपोर्ट
भारतात कोरोनामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी गोळा करण्यासाठी द न्यूयॉर्क टाइम्सने तज्ज्ञांची मदत घेतली. या तज्ज्ञांनी भारतातील कोरोना महामारीला तीन भागांत विभागले. यात सामान्य परिस्थिती, वाइट स्थिती आणि अत्यंत वाइट स्थिती असे वर्गीकरण करण्यात आले. त्यांनी तयार केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे सरकारने जी आकडेवारी जारी केली त्याहून कित्येक पटीने जास्त मृत्यू प्रत्यक्षात झाले आहेत.

तज्ज्ञांनी परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना संक्रमणाची जी आकडेवारी सरकारने नोंदवली. प्रत्यक्षात कोरोना संक्रमण फैलावण्याची गती 15 पटीने अधिक होती. संक्रमणामुळे होणारा मृत्यू 0.15% असल्याचे अधिकृत आकड्यांत म्हटले आहे. त्याचाच आधार घेऊन पाहिल्यास मृतांचा आकडा दुप्पट असल्याचे निदर्शनास आले. एक्सपर्ट्सच्या अंदाजानुसार, देशात 40.42 लोकांना कोरोना संक्रमण झाले असून त्यापैकी 6 लाख लोकांचा मृत्यू झाला.

70 कोटी भारतीय संक्रमित, 42 लाख मृत्यू
भारतात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने इतर 20 जणांना संक्रमण झाले. तसेच 0.30% लोकांचा मृत्यू झाला असे गृहित धरले, तर भारतात अधिकृत आकड्यांपेक्षा 5 पट अधिक मृत्यू प्रत्यक्षात झाले असे म्हणता येईल. सेंटर फॉर डिसीज डायनामिक्सचे संचालक डॉ. रमनन लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले, भारतात संक्रमण आणि मृत्यूच्या आकडे कमी मोजण्यात आले आहेत. त्यांनी अशा परिस्थितीत तीन विविध माध्यमातून मिळालेल्या आकडेवारीचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण केले. त्यातून जवळपास 50-60 कोटी भारतीयांना कोरोनाची लागण झाली असे निदर्शनास आले आहे.

या परिस्थितीत नोंद असलेल्या प्रकरणांपेक्षा 26 पट अधिक संक्रमण असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. तसेच संक्रमणातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 0.60% ठेवण्यात आले. देशातील कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेचा सुद्धा यात विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, 70 कोटी भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला तसेच कोरोनामुळे 42 लाख भारतीय दगावले असा अंदाज आहे.

तीन देशव्यापी सीरो सर्व्हे
भारतात कोरोना संक्रमण आणि मृत्यूचा अंदाज लावण्यासाठी तज्ज्ञांनी सीरो सर्व्हेच्या आकड्यांची सुद्धा मदत घेतली. ही आकडेवारी वेग-वेगळ्या काळात घेण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर बरे होण्यासाठी विशिष्ट अँटीबॉडी तयार होतात. त्याचा अभ्यास सीरो सर्व्हेमध्ये केला जातो. याले सकूल ऑफ पब्लिक हेल्थचे सहाय्यक प्राध्यापक डेन वीनबर्गर यांनी सांगितल्याप्रमाणे सीरो सर्व्हेच्या काही मर्यादा आहेत. पण, प्रत्यक्ष आकडेवारीचा अंदाज लावण्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत.

भारताच्या 50% लोकसंख्येला कोरोनाची लागण
संक्रमन पसरवणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी सीरो सर्व्हे केले जातात. यामध्ये आजाराविरुद्ध लढण्यासाठी किती जणांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या त्याचा शोध घेतला जातो. भारतात कोरोनाकाळात तीनदा देशव्यापी सीरो सर्व्हे करण्यात आले. त्यातून कोरोनाच्या नोंदणी असलेल्या प्रकरणांपेक्षा सीरो सर्व्हेत अधिक रुग्ण दिसून आले.

सीरो सर्व्हेमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, अधिकृत आकड्यांपेक्षा प्रत्यक्षात कोरोना झालेल्यांची संख्या 13.5 ते 28.5 पटीने अधिक आहे. त्यातही ही आकडेवारी केवळ सर्व्हे करण्यात आले तेव्हाची आहे. सीरो सर्व्हे केल्यानंतरच्या काळात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली. मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाले. डॉ. शियोडा यांच्या मते, सीरो सर्व्हेत सुद्धा कमी आकडेवारी आल्याची शक्यता आहे. कारण, संक्रमण झाल्याच्या काही महिन्यानंतर अँटीबॉडी असल्याचे निष्पन्न होते. अर्थात ज्यांनी लक्षणे नसलेल्या कोरोनावर नुकतीच मात केली त्यांच्या शरीरात अँटीबॉडी सापडल्या नसतील. त्यामुळे, सीरो सर्व्हेत सापडलेल्या कोरोना संक्रमितांपेक्षा प्रत्यक्ष संख्या आणखी जास्त असू शकते.

बातम्या आणखी आहेत...