आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरतर लाहोरही हिसकावले असते:पण भारताकडे रात्री लढण्यासाठी शस्त्रास्त्रे नव्हती; पाकिस्तानकडे होती अमेरिकन शस्त्रे

नीरज सिंह4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

60 चे दशक होते. 1962 मध्ये चीनविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय लष्कराचे मनोधैर्य खचले होते. दरम्यान, मे 1964 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर भारतीय राजकारणात पोकळी निर्माण झाली होती.

दुसरीकडे, पाकिस्तानात लष्करप्रमुख अयुब खान हे निवडून आलेले सरकार पाडून राष्ट्रपती झाले होते. त्याच्या डोळ्यात काश्मिर तरळत होता. जानेवारी 1965 मध्ये, पाकिस्तानी सैन्याने गुजरातमधील कच्छमधील सरक्रीक जवळ भारतीय हद्दीत गस्त घालण्यास सुरुवात केली.

8 एप्रिल रोजी दोन्ही देशांनी एकमेकांच्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन डेझर्ट हॉक सुरू केले आणि कंजरकोट किल्ल्याच्या सीमेजवळील काही भारतीय चौक्या ताब्यात घेतल्या.

जून 1965 मध्ये, ब्रिटीश पंतप्रधान हॅराल्ड विल्सन यांनी दोन्ही देशांना हा वाद सोडवण्यासाठी लवाद स्थापन करण्यासाठी तयार केले. मात्र, पाकिस्तानने ही भारताची कमजोरी असल्याचे मानले. यावेळी अमेरिकेने पाकिस्तानला 700 दशलक्ष डॉलर्स म्हणजे आताचे सुमारे 5.6 हजार कोटी रुपयांची लष्करी मदत आणि आधुनिक शस्त्रे दिली होती.

दुसरीकडे चीनकडून झालेल्या पराभवानंतर भारत जगाकडून आधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी करत होता, मात्र त्याची डिलिव्हरी अद्याप झालेली नव्हती. अशा स्थितीत अतिआत्मविश्‍वाश निर्माण झाला आणि अयुबला वाटले की, काश्मीर भारताकडून हिसकावून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. उशीर झाला तर भारत अधिक शक्तिशाली होईल.

आज 23 सप्टेंबर, याच दिवशी दोन्ही देशांनी युद्धविराम घोषित केला होता. आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील 1965 च्या युद्धाची कहाणी सांगत आहोत.

यात पुढे जाण्यापूर्वी, लष्करी सामर्थ्यात पाकिस्तान भारतापेक्षा किती बलवान होता ते पाहूया…

ऑपरेशन जिब्राल्टरची सुरूवात

अयुब खानने काश्मीर ताब्यात घेण्यासाठी ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केले. वास्तविक स्पेनमध्ये जिब्राल्टर नावाचे छोटे बेट आहे. जेव्हा अरब देशांचे सैन्य युरोप जिंकण्यासाठी पश्चिमेकडे गेले तेव्हा त्यांचा पहिला मुक्काम जिब्राल्टर होता. येथून पुढे सरकत अरबी सैन्याने संपूर्ण स्पेन जिंकले होते.

भारताचे जिब्राल्टर (काश्मीर) काबीज केले की, भारताचा पराभव होईल असे पाकिस्तानला वाटत होते.

भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री गंमतीने म्हणाले होते की, अयुब खान यांनी आपण चालत दिल्लीला पोहोचू अशी घोषणा केली होती. लाहोरच्या दिशेने जाऊन त्यांचे स्वागत करावे, असे मला वाटले.
भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री गंमतीने म्हणाले होते की, अयुब खान यांनी आपण चालत दिल्लीला पोहोचू अशी घोषणा केली होती. लाहोरच्या दिशेने जाऊन त्यांचे स्वागत करावे, असे मला वाटले.

33 हजार पाकिस्तानी सैनिकांनी काश्मिरी म्हणून नियंत्रण रेषा ओलांडली

5 ऑगस्ट 1965 रोजी पाकिस्तानच्या सुमारे 33 हजार सैनिकांनी काश्मिरी म्हणून नियंत्रण रेषा ओलांडली. या सैनिकांचा पेहराव आणि राहणीमान काश्मिरी लोकांसारखे होते. काश्मीरमधील स्ट्रॅटेजिक पॉईंट्स जसे की पूल, पोस्ट ऑफिस, टेलिफोन ऑफिस, कम्युनिकेशन नेटवर्क आणि सरकारी कार्यालये ताब्यात घेणे, हा त्यांचा उद्देश होता.

त्याच बरोबर काश्मिरींना भारत सरकारच्या विरोधात उभे राहण्यासाठी चिथावणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अयुबचा हा डाव उलटला. काश्मिरी जनतेने या पाकिस्तानी सैनिकांना ओळखले आणि ही माहिती 15 ऑगस्ट 1965 रोजी भारतीय लष्कराला दिली.

पाकिस्तानी अधिकारी, कॅप्टन मोहम्मद सज्जाद आणि कॅप्टन गुलाम हुसैन यांना अटक करुन घवून जातांना भारतीय लष्कराचे जवान. त्यांनी ऑगस्ट 1965 मध्ये स्थानिक काश्मिरींच्या वेशात सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला होता. स्रोत : सैनिक समाचार
पाकिस्तानी अधिकारी, कॅप्टन मोहम्मद सज्जाद आणि कॅप्टन गुलाम हुसैन यांना अटक करुन घवून जातांना भारतीय लष्कराचे जवान. त्यांनी ऑगस्ट 1965 मध्ये स्थानिक काश्मिरींच्या वेशात सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला होता. स्रोत : सैनिक समाचार

जिब्राल्टर अयशस्वी झाल्यानंतर ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू झाले

भारतीय लष्कराने सुरुवातीच्या काळातच अनेक पाक सैनिकांना अटक केली. त्यांना पकडण्याची किंवा मारण्याची जबाबदारी विशेष कमांडोना देण्यात आली होती. आपला प्लॅन फसणार, असे पाकिस्तानला वाटले म्हणून त्याने ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू केले.

1 सप्टेंबर 1965 रोजी सायंकाळी 4 वा. दिल्लीतील साउथ ब्लॉकमधील रुम नंबर 108 मध्ये एकच खळबळ उडाली. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे येथे वास्तव्य होते. आर्मी चीफ चौधरी आणि एअरफोर्स चीफ अर्जन सिंग दाखल झाले तेव्हा ते त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होते. संरक्षण सचिव तेथे आधीच उपस्थित होते.

ते म्हणाले की, युद्ध सुरू झाले आहे. रिपोर्ट नुकताच आला आहे. छांब सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्य भारताच्या दिशेने येत आहे. आपल्याला उत्तर द्यावे लागेल, असे त्यांनी चव्हाण यांना सांगितले. रात्री उशीर झाला तर आपले सैन्य रात्री लढू शकत नाही. लष्कर जम्मूमध्ये असून ते सीमेवर नेण्यास वेळ लागेल.

अर्जन सिंग म्हणाले - एअर ऑपरेशन.

चव्हाण यांनी विचारले- तुम्हाला एअर ऑपरेशनवर विश्वास आहे का?

अर्जन सिंह म्हणाले – म्हणूनच हवाई दल आहे. तुम्ही ऑर्डर दिल्यास आम्ही तयार आहोत.

चव्हाण म्हणाले किती वेळ लागेल?

अर्जनचे उत्तर आले – 5 मिनिटात ऑर्डर हवी आहे.

यानंतर चव्हाण पंतप्रधान शास्त्रींना भेटायला गेले, मात्र ते त्यावेळी संसदेत होते. ते लगेच परतले आणि अर्जन सिंगला म्हणाले की, मी हवाई दलाला छंब सेक्टरमध्ये हल्ला करण्याचा आदेश देतो. संरक्षण सचिव पीव्हीआर राव यांनी तोंडी आदेश नोंदवला.

वेळ 4:45 ची होती. बरोबर एक तासानंतर, 5:45 मिनिटांनी, 8 भारतीय व्हॅम्पायर विमानांनी पठाणकोट एअरबेसवरून उड्डाण केले. येथूनच 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची औपचारिक सुरुवात झाली.

ऑपरेशन ग्रँड स्लॅमचा उद्देश अखनूर ताब्यात घेणे आणि पूंछ आणि राजौरीपासून भारताला तोडणे हा होता, परंतु भारतीय वायुसेनेच्या हल्ल्याने तो अपयशी ठरला.

1965 मध्ये खेम करण सेक्टरमध्ये सैनिकांसह तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण.
1965 मध्ये खेम करण सेक्टरमध्ये सैनिकांसह तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण.

लाहोर ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्याने सुरू केले ऑपरेशन बंगाल

1 सप्टेंबर 1965ची रात्र होती. रात्रीचे 11.45 वाजले होते. पंतप्रधान कार्यालय 10 जनपथमध्ये, तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री त्यांच्या कार्यालयाच्या खोलीत वेगाने चकरा मारत असताना काहीतरी विचार करत होते. त्यावेळी शास्त्रींचे सचिव असलेले सीपी श्रीवास्तव यांनी त्यांच्या 'अ लाइफ ऑफ ट्रुथ इन पॉलिटिक्स' या पुस्तकात लिहिले आहे की, 'शास्त्री जेव्हा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा असेच पटापटा चालत असत. त्यावेळी ते म्हणाले, ‘आता काहीतरी करायलाच हवे.’

यानंतर 2 आणि 3 सप्टेंबर रोजी पंतप्रधान शास्त्री यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखाली. म्हणजेच अखनूरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्याचा दबाव कमी करण्यासाठी भारताने नवी आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला 7 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु पश्चिम विभागाचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल हरबख्श सिंग यांनी 24 तास आधी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण ऑपरेशनचा सांकेतिक शब्द 'बँगिल' असा होता.

पाकिस्तानला याची कल्पना येऊ नये म्हणून जनरल हरबक्ष सिंग शिमल्यात आधीच नियोजित कार्यक्रमात सामील झाले. कार्यक्रम आटोपताच ते हेलिकॉप्टरने सीमेवर पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी अमृतसरमध्ये कर्फ्यू लावण्याचे आदेश दिले. यानंतर, ठरलेल्या वेळी, भारतीय सैन्याने 4 ठिकाणांहून पाकिस्तानात प्रवेश केला आणि काही तासांतच डोगराईच्या उत्तरेकडील भसीन, दौगाईच आणि वाहग्रियांचा ताबा घेतला.

अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानचे 8 पॅटन रणगाडे केले नष्ट

7 सप्टेंबर 1965 पर्यंत, खेम करण येथे पाकिस्तानी सैन्याला रोखण्यासाठी लष्कराने 'असल उत्तर'मध्ये बचावात्मक पोजीशन घेतली होती. यादरम्यान पाकिस्तानच्या 100 पॅटन टँकनी पहिला हल्ला केला. त्यानंतर 8 सप्टेंबर 1965 रोजी अब्दुल हमीद चीमा गावाबाहेर उसाच्या शेतात जीपमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. तेव्हा त्यांना पाकिस्तानी रणगाड्यांचा आवाज आला.

थोड्या वेळाने टँक दिसू लागले. हे टँक त्यांच्या रिकॉयलेस गनच्या कक्षेत येण्याची त्यांनी वाट पाहिली. हे सर्व टँक त्यांच्या बंदुकांच्या कक्षेत येताच त्यांनी गोळीबार केला. अमेरिकन पॅटन टँक जळून राख होऊ लागले आणि त्यावर असलेले पाकिस्तानी सैनिक ते सोडून पळू लागले.

त्या लढ्यात सहभागी झालेले कर्नल रसूल खान सांगतात की 106 मिमी आरसीएलची रेंज 500-600 यार्ड असते. ते खूपच प्रभावी आहेत. ती लागल्यानंतर टँक वाचत नाही. मात्र, त्यातील कमतरता अशी आहे की, ती फक्त एक किंवा दोनच फायर करू शकते. असे असतानाही हमीद यांनी त्याच दिवशी पाकिस्तानचा दुसरा पॅटन टँकही उद्ध्वस्त केला.

10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानने जोरदार गोळीबार सुरू केला. त्यानंतर हमीदची नजर त्याच्यापासून 180 मीटर अंतरावर असलेल्या टँकवर पडली. त्याने टँक जवळ येऊ दिली आणि मग अचूक निशाना मारला. टँक जळू लागला. हमीदने घाईघाईने आपली जीप दुसरीकडे हलवली, जेणेकरून त्याचे ठिकाण इतर पाकिस्तानी रणगाड्यांना कळू नये.

यानंतर हमीदने मागून निशाणा साधून दुसरा टँकही उद्ध्वस्त केला. यानंतर ते तिसऱ्या रणगाड्याला लक्ष्य करत असताना पाकिस्तानी सैनिकाने त्यांना पाहिले. दोघांनी एकाच वेळी ट्रिगर दाबला. दोन गोळ्या सुटल्या. हमीदचा शेल टँकला लागला आणि टँकच्या शेलने हमीदची जीप उडवली. मरता-मरताही हमीद यांनी पाकिस्तानी रणगाडा उद्ध्वस्त केला.

या युद्धादरम्यान हमीद यांनी पाकिस्तानचे 8 पॅटन रणगाडे नष्ट केले होते.

‘जिंदा या मुर्दा’ डोगराईत भेटायचे ठरले

डोगराई हे लाहोरपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. डोगराई हे पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. कारण जीटी ट्रंक रोड, जो दिल्ली-अमृतसर ते लाहोरपर्यंत जातो. डोगराई येथील जीटी ट्रंक रोडच्या मधोमध इच्छागिल कालवा आहे. जे पाकिस्तानी लष्कराने 1950 मध्ये बांधले होते. जेणेकरून येथून लाहोरकडे जाणारा रस्ता अडवता येईल.

6 सप्टेंबर 1965 रोजी सकाळी 9 वाजता 3री बटालियन जाट रेजिमेंटने इच्छागिल कालव्याकडे वाटचाल सुरू केली. पाकिस्तानी वायुसेनेने केलेल्या जोरदार बॉम्बफेकीमुळे जाट रेजिमेंटला त्यांच्याकडे महत्त्वाची शस्त्रे गमवावी लागली. एवढे करूनही रात्री 11 वाजेपर्यंत त्यांनी कालव्याच्या पश्चिमेकडील बाटानगर व नंतर डोगराई ताब्यात घेतले. म्हणजेच भारतीय सैन्य लाहोरवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. दुसरीकडे, पाकिस्तानी हवाई दलाचे हल्ले सुरूच होते.

दुसरीकडे, 3 जाट रेजिमेंटला वेळेत रसद आणि शस्त्रे मिळू शकली नाहीत. भारतीय हवाई दलही मदत करू शकले नाही. याचा परिणाम असा झाला की, भारतीय सैन्याला डोगराईतून माघार घेऊन संतपुरा येथे यावे लागले. इच्छेगिल कालव्यावर पाकिस्तानने पुन्हा कब्जा केला. यानंतर भारतीय लष्कराने डोगराई ताब्यात घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही.

लेफ्टनंट कर्नल डेसमंड हाइड, 3 जाट कमांडिंगने 21 सप्टेंबरच्या रात्री डोगराईवर हल्ला करण्याची योजना आखली. हायडने आपल्या सैनिकांना सांगितले - एकही सैनिक मागे हटणार नाही. दुसरे म्हणजे, ‘जिंदा या मुर्दा’ डोगराईत भेटायचे ठरले.

लेफ्टनंट कर्नल डेसमंड हायड यांनी त्यांच्या द बॅटल ऑफ डोगराई या पुस्तकात लिहिले आहे - 'हा एक अविश्वसनीय हल्ला होता. त्याचा एक भाग होणं आणि ते इतक्या जवळून पाहणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता.
लेफ्टनंट कर्नल डेसमंड हायड यांनी त्यांच्या द बॅटल ऑफ डोगराई या पुस्तकात लिहिले आहे - 'हा एक अविश्वसनीय हल्ला होता. त्याचा एक भाग होणं आणि ते इतक्या जवळून पाहणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता.

त्यावेळी पाकिस्तानने डोगराईमध्ये आपल्या दोन कंपन्या तैनात केल्या होत्या. 13 क्रमांकाच्या माईलस्टोनवर आणखी दोन कंपन्या उपस्थित होत्या. कालव्याच्या तोंडावर प्रत्येक ठिकाणी आठ मशीन गन तैनात होत्या. भारताच्या 550 सैनिकांसमोर पाकिस्तानी सैन्याची संख्या दुप्पट होती.

54 इन्फंट्री ब्रिगेडने दोन टप्प्यांत हल्ल्याची योजना आखली होती असे हाइडने सांगितले. प्रथम 13 व्या मैलाच्या दगडावर पाकिस्तानी कंपन्यांना मागे ढकलने आणि नंतर 3 जाट रेजिमेंटला डोगराईंवर हल्ला करून ते काबीज करायचे होते.

हायडने ब्रिगेड कमांडरला आधीच सांगितले होते की 13 पंजाबचा हल्ला यशस्वी झाला नाही, तरी 3 जाट रेजिमेंटला दुसरा टप्पा पूर्ण करयचा होता. 13 पंजाबचा हल्ला अयशस्वी झाला आणि ब्रिगेड कमांडरने वायरलेसवर हल्ला थांबवण्यास सांगितले.

रात्री ठीक 1:40 वाजता हल्ला सुरू झाला. डोगराईच्या हद्दीत पाकिस्तानी सैनिकांनी सिमेंटपासून बनलेल्या अडथळ्यांच्या आडून मशीनगनने जोरदार हल्ला केला.

सुभेदार पाले राम म्हणाले की, सर्व जवान माझ्यासोबत उजव्या बाजूने चार्ज करतील. कॅप्टन कपिलसिंग थापाच्या प्लाटूननेही जवळपास एकाच वेळी चार्ज केला. ज्यांना गोळी लागली त्यांना तिथेच सोडून देण्यात आले. पाले रामच्या छातीत आणि पोटात 6 गोळ्या लागल्या, तरीही ते आपल्या सैनिकांना आज्ञा देत राहिले. बंदुका आणि बॉम्बने सुरू झालेली लढाई लवकरच हाणामारीपर्यंत आली.

3 जाट रेजिमेंटने पाकिस्तानी सैन्याचा कमांडर कर्नल गोलवाला, त्याचा बॅटरी कमांडर यांच्यासह 108 लोकांना जिवंत पकडले. यादरम्यान पाकिस्तानचे 308 जवान शहीद झाले. भारताच्या 108 जवानांपैकी 86 जवान शहीद झाले. भारताने 22 तारखेला पहाटे 5.30 वाजता डोगराई ताब्यात घेतले. पुढचा एक दिवस भारतीय सैन्याने डोगराईतून लाहोरवर गोळीबार सुरूच ठेवला.

पाकिस्तानच्या लाहोर मधील डोगराई परिसर, जो 1965 मध्ये भारतीय लष्कराच्या ताब्यात होता.
पाकिस्तानच्या लाहोर मधील डोगराई परिसर, जो 1965 मध्ये भारतीय लष्कराच्या ताब्यात होता.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला करावा लागला हस्तक्षेप

23 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला हस्तक्षेप करावा लागला. यानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम घोषित केला आणि युद्ध संपले. यानंतर युद्धात किती नुकसान झाले, याचा अंदाज आला.

अखेर युद्धात कोण जिंकले

भारताने 1920 चौरस किलोमीटर जमीन आणि पाकिस्तानने 540 चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली होती. भारताचे 2,735 आणि पाकिस्तानचे 5,988 सैनिक मारले गेले. दोन्ही देशांनी विजयाचा दावा केला, परंतु संरक्षण तज्ञांच्या मते दोन्ही देश त्यांचे लष्करी उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले.

पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब इतके निराश झाले की त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले की, मला हे समजले की पाकिस्तान 50 दशलक्ष काश्मिरींच्या फायद्यासाठी 100 दशलक्ष पाकिस्तानी लोकांचे जीवन कधीही धोक्यात घालणार नाही...कधीही नाही.

बातम्या आणखी आहेत...