आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरचीननंतर अमेरिकेची पाकिस्तानला मदत:हवाई दलाला दिले 3.58 हजार कोटी; भारताच्या पाठीत खंजीर

अनुराग आनंद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बातमी वाचण्यापूर्वी गेल्या काही महिन्यांतील या दोन बातम्यांच्या हेडलाइन वाचा...

24 जून 2022: चिनी बँकांकडून पाकिस्तानला 18.28 हजार कोटी रुपयांची मदत

8 सप्टेंबर 2022: F-16 हे लढाऊ विमान अपग्रेड करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई दलाला 3.58 हजार कोटी रुपये दिले

या दोन बातम्यां वाचल्यानंतर अर्थव्यवस्थेबाबत भीषण संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून पैसा मिळत असल्याचे स्पष्ट होते.

अमेरिकन सरकारकडून पाकिस्तानला आर्थिक मदत मिळणे ही मोठी महत्त्वाची बाब का आहे, तसेच भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे का आहे?, हे दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

या 3 कारणांमुळे पाकिस्तानला अमेरिकेची मदत मोठी आहे...

1. पाकिस्तान हा आशियातील चीनचा सर्वात मोठा कर्जदार आहे. पाकिस्तानच्या 2021-22 च्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात, वाईट टप्प्यातून जात असलेल्या पाकिस्तानवर एकूण 6.97 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत चीनच्या जवळ जात असलेल्या पाकिस्तानला आपल्या बाजूने वळवण्यासाठी अमेरिका मदत करत आहे.

2. राजीनामा देण्यापूर्वी इम्रान खान यांनी अमेरिकेवर आरोप केला होता की 'स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे अमेरिकेने त्यांचे सरकार पाडण्याचा कट रचला.' अशा स्थितीत ट्रम्प यांना शह देण्यासाठी हा बायडेन यांचा निर्णय असल्याचे मानले जात आहे.

3. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान शाहबाद शरीफ म्हणाले की, 'अमेरिकेशी शत्रुत्व अजिबात ठेवू शकत नाही. अमेरिकेने पाकिस्तानला वाईट काळात साथ दिली आहे.अशा परिस्थितीत अमेरिकेचा पाकिस्तानबाबतचा बदललेला दृष्टीकोन सर्वांनाच चकित करणारा आहे. यामागे शरीफ कुटुंबाची अमेरिकेशी असलेली जवळीक सांगितली जात आहे.

हा करार पाकिस्तानसाठी का महत्त्वाचा आहे, आपण 3 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया:

1. 39 वर्ष जुन्या फायटर जेटच्या अपग्रेडेशनसाठी पाकिस्तानला पैसे मिळाले

F-16 लढाऊ विमाने 1983 पासून पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट आहेत. आता 39 वर्षांनंतर या लढाऊ विमानाला देखभालीची गरज भासू लागल्याने कमकुवत अर्थव्यवस्था आणि परकीय कर्जाखाली दबलेल्या पाकिस्तानसाठी ते कठीण होत चालले आहे.

अशा परिस्थितीत पाकिस्तानने F-16 च्या लष्करी सुधारणा आणि देखभालीसाठी अमेरिकेकडे मदत मागितली होती. त्यानंतरच अमेरिकेच्या जो बायडेन सरकारने पाकिस्तानला 3580 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी, अमेरिकेने लढाऊ विमानाच्या अपग्रेडशिवाय कोणतीही शस्त्रे आणि युद्धसामग्री देण्यास नकार दिला आहे.

2. अपग्रेडेशनमुळे F-16 ची रडार आणि जॅमिंग क्षमता वाढेल

यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स म्हणजेच पेंटागॉनच्या दाव्यानुसार, F-16 च्या अपग्रेडचा अर्थ या विमानाचे नव्याने आधुनिकीकरण करणे आहे. याद्वारे विमानात खालील 4 बदल केले जाणार आहेत.

1. 1980 मध्ये बनवलेल्या F-16 मध्ये APG-68 रडार असायचे, पण आता APG-83 AESA सारखे आधुनिक रडार त्यात बसवले जाऊ शकतात. जे लांब अंतर कव्हर करते.

2. F-16 चे इंजिन पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि आधुनिक केले जाईल.

3. अपग्रेडेशनचा मुख्य उद्देश इलेक्ट्रॉनिक युद्धाची क्षमता वाढवणे आहे. यासाठी F-16 मध्ये क्षेपणास्त्रे, शस्त्रे आणि जॅमिंगची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक उपकरणे बसवण्यात येणार आहेत.

4. F-16 लढाऊ विमानाचे सॉफ्टवेअर अपग्रेड केले जाईल.

3. 4 वर्षानंतर पाकिस्तानला अमेरिकेकडून संरक्षण सहकार्य मिळाले

2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प सरकारने पाकिस्तानला 16,000 कोटी रुपयांची सुरक्षा मदत थांबवण्याची घोषणा केली होती. 'पाकिस्तान, तालिबान आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्यात अपयशी ठरले आहेत', असा युक्तिवाद अमेरिकन सरकारने यामागे केला होता.

आता 4 वर्षांनंतर जो बायडेन यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची दहशतवादविरोधी क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण सहकार्य सुरू करण्याची घोषणा केली आहे.

आयएएफमधील कमी होत चाललेल्या स्क्वॉड्रनमध्ये भारतासाठी ही चिंतेची बातमी

अमेरिकेच्या या निर्णयावर भारत सरकारने म्हटले आहे की, 'यामुळे दोन्ही देशांच्या क्षमतेत अस्वस्थता निर्माण होईल. भारत सरकारला आशा आहे की, अमेरिका भारताच्या सुरक्षेच्या हिताची काळजी घेईल. यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसमधील आशिया विषयावरील तज्ञ डॅनियल मार्के यांनी डॉनला सांगितले की, एफ-16 कार्यरत ठेवण्यासाठी अमेरिकेने हा आवश्यक निर्णय घेतला आहे.

या कारणांमुळे भारतासाठी ही चांगली बातमी नाही...

पहिले: अपग्रेड झाल्यानंतर F-16 फायटर जेटची लढाऊ क्षमता वाढेल.

दुसरे: अनेक वर्षांपासून पाकिस्तानची 85 F-16 लढाऊ विमाने भारतासाठी महत्त्वाची नव्हती, पण आता ते भारताला टक्कर देण्यासाठी सज्ज होतील.

तिसरे: आता भारतीय हवाई दल त्यांच्या कमी होत चाललेल्या फायटर स्क्वाड्रनच्या संख्येमुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी हवाई दलाची वाढती क्षमता ही भारतासाठी नक्कीच चांगली बातमी नाही.

शरीफ कुटुंबीयांचा अमेरिकेशी काय संबंध आहे, 4 घटनांमधून शरीफ कुटुंबाची अमेरिकेशी असलेली मैत्री कळते…

घटना पहिली : रशिया विरुद्ध पाकिस्तान अमेरिकेचा सर्वात चांगला मित्र झाला

डिसेंबर 1979 ते फेब्रुवारी 1989 हा काळ अफगाणिस्तानातील सोव्हिएत युद्ध म्हणून ओळखला जातो. या काळात अफगाणिस्तान सरकारसह रशिया मुजाहिदीनविरुद्ध युद्ध लढत असे.

1989 ची गोष्ट आहे जेव्हा रशियाला अफगाणिस्तानातून हुसकावून लावण्यासाठी पाकिस्तान आणि अमेरिका एकत्र युद्ध करत होते. सोव्हिएत रशियाला अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी नवाझ शरीफ हे अमेरिकेचे प्रमुख मित्र असल्याचे ब्रुकिंग्ज वेबसाइटने वर्णन केले आहे.

असे म्हणतात की, हे छायाचित्र सर्व काही सांगते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे हे छायाचित्र पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील घट्ट मैत्री सांगत आहे.
असे म्हणतात की, हे छायाचित्र सर्व काही सांगते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे हे छायाचित्र पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील घट्ट मैत्री सांगत आहे.

दुसरी घटना : अमेरिकेने शरीफ यांना जन्मठेपेपासून वाचवले

12 ऑक्टोबर 1999 आहे. अनेक मतभेदांमुळे नवाझ शरीफ यांनी परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. मग परवेझ मुशर्रफ यांनी बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील जनतेने निवडून दिलेले सरकार पाडले.

यावेळी अमेरिकेने नवाझ शरीफ यांच्याशी मैत्रीचा खेळ खेळला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन स्वतः पाकिस्तानात गेले आणि सौदी अरेबियाच्या मदतीने त्यांनी नवाझ शरीफ यांना जन्मठेपेपासून वाचवले.

तिसरी घटना: शरीफ सरकार वाचवण्यासाठी अमेरिकेने निर्बंधांची धमकी दिली

2014 मध्ये नवाझ शरीफ यांच्या समर्थनार्थ अमेरिका पुन्हा एकदा उघडपणे समोर आली. यावेळी प्रकरण होते, पाकिस्तानातील सततच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा सत्तापालट झाला. इम्रान खान सतत देशभरात फिरत होते.

दरम्यान, नवाझ शरीफ यांचे सरकार बेकायदेशीरपणे पाडले तर पाकिस्तानला अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अमेरिकेच्या संसदेने अहवाल जारी केला.

चौथी घटना : ओबामांच्या निमंत्रणावरून शरीफ 2015 मध्ये अमेरिकेत पोहोचले

सप्टेंबर 2015 ची ही घटना आहे. नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. यावेळी नवाझ शरीफही अमेरिकेत होते. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरच नवाझ शरीफ यांनी ओबामा यांची भेट घेतली होती. काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली पाहिजे, असे ओबामा आणि शरीफ यांनी एकत्रीत निवेदन जारी केले होते.

काश्मीर प्रश्नात कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या प्रवेशाला भारताचा विरोध आहे. अशा परिस्थितीत अमेरिका आणि पाकिस्तानच्या संयुक्त वक्तव्याला भारतावर दबाव म्हणून पाहिले जात होते.

हे छायाचित्र 2015 चे आहे, जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ अमेरिकेला पोहोचले होते. तेथे त्यांचे बराक ओबामा यांनी जोरदार स्वागत केले होते.
हे छायाचित्र 2015 चे आहे, जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ अमेरिकेला पोहोचले होते. तेथे त्यांचे बराक ओबामा यांनी जोरदार स्वागत केले होते.

या बातमीत आम्ही पाकिस्तानला मिळणाऱ्या परकीय कर्जाबद्दल चर्चा केली आहे. अशा परिस्थितीत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि कर्जाविषयी माहिती जाणून घ्या.

बातम्या आणखी आहेत...