आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चौकसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेहुल चौकसी याला अँटिगामधून डोमिनिकामध्ये आणण्यात आले असून तेथून त्याला भारतात आणण्याची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे मेहुल चौकसी यांने डोमिनिका उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने ती याचिका नाकारत पळून जाण्याचा धोका असल्याचे सांगितले होते.
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. दरम्यान, अँटिगा अपहरण प्रकरणामागे भारतीय एजन्सींचा हात असल्याचा आरोप सुप्रीम कोर्टातील मेहुल चौकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी केला आहे. कारण अँटिगामध्ये ते केस पराभूत होत असल्याने मेहुलचे अपहरण केल्याचे अग्रवाल म्हणाले.
मेहुल चौकसी भारतात का येत नाहीये? काय त्याला आपल्या देशातील लोकशाहीवर भरोसा नाही? दैनिक भास्करने मेहुलचे वकील विजय अग्रवाल यांच्याशी संभाषण करत काही प्रश्न उपस्थित केले. वाचा, संभाषणातील काही महत्वाचे मुद्दे...
प्रश्न: मेहुल चौकसीने अँटिगामधून अपहरण केल्याची तक्रार दिली आहे. यासाठी त्याने आपल्या एका गर्लफ्रेंडवर आरोप केले आहेत, परंतु ती या आरोपचे खंडण करत आहे? त्यामुळे सत्य काय आहे?
उत्तर : या अपहरणामागे भारतीय एजन्सींचा हात असून ते अँटिगामध्ये केस गमावत असल्याने असे केले. मेहुलला तेथून इतर कोणत्याही देशात नेण्याची तयारी सुरू होती. कारण त्यांना तेथून भारतात आणणे सोपे जाणार होते व यासाठी कित्येक लोकांची मदत घेण्यात आली असल्याचे अग्रवाल म्हणाले.
प्रश्न : मेहुलला आता डोमिनिकामध्येही बेकायदेशीर प्रवासी मानले जाते. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे?
उत्तरः अग्रवाल म्हणाले की, आता डोमिनिका उच्च न्यायालय आमच्या बाजूने उभा आहे. या सर्व गोष्टी 25 मे रोजीच्या एका पत्राच्या आधारे सांगितले जात असल्याचे ते म्हणाले. कारण 27 तारखेपर्यंत न्यायालयाला हा सापडलेला माणूस मेहुल चौकसी असल्याचे माहित नव्हते.
प्रश्न : हा घोटाळा 13 हजार कोटी रुपयांचा असून याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे? त्यामुळे एक वकील आपली पुढील दिशा काय असणार आहे?
उत्तर : या अपहरणामुळे आम्हाला व्हिडियो कॉन्फ्रेंसिंगव्दारे सुनावणी घ्यायची असून आम्ही त्यासाठी तयार असल्याचे विजय अग्रवाल म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मेहुल याला भारतात यायचे नाहीये. दुसरी गोष्ट ही की, त्याची प्रकृती ठीक नसून त्याला विमानाने प्रवास करणे शक्य नाही. कारण यासाठी 14 तासांचा अवधी लागत लागतो.
प्रश्न : पंजाब नॅशनल बँकेसोबत 13 हजार कोटींपेक्षा जास्त फसवणूक झाली आहे. ते पैसे कसे मिळतील?
उत्तर : ईडीने जेवढे पैसे होते त्यापेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. जर केवळ पैशांची बाब असेल तर त्यामधून बँकेचे पैसे वसूल करता येतील.
प्रश्न : प्रकृती ठीक झाल्यावर मेहुल भारतात येतील का?
उत्तर : सध्या तसे होणार नाही. प्रकृती ठीक झाल्यावर त्याबद्दल विचार केला जाऊ शकतो. परंतु, अँटिगामध्ये झालेल्या अपहरणानंतर त्यांच्या कुटुंबियांनी भारत सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले आहे. जर त्यांना अँटिगामध्ये टॉर्चर केल्या जाऊ शकते तर भारतात त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो.
प्रश्न : तपास यंत्रणा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे योग्य चौकशी करेल का?
उत्तर : ऑनलाइन चौकशीत काय अडचण आहे? होय, एक गोष्ट आहे समोरासमोरील चौकशी एजन्सी टॉर्चर करतात, ते फक्त येथे करता येणार नाही.
प्रश्न : आपण प्रत्येक धोक्याची गोष्ट करता? मेहुलला भारतात कोणापासून धोका आहे?
उत्तर : मेहुलला भारतात राजकीय शक्ती आणि तपास एजन्सीपासून धोका आहे. त्यासोबतच त्याच्या कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी होते. त्यांचा पगारही मिळाला नाही, पुरवठा करणाऱ्यालाही पैसे दिले गेले नसल्याने त्याच्या जीवाला किती धोका आहे याचा अंदाजा येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.