आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरचीन-पाकवर 'प्रचंड' नजर:16000 फुटांवर टेकऑफ-लँडिंग, अमेरिकेच्या हेलिकॉप्टरपेक्षाही सरस

लेखक: अभिषेक पाण्डेय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वदेशी बनावटीचे पहिले लढाऊ लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच LCH प्रचंड भारतीय हवाई दलात सामील झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पहिल्या बॅचमध्ये हे चार हेलिकॉप्टर हवाई दलाला सुपूर्द केले. दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये आपण त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊ, तसेच ते अमेरिका, रशिया आणि चीनच्या हेलिकॉप्टरपेक्षा कितीतरी पटीने कसे पुढे आहे हे समजून घेऊ...

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL ने हे 5.8 टन ट्विन-इंजिनयुक्त LCH विकसित केले आहे. HAL ही सरकारी कंपनी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मते, त्याचे सुमारे 45% भाग स्वदेशी आहेत, जे 55% पर्यंत वाढवायचे आहेत.

जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये कार्य करू शकणारे हे एकमेव लढाऊ हेलिकॉप्टर आहे. यात शक्ती इंजिन लावलेले आहे. हे HAL ने फ्रेंच इंजिन निर्माता Safran च्या सहकार्याने बनवले आहे.

हे जगातील एकमेव हेलिकॉप्टर आहे, जे 16,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवरही शस्त्रे आणि इंधनासह टेक-ऑफ आणि लँड शकते.

विशेष म्हणजे औपचारिकरित्या सामील होण्यापूर्वीच भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवर LCH हेलिकॉप्टर तैनात केले होते.

मार्च 2022 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने 3,887 कोटी रुपये खर्चून 15 स्वदेशी LCH खरेदी करण्यास मान्यता दिली होती. यापैकी 10 एलसीएच हेलिकॉप्टर हवाई दलाला आणि 5 लष्कराला देण्यात येणार आहेत.

2 ग्राफिक्सद्वारे जाणून घेऊया प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर विकसित करण्याचे कारण...

पुढील ३ ग्राफिक्समधून जाणून घ्या LCH प्रचंडची ताकद, क्षमता आणि वैशिष्ट्ये...

16 वर्षांत LCH प्रचंड विकसित करण्यात आले

ऑक्टोबर 2006: सरकारने LCH बनवण्याचे काम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL वर सोपवले.

फेब्रुवारी 2010: एलसीएचच्या पहिल्या प्रोटोटाईपची पहिली ग्राउंड चाचणी, काही महिन्यांनंतर पहिली उड्डाण चाचणी

फेब्रुवारी 2011: एअरो इंडिया शो दरम्यान पहिला सार्वजनिक परफॉर्मन्स

जून 2011: दुसऱ्या प्रोटोटाईपची उड्डाण चाचणी

नोव्हेंबर 2014: इंटिग्रेटेड वेपन प्लॅटफॉर्म आणि सेन्सर्ससह तिसऱ्या प्रोटोटाईपची चाचणी

नोव्हेंबर 2015: चौथ्या प्रोटोटाईपची चाचणी, हेलिकॉप्टरची उष्ण आणि थंड हवामानात टेस्टसाठी राजस्थान आणि लडाखमध्ये चाचणी

जानेवारी 2019: HAL ने LCH हेलिकॉप्टरच्या ऑपरेशनल तैनातीला ग्रीन सिग्नल दिला

फेब्रुवारी 2020: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू HAL येथे LCH उत्पादन हँगरचे उद्घाटन केले,येथे दरवर्षी 30 हेलिकॉप्टर बनवण्याचे नियोजन आहे.

नोव्हेंबर 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिकात्मकरित्या भारतीय हवाई दलाला LCH सुपूर्द केले

3 ऑक्टोबर 2022: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोधपूर येथे औपचारिकपणे 4 LCH प्रचंड भारतीय हवाई दलाला सुपूर्द केले.

भारताकडे आता 4 अटॅक हेलिकॉप्टर आहेत, त्यापैकी दोन परदेशी आहेत...

भारताच्या 4 अटॅक हेलिकॉप्टर्सपैकी अपाचे अमेरिकन आणि Mi-25/35 रशियन हेलिकॉप्टर्स आहेत.
भारताच्या 4 अटॅक हेलिकॉप्टर्सपैकी अपाचे अमेरिकन आणि Mi-25/35 रशियन हेलिकॉप्टर्स आहेत.
बातम्या आणखी आहेत...