आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Indian Navy Aircraft Carrier INS Vikrant Facts | INS Vikrant Top Speed And How Many Aircrafts Can Ins Vikrant Carry?

एक्सप्लेनर:एखाद्या तरंगणा-या गावासारखी आहे स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'विक्रांत', हिंदी महासागरात चीन आणि पाकिस्तानला देणार काटें की टक्कर

आबिद खान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या सविस्तर...

भारताची पहिलीवहिली स्वदेशी बांधणीची विमानवाहू युद्धनौका विक्रांत हिच्या समुद्री चाचण्यांना 4 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. ही युद्धनौका कोचीन शिपयार्डमध्ये बांधण्यात आली आहे. ब्रिटिश बनावटीची भारताची सर्वात पहिली युद्धनौका विक्रांत निवृत्त झाल्यावर तिच्याच नावाने ही युद्धनौका भारतात बनवण्यात आली. विक्रांतची बांधणी पूर्ण झाल्यावर तिच्या बंदरात चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर 4 ऑगस्टला ती खोल समुद्रातील चाचण्यांसाठी बंदराबाहेर पडली. सध्या भारताकडे रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य ही एकच विमानवाहू युद्धनौका आहे.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना भारतीय नौदलाने म्हटले की, हा भारतासाठी 'अभिमानास्पद आणि ऐतिहासिक दिवस' आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेली ही देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आहे. यासह, भारत निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे, जे विमानवाहू युद्धनौका तयार करत आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्यावर पुढील वर्षापर्यंत तिला नौदलाच्या सेवेत समाविष्ट केले जाईल.

समजून घ्या, विमानवाहू जहाज काय आहे? विक्रांतचे वैशिष्ट्य काय आहे? नौदलात समाविष्ट झाल्यानंतर भारतीय सैन्याची ताकद किती वाढेल? आणि कोणत्या देशांमध्ये किती विमानवाहू जहाज आहेत?

सर्वप्रथम, युद्धनौका किंवा विमानवाहू जहाज म्हणजे काय हे समजून घ्या?
सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे युद्धनौकेचा अर्थ असे जहाज आहे जे युद्धाशी संबंधित कार्यात वापरले जातात. साधारणपणे अशा जहाजांचा वापर एखाद्या देशाच्या नौदलाकडून केला जातो. विमानवाहू युद्धनौका देखील एक प्रकारची युद्धनौका आहे. एअरक्राफ्ट कॅरिअरला तुम्ही समुद्रात तरंगणारे विमानतळ म्हणून बघू शकता. म्हणजेच विमानवाहू नौकेत उड्डाणपासून लँडिंगपर्यंत सर्व सुविधा आहेत.

त्यांचे काम शत्रू देशांच्या नौदलाशी लढा देण्यापासून ते हवाई दलाला समर्थन देण्यापर्यंतचे आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने युद्धनौकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

आता विक्रांत बद्दल जाणून घ्या
23,000 कोटी रुपये खर्चून विक्रांत बनवण्यात आला आहे. ही विमानवाहू युद्धनौका 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद आहे. हे कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधले आहे. त्याची टॉप स्पीड 52 किलोमीटर प्रति तास असल्याचे सांगितले जाते. या 14 मजल्याच्या नौकेत 2300 कंपार्टमेंट आहेत. जहाजावर एका वेळी 1700 सैनिक तैनात केले जाऊ शकतात. या जहाजावर मिग -29 के, कामोव -31 हेलिकॉप्टरसह 30 लढाऊ विमानेही तैनात केली जाऊ शकतात.

विक्रांत इतके खास का आहे?
वास्तविक, विक्रांतचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्वदेशीपणा. विक्रांतचे 70% पेक्षा जास्त साहित्य आणि उपकरणे भारतात बनवले गेले आहेत. यासह, भारत जगातील मोजक्या देशांपैकी एक बनला आहे ज्यांच्याकडे विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता आहे.

युद्धनौकेच्या डिझाईनपासून त्याच्या असेंबलिंगपर्यंतची सर्व कामे कोच्चीच्या शिपयार्डमध्ये केली गेली आहेत. याची संपूर्ण जबाबदारी डायरेक्ट्रेट ऑफ नेवल डिजाइन (DND) कडे आहे. तसेच, याचे निर्माण आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत केले गेले आहे. यामुळे, त्याच्या एकूण खर्चाच्या 80-85% (23 हजार कोटी) भारतीय बाजारातच खर्च झाले आहेत. बांधकामादरम्यान 40 हजार लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोजगारही मिळाला आहे.

विक्रांतची शक्ती
विक्रांतबाबत नौदलाने म्हटले आहे की, कमिशननिंग ती समुद्रातील भारताची सर्वात मोठी शक्ती असेल. 44 हजार 500 टन वजनाच्या या जहाजामध्ये ट्विन प्रोपेलर आहेत, जे हे जड जहाज 52 किलोमीटर प्रति तास वेगाने समुद्रात तरंगू शकते. सामान्य परिस्थितीत, ही नौका 33 किलोमीटर प्रति तास वेगाने 13 हजार किलोमीटरचे अंतर सतत कापू शकते.

तसेच या नौकेकडून एका वेळी 30 हून अधिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर ऑपरेट केले जाऊ शकतात. त्यात एकाच वेळी 2 हजारांहून अधिक लोक राहू शकतात. म्हणजेच, ही विमानवाहू युद्धनौका स्वतःच एक लहानसे गाव आहे. कार्यान्वित केल्यानंतर, ते आयएनएस विक्रांत म्हणून ओळखले जाईल.

यामुळे सैन्याची ताकद किती वाढेल?
सेवानिवृत्त नौदलाचे अधिकारी आणि संरक्षण तज्ज्ञ उदय भास्कर यांच्या मते, विमानवाहू युद्धनौका पूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर हिंदी महासागरातील भारताची सीमापार क्षमता वाढेल. तसेही चीन हिंदी महासागरात आपले वर्चस्व वाढवत आहे. विमानवाहू युद्धनौकेच्या मदतीने भारत चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना टक्कर देऊ शकेल.

भारतीय लष्करातील ही पहिली विमानवाहू नौका आहे का?
नाही. भारतात सध्या आयएनएस विक्रमादित्य आहे, जे नोव्हेंबर 2013 मध्ये कार्यान्वित झाले. त्यावर 30 पेक्षा जास्त लढाऊ विमाने उभी करता येतील. रशियातून डी-कमिशंडझालेल्या अॅडमिरल गोर्शकोव्ह नावाच्या युद्धनौकेत मॉडिफिकेशन करुन ती बनवण्यात आली आहे.

याशिवाय भारताकडे पहिले आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौकाही होत्या. सध्या दोघांनाही डी-कमिशन करण्यात आले आहे. या दोन्ही विमानवाहू युद्धनौका ब्रिटनने बनवल्या होत्या. ब्रिटीश नौदलातून डी-कमिशन घेतल्यानंतर त्यांना भारतीय नौदलात दाखल करण्यात आले होते.

याला विक्रांत असे नाव का दिले जात आहे?
भारताकडे आधीच INS विक्रांत नावाची विमानवाहू युद्धनौका होती, मग या नवीन युद्धनौकेचे नाव विक्रांत असे का ठेवले जात आहे?, असा विचार नक्कीच तुम्ही करत असाल. खरं तर, भारताकडे यापूर्वी जे आयएनएस विक्रांत होते, त्याने 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात खूप महत्वाची भूमिका बजावली होती. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला आणि पाकिस्तानने बांगलादेशच्या रूपाने आपली जमीनही गमावली होती.

भारत 1971 च्या युद्धातील विजयाचा 50 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. म्हणूनच नौदलाने आपल्या आयएनएस विक्रांतच्या स्मरणार्थ या नवीन विमानवाहू जहाजाला विक्रांत असे नाव दिले आहे. आयएनएस विक्रांतचा हा पुनर्जन्म असल्याचे नौदलाने म्हटले आहे.

भारत दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेवरही काम करत आहे का?
भारत आपल्या दुसऱ्या स्वदेशी विमानवाहू नौका विशालवर काम करत आहे. पण त्याचा संपूर्ण आराखडा अद्याप मंजूर झालेला नाही आणि केवळ सुरुवातीच्या नियोजनावर काम केले जात आहे. या युद्धनौकेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टम (EMALS) ने सुसज्ज करण्याच्या योजनेवर नौदल काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...