आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरट्विटरला कमाईचा अड्डा बनवणार भारतवंशीय श्रीराम कृष्णन:मस्क यांना ब्ल्यू टिकसाठी पैसे आकारण्याचा सल्ला त्यांनीच दिला

लेखक: नीरज सिंह25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासूनच कंपनीत उलथापालथ सुरू आहे. सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ब्ल्यू टिकसाठी शुल्क, एडिट बटणसारख्या अनेक फीचर्सवर काम सुरु आहे. या सर्व मोठ्या निर्णयांमागे भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन असल्याचे सांगितले जात आहे.

श्रीराम कृष्णन 30 ऑक्टोबरपासून ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयात तळ ठोकून आहेत. तर मस्क न्यूयॉर्कला गेले आहेत. NYT नुसार, यावेळी सर्व प्रमुख निर्णय त्यांच्या निगराणीत घेतले जात आहेत.

हे श्रीराम कृष्णन कोण आहेत, त्याचा एलॉन मस्कशी काय संबंध? चला, तर जाणून घेऊया दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये...

आधी श्रीराम कृष्णन यांचे 31 ऑक्टोबर रोजीचे हे ट्विट वाचा...

श्रीराम कृष्णन यांनी 31 ऑक्टोबर रोजी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, आता जर गोष्ट बाहेर आलीच आहे. मी ट्विटरसाठी काही उत्तम लोकांच्या टीमसोबत एलॉन मस्क यांना मदत करत आहे. मला विश्वास आहे की ही एक अतिशय महत्त्वाची कंपनी आहे. याचा जगावर मोठा प्रभाव पडू शकतो आणि एलॉन हे अशे व्यक्ती आहेत जे ते शक्य करतील.

मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, त्यांचे मुख्य काम a16z कंपनीशी संबंधित आहे. या गुंतवणूक कंपनीचे काम स्टार्टअप्स, अनेक नामांकित कंपन्या आणि क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे हे आहे.

सध्या ट्विटरवर होत असलेल्या बदलांमध्ये श्रीराम कृष्णन यांची मोठी भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता प्रश्न निर्माण होतो की हे बदल काय आहेत?

पहिला बदल: ब्ल्यू टिकसाठी दरमहा 8 डॉलर्स द्यावे लागतील

31 ऑक्टोबर रोजीच्या, द व्हर्जने वृत्तात दावा करण्यात आला आहे की ट्विटरचे नवीन मालक मस्क यांनी व्हेरिफिकेशन प्रक्रियेत म्हणजेच ब्ल्यू टिक देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. ब्ल्यू सबस्क्रिप्शनसाठी, वापरकर्त्यांना दरमहा 8 डॉलर्स म्हणजेच सुमारे 660 रुपये द्यावे लागतील. जी खाती आधीच व्हेरिफाईड आहेत, त्यांना 90 दिवसांच्या आत सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल, अन्यथा ब्ल्यू टिक काढून टाकली जाईल.

ट्विटर ब्ल्यू सबस्क्रिप्शन सुमारे एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. याला ट्विटरची प्रीमियम सेवा म्हणतात. या सेवेमध्ये, वापरकर्त्यांना काही अतिरिक्त फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत, जे सामान्य ट्विटर वापरकर्त्यांसाठी लॉक केलेले आहेत. ट्विटरला ब्ल्यू सबस्क्रिप्शन आणि पेड व्हेरिफिकेशनद्वारे आपला महसूल वाढवायचा आहे. हा नियम भारतासारख्या देशात लागू झाला आहे की नाही, याची पुष्टी झालेली नाही.

दुसरा बदल: पोस्टसाठी वर्ण मर्यादा म्हणजेच कॅरेक्टर लिमिट 280 वरून वाढवली जाईल

ट्विटर लवकरच मेसेजची 280 ही कॅरेक्टर लिमिट वाढवू शकते. मस्क यांनी ट्विटद्वारे याचे संकेत दिले आहेत. ट्विटरने 280 अक्षरांची मर्यादा वाढवावी किंवा काढून टाकावी असे मस्क यांनी म्हटले आहे. सध्या, ट्विटरवर ट्विट करण्यासाठी, वापरकर्ते केवळ 280 अक्षरांमध्येच मेसेज लिहू शकतात. यापूर्वी ही मर्यादा 140 अक्षरांची होती.

तिसरा बदल: लॉगआउट केल्यानंतरही तुम्ही ट्रेडिंग ट्विट आणि स्टोरी पाहू शकाल

एलॉन मस्क यांनी होमपेजही बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, आता ट्विटर आयडीवरून लॉग आउट केल्यानंतर यूजर्सला लॉग-ईन पेजऐवजी एक्सप्लोर पेजवर पाठवले जाईल. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना पेजवर ट्रेडिंग ट्विट आणि न्यूज स्टोरी दिसतील. त्याच वेळी, जे पहिल्यांदा ट्विटर डॉट कॉमला भेट देतील त्यांनाही एक्सप्लोर पेज दिसेल जेणेकरुन वापरकर्त्यांना अकाऊंट क्रिएट करण्यासाठी आकर्षित करता येईल.

श्रीराम कृष्णन यांनी मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि स्नॅपचॅटमध्येही काम केले आहे

मूळचे चेन्नईचे असलेले कृष्णन हे व्यवसायाने इंजिनिअर आहेत. तो सध्या एन्ड्रिसेन होरिवित्झ नावाच्या व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये भागीदार आहे. ही कंपनी a16z म्हणूनही ओळखली जाते. मायक्रोसॉफ्टमध्ये व्हिज्युअल स्टुडिओसाठी प्रोग्राम मॅनेजर म्हणून त्यांनी 2007 मध्ये पहिली नोकरी केली होती.

2013 मध्ये त्यांनी फेसबुक जॉईन केले. त्यांनी 2016 पर्यंत उत्पादन/व्यवसाय धोरणासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी स्नॅपचॅटसोबत देखील काम केले, जिथे त्याने कंपनीचा आयपीओ येण्यापूर्वी जाहिरात तंत्रज्ञान मंच तयार केला.

श्रीराम कृष्णन यांना कन्झ्यूमर टेक आणि क्रिप्टोमध्ये रुची आहे. याशिवाय त्यांना किश्श्यांमध्येही रस आहे.
श्रीराम कृष्णन यांना कन्झ्यूमर टेक आणि क्रिप्टोमध्ये रुची आहे. याशिवाय त्यांना किश्श्यांमध्येही रस आहे.

ट्विटरला आधीही मिळवून दिली 20% ग्रोथ

सिलिकॉन व्हॅलीमधील टॉप कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 2017 मध्ये श्रीराम कृष्णन ट्विटरसोबत जोडले गेले. येथील मुख्य ग्राहक उत्पादन टीमचे त्यांनी नेतृत्व केले. या वर्षी, ट्विटर वापरकर्त्यांची संख्या 20% वाढविण्यात त्यांना यश आले. ट्विटरची होम टाइमलाइन, नवीन वापरकर्त्यांचे अनुभव, सर्च, डिस्कव्हरी आणि ऑडिअन्स ग्रोथसारखी महत्त्वाची कामे त्यांना करायची होती. 2019 पर्यंत ते ट्विटरशी जोडलेले होते आणि होम पेज त्यांनी नव्या पद्धतीने पुन्हा लॉन्च केले.

यासोबतच त्यांनी याहू कंपनीतही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. सोबतच बिटस्की, होपिन आणि पॉलिवर्कसारख्या अनेक कंपन्यांच्या बोर्डवरही ते राहिले आहेत. 2021 मध्ये त्यांनी एन्ड्रिसेन होरिवित्झ जॉईन केले. क्लबहाऊसमध्ये ही मोठी गुंतवणूकदार आहे. क्लबहाउस हे एक सोशल ऑडिओ अॅप आहे जे 2020 मध्ये रिलीज झाले होते.

याहूवरील चॅटिंगमुळे पत्नी आरती राममूर्तींशी मैत्री झाली

श्रीराम कृष्णन पत्नी आरती राममूर्तींसह.
श्रीराम कृष्णन पत्नी आरती राममूर्तींसह.

कृष्णन यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी आरती राममूर्तीही चेन्नईच्या आहेत. इंजिनिअरिंग करताना दोघांची भेट झाली. याआधी याहूवर चॅटिंग करताना दोघांमध्ये मैत्री झाली होती. हे 37 वर्षीय जोडपे सॅन फ्रॅन्सिस्कोतील नोए व्हॅलीत राहते आणि त्यांना 2 वर्षांची मुलगी आहे.

आरती राममूर्ती यांनी नेटफ्लिक्स आणि फेसबुकसारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे आणि स्टार्ट-अप्स ट्रू अँड कंपनी आणि लुमॉइडची सुरुवात केली आहे.

गूड टाईम शोमधून सिलिकॉन व्हॅलीतील पॉवर कपल बनले

2021 च्या सुरुवातीला, कृष्णन आणि त्यांच्या पत्नी आरती राममूर्ती यांनी एक क्लबहाऊस टॉक शो, 'द गुड टाइम शो' सुरू केला. स्टार्ट-अप्स, भांडवलदार आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतलेल्या लोकांना लक्षात घेऊन हा शो तयार करण्यात आला आहे.

या शोमध्ये एलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, टोनी हॉक, डियान वॉन फर्स्टनबर्ग, कान्ये वेस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिस्टर बीस्टसारखे पाहुणे सामील झाले आहेत. या शोमुळे हे दोघेही सिलिकॉन व्हॅली पॉवर कपल म्हणून ओळखले जातात.

व्यवसायाने अभियंता असलेले कृष्णन हे स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जातात. आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे 23 गुंतवणुका केल्या आहेत आणि 4 ऑक्टोबर रोजी त्यांनी सीड राऊंड-लॅसो लॅबसाठी अशीच गुंतवणूक केली होती. कृष्णन प्रामुख्याने क्रिप्टो आणि वेब3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

टॉक शो ‘द गुड टाइम शो’ मध्ये आरती राममूर्ती आणि श्रीराम कृष्णन.
टॉक शो ‘द गुड टाइम शो’ मध्ये आरती राममूर्ती आणि श्रीराम कृष्णन.

स्पेसएक्स मुख्यालयात पहिल्यांदा मस्क यांना भेटले

एलॉन मस्क फेब्रुवारी 2021 मध्ये श्रीराम कृष्णन आणि आरती राममूर्ती यांच्या द गुड टाइम शोमध्ये आले होते. NYT ने आपल्या अहवालात म्हटले आहे की ते काही वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियाच्या हॉथोर्नमधील स्पेसएक्सच्या मुख्यालयाच्या दौऱ्यादरम्यान त्यांना भेटले होते.

एलॉन मस्क यांनी भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माजी व्यवस्थापनावर ते नाराज होते. मस्क यांनी गेल्या आठवड्यात कंपनीची सूत्रे हाती घेताच भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गाडे यांची हकालपट्टी केली होती.

एलॉन मस्क यांनी स्वतःला ट्विटरचे नवे सीईओ आणि संचालक बनवले आहे. कंपनीने सिक्युरिटी फायलिंगमध्ये याची माहिती दिली आहे.
एलॉन मस्क यांनी स्वतःला ट्विटरचे नवे सीईओ आणि संचालक बनवले आहे. कंपनीने सिक्युरिटी फायलिंगमध्ये याची माहिती दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...