आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरइंदिरा गांधींना अटकेच्या चरण सिंहांच्या चुकीची कहाणी:जनता पार्टीला गमवावी लागली सत्ता, 'ऑपरेशन ब्लंडर' म्हणून नोंद

लेखक: नीरज सिंह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

3 ऑक्टोबर 1977 चा दिवस. सीबीआयचे अधिकारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घरी पोहोचतात आणि प्रचारासाठी जीप खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक करतात. त्यावेळी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात जनता पक्षाचे सरकार होते आणि गृहमंत्री होते चौधरी चरणसिंह.

जनता पक्षाच्या या राजकीय चुकीला 'ऑपरेशन ब्लंडर' म्हणतात. इंदिरा गांधींना या अटकेमुळे नुकसान न होता याचा फायदाच झाला.

आज एक्सप्लेनरमध्ये आम्ही इंदिरा गांधींच्या अटकेची कहाणी सांगणार आहोत. त्यांना अटक का झाली? आणि ही अटक इंदिराजी आणि काँग्रेससाठी संजीवनी कशी ठरली ते?

जनता पक्षाच्या नेत्यांना इंदिरा गांधींना तुरुंगात पाठवून आणीबाणीचा राग काढायचा होता.

25 जून 1975 रोजी देशात आणीबाणीची घोषणा करण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करताना इंदिरा गांधी.
25 जून 1975 रोजी देशात आणीबाणीची घोषणा करण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करताना इंदिरा गांधी.

1971 ची गोष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड बहुमताने विजय मिळवला. रायबरेलीतून निवडणूक जिंकून इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. मात्र 4 वर्षांनंतर अलाहाबाद हायकोर्टाने निवडणुकीतील हेराफेरीप्रकरणी त्यांचे संसद सदस्यत्व रद्द केले. यानंतर 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी संपूर्ण देशात आणीबाणी लागू करून सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात पाठवले.

सुमारे 2 वर्षानंतर 1977 मध्ये अचानक लोकसभा निवडणुकीची घोषणा करतात. या निवडणुकीत काँग्रेससह इंदिरा गांधींना रायबरेली मतदारसंघातून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. जनता पक्षाने चे सरकार सत्तेवर येते. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि चौधरी चरणसिंह गृहमंत्री झाले. मानले जाते की, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे विरोधकांना त्रास दिला, त्यामुळे अनेक नेते संतप्त झालेले होते.

सरकार स्थापनेनंतर जनता पक्षाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंदिरा गांधींना अटक करावी, असा मुद्दा उपस्थित होऊ लागला. राजनारायण, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे नेते या बैठकांमध्ये असत. दुसरीकडे, आणीबाणीच्या काळात जेव्हा चौधरी चरणसिंह तिहार तुरुंगात होते, तेव्हा ते म्हणायचे की, मी सत्तेत आलो तर इंदिरा गांधींना या कोठडीत बंद करेन. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणीही त्यावेळी इंदिरा गांधींच्या अटकेच्या बाजूने होते.

बोलले जाते की जनता सरकार बनल्यानंतर प्रत्येक कॅबिनेट मिटींगमध्ये इंदिरा गांधींच्या अटकेची मागणी केली जात होती.
बोलले जाते की जनता सरकार बनल्यानंतर प्रत्येक कॅबिनेट मिटींगमध्ये इंदिरा गांधींच्या अटकेची मागणी केली जात होती.

मोरारजी देसाईंची एक अट होती - इंदिरांना हातकड्या(बेड्या) घातल्या जाणार नाहीत

चरणसिंह इंदिरांच्या अटकेवर ठाम होते. तर त्यावेळचे पंतप्रधान असलेले मोरारजी देसाई आणि कायदा मंत्री शांती भूषण यांचे असे मत होते की, असे कोणतेही पाऊल अत्यंत सावधपणे उचलले पाहिजे. यानंतर चौधरी चरण सिंह ऑपरेशन अरेस्टचे काम सुरू करतात. ते आपल्या अधिकार्‍यांना इंदिरा गांधींविरुद्ध मजबूत केस करायला सांगतात.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा धक्का बसलेल्या इंदिरा गांधी 3 महिने बाहेर पडत नाही. याच दरम्यान, 27 मे 1977 रोजी बिहारमधील बेलछी येथे 11 दलितांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर गप्प बसलेल्या इंदिरा गांधींना यात एक राजकीय शक्यता दिसते जी काँग्रेसला पुनरुज्जीवित करू शकते.

बेलछीचा परिसर पुरग्रस्त होता. अशा स्थितीत इंदिरा गांधी हत्तीवर बसून गावात पोहोचतात. त्या येथे ५ दिवस मुक्काम करतात. यानंतर देशात सर्वत्र इंदिरा गांधींचीच चर्चा होती. यानंतर त्या त्यांचा लोकसभा मतदारसंघ रायबरेलीमध्ये पोहोचतात. इथेही त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा मिळतो.

बिहारच्या बेलछीमध्ये पूरस्थितीमुळे इंदिरा गांधी हत्तीवर बसून तेथे गेल्या होत्या.
बिहारच्या बेलछीमध्ये पूरस्थितीमुळे इंदिरा गांधी हत्तीवर बसून तेथे गेल्या होत्या.

अशा प्रकारचे समर्थन पाहून जनता पक्षात घबराटीचे वातावरण निर्माण होते आणि अटकेची मागणी आणखी जोर धरू लागते. दरम्यान, चरण सिंह एसपी स्तरावरील अधिकाऱ्यांची यादी मागवतात. या सर्व लोकांचे रेकॉर्ड ते बारकाईने पाहतात. यानंतर, ऑपरेशन अटकेसाठी एक विशेष अधिकारी एनके सिंह यांची निवड करतात, जे तेव्हा सीबीआयमध्ये होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा संपूर्ण प्लॅन बनवताना अॅटर्नी जनरल किंवा सॉलिसिटर जनरल यांनाही विश्वासात घेतले जात नाही.

यानंतर चरणसिंह इंदिरा गांधींना अटक करण्यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची परवानगी घेतात. देसाई म्हणतात की, जर फूलप्रुफ प्लॅन असेल तर ते अटकेला परवानगी देतो. पण त्यातही एक अट होती. म्हणाले- इंदिरा गांधींना बेड्या घातल्या जाणार नाही.

इंदिरा गांधींना अटक करणारे CBI अधिकारी एनके सिंह.
इंदिरा गांधींना अटक करणारे CBI अधिकारी एनके सिंह.

पहिल्या ऑपरेशन अरेस्टसाठी 1 ऑक्टोबर हा दिवस निवडला जातो.

योजनेनुसार, अटकेसाठी 1 ऑक्टोबर 1977 हा दिवस निवडला जातो. असे सांगितले जाते की, अटकेसाठी शनिवार शुभ नाही, असे गृहमंत्री चरण सिंह यांच्या पत्नीचे म्हणणे होते. म्हणजेच त्याची फलनिष्पत्ती चांगली होणार नाही. त्यानंतर २ ऑक्टोबरला गांधी जयंती होती. म्हणजेच या दिवशीही अटकेतून चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. अशा स्थितीत त्यावेळचे डीआयजी असलेले विजय किरण यांनी इंदिरा गांधींना 2 ऑक्टोबरनंतर अटक करण्याचा सल्ला गृहमंत्र्यांना दिला.

तात्काळ जामीन मिळू नये, यासाठी सायंकाळी अटक करण्याचे नियोजन करण्यात आले.

आता इंदिरा गांधींना अटक करण्यासाठी 3 ऑक्टोबर हा दिवस निश्चित करण्यात आला. चरणसिंह यांनी सीबीआय संचालकांना समन्स बजावले. इंदिरा गांधींना कशी अटक होणार याची योजना आखली जाते. यानंतर एफआयआर नोंदवला जातो.

आरोप लावला जातो की, लोकसभा निवडणुकीदरम्यान रायबरेलीत इंदिरा गांधींसाठी 100 जीप खरेदी करण्यात आल्या होत्या. याचे पैसे काँग्रेसने नव्हे तर उद्योगपतींनी दिले. त्याच वेळी, दुसरा आरोप होता - एका फ्रेंच कंपनीला ऑफशोअर ड्रिलिंगचे कंत्राट दिले, ज्यामुळे भारत सरकारचे 11 कोटी रुपयांचे नुकसान झाले. इंदिराजींना संध्याकाळी अटक होणार हे ठरते, जेणेकरून त्यांना किमान एक रात्र तुरुंगात घालवावी लागेल.

मोरारजी देसाईंनी चौधरी चरण सिंहांना म्हटले होते की इंदिरा गांधींना अटक करताना त्यांच्याशी कसलीही गैरवर्तणूक करू नये.
मोरारजी देसाईंनी चौधरी चरण सिंहांना म्हटले होते की इंदिरा गांधींना अटक करताना त्यांच्याशी कसलीही गैरवर्तणूक करू नये.

इंदिरा गांधींच्या अटकेसाठी लागले तीन तास

यानंतर एनके सिंग इंदिरा गांधींना अटक करण्यासाठी जाणार हे निश्चित झाले. ते त्यांना घरीच वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीनही ऑफर करतील. म्हणजेच जामीन घ्यायचा असेल तर इंदिरांना त्याच वेळी जामीनही मिळेल. त्यांच्यासोबत डेप्युटी एसपी एम व्ही राव, एक इन्स्पेक्टर आणि एक सब इन्स्पेक्टर असतील असेही ठरले. यावेळी दोन गाड्या असतील. एका गाडीत अटक झाल्यानंतर इंदिरा गांधी बसतील आणि दुसऱ्या गाडीत त्यांचे सामान ठेवले जाईल आणि सब-इन्स्पेक्टर असतील.

याच दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जातो. त्यादरम्यान डीआयजी असलेले राजपाल आणि अतिरिक्त एसपी असलेल्या किरण बेदी यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घराबाहेर तैनात करण्यात आले होते. म्हणजेच आता इंदिरा गांधींच्या अटकेचा संपूर्ण रोडमॅप तयार झाला होता. 3 ऑक्टोबर 1977 चा दिवस होता. संध्याकाळचे 5:15 वाजले होते. सीबीआय अधिकारी त्यांच्या अॅम्बेसेडर कारमधून इंदिराजींच्या घरी पोहोचतात. संजय गांधी आणि मनेका गांधी घराच्या लॉनमध्ये बॅडमिंटन खेळत होते. एनके सिंग यांना पाहताच संजय गांधींनी त्यांना ओळखले. तर इंदिरा गांधी त्यांच्या ड्रॉइंग रुममध्ये काही नेत्यांशी बोलत होत्या.

सीबीआयचे अधिकारी एनके सिंह आल्याची माहिती मिळताच इंदिरा गांधींचे पर्सनल सेक्रेटरी असलेले आरके धवन लगेच बाहेर येतात. ते एनके सिंग यांना विचारतात काय प्रकरण आहे. म्हणजेच ते का आले आहेत? तेव्हा एनके सिंह म्हणतात की हे प्रकरण निकडीचे आहे. मी फक्त इंदिरा गांधींशी बोलेन. एनके सिंग यांची ही बाब इंदिरा गांधींना सांगितली जाते. इंदिराजी म्हणतात, तुम्ही अगोदर वेळ घेऊन का आले नाही.

एनके सिंग म्हणतात की, मी ज्या कामासाठी आलो आहे, त्यासाठी अपॉइन्टमेन्टची गरज नाही. तेव्हा धवन म्हणतात की इंदिरा गांधी आत काही लोकांशी बोलत आहेत आणि ते जाताच तुम्ही त्यांना भेटू शकता. यानंतर एनके सिंह घराबाहेर रस्त्यावर उभे राहूनच वाट बघतात. दुसरीकडे गृहमंत्री चरणसिंहही अस्वस्थ होते आणि ते सीबीआय अधिकाऱ्यांकडून प्रत्येक क्षणाची माहिती घेत होते.

आत खळबळीचे वातावरण होते. संजय गांधी त्यांचे वकील आणि जवळच्या काँग्रेस नेत्यांशी सतत फोनवर बोलत होते. याच दरम्यान, इंदिरा गांधींना भेटणारे लोक बाहेर येतात. आणखी अनेक लोक त्याला भेटायला जाऊ लागतात. त्यात प्रसिद्ध वकील फ्रँक अँटनी, नेपाळमधील भारताचे राजदूत राहिलेले सीपीएन सिंह यांसारखे लोक होते. हे पाहून एनके सिंह संतापतात आणि म्हणतात की त्यांना आत जाण्यास सांगण्यात आले होते. मग हे लोक आत का जात आहेत? यावर उत्तर येते, त्यांची आधीच भेटीची वेळ होती.

3 ऑक्टोबरला जसे CBI चे अधिकारी इंदिरांच्या घरी पोहोचले, त्यानंतर संजय गांधींनी फोन करून निकटवर्तीय आणि वकिलांना बोलावले होते.
3 ऑक्टोबरला जसे CBI चे अधिकारी इंदिरांच्या घरी पोहोचले, त्यानंतर संजय गांधींनी फोन करून निकटवर्तीय आणि वकिलांना बोलावले होते.

मग सीबीआय उपनिरीक्षक येतात आणि एनके सिंह यांना सांगतात की मनेका आणि संजय गांधी सतत फोन करुन बाहेरून लोकांना बोलावत आहेत. त्यामुळे एनके सिंह संतापतात आणि ते धमकीच्या स्वरात म्हणतात की, 15 मिनिटांत इंदिरा गांधींना भेटू न दिल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर कमलापती त्रिपाठी, केसी पंत, बंशी लाल, सीताराम केसरी यांच्यासह काँग्रेस नेत्यांचा आणखी एक गट इंदिरा गांधींच्या घरी पोहोचतो.

सुमारे तासाभरानंतर एनके सिंह इंदिरा गांधींना भेटतात. ते त्यांना म्हणतात, मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे. इंदिरा गांधी एनके सिंहांसोबत कॉरिडॉरमध्ये जातात. येथे एनके सिंह त्यांचे ओळखपत्र काढून इंदिरा गांधींना दाखवतात. एनके सिंह म्हणतात की, तुम्हाला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे. एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यात तुम्ही मुख्य आरोपी आहात. मला तुम्हाला अटक करण्याचा थँकलेस जॉब मिळाला आहे.

हे ऐकताच इंदिरा गांधी भडकतात आणि ओरडून म्हणतात की त्यांना अटकेची कसलिही भीती नाही. वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन घेण्यासही त्या नकार देतात. जोरात ओरडून म्हणतात - हातकड्या आणा. याच दरम्यान इंदिरा गांधींच्या अटकेची बातमी काँग्रेसच्या वर्तुळात पसरते. काँग्रेसच्या बड्या नेत्यांबरोबरच सामान्य कार्यकर्त्यांची झुंबड इंदिरा गांधींच्या घरी पोहोचू लागते. आता इंदिरा गांधी शांत होतात आणि एनके सिंहांना सांगतात की त्यांना तयार होण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. यानंतर त्या त्यांच्या बेडरूममध्ये जातात आणि आतून दार बंद करतात.

3 ऑक्टोबर 1977 ला CBI च्या अटकेपूर्वी इंदिरा गांधींच्या बेडरूमच्या बाहेर उभे काँग्रेस कार्यकर्ते.
3 ऑक्टोबर 1977 ला CBI च्या अटकेपूर्वी इंदिरा गांधींच्या बेडरूमच्या बाहेर उभे काँग्रेस कार्यकर्ते.

इकडे जसजसा वेळ जातो, तसतशी एनके सिंहांची काळजीत वाढते. सुमारे दीड तासानंतर, इंदिरा गांधी, पांढरी साडी नेसून आणि बॅग घेऊन रात्री साडेआठ वाजता बाहेर पडतात. घराबाहेर आता घोषणाबाजी होत असते. इंदिराजींनाही या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता. कारमध्ये बसण्यापूर्वी, त्या उभ्या राहतात आणि कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारतात आणि अटक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हणतात. त्यानंतर त्या आत बसतात. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते ललित माकनही मागच्या सीटवर बसतात. मोठ्या मुश्किलीने त्यांना बाहेर काढले जाते.

तेव्हा गांधी पीस फाऊंडेशनच्या निर्मला देशपांडे यांनी इंदिरा गांधींसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना इंदिराजींच्या सोबत जाऊ दिले जाते. इंदिरा आणि निर्मला यांना अॅम्बेसेडर कारच्या मागच्या सीटवर बसवण्यात येते. एनके सिंह समोरच्या सीटवर बसतात. इंदिरा गांधींना फरिदाबादच्या बडखड लेकमधील एक गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात येणार होते. गाडी सुरू होताच काँग्रेसचे कार्यकर्ते गाडीसमोर आडवे झोपतात.

3 ऑक्टोबर 1977 ला अटकेनंतर CBI च्या कारमध्ये बसताना इंदिरा गांधी.
3 ऑक्टोबर 1977 ला अटकेनंतर CBI च्या कारमध्ये बसताना इंदिरा गांधी.

इंदिरा गांधी दुसऱ्या राज्यात जाण्यास नकार देतात आणि चौथऱ्यावर बसतात

पोलिस मोठ्या धडपडीनंतर कार्यकर्त्यांना हटवतात. इंदिरा गांधींची गाडी जशी पुढे सरकते. त्यांच्या मागोमाग संजय गांधींची ब्लू मॅटाडोर कार, नंतर राजीव गांधींची मॅटाडोर कार आणि काँग्रेस नेत्यांची कार चालत होती. फरिदाबादला पोहोचल्यावर ताफा बडखड तलावाकडे वळतो. मग रेल्वे क्रॉसिंग बंद झाल्याने ताफा तिथेच थांबतो. इंदिरा गांधी कारमधून खाली उतरतात आणि तिथे बांधलेल्या एका चौथऱ्यावर बसतात. त्याच वेळी, इंदिराजींचे वकील आणि काँग्रेसचे अनेक नेते एनके सिंहांसह सर्व सीबीआय अधिकाऱ्यांना घेरतात आणि म्हणतात की कोणत्याही न्यायालयीन वॉरंटशिवाय तुम्ही त्यांना दुसऱ्या राज्यात नेऊ शकत नाही.

मग क्रॉसिंगवरून रेल्वे जाते आणि फाटक उघडते. एनके सिंह इंदिरा गांधींना गाडीत बसायला सांगतात. पण इंदिरा नकार देतात आणि म्हणतात की त्यांच्या वकिलांनी त्यांना दुसऱ्या राज्यात नेले जाऊ शकत नाही असे सांगितले आहे. चर्चेचा एका दीर्घ टप्पा चालतो. याच दरम्यान, सीबीआयचे डीआयजी आयसी द्विवेदी पोहोचतात. त्यांना सांगितले जाते की, इंदिरा गांधींना हरियाणात जायचे नाही. ते म्हणतात ठीक आहे. आता किंग्सवे कॅम्प दिल्ली पोलिस ऑफिसर्स मेसमध्ये घेऊन जाण्याची चर्चा होते आणि ताफा पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने निघतो.

ताफा किंग्सवे कॅम्पवर पोहोचतो. पोलिस अधिकारी राजपाल आणि वेद मारवाह तेथे उपस्थित होते. इंदिरा गांधींना तळमजल्यावरील व्हीआयपी रूममध्ये ठेवण्यात आले. निर्मला देशपांडे सोबत होत्या. त्यांना जेवण ऑफर करण्यात आले. पण त्यांनी जेवण्यास नकार दिला. एनके सिंह तिथून निघू लागतात तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना बोलावले आणि म्हणाल्या की, आज जे काही झाले त्याबद्दल मला क्षमा करा. यानंतर एनके सिंह तेथून निघून जातात.

न्यायाधीशांनी एक ते दीड मिनिटांत खटला फेटाळला

इंदिरा गांधींना दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले जाणार होते. एनके सिंह 4 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता पोलिस मेसमध्ये पोहोचतात. संजय आणि राजीव गांधी तिथे आधीच होते. त्यांनी आई इंदिरा गांधींसाठी नाष्टा आणला होता. यानंतर इंदिरा गांधी यांना संसद मार्गावरील मुख्य महानगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी मुख्य महानगर न्यायाधीश आर दयाळ होते.

इंदिरा तिथे पोहोचताच मोठा जमाव जमतो. त्यात इंदिरा गांधींचे समर्थक आणि विरोधक दोघेही होते. दोन्ही गटात बाचाबाची होते. लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडतात. दरम्यान, प्रणव मुखर्जी, वसंत साठे आदी काँग्रेस नेतेही तेथे पोहोचतात. इंदिरा गांधींसाठी खुर्ची आणली जाते पण त्या बसण्यास नकार देतात.

4 ऑक्टोबर 1977 ला संसद भवन मार्गावर चीफ मेट्रोपोलिटन कोर्टाबाहेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावावर नियंत्रण मिळवणारे पोलिस.
4 ऑक्टोबर 1977 ला संसद भवन मार्गावर चीफ मेट्रोपोलिटन कोर्टाबाहेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावावर नियंत्रण मिळवणारे पोलिस.

त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फिर्यादीच्या वकिलांना विचारले की, तुमच्याकडे काय पुरावे आहेत. तेव्हा सरकारी वकिलांनी सांगितले की, एफआयआर कालच दाखल केला आहे. अशा स्थितीत अतिरिक्त पुरावे सादर करण्यास वेळ लागेल. यानंतर, एक ते दीड मिनिटांत न्यायाधीशांनी सांगितले की, फिर्यादीकडे कोणताही पुरावा नाही, अशा परिस्थितीत केस डिसमिस केली जाते. हे ऐकून संजय गांधी धावत बाहेर येतात आणि ओरडतात डिसमिस, डिसमिस. न्यायालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पसरते आणि घोषणाबाजी होते.

4 ऑक्टोबर 1977 ला चीफ मेट्रोपोलिटन जजने केस फेटाळल्यानंतर घरी जाताना कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारताना इंदिरा गांधी.
4 ऑक्टोबर 1977 ला चीफ मेट्रोपोलिटन जजने केस फेटाळल्यानंतर घरी जाताना कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारताना इंदिरा गांधी.

या दरम्यान प्रणव मुखर्जी यांचे एक विधान खूप गाजले की, जनता पक्षाच्या ज्या नेत्यांना इंदिरा यांनी 19 महिने तुरुंगात ठेवले ते त्यांना (इंदिरा गांधी) 19 तासही तुरुंगात ठेवू शकले नाही. जनता सरकारसाठी हा मोठा राजकीय धक्का होता. इंदिराजींना योग्य तयारी न करता अटक करणे ही जनता सरकारसाठी गळ्याचा फास ठरला. इंदिरा त्यांच्या अटकेचे सहानुभूतीमध्ये रूपांतर करतात.

त्यानंतर 1980 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतात. इंदिराजी प्रचंड बहुमताने परत निवडून येतात आणि पंतप्रधान होतात. म्हणजे ज्या अटकेतून जनता सरकारला इंदिराजींवर भ्रष्टाचाराचा डाग लावायचा होता. तीच अटक जनता सरकारसाठी घोडचूक ठरली आणि त्यांना आपली सत्ता गमवावी लागली.

बातम्या आणखी आहेत...