आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्चविवाहबाह्य सेक्सवर इंडोनेशियात बंदी, फ्रान्स वाटतोय कंडोम:96% देशांत अनैतिक संबंध मान्य नाही… शिक्षा केवळ 24 देशांत

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

इंडोनेशियाने अलिकडेच विवाहबाह्य संबंधांना गुन्हा ठरवले आहे. यावर तिथल्या जनतेपासून ते पाश्चिमात्य देश आक्षेप घेत आहेत. मात्र असे करणारा इंडोनेशिया हा एकमेव देश नाही. जगातील 24 देशांमध्ये आधीपासूनच विवाहबाह्य संबंध किंवा अॅडल्ट्री म्हणजेच व्यभिचार हा गुन्हा आहे.

2013 मध्ये प्यू रिसर्चने 50 देशांचा एक सर्व्हे केला होता. ज्यात विवाहबाह्य संबंध किंवा विवाहापूर्वी सेक्सविषयी लोकांची स्वीकार्यता पडताळण्यात आली होती. विवाहबाह्य लैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या इंडोनेशियातील 93% लोक असे संबंध पूर्णपणे अस्वीकार्य मानतात.

तर फ्रान्समध्ये 52% लोक असे संबंध मान्य असल्याचे म्हणतात किंवा त्यांना याने काहीही फरक पडत नाही. तिथे सरकार तरुणांना मोफत कंडोम वाटपाची योजना सुरु करत आहे. मात्र अडचण त्या देशांची आहे जिथे असे संबंध स्वीकार्य नाही, पण यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूदही नाही.

50 पैकी 48 देशांतील 60% पेक्षा जास्त लोक व्यभिचार कदापिही मान्य नसल्याचे सांगतात. अमेरिकेत तर 84% लोक व्यभिचार पूर्णपणे चुकीचा असल्याचे मानतात. तर भारतात असे मानणारे लोक 62% आहेत.

जाणून घ्या, विवाहबाह्य संबंधांना अमान्य करूनही अनेक देश हे कायद्याच्या कक्षेत का आणू इच्छित नाही आणि ज्या देशांत यासाठी कायदा आहे तिथे यासाठी काय शिक्षा आहे.

सर्वात आधी जाणून घ्या, कोणत्या देशांत विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे

केवळ मुस्लीम देशच नव्हे, तैवानमध्येही विवाहबाह्य संबंध हा गुन्हा आहे

जगातील अनेक देशांत विवाहबाह्य संबंधांना गुन्हा मानले गेले आहे. सामान्य समजूत अशी आहे की हे सर्व मुस्लीम देश आहेत. मात्र असे नाही. या यादीत तैवान, व्हिएतनाम आणि फिलिपिन्ससारखे देशही आहेत. बघा, या देशांची यादी -

 • अफगाणिस्तान
 • इजिप्त
 • अल्जेरिया
 • इथिओपिया
 • बांगलादेश
 • इराण
 • बेनिन
 • लाओस
 • बुर्किना फासो
 • मालदीव
 • कांगो
 • मोरक्को
 • पाकिस्तान
 • सौदी अरेबिया
 • फिलिपिन्स
 • सेनेगल
 • कतार
 • सूदान
 • रवांडा
 • ट्युनिशिया
 • व्हिएतनाम
 • तैवान
 • इंडोनेशिया
 • सोमालिया

आता पाहा, यापैकी बहुतांश देशांत काय शिक्षा आहे...

अनेक देशांत असे संबंध कायद्याच्या कक्षेबाहेर

सेक्शुअल राईटस डेटाबेस नावाची संस्था जगातील अनेक देशांतील लैंगिक हक्कांचा लेखाजोखा ठेवते. यातील 104 पैकी 21% देशांतच विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे. या डेटाबेसमध्ये तैवानसारख्या देशाचा समावेश नाही. मात्र या प्रगतशील मानल्या जाणाऱ्या देशातही व्यभिचारात दोषी आढलल्यास 1 वर्ष कैदेची शिक्षा होऊ शकते.

तथापि, दक्षिण कोरियासारखे अनेक देश असेही आहेत जिथे आधी असे संबंध गुन्ह्याच्या श्रेणीत होते, पण नंतर कायदा बदलण्यात आला. दक्षिण कोरियाने 2015 मध्ये असे म्हणत व्यभिचार कायद्याच्या कक्षेतून वगळला की, हा दोन व्यक्तींमधील वैयक्तिक मुद्दा आहे. यावर आपसातच तोडगा काढला जाऊ शकतो.

भारताने 2018 मध्ये कायदा बदलला.. आता शिक्षेची तरतूद नाही, मात्र घटस्फोटाचा आधार आहे

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, कलम 497 प्रो-वूमन असायला हवे मात्र हा कायदा महिला विरोधी आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, कलम 497 प्रो-वूमन असायला हवे मात्र हा कायदा महिला विरोधी आहे.

भारतातही 2018 पर्यंत विवाहबाह्य संबंध कलम 497 अंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीत होते. यानुसार 5 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकत होती.

मात्र अडचण ही होती की अशा प्रकरणांत तक्रार केवळ पुरुषच करू शकत होता. म्हणजे चर एखाद्या महिलेच्या पतीने दुसऱ्या विवाहित महिलेशी संबंध ठेवले तर ती महिला तिच्या पतीविरोधात तक्रार करू शकत नव्हती.

मात्र ज्या महिलेसोबत तिच्या पतीचे संबंध आहेत, तिचा पती तक्रार करू शकत होता. म्हणजेच पतीचे संबंध एखाद्या अविवाहित महिलेसोबत असल्यास तक्रारीला आधारच नव्हता.

त्यामुळे या कायद्याचा वापर महिलांविरोधातच होत होता. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की घटस्फोट घेण्यासाठी किंवा पत्नीच्या अपमानासाठी पुरुष अशा प्रकारच्या तक्रारी जास्त नोंदवतात. त्यामुळे असे संबंध गुन्ह्याच्या कक्षेतून वगळण्यात आले होते.

आता देशात विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, मात्र हा घटस्फोटासाठी आधार ठरू शकतो.

व्यभिचाराच्या कायद्याचा वापर महिलांविरोधातच जास्त, असे कायदे हटवण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रानेही केले आहे

बहुतांश व्यभिचार कायदे महिलांना एखाद्या संपत्तीप्रमाणे ट्रिट करतात. केवळ इस्लामिक देशांतच नव्हे, व्यभिचार कायदा तयार करणाऱ्या इतर देशांतही महिलांविरोधात सोशल बायस होते.
बहुतांश व्यभिचार कायदे महिलांना एखाद्या संपत्तीप्रमाणे ट्रिट करतात. केवळ इस्लामिक देशांतच नव्हे, व्यभिचार कायदा तयार करणाऱ्या इतर देशांतही महिलांविरोधात सोशल बायस होते.

2012 मध्ये संयुक्त राष्ट्राने सर्व देशांना आवाहन केले होते की, व्यभिचाराविरोधातील कायदे संपुष्टात आणले पाहिजे. याचे हे कारण आहे की, अशा कायद्यांचा वापर महिलांविरोधातच जास्त होतो.

इजिप्तमध्ये या कायद्यात थेटपणे महिलांनाच जास्त शिक्षेची तरतूद आङे. ज्या देशांत शिक्षा समान आहे, तिथेही महिला दोषी आढळण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. याचे कारण सामाजिक पक्षपात हे मानले जाते. ज्यू कायद्यात व्यभिचाराचा अर्थ आहे, एखाद्या विवाहित महिलेने पतीशिवाय दुसऱ्यासोबत संबंध ठेवणे. त्यामुळे अशा प्रकरणांचा तपास करणाऱ्यांनी पक्षपात करणे सामान्य आहे.

इस्लामिक देशांत विवाहबाह्य संबंध गुन्हा मानले जातात. मात्र येथे एका पुरुषाला 4 विवाह करण्यास परवानगी आहे. अशात पुरुषांसाठी विवाहबाह्य संबंधांची गरज कमी होते.

आता जाणून घ्या, जगातील कोणत्या देशात विवाहबाह्य संबंधांना जास्त स्वीकार्यता

अमेरिकेच्या 50 पैकी 21 राज्यांत व्यभिचार गुन्हा

ज्या देशांत व्यभिचार गुन्हा आहे, तिथल्या जनतेचे स्पष्टपणे याविरोधात मत आहे. मात्र अमेरिकेतील आकडेवारी आश्चर्यकारक आहे.

इथले 84% लोक म्हणतात की त्यांना विवाहबाह्य संबंध मान्य नाही. मात्र इथे कोणताही संघीय कायदा याविरोधात नाही. राज्यांनी व्यभिचाराविषयी आपापले कायदे तयार केले आहेत. येथील 50 पैकी 21 राज्यांत व्यभिचार हा गुन्हा आहे.

रिसर्चः हीना ओझा

बातम्या आणखी आहेत...