आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:लहान मुलांसाठी कोरोना लस येण्यापूर्वीच इनफ्लुएन्झा लसीची चर्चा; पण कोरोना विरोधात किती प्रभावी आहे ही लस, जाणून घ्या याविषयी सविस्तर

रवींद्र भजनीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सप्टेंबरपूर्वी मुलांना कोरोनाची लस मिळणार नाही.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. एम्स दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सने देखील येत्या तीन ते चार आठवड्यांत कोरोनाच्या प्रकरणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. यानंतर सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे, परंतु सप्टेंबरपूर्वी मुलांना कोरोनाची लस मिळणार नाही.

हे लक्षात घेता इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स आणि महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्सने 5 वर्षांखालील मुलांना इनफ्लुएन्झा लस देण्याची शिफारस केली आहे. मान्सून आणि त्यानंतर येणारा हिवाळा पाहता डॉक्टरांनी केवळ मुलांनाच नाही तर प्रौढांनाही इनफ्लुएन्झा लस देण्याचा सल्ला दिला आहे.

परंतु इनफ्लुएन्झा म्हणजे फ्लूची लस कोविड - 19 विरूद्ध प्रतिकारशक्ती मिळविण्यास मदत करू शकते का? फ्लू लसीचा डोस कोविड -19 विरूद्ध प्रभावी आहे का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही नवी दिल्लीतील सल्लागार बालरोगशास्त्र डॉ. हिमांशू बत्रा (मणिपाल हॉस्पिटल), अहमदाबादच्या सल्लागार बालरोगशास्त्र डॉ. उर्वशी राणा (नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) आणि मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोग विभागातील सल्लागार डॉ. माला कनेरिया यांच्याशी बातचीत केली. या विषयाबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या...

सर्व प्रथम, जाणून घेऊया इनफ्लुएन्झा लस म्हणजे काय?
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) च्या मते, इनफ्लुएन्झा म्हणजे फ्लूची लस इनफ्लुएन्झा विषाणू आणि इतर अनेक आजारांपासून संरक्षण करते. सामान्यत: फ्लू आणि कोविड -19 ची लक्षणे समान आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की, इनफ्लुएन्झा लस कोविडपासून संरक्षण करेल.

आपण सर्वांनी हेही पाहिले आहे की, दुसर्‍या लाटेत मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण मोठे होते. खरं तर मुलांना संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचे नोंदविण्यात आले होते, परंतु गेल्या काही महिन्यांत काही मुलांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. डॉक्टरांच्या मते, तिस-या लाटेत मुलांना धोका जास्त असू शकतो. त्यांच्यासाठी कोणतीही लस नाही, म्हणून तरुणाई कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी इतर मार्ग शोधत आहेत. यापैकीच एक फ्लूची लस आहे.

मार्च 2021 मध्ये अमेरिकेतील मिशिगन मेडिकल हेल्थकेअर सिस्टमला फेब्रुवारी-जुलै 2020 च्या एका अभ्यासानुसार असे आढळले की, ज्यांना फ्लूची लस दिली गेली होती त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्याची किंवा संसर्ग झाल्यास गंभीर लक्षणे दिसण्याची शक्यता कमी आहे. अशा प्रकारे, फ्लूचे शॉट्स काही प्रमाणात संसर्ग होण्याचा धोका देखील कमी करू शकतात.

इनफ्लुएन्झा लस रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यात कशी मदत करते?

इनफ्लुएन्झा लस (फ्लू शॉट) सामान्यत: फ्लूपासून संरक्षण प्रदान करते. फ्लू हे व्हायरल इन्फेक्शन आहे, जे इनफ्लुएन्झा विषाणूमुळे होते. हे मुलाची प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते आणि यामुळे बर्‍याचदा पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये मुलांमध्ये श्वसनाच्या तक्रारी वाढतात.

इनफ्लुएन्झा लस फ्लूपासून संरक्षण करेल, पण कोविड 19 पासून नाही. परंतु मुलांमध्ये गंभीर लक्षणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण निश्चितच ही लस कमी करु शकते. त्यामुळे कोविड - 19 च्या तिसर्‍या संभाव्य लाटेदरम्यान रुग्णालयांवरचा ताण वाढणार नाही.

लसीकरणानंतर शरीरात कमजोर किंवा मृत विषाणू असतात. लसीमुळे याविरूद्ध शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते. लसीकरणाच्या दोन आठवड्यांनंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडी एखाद्या रोगापासून त्या व्यक्तीचे रक्षण करतात. सीझनल फ्लूची लस इनफ्लुएन्झा विषाणूपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण प्रदान करते. हे विषाणू पावसात आणि नंतर हिवाळ्यात खूप सक्रिय असतात.

बाजारात उपलब्ध इनफ्लुएन्झा लसीची किंमत व व्हरायटी काय आहे?
इनफ्लुएन्झा लस इंजेक्शन आणि नेझल स्प्रेच्या रुपात उपलब्ध आहे. 2 ते 49 वर्षे वयोगटातील लोकांना स्प्रेची शिफारस केली जाते. गर्भवती किंवा इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड लोकांना ही लस देऊ नका, असा सल्ला दिला जातो. इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड लस देखील ट्रायवेलंट असू शकते, ज्यात तीन वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेन असतात. क्वाड्रिवेलेंटमध्ये चार स्ट्रेन असतात. ही लस दरवर्षी अपडेट केली जाते. शास्त्रज्ञ त्या त्या काळात पसरलेल्या व्हायरसच्या आधारे लसीला विकसित करतात. इनफ्लुएन्झा ही लस बाजारात इनअॅक्टिवेटेड क्वाड्रिवेलेंट लस म्हणून उपलब्ध आहे. हे इनफ्लुएन्झा A तसेच इनफ्लुएन्झा B या दोन्ही स्ट्रेन विरूद्ध संरक्षण प्रदान करते. वेगवेगळ्या ब्रँडच्या या लसीचा 0.5 मिली डोस 1,100 ते 2,400 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

कोरोना विरूद्ध इनफ्लुएन्झाची लस घेणे पुरेसे आहे का?
सध्या मुलांसाठी कोरोनाची कोणतीही लस उपलब्ध नाहीये, त्या पार्श्वभूमीवर इनफ्लुएन्झा लस मुलांमधील जोखीम कमी करण्यास मदत करु शकते. संशोधनात दिसू आले आहे की, कोविड 19 आणि इनफ्लुएन्झाची एपिडेमियोलॉजिकल आणि क्लिनिकल ​​वैशिष्ट्ये समान आहेत. त्यामुळे, मुलांना फ्लूची लस दिल्यामुळे कोविड -19 चा धोका कमी होण्यास मदत होते. कमीतकमी हे त्यांना गंभीर संक्रमण होण्यापासून वाचवेल.

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जोपर्यंत लहान मुलांसाठी कोरोनाची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत फ्लू व्हॅक्सिनचे शॉट्स गंभीर लक्षणांपासून मुलांना संरक्षण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. जेव्हा कोविड लस येईल, तेव्हा पालक दोन्ही लस त्यांच्या मुलांना देण्याची योजना आखू शकतात. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, दोन लसींमध्ये चार आठवड्यांचे अंतर असले पाहिजे. यामुळे मुलांना विषाणूंविरूद्ध अँटीबॉडी विकसित करण्यास भरपूर वेळ मिळेल.

इनफ्लुएन्झा लस कोण-कोण घेऊ शकतात?
IAP च्या शिफारशींनुसार, जन्माच्या सहा महिन्यांनी फ्लूचा पहिला शॉट द्यायला हवा. तोपर्यंत बाळाला त्याच्या आईच्या दुधापासून प्रतिकारशक्ती मिळत असते. बाळ सहा महिन्यांचं झाल्यानंतर तेथून पुढे पाच वर्षांपर्यंत पालकांनी आपल्या मुलांना हा डोस द्यायला हवा. 5 वर्षांच्या पुढे इनफ्लुएन्झाची लस केवळ हाय रिक्स ग्रुपमध्ये दिली जाते.

कोविड - 19 आणि फ्लूची लक्षणे सारखी आहेत. मुलांना इनफ्लुएन्झाची लस दिल्यास त्यांना कोविड झाला आहे की नाही हे शोधणे सोपे होईल. व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पालक त्यांच्या मुलांना इनफ्लुएन्झा लस देऊ शकतात. मात्र लसीची कार्यक्षमता एका सीझनमधून सीझनमध्ये बदल असते आणि त्याचे परिणाम वय आणि आरोग्याच्या स्थितीनुसार देखील बदलू शकतात हे देखील लक्षात ठेवावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...