आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिनी 4 इनोव्हेटिव्ह शिक्षकांची स्टोरी:हिंदीच्या शिक्षकाने शिकवले कोडिंग, सरकारी शाळेतील मुले बनवतात अॅप, वाचा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज शिक्षक दिन आहे आणि ही कहाणी आहे 4 इनोव्हेटिव्ह शिक्षकांची. असे शिक्षक, ज्यांनी शिकवण्याच्या पद्धतींत नवीन शोधून काढल्या आणि त्यातून रचला नवा इतिहास.. चला तर पाहुया या शिक्षकांची कहाणी...
पहिली कहाणीः घरातच आहे चालती-फिरती शाळा, मुले आई-वडिलांना शिकवतात
सर्वात आधी हा फोटो पाहा...

जोबा अटपारा, पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील एक आदिवासी गाव. बहुतांश लोक गरीब आहेत. दोन वेळचे जेवण मिळावे, यापेक्षा जास्त अपेक्षा या लोकांना नाही. गावात शिरताच एक मातीचे घर दिसले. याच्या भिंतींवर सुंदर आणि क्रिएटिव्ह फळे तयार केलेले आहेत. पेंटिंगमधून फळांचे नाव, पाढे, आणि मुळाक्षरे काढलेली आहे.
मुले शिक्षण घेत आहेत. बंगाली, हिंदीसह इंग्रजी बोलण्यातही त्यांना कसलाही संकोच नाही. विशेष म्हणजे ही मुले स्वतःसह आपल्या आई-वडिलांनाही शिकवत आहेत. तुम्ही हे वरील फोटोतही पाहू शकता.
इथून थोडे पुढे गेल्यावर तिथेही हेच चित्र बघायला मिळाले. मुले घराच्या भिंतीवरील फळ्यावर गणित सोडवत आहे. तर कुणी इंग्रजीतील कविता पाठ करत आहे. कुठे आई मुलाचा हात धरून ABCD शिकवत आहे, तर कुठे मुलगा आईला शिकवत आहे.
हे प्रत्येक घरातील चित्र आहे. इथे सकाळ-संध्याकाळ प्रत्येक घरात चालती-फिरती शाळा तुम्हाला दिसेल.
या मोहिमेचे कर्ते करविते आहेत दीप नारायण नायक. भिंतींवर फळ्याच्या फोटोला 2021 मध्ये युनिसेफने फोटो ऑफ द इअर स्पर्धेत दुसरे बक्षीस दिले होते.
निवडणुकीसाठीच्या वॉल पेंटिंगमधून सुचली कल्पना
35 वर्षांचे दीप नारायण सांगतात की, जेव्हा कोविडमुळे लॉकडाऊन लागला होता, तेव्हा मुलांचे शिक्षण ठप्प झाले होते. त्यांना घरात कुणी शिकवणारे नव्हते, ना त्यांच्याकडे शिक्षणाचे काही साधन उपलब्ध होते. ते दिवसभर इकडे-तिकडे भटकायचे.
एप्रिल 2020 मध्ये मी दोन मुलांना झाडाखाली शिकवणे सुरू केले. पण त्यांच्या घरचे विरोध करायला लागले. त्यांचे म्हणणे होते की, मुले शिकतील तर मजुरी कोण करणार? खूप समजावल्यानंतर ते तयार झाले. अशा पद्धतीने हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली.
एका दिवशी एका मुलाला एक किडा चावला. तो खूप वेळ रडत होता. नंतर माझ्या मनात विचार आला की, उद्या जर या मुलांना साप चावला तर... तेव्हा मला कल्पना सुचली की, निवडणुकीत जशी वॉल पेंटींग केली जाते, तशीच त्यांच्या घराच्या भिंतीवर पेटिंग करून फळा तयार करावा.
काही महिन्यांतच 12 गावांतील घरांच्या भिंतींवर फळ्यांचे पेटिंग

दीप नारायण यांनी आधी एका घराच्या भिंतीवर फळ्याचे पेटिंग केले. नंतर त्यावर मुळाक्षरे, पाढेही काढले. त्यावरून ते मुलांना शिकवू लागले. यामुळे मुलांमध्येही रुची वाढली. हळूहळू 12 गावांतील बहुतांश घरांवर फळे काढण्यात आले.
आता भलेही शाळा सुरू झाल्या असतील, पण ही मोहीम सुरू आहे. शाळेतून आल्यानंतर ही मुले भिंतींवरील फळ्याच्या सहाय्याने अभ्यास करतात. सोबत आपल्या आई-वडिलांनाही शिकवतात. आता त्यांच्यावर वेळेचेही बंधन नाही. रात्री कंदिल लावून ते या फळ्यांवर अभ्यास करतात. सुमारे 2 हजार मुले आणि त्यांच्या आई-वडिलांना या मोहिमेचा लाभ झाला आहे.
दुसरी कहाणीः आधी माझा स्वतःचा ईमेल आयडी नव्हता, आज आमच्या शाळेतील विद्यार्थी 40 देशांतील मुलांना कोडिंग शिकवत आहेत
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील विजयनगरमधील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. वीट भट्टी आणि गुरे चारणाऱ्यांच्या वस्तीवरील ही शाळा जगातील 40 देशांशी जोडलेली आहे. जपान, अमेरिका, लंडन, जर्मनी, न्युझीलंडसारख्या देशांतील मुले यांच्याकडून कौशल्य शिकत आहेत. इथे मुले कॉम्प्युटरवर कोडींग करतात. अॅप बनवतात, ऑनलाईन ग्रुप स्टडी करतात.
इतकेच नव्हे, खेळण्या-बागडण्याच्या वयात ही मुले होममेड साबण आणि हर्बल प्रॉडक्टसही बनवतात आणि वेगवेगळ्या जागांवर एक्झिबिशन घेऊन त्यांची मार्केटिंगही करतात.
आहे ना कामाल! खरंतर यामागे मेहनत आहे 36 वर्षीय बालाजी बाबूराव जाधव यांची. यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 70 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.

ही शाळा तर स्मार्ट आहेच, इथली मुलेही त्यापेक्षा स्मार्ट आहे. पापणी लवायच्या आत कठीण प्रश्नांची उत्तरे टॅबवरून शोधून काढतात.
ही शाळा तर स्मार्ट आहेच, इथली मुलेही त्यापेक्षा स्मार्ट आहे. पापणी लवायच्या आत कठीण प्रश्नांची उत्तरे टॅबवरून शोधून काढतात.

आधी केवळ मजुरांची मुले इथे शिकत होती, आता श्रीमंतांची मुलेही प्रवेशासाठी वेटींगवर
बालाजी सांगतात की, काही वर्षांपूर्वी ही शाळा अस्पृश्यासारखी होती. केवळ गुरेढोरे चारणाऱ्या आणि वीट भट्टीवर मजुरी करणाऱ्यांची मुले इथे शिकत होती. तेव्हा शाळेत शौचालय नव्हते, वीज नव्हती, संगणकही नव्हते. केवळ भिंतींचा सांगाडा आणि जमीनीवर पोते टाकून मुलांना शिकवले जायचे.
आता स्थिती अशी आहे की, श्रीमंत लोक विनंती करतात की आमच्या मुलाला इथे प्रवेश द्या.
ते सांगतात की, 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, साताऱ्याच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या एका कार्यक्रमात मला पहिल्यांदा ऑनलाईन एज्युकेशनविषयी माहिती झाली. तेव्हा माझा स्वतःचा ईमेल आयडी नव्हता. माझ्याकडे बटणवाला फोन होता. त्यानंतर मी स्मार्टफोन घेतला आणि गूगलवर शिक्षणाविषयी माहिती सर्च करू लागलो. इंटरनेटशी निगडीत वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये मी जायला लागलो. काही वर्षांनंतर मी गूगल सर्टिफाईड टिचर बनलो.
नंतर मी एक लॅपटॉप घेतला. या माध्यमातून मी मुलांना शिकवायला लागलो. त्यांना क्लासमध्ये जो विषय शिकवला, लॅपटॉपवर त्याचे व्हिडिओ दाखवायचो. यामुळे मुलांचे मन अभ्यासात रमायला लागले. यानंतर मी कोडिंग शिकलो, आणि मुलांनाही शिकवले.
आता शाळेतील पायाभूत सुविधा चांगल्या करण्यावर माझा फोकस आहे. मी सीएसआर फंडसाठी अप्लाय केले. माझ्या कामामुळे लवकरच मंजुरी मिळाली. यानंतर मी शाळेत कॉम्प्युटर लॅब बनवली, टॅब घेतले. ई-लायब्ररी डेव्हलप केली. या बदलांमुळे आमची मुले राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार जिंकायला लागले.
40 देशांतील शाळांसोबत टायअप, एकमेकांना आयडिया शेअर करतात

हा फोटो बघा, अशा सुविधा हायटेक शाळांतही नसतील. इथल्या मुलांकडे वही-पुस्तकांऐवजी टॅब आहेत.
हा फोटो बघा, अशा सुविधा हायटेक शाळांतही नसतील. इथल्या मुलांकडे वही-पुस्तकांऐवजी टॅब आहेत.

बालाजी सांगतात की आमच्या प्रोजेक्टशी 40 देशांतील शाळा जोडलेल्या आहेत. आमची मुले आपले कौशल्य त्यांना शिकवतात आणि त्यांची मुले त्यांचे कौशल्य आमच्या मुलांना शिकवतात. अशा प्रकारे आम्ही एकमेकांसोबत आयडिया आणि तंत्रज्ञान शेअर करतो. यामुळे मुलांचे ज्ञान वाढते. देशाबाहेरील मुले काय आणि कसे शिकत आहेत हे त्यांना कळते.
एवढेच नव्हे तर देशातील 25 हून अधिक राज्यांतील मुलांनाही आमची मुले त्यांचे कौशल्य शिकवत आहेत.
कोव्हिडमध्ये कॉन्फरन्स कॉलद्वारे मुलांना शिकवायाला सुरूवात केली
बालाजी सांगतात, जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा आमच्या मुलांचे शिक्षण ठप्प झाले होते. बहुतांश मुलांकडे स्मार्टफोन नव्हता. ते ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नव्हते. यानंतर मी एक नवी कल्पना लढवली आणि कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून मुलांना शिकवायला सुरूवात केली.
एका वेळी 10 मुलांना कॉलवर जोडत होतो आणि कहाणीद्वारे त्यांना शिकवत होतो. त्यानंतर मुलांना वहित लिहायला सांगायचो, वहित लिहिल्यानंतर ते पुन्हा मला ते ऐकवत होते. एवढेच नव्हे, मुले याचे रेकॉर्डिंगही करायचे. जेणेकरून ते पुन्हा याद्वारे अभ्यास करू शकतील.
हे मॉडेल इतके लोकप्रिय झाले की, अनेक देशांत याचा अवलंब झाला. यामुळे धडे सहजपणे लक्षात राहायचे.
तिसरी कहाणीः आधी केवळ 19 मुले, आता 50 मुले अॅडमिशनसाठी वेटिंगवर

हा फोटो बदलाची कहाणी सांगत आहे. मुलांच्या हातात पुस्तकांऐवजी स्मार्टफोन आणि टॅब आहेत. ज्यावर कार्टुनच्या माध्यमातून ते शिकत आहेत.
हा फोटो बदलाची कहाणी सांगत आहे. मुलांच्या हातात पुस्तकांऐवजी स्मार्टफोन आणि टॅब आहेत. ज्यावर कार्टुनच्या माध्यमातून ते शिकत आहेत.

यूपीची राजधानी लखनौपासून सुमारे 200 किमी अंतरावर बस्ती जिल्ह्याची प्राथमिक शाळा मूडघाट. हिरवेगार मैदान, रंगीबेरंगी भिंती आणि त्यावर काढलेल्या सुंदर पेंटिंग्स. आवारभिंतीवर अटलजींच्या कवितेच्या ओळी - छोटे मन से कोई बडा नहीं होता, टुटे मन से कोई खडा नहीं होता.
पुढे गेल्यावर एक बोर्ड दिसले, ज्यावर लिहिले होते, नो व्हॅकेन्सी. म्हणजेच शाळेतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. सरकारी शाळेत नो व्हॅकेन्सीचा बोर्ड पाहून आश्चर्य वाटले. पण वर्गात शिरताच हा भ्रम दूर झाला.
मुले प्रोजेक्टरद्वारे अभ्यास करत होते. टीव्हीवर कार्टून सुरू होते, कुणी इंग्रजी बोलत होते, कुणाची बोटे कॉम्प्युटरच्या की-बोर्डवर पडत होती. भिंतीवर लिहिले होते, हसा, तुम्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहात. म्हणजेच तिथे सीसीटीव्ही लागलेले होते.
थोडे पुढे गेल्यावर मुले लायब्ररीत अभ्यास करताना दिसली. ही लायब्ररीही हायटेक होती. पुस्तकांसह इंटरनेटद्वारे अभ्यासाची सुविधा, म्हणजेच ई-लायब्ररी. एका नजरेत हे एखादे हायफाय स्कूल वाटले.
19 हून 280 वर विद्यार्थीसंख्या
सहा वर्षांपूर्वी या शाळेची स्थिती आजच्यासारखी नव्हती. शाळेच्या भिंती तुटलेल्या होत्या. वर्ग खोल्याही चांगल्या नव्हत्या, शौचालयही नव्हते. मुलांची संख्याही 19 इतकीच होती. पण आज हे मॉडेल स्कूल बनले आहे. मुलांची संखअया 280 वर गेली आहे.
आता प्रवेशासाठीही जागा नाही. या बदलाची कहाणी लिहिली आहे, डॉ. सर्व्हेष्ट मिश्र यांनी. या उपक्रमासाटी डॉ. सर्व्हेष्ट यांना 2018 मध्ये राष्ट्रपती पुरस्कारही मिळालेला आहे. हा सन्मान मिळणारे ते तेव्हा यूपीतील एकमेव शिक्षक होते.

ज्या शाळेत 6 वर्षांपूर्वी वर्ग नव्हते. तिथे आज मुले प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिकत आहेत.
ज्या शाळेत 6 वर्षांपूर्वी वर्ग नव्हते. तिथे आज मुले प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिकत आहेत.

डॉ. सर्व्हेष्ट सांगतात की, 2016 मध्ये त्यांची या शाळेवर पोस्टींग झाली, तेव्हा शाळेची स्थिती खूप खराब होती. लोक आपल्या मुलांना या शाळेत टाकण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा जिल्हाधिकारी आशुतोष निरंजन यांनी ही शाळा मॉडेल स्कूल बनवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली.
यानंतर मी माझ्या मोहीमेवर काम सुरू केले. घरोघरी जाऊन मी लोकांना भेटायचो. ते मुलांना शाळेत का पाठवत नाही हे मी जाणून घेतले. माझ्या पगारातून मी शाळेची डागडुजी सुरू केली. भिंती रंगवल्या. शौचालय ठिक केले. घरोघरी जाऊन डोनेशन घेतले.
कुणी फर्नीचर दिले, तर कुणी प्रोजेक्टर दिले. कुणी टीव्ही आणि पंखे गिफ्ट केले. अशा प्रकारे हळूहळू ही शाळा मॉडेल स्कूलमध्ये रुपांतरित झाली.
सर्व्हेष्ट म्हणतात की, दुसऱ्या गावातील मुलेही इथे शिकण्यासाठी येतात. अनेक मुले तर खासगी शाळा सोडून इथे आले आहेत. आता 50 मुले अॅडमिशनसाठी वेटिंग लिस्टवर आहेत. त्यांना शिकवण्यासाठी आमच्याकडे जागाच नाही.
आम्ही मुलांच्या दैनंदिन अॅक्टिव्हिटी मॉनिटर करतो. यासाठी आम्ही 9 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. हजेरीसाठी बायोमेट्रीक सिस्टिम आहे. मुले किंवा शिक्षक वेळेवर येत आहेत की नाही हे यामुळे सहजपणे कळते.
चौथी कहाणीः हिंदीच्या शिक्षकांनी मुलांना शिकवले कोडींग, मुले स्वतःच बनवतात अॅप
दिल्ली व हरियाणा बॉर्डरवर बजखेडातील सरकारी सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये चांगलीच वर्दळ आहे. शाळा सुटण्याच्या वेळेस मुले घोळक्याने बाहेर जात आहेत. इथे आमची भेट 50 वर्षीय मनोज कुमार यांच्याशी झाली. ते कॉम्प्युटर लॅबमध्ये मुलांच्या सोबत होते. ते स्वतः सांगतात की, एका हिंदी शिक्षकाने कसे मुलांना कोडिंग आणि कॉम्प्युटरशी जोडले.
आवारात फिरत फिरत आम्ही वर्गात पोहोचलो. तिथे दुसरी-तिसरीतील मुलांनाही माहिती होते की स्मार्ट टीव्ही कशी ऑपरेट केली जाते. मुले स्वतःच ती सुरू करून डेमो देत होती.
वर्गातून बाहेर आल्यावर सांगतात, स्मार्ट टीव्ही चांगली पद्धत आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाबद्दल तुम्ही वर्णन करून जितक्या चांगल्या पद्धतीने समजावून सांगाल, त्यापेक्षाही एका 5 मिनिटांच्या व्हिडिओतून हे अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. स्मार्ट टीव्हीची मदत यासाठी होते.
वीज गेल्यावरही यावर उपाय आम्ही शोधला आहे.
ते एक बॉक्स काढतात. ही मोबाईल टीव्ही आहे. यात मोबाईल फिट करून व्हिडिओ दाखवला तर व्हिडिओ मोठा दिसतो. यात कोणताही वायर किंवा बॅटरी नाही. केवळ स्क्रिनच्या जागेवर एक शीट आहे. याला फ्लॅगनर म्हणतात. यामुळे व्हिडिओ किंवा फोटो मोटा दिसतो. आता लाईट गेल्यानंतरही मुले सहजपणे व्हिडिओ पाहू शकतात.

मनोज कॉम्प्युटर लॅबमध्ये मुलांना शिकवत आहेत. अनेक मुले कोडिंगही करतात आणि मोबाईल अॅपही बनवतात.
मनोज कॉम्प्युटर लॅबमध्ये मुलांना शिकवत आहेत. अनेक मुले कोडिंगही करतात आणि मोबाईल अॅपही बनवतात.

वेळ वाचवण्यासाठी मिड डे मीलसाठी बनवले अॅप
मनोज सांगतात की, 2001 मध्ये मी जेव्हा या करिअरमध्ये आलो, तेव्हा सर्वात मोठे आव्हान माझ्यासमोर होते मिड डे मील. नियमांनुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना दुपारचे जेवण यात मिळते. यासाठी एका शिक्षकाची ड्युटी लागायची. तोच हे सर्व काही सांभाळायचा. केवळ क्वान्टिटी ठरवण्यासाठीच शिक्षकाचे एक-दोन तास जायचे.
म्हणजे हरियाणात हजारो शाळांत शिक्षकांचे हजारो तास केवळ खीरमध्ये किती दूध-तांदूळ किंवा खिचडीत किती दाळ लागेल हे ठरवण्यासाठीच वाया जायचे.
यावर काय उपाय केला जाऊ शकतो यावर मी विचार करायचो. तोपर्यंत मला कॉम्प्युटरची ओळख झालेली होती. मी बघितले की, मुलांना कोडिंग लवकर समजते. मी कॉन्सेप्ट तयार केली आणि मुलांना यात सहभागी करून घेतले. मग आम्ही एकत्रितपणे काम केले आणि काही महिन्यांतच अॅप तयार झाले.
यात मुलांची संख्या आणि रेसिपीचे नाव टाकल्यानंतर अॅप तत्काळ सांगायचे कि किती पदार्थ किती प्रमाणात पाहिजे. हे आम्ही आमच्या शाळेत लागू केले आणि नंतर हरियाणाच्या शिक्षण विभागासमोर ठेवले. ही 2016 मधील गोष्ट आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत हेच अॅप हरियाणातील प्रत्येक सरकारी शाळेत वापरले जात आहे.
मिड-डे मील अॅप बनवून त्याचे अप्रुव्हल घेताना अनेक आव्हाने आली. मी हिंदी विषयाचा शिक्षक आहे. मी कॉम्प्युटर लॅबमध्ये गेल्यानंतर बाकी लोक मला टोकायचे. अनेकांना राग यायचा की, विषय नसताना मी लॅबमध्ये का जात आहे. थोडी टोकाटाकी सुरू झाल्यावर मी दुसरा मार्ग काढला. शाळेची वेळ संपल्यानंतर मी लॅबमध्ये थांबायला लागलो. मोठ्या वर्गातील मुलेही माझ्यासोबत थांबायचे आणि आम्ही काम करायचो.
2020 मध्ये याच इनोव्हेशनमुळे मनोज यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यांच्या शाळेतील मुलांनी हेल्मेट फॅन आणि जीपीएसही डेव्हलप केले आहे.
रिपोर्टः पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून इंद्रभूषण मिश्र, हरियाणाच्या गुरूग्राममधून मृदुलिका झाका, महाराष्ट्राच्या सातारामधून मनीषा भल्ला आणि यूपीच्या बस्तीमधून संदीप गोयल.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने वाचा ही खास स्टोरी...

शिक्षक दिन विशेष: 4 हटके शाळांची भन्नाट स्टोरी:कुठे संग्रहालयात वर्ग, तर कुठे किराणा यादीचे धडे; चित्रपट पाहूनही शिकवले जाते

बातम्या आणखी आहेत...