आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • INS Vikrant Will Not Be Operational For War Till December 2023; Fighter Jet Take off And Landing Test Pending, Tensions Rise Over MiG

दिव्य मराठी एक्सप्लेनरडिसेंबर 2023 पर्यंत युद्धसज्ज होणार नाही INS विक्रांत:फायटर जेटचे उड्डाण आणि लँडिंगची चाचणी बाकी, मिगमुळे वाढले टेन्शन

लेखक: अभिषेक पाण्डेयएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नौदलात समाविष्ट झाली आहे. २ सप्टेंबर रोजी कोच्ची शिपयार्डमध्ये झालेल्या भव्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या युद्धनौकेचे नौदलात कमिशनिंग झाले.
अनेक वैशिष्ट्यांनी युक्त INS विक्रांतच्या रुपाने नौदलाला स्वदेशी बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका मिळाली आहे. मात्र ही युद्धनौका १५ महिन्यांनंतर, म्हणजेच २०२३ च्या अखेरपर्यंत युद्धसज्ज होऊ शकणार आहे.
या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया की, नौदलात समाविष्ट झाल्यानंतरही विक्रांत युद्धासाठी सज्ज का नाही आणि विक्रांतला खास बनवणाऱ्या काही विशेष गोष्टी...
पहिले कारण - INS विक्रांतवर फायटर प्लेनच्या लँडिंगची ट्रायल सुरू होऊ शकली नाही
INS विक्रांतविषयी २५ ऑगस्ट रोजी नौदलाचे व्हाईस चीफ ऑफ स्टाफ व्हाईस अॅडमिरल एसएन घोरमडेंनी विधान जारी केले होते. ते म्हणाले होते की, नौदल विक्रांतवर MiG-29K फायटर प्लेनच्या लँडींगची ट्रायल या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू करेल.
या ट्रायल २०२३ च्या मध्यापर्यंत पूर्ण होतील. म्हणूनच INS विक्रांत २०२३ च्या अखेरपर्यंतच पूर्णपणे ऑपरेशनल होऊ शकणार आहे. घोरमडेंनी याविषयी जास्त माहिती देण्यास नकार दिला.

INS विक्रांतवर फाइटर प्लेनची ट्रायल या वर्षी नोव्हेंबरपासून सुरू होईल. मे 2023 मध्ये ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
INS विक्रांतवर फाइटर प्लेनची ट्रायल या वर्षी नोव्हेंबरपासून सुरू होईल. मे 2023 मध्ये ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

विक्रांतवर फायटर प्लेनची ट्रायल आधी का केली नाही?
अलिकडेच नौदलाने एका अधिकृत वक्तव्यात म्हटले होते की, विमानवाहू युद्धनौका बनवण्यासाठी विकसित देशांच्या नियमांचेच पालन नौदलाकडून केले जात आहे. २ सप्टेंबर रोजी विक्रांतच्या नौदलात अधिकृत समावेशानंतरच त्याच्या फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट आणि त्याच्या एव्हिएशन फॅसिलिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच AFC सुविधांची सुरूवात होईल.
नौदलाने म्हटले होते की, हे तेव्हाच सुरू केले जाईल, जेव्हा शिपची कमांड व कंट्रोलसह फ्लाईट सेफ्टीही त्यांच्या हातात असेल.
दुसरे कारण - रशिया-युक्रेन युद्ध
रिपोर्टनुसार, येणाऱ्या काही महिन्यांत INS विक्रांतची एव्हिएशन फॅसिलिटी कॉम्प्लेक्स म्हणजे AFC पूर्णपणे रशियन इंजिनिअर्स आणि टेक्निशिअन्सच्या मदतीने स्थापित केली जाईल. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियावर लावलेल्या प्रतिबंधांमुळे या इंजिनिअर्सना भारतात येण्यास उशीर होऊ शकतो.

AFC युद्धनौकेच्या महत्वाच्या भागांपैकी एक असते. AFC मध्ये एविएशन शस्त्रास्त्र स्टेशनरी, मोबाईल सिस्टीम आणि एयरक्राफ्ट कॅरियरवर विमानांच्या वापरासाठीच्या गरजेच्या वस्तू असतात.
AFC युद्धनौकेच्या महत्वाच्या भागांपैकी एक असते. AFC मध्ये एविएशन शस्त्रास्त्र स्टेशनरी, मोबाईल सिस्टीम आणि एयरक्राफ्ट कॅरियरवर विमानांच्या वापरासाठीच्या गरजेच्या वस्तू असतात.

तिसरे कारण - विक्रांतचा डेक मिगसाठी बनला होता, आता त्याचा पर्याय आणण्याची तयारी
विक्रांतविषयी एक समस्या ही आहे की, त्याची एव्हिएशन फॅसिलिटी कॉम्प्लेक्स मिग-२९ विमानांसाठी तयार केली होती.
मिग रशियात बनलेले फायटर प्लेन आहेत. अलिकडील काही वर्षांत क्रॅशमुळे हे विमान चर्चेत होते. त्यामुळे येत्या काही वर्षांत आपल्या ताफ्यातून मिग विमाने हटवण्याचा विचार नौदलाकडून सुरू आहे.
मिग विमानांतील तांत्रिक समस्यांमुळे अडचणी वाढल्या
नौदलाने २००९ ते २०१७ दरम्यान रशियाकडून २ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १६ हजार कोटींना ४५ मिग-२९ विमाने खरेदी केले होते. गेल्या काही वर्षांत मिग ऑपरेशनल बाबतीत निष्प्रभ असल्याचे दिसून आले आहे.
या विमानांच्या टर्बोफॅन इंजिनमध्ये बंद होण्याची समस्या दिसून आली आहे. तर नौकेच्या डेकवर लँडींगनंतर विमानाच्या काही ऑनबोर्ड कंपोनंटसचेही नुकसान झाले. त्याच्या रिपेअरींगची गरज पडली.
मिगच्या जागी राफेल, एफ-१८ आणि तेजस होतील विक्रांतवर तैनात
INS विक्रांतचे AFC ही INS विक्रमादित्यप्रमाणे रशियन मिग-२९ च्या ऑपरेशनसाठी बनवले होते. मिगमधील समस्यांमुळे यात राफेल किंवा एफ-१८ आणण्याची गरज नौदलाला वाटत आहे.
विक्रांत मिग-२९ साठी डिझाईन करण्यात आले होते, मात्र याच्या जागी डेक-बेस्ड फायटर प्लेनचा शोध केला जात आहे असे नौदलाने अलिकडेच म्हटले होते. यासाठी फ्रान्सकडून राफेल आणि अमेरिकेकडून बोईंग एफ-१८ सुपर हार्नेट फायटर प्लेन खरेदीचीही चर्चा सुरू आहे. या दोन्ही विमानांची फ्लाईट ट्रायल INS हंसावर गोव्यातील STBF मध्ये झाली आहे. INS हंसावरही कॅरिअर फ्लाईट डेकची सुविधा आहे.
विक्रांतवर तैनातीसाठी नौदल लवकरच २६ डेक-बेस्ड फायटर प्लेन खरेदीसाठी चर्चा करत आहे. यासाठी राफेल आणि एफ-१८ फायटर प्लेन बनवणाऱ्या देशांत फ्रान्स आणि अमेरिकेत कडवी टक्कर आहे. या २६ फायटर प्लेनमध्ये ८ ट्विन सीट ट्रेनर्सही असतील.
येणाऱ्या वर्षांत तेजस लाईट कॉम्बॅट विमानाच्या नेव्हल व्हर्जनची विक्रांतवर तैनातीची नौदलाची योजना आहे. तेजस देशात विकसित होणारे ट्विन इंजिन डेक-बेस्ड फायटर प्लेन आहे. डीआरडीओकडून विकसित होत असलेले तेजस तयार होण्यासाठी अजून ५-७ वर्षांचा वेळ आहे. २०३०-३२ पर्यंत हे नौदलाला मिळण्याची अपेक्षा आहे.

INS विक्रांतवर सुरुवातीला मिग फाइटर प्लेन तैनात होतील. हळूहळू त्यांची जागा राफेल, F-18 किंवा तेजस तैनात करण्याची योजना आहे. छायाचित्रात INS विक्रांतवर मिग-29K दिसत आहे.
INS विक्रांतवर सुरुवातीला मिग फाइटर प्लेन तैनात होतील. हळूहळू त्यांची जागा राफेल, F-18 किंवा तेजस तैनात करण्याची योजना आहे. छायाचित्रात INS विक्रांतवर मिग-29K दिसत आहे.

आता INS विक्रांतची वैशिष्ट्ये जाणून घ्या
देशी बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका INS विक्रांत, 1600 क्रू, ३० विमान होऊ शकतात तैनात
INS विक्रांतची निर्मिती कोचीन शिपयार्ड लिमिटेड म्हणजेच CSL ने केली आहे. वॉरशिप डिझाईन ब्युरोने याचे डिझाईन केले आहे. हे आधी नौसेने डिझाईन संचालनालय म्हणून ओळखले जायचे. ही भारतीय नौदलाचे इन-हाऊस डिझाईन संघटना आहे.
४५ हजार टन वजनाची INS विक्रांत भारतात तयार झालेली सर्वात मोठी युद्धनौका आहे. INS विक्रमादित्यनंतर ही देशाची दुसरी सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आहे. विक्रमादित्य रशियन प्लॅटफॉर्मवर तयार झाली होती.
INS विक्रांतमुळे विमानवाहू युद्धनौका डिझाईन करणे आणि बांधणी करण्याची क्षमता असलेल्या जगातील मोजक्या देशांत भारताचा समावेश झाला आहे. यात इंधनाचे 250 टँकर आणि 2400 कंपार्टमेंटस् आहेत. यात एका वेळी 1600 क्रू मेंबर्स आणि 30 विमान तैनात होऊ शकतात.
INS विक्रांतची वैशिष्ट्ये ग्राफिक्समधून पाहुया...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत देशाला समर्पित केली. विमानवाहू युद्धनौका बांधणीचे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील सहावा देश आहे. आयएनएस विक्रांतवर 30 फायटर प्लेन किंवा हेलिकॉप्टर तैनात होऊ शकतात. ही युद्धनौका तैनात असलेल्या भागातील 400 किमी क्षेत्रात शत्रू काहीही करू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...