आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणा:हात नसल्याने पायाच्या बोटांत ब्रश पकडून काढले चित्र, हे विकून दिव्यांगांसाठी शाळा काढण्याची इच्छा; आसाममधील प्रिन्सी गोगोईंसमोर संकटांनीही मानली हार

दिलीपकुमार शर्मा | गुवाहाटीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मानसिक आजारी सांगत शाळेत प्रवेश नाकारला होता

अडचणी कुणाच्या आयुष्यात नाही? देव तर माझे दोन्ही हात बनवणेच विसरला, मात्र तरीही मी पायाच्या आधारे जगायला शिकले. २१ वर्षीय प्रिन्सी गोगोई या भावना व्यक्त करतात तेव्हा त्यांचे डोळे आत्मविश्वासाने आणखी चमकायला लागतात. आसामच्या सोनारी या छोट्याशा शहरात जन्मलेल्या प्रिन्सींना जन्मत: दोन्ही हात नाहीत. सध्या त्या गुवाहाटीतील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत घरातील गरजा पूर्ण करत आहेत. प्रिन्सी पायाने लिहून १२ वी उत्तीर्ण झाल्या. पायाच्या बोटांमध्ये ब्रश पकडून प्रिन्सींनी श्रीगणेशाचे चित्र काढलेे, जे ३० हजारांमध्ये विकले गेले. दिव्यांग मुलांसाठी आर्ट स्कूल सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे.

मानसिक आजारी सांगत शाळेत प्रवेश नाकारला होता

प्रिन्सीने सांगितले, मला एका सरकारी शाळेत इयत्ता पाचवीसाठी प्रवेश देण्यात आला नव्हता. कारण मला दोन्ही हात नव्हते. मी मानसिक आजारी असल्याचे एका शिक्षकाने माझ्या आईला सांगितले होते. मात्र, एक दार बंद झाल्यानंतर देव दुसरे दार उघडतो. गावातील एका व्यक्तीच्या मदतीने मला एका खासगी शाळेत प्रवेश मिळाला. येथे मी १० वी उत्तीर्ण झाले.

यशाचा मंत्र : स्वत:ला विचारा, काम आणखी चांगले होईल?

कोणतेही काम करणे अशक्य नाही. एखादे काम तुम्ही करू शकता असा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतो तेव्हा कुठल्याही स्थितीत तुम्ही ते काम पार पाडता. अडचणींवर मात करण्यासाठी स्वत:ला झोकून दिल्यास मार्ग सापडतोच.

> तुमच्या शब्दसंग्रहातून अशक्य, हे काम होणार नाही, मी हे करू शकत नाही, प्रयत्न करून फायदा नाही...असे शब्द काढून टाका.

> मी हे काम आणखी चांगले कसे करू शकतो? असे स्वत:ला रोज विचारा. स्वत:ला विचारल्याने तुम्हाला सकारात्मक उत्तरे मिळतील.

बातम्या आणखी आहेत...