आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्च2 वर्षांत 1 जीबी डेटाची किंमत दुप्पट:इंटरनेट युझर्स वाढत नाहीत; 45% लोकांकडे स्मार्टफोन, पण इंटरनेटचा वापर नाही

लेखक: प्रतीत चटर्जी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला माहिती आहे का? की, स्वस्त इंटरनेटच्या बाबतीत भारत जगातील सर्व देशांत 5 व्या क्रमांकावर आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, असे असूनही गेल्या दोन वर्षांत भारतात मोबाईल इंटरनेट युझर्सची संख्या वाढली नाही.

देशात गेल्या 2 वर्षांत आयटी सेक्टरमध्ये आलेली बूम आणि टेक स्टार्ट-अप्सच्या पुराने असे नक्कीच वाटत आहे की संपूर्ण देश मोबाईलवरच सुरू आहे. पण याच्या तुलनेत जर आपण मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या बघितली तर वेगळे चित्र पाहायला मिळते.

ट्राय दर महिन्याला देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची आकडेवारी जाहीर करते. यानुसार ऑक्टोबर 2021 मध्ये देशातील एकूण 77.30 कोटी लोक मोबाईल इंटरनेट वापरत होते. ऑक्टोबर 2022 मध्ये ही संख्या वाढून 78.91 कोटीवर गेली. म्हणजे केवळ 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ही आकडेवारी चिंताजनक यासाठी आहे, कारण 2014 पासून 2020 दरम्यान मोबाईल इंटरनेट युझर्सची संख्या दरवर्षी जवळपास दुप्पट होत होती. मात्र 2020 नंतर यावर ब्रेक लागला आहे.

टेलिकॉम कंपन्या यासाठी स्मार्टफोनच्या वाढलेल्या किंमतींना जबाबदार मानत आहेत. मात्र आकडेवारीची पडताळणी केली तर याचे खरे कारण दुसरेच असल्याचे कळते आणि ज्यावर टेलिकॉम कंपन्या आता लक्ष देऊ इच्छित नाही.

आज भारत स्वस्त इंटरनेटच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे, मात्र केवळ 2 वर्षांपूर्वीच जगात सर्वात स्वस्त इंटरनेट भारतातच होते. 2020 ते 2022 दरम्यान भारतात डेटाची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. जाणून घ्या, इंटरनेट बेस्ड कंपन्यांसाठी सर्वात मोठा बाजार मानल्या जाणाऱ्या भारतात डेटाच्या किंमतींमुळे इंटरनेट युझर्स कसे घटू शकतात.

आधी समजून घ्या, भारतात डेटाच्या किंमती कशा वाढल्या?

2020 मध्ये 7 रुपयांचा होता 1 जीबी डेटा... 2022 मध्ये सुमारे 14 रुपयांचा झाला

देशात इंटरनेटच्या किंमती 2016 नंतर वेगाने घटल्या होत्या, मात्र आता सर्व टेलिकॉम कंपन्या टॅरिफ वाढवत आहेत.
देशात इंटरनेटच्या किंमती 2016 नंतर वेगाने घटल्या होत्या, मात्र आता सर्व टेलिकॉम कंपन्या टॅरिफ वाढवत आहेत.

वर्ल्डवाईड मोबाईल डेटा प्राइसिंग रिपोर्ट दरवर्षी संपूर्ण जगातील 223 देशांची यादी जाहीर करते. यात सांगितले जाते की या देशांत 1 जीबी डेटाची सरासरी किंमत किती आहे.

2020 च्या रिपोर्टनुसार जगात सर्वात स्वस्त इंटरनेट भारतात होते. तेव्हा देशात 1 जीबी डेटाची सरासरी किंमत 7.31 रुपये होती. मात्र 2022 च्या रिपोर्टनुसार भारतात 1 जीबी डेटाची सरासरी किंमत वाढून 13.81 रुपये झाली आहे.

म्हणजेच भारतात डेटाची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. टेलिकॉम कंपन्या स्पेक्ट्रम चार्ज आणि इतर खर्चांचा हवाला देत सातत्याने डेटा टॅरिफ वाढवण्याबद्दल बोलत आल्या आहेत.

इस्रायलमध्ये 2020 मध्ये सुमारे 9 रुपयांचा होता 1 जीबी डेटा... आता 3.25 रुपयांचा आहे

भारतात डेटाच्या किंमतींची जर त्या देशांशी तुलना केली जे स्वस्त इंटरनेटवाल्यांच्या यादीत आहेत, तर टेलिकॉम कंपन्यांचा तर्क योग्य वाटत नाही.

2020 मध्ये स्वस्त इंटरनेटच्या बाबतीत इस्रायल दुसऱ्या क्रमांकावर होता. तेव्हा तिथे 1 जीबी डेटाची सरासरी किंमत 8.94 रुपये होती. 2022 मध्ये जगात सर्वात स्वस्त इंटरनेट इस्रायलमध्ये होते. तिथे आता 1 जीबी डेटाची सरासरी किंमत 3.25 रुपये आहे. म्हणजे इस्रायलमध्ये डेटाची किंमत अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे.

दुसरे उदाहरण इटलीचे आहे. 2020 मध्ये स्वस्त इंटरनेटच्या बाबतीत इटली चौथ्या क्रमांकावर होते. तिथे 1 जीबी डेटाची किंमत 34.93 रुपये होती. 2022 मध्ये इटली स्वस्त इंटरनेटच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे आता 1 जीबी डेटाची सरासरी किंमत 9.75 रुपये आहे. म्हणजेच किंमती 72 टक्के घटल्या आहेत.

आता समजून घ्या, भारतात इंटरनेट युझर्स का वाढत नाही

आधी दरवर्षी इंटरनेट युझर्स दुप्पट होत होते... आता 2 टक्केच वाढले

ट्राय दर महिन्याला देशातील एकूण इंटरनेट युझर्सची आकडेवारी जाहीर करते. त्यांचा ताजा अहवाल ऑक्टोबर 2022 चा आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये देशात 78.91 कोटी लोक मोबाईल इंटरनेट वापरत होते. ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत ही वाढ 2 टक्केच आहे.

याच्या तुलनेत जर आपण 2014 ते 2020 च्या दरम्यानची मोबाईल इंटरनेट युझर्सची आकडेवारी बघितली तर दरवर्षी दुपटीने वाढत होती.

ऑक्टोबर 2014 मध्ये मोबाईल इंटरनेट युझर्स केवळ 6.36 कोटी होते. ऑक्टोबर 2015 मध्ये ते वाढून 10.80 कोटी आणि ऑक्टोबर 2016 मध्ये 17.38 कोटी झाले.

ऑक्टोबर 2017 मध्ये ते वाढून 32.17 कोटी झाले. म्हणजेच दरवर्षी मोबाईल इंटरनेट युझर्सची संख्या जवळपास दुप्पट होत होती. ही वाढ 2019 पर्यंत सुरू होती. 2020 मध्ये मोबाईल इंटरनेट युझर्स 71.26 कोटी होते, जे ऑक्टोबर 2021 पर्यंत 77.30 कोटी झाले.

टेलिकॉम कंपन्यांचा तर्क... स्मार्टफोन महाग झाले, म्हणून इंटरनेट वापर होत नाही

मोबाईल कंपन्यांनी एंट्री लेव्हल स्मार्टफोनचे उत्पादन घटवले आहे. तथापि हाय एंड स्मार्टफोन्सची लॉन्चिंग होत आहे.
मोबाईल कंपन्यांनी एंट्री लेव्हल स्मार्टफोनचे उत्पादन घटवले आहे. तथापि हाय एंड स्मार्टफोन्सची लॉन्चिंग होत आहे.

जागतिक बाजारात, चिप, सेमिकंडक्टर आणि स्क्रिनसारख्या कंपोनंटच्या तुटवड्यामुळे स्मार्टफोन्सचे उत्पादन घटले आहे.

याचा सर्वाधिक परिणाम एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सवर झाला आहे. दोन वर्षांपूर्वी मार्केटमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन 5 ते 8 हजारांच्या रेंजमध्ये होता, तो आता 15-18 हजारांच्या रेंजमध्ये आहे.

मोबाईल कंपन्यांनी नव्या फोन्सची लॉन्चिंग खूप कमी केली आहे. कंपन्या उपलब्ध कंपोनंटचा वापर हाय एंड स्मार्टफोन्ससाठी जास्त करत आहेत.

भारतात स्मार्टफोन्सचा सर्वात मोठा बाजार एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सचाच राहिला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत या सेगमेंटमध्ये विक्री सातत्याने घटली आहे.

टेलिकॉम कंपन्यांचा तर्क आहे की भारतात ज्या लोकांना फीचर फोनवरून स्मार्टफोनवर शिफ्ट व्हायचे इच्छा आहे, त्यांनी वाढलेल्या किंमतींमुळे स्मार्टफोन खरेदीचा प्लॅन सध्या होल्ड केला आहे.

केवळ स्मार्टफोनच नाही इंटरनेटचा कमी वापर होण्याचे कारण

तथापि, भारतात केवळ स्मार्टफोन्सची वाढलेली किंमत हे इंटरनेट वापर घटण्याचे एकमेव कारण नाही.

जगभरातील मोबाईल कनेक्शन्सवर अभ्यास करणारी संस्था ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स जगातील वेगवेगळ्या भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या स्थितीचा अहवाल जारी करते.

सोबतच हा डेटाही जारी करते की कोणत्या भागात कोणत्या प्रकारच्या मोबाईल डिव्हाईसचा वापर होत आहे.

हे प्रत्येक देशाचा वेगळा डेटा जाहीर करत नाही, मात्र दक्षिण आशियाचा डेटा नक्कीच जारी करते. दक्षिण आशियात मोबाईल वापरकर्त्यांच्या दृष्टीने भारतच मोठी बाजारपेठ आहे.

जीएसएमएची आकडेवारी सांगते की दक्षिण आशियात 2021 मध्ये एकूण मोबाईल युझर्सपैकी 59 टक्के लोकांकडे 4जी किंवा 5जी एनेबल्ड स्मार्टफोन होता. तर 8 टक्के युझर्सकडे 3जी एनेबल्ड स्मार्टफोन होता.

म्हणजेच दक्षिण आशियाच्या एकूण मोबाईल युझर्सपैकी सुमारे 70 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहे. या लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग भारतातच आहे.

म्हणजे लोकांकडे स्मार्टफोन तर आहे, मात्र ते इंटरनेट खूप कमी वापरतात. याची पुष्टी जीएसएमएचा डेटाही करतो.

जीएसएमएनुसार दक्षिण आशियात सुमारे 102 कोटी लोक असे आहेत ज्यांच्याकडे मोबाईल आहे, मात्र ते इंटरनेटचा वापर करत नाही. एकूण मोबाईल युझर्सच्या हे 54 टक्के आहे.

दक्षिण आशियात सर्वाधिक मोबाईल युझर्स भारतात असल्याने असा अंदाज लावला जातो की इंटरनेट न वापरणाऱ्या या 102 कोटी लोकांतील बहुसंख्य भारतातील आहेत. या आधारे म्हटले जाऊ शकते की भारतात 45 टक्के लोक स्मार्टफोन्स असूनही इंटरनेट वापरत नाही.

जगातील बहुतांश देशांत घटत आहेत डेटाच्या किंमती... किंमती वाढवणाऱ्या मोजक्या देशांत भारत

जगातील ज्या देशांत इंटरनेट महाग आहे, तेही सातत्याने याच्या किंमती घटवत आहेत. अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे, फिनलंडसह अनेक देश असे आहेत, जिथे इंटरनेट भारताच्या तुलनेत खूप महाग आहे, मात्र तरीही 2020 च्या तुलनेत किंमती घटल्या आहेत. वाढल्या नाही.

अमेरिकेत 2020 मध्ये 1 जीबी डेटाची सरासरी किंमत 649 रुपये होती. 2022 मध्ये ती घटून 456 रुपये झाली आहे. 2020 मध्ये ब्रिटनमध्ये 1 जीबी डेटाची सरासरी किंमत 112 रुपये होती ती आता 64 रपये झाली आहे.

महाग इंटरनेट असलेल्या देशांत दक्षिण कोरिया आणि येमेन असे देश आहेत जिथे इंटरनेट आधीच्या तुलनेत महाग झाले आहे. दक्षिण कोरियात 2020 मध्ये 1 जीबी डेटाची किंमत 888 रुपये होती. ती आता 1018 रुपये झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...