आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Interview With Union Education Minister Ramesh Pokhriyal On The Changed Education System After Corona

दिव्य मराठी विशेष:कोरोना मोठे आव्हान होते; मात्र ई-विद्यामुळे 25 कोटी विद्यार्थ्यांना झाला फायदा, आता 75% पात्रतेची तरतूदही काढली : निशंक

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना नंतरच्या बदललेल्या शिक्षण पद्धतीवर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची मुलाखत

कोरोना दरम्यान विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत बदलून ई-लर्निंगवर आली. मात्र, ऑनलाइन अभ्यास फक्त २६% विद्यार्थ्यांनाच करता आला. या नव्या स्थितीत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याशी सध्याची शैक्षणिक स्थिती, नवे शिक्षण धोरण आणि मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा तुटवडा या मुद्यावर भास्करचे डेप्युटी एडिटर धर्मेंद्रसिंह भदौरिया यांनी विशेष चर्चा केली. वाचा काही भाग...

> शाळा-महाविद्यालयांमध्ये जसे शिकवले जायला हवे होते ते कोरोनामुळे झाले नाही?

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व आव्हान उभे ठाकले होते. मंत्रालयाने अनेक पावले टाकली. विद्यार्थ्यांना मल्टी मोडमध्ये शिकवण्यासाठी पीएम ई-विद्या सुरू केले. यामुळे देशभरातील २५ कोटी शाळकरी मुलांना फायदा झाला. अनेक राज्यांत शाळा, उच्च शैक्षणिक संस्था सुरू होताहेत. बहिःस्थ शिक्षण धोरणात सवलतीचे निर्देश दिले आहेत.

> जेईई, नीटमध्ये संधी मर्यादित आहे, विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्याचा विचार कराल?

मी नियमित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. यामुळे आम्ही जेईई मेन्सचे यशस्वी आयोजन करू शकलो. ते एक आदर्श उदाहरण आहे, ज्याच्या आधारे बिहारमध्ये विधानसभा निवडणूक झाली. आता वर्षात चार वेळा जेईई मेन्स होत आहे. यामुळे त्यांना पुरेशी संधी मिळेल.

> मुलांनी विपरित स्थिती पाहिली. दिलासा देण्यासाठी काय करताय?

विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची यादी मोठी आहे. आम्ही ७५% पात्रतेची तरतूद हटवली. विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय मदत देण्यासाठी मनोदर्पण सुरू केले. शुल्क न वाढवण्याचे सर्व शैक्षणिक संस्थांना आव्हान केले.

> शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांत शिक्षकांचा तुटवडा आहे, २०२१मध्ये नव्या नियुक्तीची काय योजना?

शिक्षकांची भरती होत आहे. २०२० मध्ये २११७६ नियुक्त्या करण्यात आल्या. तर ४० हजारांपेक्षा जास्त पदांसाठी प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनेक शिफारशी करण्यात आल्या. टीईटीत चांगले परीक्षा साहित्य दिले जाईल. शिक्षकांचा तुटवडा असेल तेथे शिक्षकांना प्रोत्साहन दिले जाईल.

> नवे धोरण केव्हा लागू होईल?

शिक्षण मंत्रालय ड्राफ्ट इम्प्लीमेंटेशनसाठी निश्चित कालमर्यादेसह कार्यशाळा आयोजित करत आहे. नुकतेच मी शालेय शिक्षण विभाग आणि उच्च शिक्षण विभागादरम्यान एनईपीच्या अंमलबजावणीत समन्वयासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सल्ला देण्यात आला आहे की, उच्च शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेत आढावा समिती आणि एक अंमलबजावणी समिती स्थापन केली जावी.

> ऑनलाइन शिक्षण सर्वांना नवीन, मग परिणाम चांगला कसा येईल?

विद्यार्थ्यांनी जेईई, नीट आणि बोर्ड परीक्षांमध्ये उत्साहाने भाग घेतला. शिक्षण आणि त्याच्या प्रक्रियेला पुन्हा व्यवस्थित करण्याची संधी कोरोनाने आपल्याला दिली. ब्लेंडेड मोडमध्ये शिक्षणाला चालना देण्यात आली. यामुळे विद्यार्थी डिजिटल आणि फेस टू फेस पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...