आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज iPhone 14 होणार लॉन्च:कमी पैशांत iPhone घ्यायचाय? जाणून घ्या, 20-30 हजारांनी कसा स्वस्त मिळेल iPhone?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी iPhone 14 लॉन्च होत आहे. साहजिकच याची लॉन्चिंग प्राईस बहुतांश लोकांच्या बजेटमध्ये नसेल. पण iPhone तर iPhone आहे ना भाऊ... याची क्रेझ प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये आहे. त्यामुळे लोक iPhone ची नवी सीरिज लॉन्च होण्याची वाट बघत असतात, जेणेकरून जुन्या सीरिजची किंमत कमी होईल आणि ते आपल्या बजेटमध्ये हा फोन घेऊ शकतील.
आज कामाच्या गोष्टीत जाणून घेऊया iPhone 14 लॉन्च झाल्यानंतर iPhone 11, 12 आणि 13 किती स्वस्त होईल. सोबतच हेही समजून घेऊया की कोणती सीरिज तुमच्या कामाची आहे.
त्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करावी लागेल की, काही लोक ही किंमत वाचून म्हणतील की ऑनलाईन हा अजून कमी किंमतीत मिळू शकतो. हो नक्कीच हे शक्य आहे, पण iPhone च्या खोक्यात वीट, दगड मिळाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. त्यामुळे तो प्रत्यक्ष स्टोअरमधून घेणेच योग्य आहे. हेच कारण आहे की आम्ही तुम्हाला स्टोअरच्या किंमती सांगत आहोत.
आमचे एक्सपर्ट आहेत, लखन कृपलानी, मालक, सपना इंटरप्रायजेस, इलेक्ट्रॉनिक आणि आशा कलेक्शन
प्रश्न - iPhone 14 केव्हापर्यंत ऑर्डर केला जाऊ शकतो?
उत्तर- लॉन्चनंतरच कंपनी घोषणा करते की नवा फोन ते कधीपर्यंत डिस्पॅच करतील. 9 ते 10 सप्टेंबरपासून हा फोन प्रीऑर्डरसाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.
प्रश्न - iPhone च्या मागील 3 सीरिजचे फोन स्टोअरमध्ये मिळू शकतील का?
उत्तर - हो. iPhone च्या मागील सीरिज तुम्ही अॅप्पल स्टोअर आणि तुमच्या शहरातील अॅप्पल डिस्ट्रीब्युटरकडून घेऊ शकता. ते ऑनलाईनही घेतले जाऊ शकते.
प्रश्न - लॉन्च झाल्यानंतर iPhone 11, 12 आणि 13 किती हजारांनी स्वस्त होईल?
उत्तर - वेगवेगळ्या किंमती आहेत. स्टोअर आणि ऑनलाईन किंमतीत थोडाफार फरक आहे. ही सर्व माहिती पुढे देत आहोत. यासाठी बातमी पूर्ण वाचा...
एक एक करून सर्व माहिती सविस्तर वाचूया... सुरूवात करूया iPhone 13 पासून...
फिल्म मेकिंग करणाऱ्या युझर्सनी iPhone 13 घ्यावा

iPhone 13 सीरिजच्या कॅमेऱ्यात सिनेमॅटिक मोड आहे. यामुळे फिल्म बनवणे सोपे होईल. सिनेमॅटिक मोडमध्ये iPhone च्या कॅमेऱ्याने सब्जेक्ट आणि बॅकग्राऊंड फोकस-डिफोकस ऑटोमॅटिक मॅनेज केले जाऊ शकते. यामुळे व्हिडिओ सिनेमा स्टाईलसारखा दिसेल. यामुळे ज्यांना iPhone द्वारे फिल्म मेकिंग करायची आहे, त्यांनी iPhone 13 घेतला पाहिजे.

आता iPhone 12 विषयी बोलूया...
वारंवार फोन पडत असेल तर iPhone 12 घ्या

iPhone 12 चे सर्व फोन 6 मीटर खोल पाण्यात अर्धा तास बुडाल्यानंतरही योग्य रितीने काम करतात. या सीरिजची ड्रॉप परफॉर्मन्स iPhone 11 च्या तुलनेत 4 पट मजबूत आहे. फोनच्या मजबुतीसाठी यात सिरॅमिक शील्डचा वापर केला आहे. इतकेच नव्हे, आयफोन 12 अॅल्युमिनियमपासून बनवला आहे. हा डिव्हाईस मजबूत आहे.
जेव्हा iPhone 12 लॉन्च झाला होता, तेव्हा कंपनीने हीच गोष्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये वापरली होती. अनेक युट्यूबर्सनी याची लाईव्ह टेस्टही केली होती. यात ते यशस्वी ठरले होते. म्हणूनच ज्यांच्याकडून वारंवार फोन पडतो आणि त्यांना महाग फोन घ्यायची भीती वाटते, ते iPhone 12 घेण्याचा विचार करू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की हा iPhone 11 पेक्षा 11 टक्के थीन, 15 टक्के लहान आणि 16 टक्के हलका आहे.

iPhone 11 पॉवरफुल गेमिंग कॅटेगिरीत गणला जातो
तुम्ही तुमच्या पॉकेटमनीतून iPhone घ्यायचा विचार करत आहात. किंवा ज्यांचा पगार कमी आहे आण iPhone घेण्याची त्यांची इच्छा आहे, तर iPhone 11 त्यांच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. परफॉर्मन्सच्या दृष्टीने हा चांगला आहे. जे लोक Call of Duty, Asphalt 9 Legends अशा गेम्ससाठी चांगला फोन घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा कमी बजेटमध्ये सर्वोत्तम आहे.
फोन हँगचा प्रॉब्लेम गेम खेळताना होत नाही, तसेच गेमिंगदरम्यान स्क्रीन हटवून दुसरे अॅप वापरल्यावरही फोन गरम होत नाही. म्हणजेच मल्टिपल यूजसाठी हा चांगला फोन आहे.

नोट - फोनसह अडॅप्टर मिळत नाही. जर तुमच्या iPhone चे जुने चार्जर असेल तर ठिक, नाही तर तुम्हाला नवे घ्यावे लागेल. दुसरी गोष्ट, या किंमती भोपाळमधील मार्केटनुसार देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन ऑफर, क्रेडीट आणि डेबिट कार्ड कॅशबॅकमुळे याची किंमत आणखी कमी होऊ शकते.
जाता-जाता
सेकंड हँड iPhone घ्यायचा विचार करत असाल तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा

1. ज्याच्याकडून iPhone घेत आहात, त्याने तो किती वापरला आहे हे माहिती करून घ्या.
2. ई-कॉमर्स वेबसाईटवरून iPhone मॉडेल खरेदी करताना तो ब्लॅकलिस्ट तर नाही ना याची खात्री करून घ्या.
3. फोनची वॉरंटी तपासणे खूप गरजेचे आहे. तुम्ही अॅप्पलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन डिव्हाईसचा सीरियल नंबर टाकला की तुम्हाला कळेल की iPhone वॉरंटीत आहे की नाही.
4. काही जुने आयफोन वेगळ्या नेटवर्क बँडवर काम करतात. त्यामुळे जुना आयफोन घेताना त्यात सिम टाकून नेटवर्क नक्कीच चेक केले पाहिजे.
सेकंड हँड iPhone घेतल्यानंतर फॉरमॅट करताना या गोष्टी विसरू नका

  • स्वस्त iPhone खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यावर ओनरकडून IMEI नंबर घ्या. IMEI नंबरवरून कळते की तो ब्लॅक लिस्टेड आयफोन्समध्ये तर नाही ना.
  • फोनचा मायक्रोफोन, बटण, स्क्रीन, कॅमेरा, पोर्ट, कनेक्टिव्हीटी चेक करून घ्या.
  • आयक्लाऊड अकाऊंट अनलिंक करणे गरजेचे आहे. म्हणजे जुना आयफोन घेतल्यानंतर आधी त्यातील जुन्या युझर्सचे सर्व डिटेल्स क्लिअर करून टाका. नंतर जुने आयक्लाऊड अकाऊंटही अनलिंक करतानाही तुम्हाला पासवर्ड मागितला जाईल. त्यामुळे जुन्या युझरकडूनच ते तुम्ही अनलिंक करून घेणे योग्य राहील.
बातम्या आणखी आहेत...