आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • IPL Satta Racket 2022 । IPL Mumbai Satta Bookie To Dainik Bhaskar Over IPL Satta Market । How Satta Market Works

12 बुकीजचे नेटवर्क चालवतो IPL सट्टा:80-20 रेशोचा आहे सट्ट्याचा खेळ; खेळणाऱ्यांपैकी 80% पैसे गमावतात, फक्त 20% जणांची होते कमाई

लेखक: वैभव पळणीटकर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘IPL का एक सीजन, अपुन के लिए इसका मतलब है 100 करोड के सट्टे की बुकिंग. इस बार IPL शुरू होने के पहले चेन्नई, मुंबई का भाव टाइट था, लेकिन अब लखनऊ और गुजरात का भाव चढ़ेला है. भाव-बिव सेट होगा, पंटर लोग आएगा, पैसा लगाएगा. कोई भी टीम जीते-कोई भी टीम हारे, अपुन को उससे मतलबिच नई. अपना कटिंग फिक्स है.’

हा आहे मिड लेव्हलचा क्रिकेट बुकी गौरव भाई (बदललेले नाव). 42 वर्षांच्या गौरवचा ज्वेलरीचा बिझनेसही आहे, पण तो फक्त दाखवण्यापुरता बिझनेस आहे. गौरवसाठी त्याचा ‘मेन बिझनेस’ आहे सट्टा मार्केट. त्याच्याकडे मान्सूनपासून ते पॉलिटिक्सपर्यंत प्रत्येक इव्हेंटचा सट्टा लागतो.

गौरव लहानपणी स्वत: क्रिकेटर राहिला आहे आणि त्यांना या खेळातील बारकाव्यांचे चांगले ज्ञान आहे. एकदा गौरव याच्या काकांनी त्यांची एका बुकीशी भेट करून दिली. बुकीसोबत त्याची चांगली गट्टी जमली. हळूहळू गौरवला हे काम आवडले आणि जलद पैशाची भुरळ पडली. आता गौरव मिड लेव्हलचा बुकी आहे आणि 100 कोटींपेक्षा जास्तीचा सट्टा लावतो.

भारतात क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत सट्टेबाजीचा कसा खेळ होतो यावर आम्ही IPL मध्ये सट्टेबाजीवर दोन रिपोर्टची सिरीज आणत आहोत. या पहिल्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की, पडद्यामागे राहून सट्टेबाजीचा कोट्यवधींचा खेळ कसा होतो? सट्टेबाजीची नेटवर्किंग, पद्धत, शब्दावली, ट्रिक्स सर्वकाही खूप रंजक आहे.

पडताळणीची सुरुवात आम्ही सट्टेबाजीत सहभागी बुकीला शोधून केली. कोट्यवधींचा सट्टा खेळणारे हे बुकी मीडियातील लोकांना भेटणे टाळतात, पण खूप प्रयत्नांनंतर ते एका मीडिएटरच्या माध्यमातून बोलायला तयार झाले. आम्ही मुंबईच्या एका बुकीशी IPL मध्ये होणाऱ्या 'बिझनेस'वर चर्चा केली आणि क्रिकेटमधून होणाऱ्या सट्ट्याचा खेळ समजून घेतला.

टॉप बुकी मुंबईच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेतो प्री-लीग मीटिंग

IPL सुरू होण्याच्या जवळपास महिनाभर आधी टॉप 10-20 बुकींची मोठमोठ्या रिसॉर्ट आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मीटिंग होते. बुकीज मागच्या सीझनच्या कामगिरीचा रिव्ह्यू करतात. मग खेळाडूंच्या कामगिरीच्या अपेक्षेने त्यांचा रेट निश्चित करतात. बुकीजच्या या मीटिंगमध्ये रेटचा चार्ट तयार होतो. पहिल्या दिवशी जो रेट ठेवला जातो त्याला ओपनिंग रेट म्हणतात. सट्टेबाजीचे नेटवर्क खूपच गोपनीय पद्धतीने डिझाइन केलेले आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सट्टा लावण्याची पद्धत तर एकच असते, पण IPL यामुळे खास आहे कारण यात रोमांच आणि पैसा दोन्ही भरपूर आहेत.

महिनाभरापूर्वी ठरलेला जो दर असतो त्याच आधारे पंटर (सट्टा लावणारे) भाव लावणे सुरू करतात. बुकीजचे नेटवर्क असते- सर्वात वर 1,000- 500 कोटींपर्यंतची बुकिंग घेणारे बुकी असतात, त्या खाली 200 कोटींपर्यंत बुकिंग घेणारा बुकी असतो, तर त्याखाली 50 कोटींपर्यंत बुकिंग घेणारा असतो.

गौरवने आम्हाला एका सामन्याच्या उदाहरणातून सट्टेबाजीची पद्धत समजावून सांगितली. 8 एप्रिलला IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज सामन्यातील अखेरचे षटक. गुजरातला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी 12 धावांची गरज होती आणि प्रत्येकाला असे वाटत होते की, गुजरात आता हरणारच. सट्टा बाजारात तेव्हा प्रत्येक जण पंजाबवरच पैसे लावत होता, पण तेवतियाने अखेरच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले आणि आपली टीम गुजरातला विजयी करून पंजाबवर पैसे लावणाऱ्यांची स्वप्ने भंग केली.

IPL मध्ये स्पॉट बेटिंग आहे सर्वात प्रसिद्ध सट्टा

क्रिकेटमध्ये सट्टा लावण्याच्या अनेक कॅटेगरीज असतात, पण यातील दोन प्रमुख आहेत. पहिली- टीमचा पराभव- विजयावर सट्टा, दुसरी- स्पॉट सट्टा जो प्रत्येक बॉल, ओव्हर, प्लेयर, पावरप्लेमध्ये लागतो आणि याचा भाव वर-खाली होत राहतो. स्पॉट बेटिंग ही सर्वात प्रसिद्ध सट्टा असतो, ज्यात खेळणाऱ्यांना जास्त रोमांच मिळतो. पण अशाच प्रकारच्या बेटिंगमध्ये पंटर (सट्टा लावणारे) एकतर मोठा पैसा गमावतात किंवा कमावतात.

क्रिकेट बेटिंगमध्ये काही चर्चित शब्दावली आहे जी तुम्हाला सट्टेबाजीचा खेळ समजून घेण्यासाठी जाणून घ्यावी लागेल...

बुकी- जो सट्टा लावतो आणि बेट पुढे पास करतो. या बदल्यात बुकी आपले कमिशन घेतो आणि बाकीचा सगळा पैसा आपल्यापेक्षा वर असलेल्या बुकीला पास करतो.

पंटर- सट्टेबाजीच्या भाषेत सट्ट्यात पैसा लावणाऱ्यांना पंटर म्हणतात. हा मुंबईच्या स्थानिक भाषेतून निघालेला शब्द आहे, पण क्रिकेट सट्टा बाजारात सर्वसामान्य झाला आहे.

भाव वा रेट- कोणत्याही टीमच्या विजयाची अपेक्षा म्हणजे रेट. पिच कंडिशन, होम अॅडव्हांटेज आणि बॅटिंग लाइन अप आणि बॉलिंग डिफेन्सच्या आधारावर हे कळते की कोणती टीम विजयी होत आहे. ज्या टीमच्या विजयाची अपेक्षा जास्त असते, त्यावर भाव कमी लागतो आणि ज्यांच्या विजयाची अपेक्षा कमी त्यांचा भाव जास्त लागतो. हे भाव वेगाने बदलत राहतात.

लगाई-खाना- 'खाना' म्हणजे तुम्ही अशा टीमला सपोर्ट करत आहात जी तुम्हाला पसंत नाही. 'लगाना' म्हणजे तुम्ही आपल्या पसंतीच्या टीमला सपोर्ट करत आहात. बेटफेयर डिसाइड करते की, कोणत्या टीमच्या विजयाची शक्यता जास्त आहे. जर चेन्नई आणि बंगळुरूपेक्षा चेन्नईच्या विजयाची शक्यता जास्त असेल आणि माझा चेन्नईवर पैसा लावला असेल, तर याला 'लगाना' म्हणतात. तर बंगळुरूवर पैसे लावण्याला 'खाना' म्हणतात.

लाइव्ह कॉमेंट्री डिले- मैदानावर जे काही लाइव्ह सुरू असेल ते आपल्या टीवी सेटवर प्रसारित होण्यासाठी 9 ते 10 सेकंदांचा वेळ लागतो. सट्टेबाजीच्या महारथींसाठी हा वेळ कोट्यवधींची कमाई करण्यासाठी पुरेसा असतो. ही यंत्रणा कॉन्फरन्स कॉल सिस्टिमवर काम करते, ज्यात एक व्यक्ती स्टेडियममध्ये हजर आहे आणि दुसरी एका कॉन्फरन्स लाइनच्या माध्यमातून प्रत्येक बॉलची अपडेट देतो.

कसे ठरतात रेट?

सामना सुरू होण्याच्या आधी रेट पूर्वनिर्धारित असतात आणि या पूर्ण IPL सट्टेबाजीच्या खेळात सर्वात महत्त्वाची भूमिका आहे Batfair.comची. हा एक व्हर्च्युअल ऑनलाइन सट्टेबाजीचा प्लॅटफॉर्म आहे. हा जगातील अनेक देशांत लीगल आहे. भारतात ही वेबसाइट उघडल्यावर लिहून येते- ‘तुमच्या देशात ही वेबसाइट उघडण्यास बंदी आहे कारण भारतात सट्टेबाजी लीगल नाही.’ तथापि, भारतात सट्टा बाजारात या वेबसाइटचे खूप महत्त्व आहे. भारताचे बुकीज बेटफेयरने ठरवलेल्या ऑड्सना बेंचमार्क मानून बुकिंग सुरू ठेवतात.

‘नॅशनल टास्क फोर्ससारखे काहीतरी आणावे, तरच होईल खुलासा’

IPL 2022 च्या प्रारंभासोबतच देशातील वेगवेगळ्या राज्यांतून सट्टेबाजांवर कारवाईचे वृत्त येऊ लागले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक… बहुतांश राज्यांतून सट्टा लावताना लोकांना पकडण्यात आले. जेव्हाही पोलिस अशा प्रकारची कारवाई करतात तेव्हा काही आरोपी पकडले जातात, त्यांच्याजवळून लॅपटॉप-फोन आणि रोख रक्कम जप्त केली जाते. पण तज्ज्ञ सांगतात की, अशा प्रकारच्या केसेसमध्ये कार्रवाई पुढे जात नाही आणि आरोपी सुटून जातात.

इंडिया क्राइम पोर्टलचे विवेक अग्रवाल सांगतात की, ‘भारतात जवळपास 5 लाख बुकी आहेत. तर 500 कोटींच्या वरील कारभार पाहणारे बुकीज फक्त 10-12 जणच आहेत. इतर सर्व बुकीज लहान आहेत. आता मोठ्या संख्येने बुकी तयार होऊ लागले आहेत. बुकी आपल्या पातळीवर आपल्या परिसरात रेट कोट करतात. छोटे बुकी कटिंग करून पैसे कमावतात. तर, बरेचसे इंटरनॅशनल बुकी असे आहेत, जे इतर देशांतील लोकांचाही सट्टा लावतात.’

‘फिक्स्ड: कॅश, करप्शन अँड क्रिकेट’ पुस्तकाचे लेखक शांतनु गुहा रे सांगतात की, ‘भारतात स्पोर्ट्समध्ये जेवढा पैसा आहे त्यातील 85% पैसा एकट्या क्रिकेटमधूनच येतो, इतर सर्व खेळ एकत्र केले तरी त्यात केवळ 15% पैसा आहे. यावरून कळते की, सट्टेबाजीचा खेळ केवढा मोठा आहे.

फायनल मॅचच्या दिवसापर्यंत 40 कोटी लोक बनतात सट्टा बाजाराचा हिस्सा

शांतनु सांगतात की,‘एका अंदाजानुसार भारतात तब्बल 14 कोटी लोक दररोज सट्ट्यामध्ये राहतात, तर जसजशी लीग सेमीफाइनलकडे सरकत जाते तेव्हा हीच संख्या 35-40 कोटी होऊन जाते. मागच्या वर्षापर्यंत भारतात सट्टेबाजीचे मार्केट 10 लाख कोटी रुपये (180 अब्ज डॉलर)चे आहे. यावर सरकार आणि BCCI ने मिळून चौकशी केली पाहिजे.’

सट्टेबाजीच्या रेव्हेन्यू मॉडलवर रे सांगतात की, ‘गेमला डिझाइनच असे केले जाते की, जास्त पैसा सट्टेबाजच कमावतात. यात 80 आणि 20 चे गुणोत्तर काम करते. सट्टा खेळवणारे 80% पैसा कमावतात आणि 20% खेळणाऱ्यांचीही कमाईही होते. अनेक जण तर असेही आहेत जे स‌ट्ट्यातून कोट्यवधींची कमाई करतात.’

आतापर्यंत आम्ही जे काही तुम्हाला सांगितलंय तो IPL सट्टेबाजीचा फक्त एक भाग आहे. आता काळ डिजिटलचा आहे आणि सट्टेबाजही डिजिटल झाले आहेत. IPL सट्टेबाजीवरील सिरीजच्या दुसऱ्या रिपोर्टमध्ये आम्ही पडताळणी करू क्रिकेट सट्टेबाजीच्या डिजिटल दुनियेची आणि सांगू की, आता घरबसल्या कसे एका क्लिकवर सट्टा खेळला जातोय आणि पीडितांचे आयुष्य कसे बरबाद झाले.

(ग्राफिक्स- कुणाल शर्मा, पुनीत श्रीवास्तव, रथिन सरकार)

बातम्या आणखी आहेत...