आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • IPL SUSPENDED 2021; BCCI Sponsorship Revenue EARNING Report Latest Update | How Much Does BCCI Earn From 14th Edition Of The Indian Premier League

एक्सप्लेनर:जाणून घ्या IPL मधून BCCI ला कशी होणार होती कोट्यवधींची कमाई; विमा असूनही का मिळू शकणार नाही आता क्लेम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाने आता आयपीएलचा बळी घेतला.

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल आता इंडियन 'पॉझिटिव्ह' लीग बनली आहे. अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने अनिश्चित काळासाठी स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर हा निर्णय झाला आहे. लीग सुरु झाल्यापासून आठ खेळाडू आणि काही कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. 24 दिवस आणि 29 सामन्यानंतर आयपीएल स्थगित झाली आहे. अद्याप 31 सामने शिल्लक आहेत. लीग पुन्हा सुरु होईल तेव्हा 30 व्या लढतीपासून पुढे चालेल. दरम्यान आयपीएलची व्ह्युअरशिपही 35% वर घसरली आहे. कोरोनाने आता आयपीएलचा बळी घेतला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

खरं तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ला या वेळी आयपीएलच्या प्रायोजकत्वातून 700 कोटींहून अधिकची कमाईची अपेक्षा केली होती, परंतु आता ही कमाई होईल अशी चिन्ह दिसत नाहीयेत. इतकेच नव्हे तर बीसीसीआयने आयपीएलचा विमादेखील काढला आहे, परंतु सामने पुढे ढकलण्यात आल्याने त्याचा दावा मिळणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात, बोर्डाची कुठून किती कमाई होणार होती आणि आता लीग पुढे ढकलल्याने कोणते परिणाम होतील...

2020 मध्ये 50% कमाई कमी झाली होती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने मागील वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात देशाबाहेर म्हणजे युएईमध्ये झाले होते. गेल्या वर्षी बीसीसीआयला प्रायोजकांकडून होणा-या कमाईत 50% घट झाली होती. वृत्तानुसार मंडळाला मागील वर्षी 400 कोटींचा प्रायोजक महसूल मिळाला होता. पण यावेळी बोर्डाला मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट उत्पन्न मिळवणे अपेक्षित होते. यावेळी बीसीसीआयला प्रायोजकांकडून 708 कोटी रुपये कमावता आले असते.

यावर्षी बीसीसीआयने डिजिटल ब्रोकरेज फर्म 'अपस्टॉक'ला ऑफिशिअल पार्टनर बनवले होते. याशिवाय 2021 मध्ये 4 ऑफिशिअल पार्टनर आयपीएलमध्ये जोडले गेले. सोबतच ड्रीम 11 च्या जागी वीवोला टायटल स्पॉन्सरशिप देण्यात आली.

फ्रँचायझींची कमाईदेखील 25-30% पर्यंत वाढणार अशी होती अपेक्षा

आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपमधून होणारी कमाई दुप्पट होण्याचा अर्थ म्हणजे फ्रँचायझींची कमाईतही वाढ होणे हा आहे. खरं तर बोर्ड आणि फ्रेंचायझी यांच्यात रेव्हेन्यू शेअरिंग असा करार होतो. शिवाय फ्रँचायझी स्वत:ची कमाई वेगळी करतात. ही कमाई वेगवेगळ्या टीम प्रायोजकांकडून केली जाते. यावेळी फ्रँचायझींना टीम स्पॉन्सरशिपकडून होणारी कमाई 25-30% वाढण्याची अपेक्षा होती. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या आठ संघांची कमाईदेखील 550 कोटींंपेक्षा जास्त अपेक्षित होती. यापैकी काही मोठ्या संघांची कमाई 75-80 कोटी इतकी असते तर छोटे संघदेखील 40-45 कोटी रुपयांपर्यंत कमाई करत असतात.

बीसीसीआयला जाहिरातींमधून 3500 कोटी रुपये मिळवण्याची अपेक्षा होती

यावर्षी बीसीसीआयला आयपीएलमध्ये टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रसिद्ध होणा-या जाहिरातींमधून 3500 कोटींची कमाई अपेक्षित होती. रिपोर्ट्सनुसार, स्टार इंडियाने यावेळी ऑन एअर पॅकेजमध्ये 15-20% वाढ केली. गेल्या वर्षी 2020 च्या आयपीएलमध्ये ते जाहिरातींसाठी प्रत्येक 10 सेकंदाला 8-10 लाख रुपये आकारत होते. यावेळी हा आकडा प्रति 10 सेकंदांसाठी 9.5-12 लाखांपर्यंत वाढवण्यात आला. आयपीएल 2021 च्या सुरूवातीस स्टार स्पोर्ट्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अनिल जयराज म्हणाले होते की, यावेळी ब्रँड्सकडून जोरदार मागणी आहे. आमच्या जवळपास सर्व जाहिरातींचे स्लॉट बुक झाले आहेत. इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार 2020 मध्ये आयपीएलमध्ये जाहिरातींमधून 2600 कोटींचे उत्पन्न झाले होते.

कोविडशी संबंधित कोणताही विमा नाही
आयपीएलसाठी विमा आहे, पण त्यात एक पेचदेखील आहे. त्यात कोविड 19 समाविष्ट नाही. एका अहवालानुसार, विमा कंपनी कोरोनामुळे होणारा विलंब किंवा रद्दबातल देय देणार नाही. आयपीएलचे विमा संरक्षण सुमारे 3500 कोटी रुपये इतके आहे. दहशतवादी घटना किंवा भूस्खलन, चक्रीवादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे लीग रद्द झाल्यास विम्याचे पैसे मिळतात. एखादा खेळाडू संघातून बाहेर जाणे किंवा सामना पुढे ढकलणे हे इंश्युरन्स क्लेमचा भाग नाही. या विम्यात ब्रॉडकास्ट आणि टीम कव्हरचा समावेश आहे. न्यू इंडिया इन्शुरन्सकडे आयपीएलसंबंधित बहुतेक पॉलिसी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपन्या अशा पॉलिसीमध्ये कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा समावेश करण्याच्या मार्गावर नक्कीच विचार करत आहेत.

अर्ध्यावर सेटल करावी लागणार कमाई
आयपीएल अर्ध्यावर थांबल्यामुळे प्रायोजकांमध्ये नक्कीच चिंतेचे वातावरण आहे. तज्ज्ञांच्या मते लीग थांबल्याने कंपन्यांना अर्ध्या रकमेवर कमाई सेटल करावी लागेल. दुसरीकडे, आयपीएलमुळे आर्थिक नुकसान होईल, पण ब्रॅण्डवर फारसा परिणाम होणार नाही, असा ब्रॅण्डशी संबंधित तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे आयपीएलला सुरुवातीपासूनच विरोध होत होता. अशा परिस्थितीत आयपीएल पुढे ढकलणे ही विश्वासार्हता वाचविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. तसेही कोरोनामुळे त्याचा परिणाम विक्री आणि मागणीवर आधीपासूनच दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल पुढे ढकलल्याने स्पॉन्सर्सच्या ब्रॅण्ड इमेजवर फारसा परिणाम होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...