आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Iraq, Iran, Turkey Onions Will Arrive In Ten Days; Registration By Importers, This Will Be 10 To 15 Rupees Cheaper Than Onions In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:दहा दिवसांत येणार इराक, इराण, तुर्कीचा कांदा; आयातदारांनी केली नोंदणी, भारतातील कांद्यापेक्षा 10 ते 15 रुपयांनी राहणार स्वस्त

सचिन वाघ | नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने दर नियंत्रणासाठी कांदा निर्यातबंदी लागू केली होती

उन्हाळी कांद्याचे दर चार हजार रुपयांपर्यंत पोहोचताच केंद्र सरकारने दर नियंत्रणासाठी निर्यातबंदी लागू केली. मात्र, मागणीच्या तुलनेत कांदा आवक कमी असल्याने दरात तेजी होत आहे.

मंगळवारी क्विंटलमागे सरासरी दरात ५०० रुपयांनी घसरण असली तरी लाल कांदा बाजारात येण्यासाठी किमान महिना- दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीचे नियोजन केले आहे. काही आयातदारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी इराक, इराण आणि तुर्कस्तानमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी १० दिवसांत परदेशातील कांदा भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या कांद्याचे दर भारतीय कांद्यापेक्षा १० ते १५ रुपयांनी किलोमागे कमी राहणार आहे. केंद्र सरकारने अद्यापपर्यंत कांदा आयातीबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे ऑगस्ट महिन्यानंतर कांद्याचा भाव वाढत असतो. हा भाव प्रति क्विंटल पाच हजार रुपयांच्या पुढे गेल्यानंतर आणि ग्राहकांची ओरड सुरू झाल्यानंतर केंद्र सरकार किमान निर्यातमूल्य वाढ करून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते. या काळात प्रामुख्याने व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर लक्ष ठेवले जाते. संबंधितांवर कारवाया केल्या जातात. परंतु, यंदा केंद्र सरकारने १४ सप्टेंबरपासून थेट निर्यातबंदी लागू केल्याने दरावर आपोआपच एकप्रकारे अंकुश आला आहे. निर्यातदारांचा ५० टक्क्यांहून अधिक कांदा कंटेनर आणि ट्रकमध्ये पडून राहिल्याने खराब होत आहे. परंतु, शेतकऱ्यांकडे कांदा कमी प्रमाणात असल्याने साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने त्याची विक्री होत आहे. आगामी काळात कांदा टंचाई जाणवणार असल्याने काही आयातदारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आताच इराण, इराक आणि तुर्कस्तानमधून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही आयातदारांनी या तिन्ही देशांत जाऊन कांदा खरेदी केला आहे. तो १० दिवसांत भारतात येण्याची शक्यता आहे.

भारतीय कांद्याच्या तुलनेत परदेशी कांदा बेचव

भारतीय कांद्याप्रमाणे इराक, इराण आणि तुर्कस्तानच्या कांद्याला चव नसली तरी वाढत्या दरात आधार म्हणून हा कांदा नागरिक खरेदी करू शकतात. परदेशातील आणि भारतातील कांदा दरात किलोमागे किमान १० ते १५ रुपयांचा फरक राहणार आहे. केंद्र सरकारदेखील आयातदारांना कांदा आयातीसाठी सवलत देऊ शकते. परंतु, त्याबाबत केंद्राने अद्याप तरी निर्णय घेतलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...