आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Is Alien Life Possible, Venus Phosphine Discovery: Astronomers Have Found Signs Of Life On Venus Planet ? All You Need To Know Of Phosphine Means

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सप्लेनर:शुक्र ग्रहावर सापडले एलियन लाइफचे संकेत, संशोधकांनी इतर ग्रहांवरील जीवनाच्या शोधातील सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हटले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहावर जीवन आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर शतकांपासून शोधले जात आहे. यातच शास्त्रज्ञांनी शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फिन वायू सापडल्याचा दावा केला आहे. हा गॅस एका जैविक प्रक्रिया किंवा बायोलॉजिकल प्रोसेसमधूनच निर्माण होतो. या शोधामुळे विश्वात एलियन असल्याची शक्यता पुन्हा जागृत झाली आहे. नासाच्या प्रमुखांनी या शोधाला इतर ग्रहावरील जीवन शोधण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल म्हटले आहे. आम्ही तुम्हाला पाच प्रश्नांच्या माध्यमातून सांगणार आहोत की, या शोधाबद्दल आपण का उत्सुक असावे आणि पुढे काय होईल ?

संशोधकांना शुक्र ग्रहावर काय सापडले आहे ?

नेचर एस्ट्रोनॉमीमध्ये प्रकाशित अभ्यासात रिसर्चर्सने दावा केला आहे की, शुक्र ग्रहाच्या वातावरणात अम्लीय ढगांमध्ये फॉस्फिन नावाचा एक वायू आढळला आहे. पृथ्वीवरील फॉस्फिन सूक्ष्मजंतूंनी बनलेले असते जे ऑक्सिजनशिवाय टिकू शकतात. हा औद्योगिक प्रक्रियेत उद्भवणारा वायू आहे.

हवाईमधील जेम्स क्लर्क मैक्सवेल टेलीस्कोपच्या डेप्यूटी डायरेक्टर जेसिका डेम्पसीने या गॅसचा शोध लावला आहे. त्यांनी सांगितले की, "हा गॅस तुम्हाला स्वॅम्प्स आणि डिकम्पोज होणाऱ्या वस्तुंवर आढळतो. मायक्रोब्ससारख्या अॅनारोबिक लाइफ हवेतून जाऊन ढगांवर बसतात.'

गुरु आणि शनी या ग्रहांच्या वातावरणामध्येही फॉस्फिन आढळते. परंतू, हा गॅस तिथे असण्यामागे इतर केमिकल प्रक्रीया आहेत. या प्रक्रिया पृथ्वीवर किंवा शुक्रावर संभवत नाहीत. यामुळेच संशोधकांना ते शुक्रावरील जीनवाचे संकेत वाटत आहेत.

या शोधाचा काय अर्थ आहे ?

याचे दोन अर्थ आहेत- 1. जीवित मायक्रोब्स असू शकतात. परंतू, हे शुक्र ग्रहावर नसून, त्याच्या ढगांमध्ये आहेत. आपल्याला माहिती की, शुक्राचे वातावरण कोणत्याच जीवनासाठी अनुकूल नाही. हा गॅस ज्या ढगांमध्ये आढळला आहे, तेथील तापमान 30 डिग्री सेल्सियस होते. 2. हे मायक्रोब्स त्या जियोलॉजिकल किंवा केमिकल प्रक्रियेपासून बनू शकते, जी आपल्याला पृथ्वीवर दिसत नाही आणि आपण त्याला समजू शकत नाहीत.

डॉ. डेम्पसी यांचे म्हणने आहे की, आम्ही 100% दावा करू शकत नाहीत की, आम्ही शुक्रावर सजीव सृष्ठीचा शोध लावला आहे. परंतू, तेथे जीन नाही, असेही म्हणू सकत नाहीत. हा एक आशादायक शोध आहे. आम्हाला मिळालेला फॉस्फिन वायू तिथे असण्याचे नेमके कारण आम्हाला अद्याप माहिती नाही.

यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, रीवरसाइड, चे प्लेनरी सायंटिस्ट स्टीफन केन सांगतात की, आम्ही पृथ्वीवर बायोलॉजिकल प्रक्रियेतून फॉस्फीनला बनताना पाहिले नाही. जियोलॉजिकल कारणदेखील आम्हाला माहित नाही. परंतू, असे प्रत्येक ठिकाणी होते, असेही आम्ही म्हणू शकत नाहीत.

फॉस्फीन गॅस आणि जीवनाचा काय संबंध ?

अद्याप यावर बोलणे योग्य नाही. जर शुक्र ग्रहावर जीवन सापडसे नाही, तर फॉस्फिन वायू तेथे असण्याचे कारण वेगळे असेल. परंतू, तेथे आढळणारे सूक्ष्मजंतू पृथ्वीवर अत्यंत बिकट परिस्थितीत आढळतात- जसे जियोथर्मल पूल्सनर. पाच टक्के आम्ल असलेल्या वातावरणात ते जगू शकतात. त्या तुलनेत शुक्राचे ढग 90 टक्के आम्ली आहेत. आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक जीन ग्रीव्हस म्हणाले की, जर तेथे जीवन अस्तित्त्वात असेल, तरीदेखील यावर प्रयोग करणे सोपे नसेल.

मग या शोधाबद्दल उत्सुक होण्याचे कारण काय आहे?

पृथ्वीबाहेरील जीवनाच्या शोधातील ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे नासाचे प्रमुख जिम ब्राइडस्टाईनने म्हटले आहे. शुक्राच्या वातावरणामध्ये फॉस्फिन आढळणे आणि त्यातून तेथे जीवन असल्याचा दावा करणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. जर तेथे जीवन असेल, तर त्याची इतर लक्षणेही आढळायला हवीत.

हे खरोखरच जीवन आहे की नाही हे वैज्ञानिकांना कसे कळेल?

प्रोफेसर ग्रीव्ह्स म्हणतात की आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कोणीही ठोसपणे सांगू शकत नाही. यासाठी आपल्याला स्पेसक्राफ्ट पाठवावा लागेल. सँपल घ्यावे लागतील. तेव्हाच तेते जीवनाचे अस्थित्व असल्याचे सांगता येईल. नासाने पुढील दोन दशकांत शुक्र ग्रहावर दोन शोध मोहिमा आणि फ्लॅगशिप मिशनच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. फ्लॅगशिप मिशनमध्ये एका ऑर्बिटरचा वापर करुन शुक्रावर शोध केला जाईल.