आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टलैंगिक संबंधांमुळे होतो सर्व्हायकल कॅन्सर:देशात दरवर्षी ६७ हजार महिलांचा मृत्यू, टाळण्यासाठी काय करावे?

लेखक: अलिशा सिन्हाएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

भारतातील महिलांना होणारा दुसरा सर्वांत कॉमन कॅन्सर आहे सर्व्हायकल कॅन्सर. यावरील पहिली स्वदेशी लस आता आली आहे. तिचे नाव आहे, क्वाड्रिव्हेलेन्ट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन(qHPV). सीरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया(SII) आणि केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीने(DBT) एकत्रितपणे ही लस विकसित केली आहे. लवकरच या लसीची विक्री सुरू होईल.
या आकडेवारीवर एक नजर टाका
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर(IARC-WHO)नुसार...

 • भारतात दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सरचे 1.23 लाख रुग्ण आढळतात
 • दरवर्षी 67000 महिलांचा यामुळे मृत्यू होतो
 • देशातील महिलांमध्ये आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा कॉमन कॅन्सर आहे
 • जगात सर्व्हायकल कॅन्सरच्या बाबतीत भारत 5 व्या क्रमांकावर आहे

आज कामाच्या गोष्टीत जाणून घेणार आहोत, सर्व्हायकल कॅन्सरविषयीच्या प्रश्नांची उत्तरे...
आमचे एक्सपर्ट आहेत, दिल्लीचे डॉ. आयुष पांडे, धर्मशीला कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्ट सेंटरचे सर्जिकल अँकोलॉजी डिपार्टमेंटचे संचालक डॉ. अंशुमान कुमार आणी राजीव गांधी कॅन्सर इन्स्टीट्युटच्या डॉ. वंदना.

प्रश्न - सर्व्हायकल कॅन्सर काय आहे?
उत्तर -
महिलांच्या युटेरस म्हणजेच गर्भाशयाच्या खालच्या भागाला सर्व्हिक्स(Cervix) म्हणतात. सर्व्हायकल कॅन्सर महिलांच्या सर्व्हिक्सच्या पेशींवर परिणाम करतो. याला गर्भाशयाचा कॅन्सरही म्हणतात.
अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की, याचा परिणाम सर्व्हिक्सवर होतो, तर लैंगिक संबंधांमुळे सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी खालील ग्राफिक्स वाचा...

प्रश्न - सर्व्हायकल कॅन्सरचे सर्वात मोठे कारण काय आहे?
उत्तर -
जास्त केसेस ह्युमन पॅपिलोमा व्हायरस(HPV) च्या वेगवेगळ्या स्ट्रेन्सच्या असतात.
प्रश्न - सर्व्हायकल कॅन्सरचा धोका कोणत्या महिलांना जास्त असतो?
उत्तर -
याचा विषाणू पुरुषांमधून महिलांत जात असल्याचे वरील ग्राफिक्समध्ये आपण बघितले. 35 ते 45 वर्षे वयाच्या महिलांना याचा धोका जास्त आहे. 15 टक्क्यांपेक्षा जास्त नवी प्रकरणे 65 वर्षांवरील महिलांचे आहेत. यात नियमित तपासणी न करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे.
या 5 प्रकारच्या महिलांना सर्व्हायकल कॅन्सरचा धोका जास्त

 • कमजोर प्रतिकारशक्ती
 • गंभीर आजारने ग्रस्त
 • एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या
 • 5 वर्षांपेक्षा जास्त काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास
 • धुम्रपान करणाऱ्या

प्रश्न - आपल्याला सर्व्हायकल कॅन्सर होत आहे किंवा झाला आहे हे महिलेला कसे कळेल?
उत्तर -
सर्व्हायकल कॅन्सर होण्यासाठी सुमारे 10 ते 15 वर्षे लागतात. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी याची लक्षणे जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे.
खाली दिलेल्या ग्राफिक्समध्ये वाचा, सर्व्हायकल कॅन्सरच्या लक्षणांबद्दल

प्रश्न - सर्व्हायकल कॅन्सरचे निदान कोणत्या चाचणीने होते?
उत्तर -
पॅम स्मिअर टेस्ट(pap smear test) आणि HPV टेस्ट.
प्रश्न - ही टेस्ट केव्हा आणि किती वय असलेल्या महिलांनी केली पाहिजे?
उत्तर -
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार

 • 25 ते 65 वर्षांच्या महिलांनी सर्व्हायकल कॅन्सरची चाचणी केली पाहिजे
 • दर 5 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी महिलांनी ही टेस्ट नक्कीच केली पाहिजे

प्रश्न - डॉक्टरांशी संपर्काची गरज केव्हा पडते?
उत्तर -
ठराविक वयानंतर महिलांना पाळी येणे बंद होते. याला मेनोपॉज म्हणतात. मेनोपॉजनंतर रक्तस्राव होणे सामान्य नाही. जर असे होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवले पाहिजे.
काही महिलांना लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव जास्त असेल तर डॉक्टरकडे गेले पाहिजे.
जर तुम्हाला थकवा येत असेल आणि गुप्तांगातून जास्त रक्तस्राव होत असेल तर डॉक्टरांना दाखवले पाहिजे.
प्रश्न - सर्व्हायकल कॅन्सरचे किती प्रकार आहेत?
उत्तर -
याचे तीन प्रकार आहेत

 • स्क्वॅमस सेल कार्सिनोमा
 • अॅडेनोकार्सिनोमा
 • मिक्स्ड कार्सिनोमा

प्रश्न - सर्व्हायकल कॅन्सरवर लस किती प्रभावी ठरेल?
उत्तर -
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनमधील इंडियन जर्नल ऑफ मेडिकल अँड पीडियाट्रिक ऑन्कोलॉजीतील अहवालानुसार...

 • HPV लसीवर तीन वर्षे अभ्यास करण्यात आला. यात ही लस 95.8 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले.
 • महिलांना सर्व्हायकल आणि व्हल्वर कॅन्सरपासून वाचवण्यासाठी ही लस 100 टक्के प्रभावी आहे.

प्रश्न - सर्व्हायकल कॅन्सरच्या लसीची किंमत किती असेल?
उत्तर -
सीरम इन्स्टिट्युटच्या अदर पुनावालांचे म्हणणे आहे की, लसीच्या किंमतीविषयी भारत सरकारसोबत चर्चा सुरू आहे. याची किंमत 200 ते 400 रुपयांपर्यंत असेल.
जाता-जाता
सर्व्हायकल कॅन्सरविषयी WHO ची आकडेवारी

 • जगभरात 2020 मध्ये 6 लाखांपेक्षा जास्त केसेस समोर आल्या व 3.42 लाख लोकांचा मृत्यू झाला
 • यापैकी 90 टक्के केसेस मध्यम उत्पन्न गटातील देशांतील होत्या
बातम्या आणखी आहेत...