आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Is Remdesivir Favipiravir Steroids Tocilizumab Drug Effective, Coronavirus Injection Side Effects (Treatment) Update

एक्सप्लेनर:रेमडेसिवीरच्या मागे धाऊ नका! इतर औषधी सुरुवातीला दिल्यास बरा होतोय कोरोना, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

एका वर्षापूर्वीलेखक: रवींद्र भजनी
 • कॉपी लिंक

कोरोना व्हायरसची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत आहे. व्हायरस रोखण्यासाठी नेमके औषध नसल्याने डॉक्टर वेग-वेगळी उपचार पद्धती आणि औषधींचा वापर करत आहेत. पण, रेमडेसिवीर जणू जादूचीच दवा असल्याचा लोकांचा समज झाला आहे. रेमडेसिवीर घेतल्याशिवाय कोरोना बरा होणार नाही असेही अनेकांना वाटते. पण, तज्ज्ञांच्या मते या व्यतिरिक्त इतर औषधींचा देखील वापर होत असून त्या कोरोना विरोधात प्रभावी ठरत आहेत.

सरकारला सुद्धा सांगावे लागले की रेमडेसिवीर काही जादूचे औषध नाही. यावर आम्ही चंदीगडच्या पोस्ट ग्रॅजुएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल एजुकेशन अँड रिसर्च (PGIMER) मध्ये असलेल्या पल्मोनरी मेडिसिनचे वरिष्ठ प्राध्यापक तसेच 2020 मध्ये पद्मश्रीचा मान मिळवलेले डॉ. दिगंबर बेहरा, मुंबईतील खार येथील पीडी हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्स सेंटरचे इंटरनल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. राजेश झरिया आणि मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व मुंबई क्रिटिकल केअर कन्सल्टंट डॉ. पिनांक पांड्या यांच्याशी बातचीत केली.

रेमडेसिवीर खरंच जीवनरक्षक आहे का?

 • नाही. हे एक अँटी व्हायरल औषध आहे. 4 वर्षांपूर्वी इबोला महामारीच्या वेळी याचा वापर करण्यात आला होता. आता कोविड19 मध्ये सुद्धा ते वापरले जात आहे. गतवर्षी मे महिन्यात अमेरिकेतील औषध प्रशासन विभागाने (US-FDA) या औषधीला कोरोनाच्या आपातकालीन उपचारासाठी मंजुरी दिली होती. तेव्हापासूनच या औषधीचा वापर सुरू झाला.
 • डॉ. बेहरा सांगतात, की WHO ने या औषधीच्या चाचण्या घेतल्या असून त्यामध्ये कोरोना फायदा होत असल्याचे सिद्ध झालेले नाही. डॉ. झरिया यांच्या मते, रेमडेसिवीर व्हायरसच्या जीनोमिक रिप्लीकेशन अर्थात त्याला रोखण्यात काही प्रमाणात मदत करते. पण याचा फायदा लक्षणांच्या सुरुवातीलाच होतो. व्हायरल लोड कमी झाल्यास शरीराला अँटीबॉडी बनवण्यात मदत मिळते. पण, प्रत्येकाला याचा फायदा होईलच असे नाही.
 • तर डॉ. पांड्या यांनी सांगितल्याप्रमाणे, या औषधीने केवळ हॉस्पिटलचा मुक्काम कमी होतो. कुणी या औषधीने कोरोना बरा होत असल्याचा दावा करत असेल तर तो चुकीचा आहे. असा दावा रेमडेसिवीर बनवणारी कंपनी सुद्धा करू शकत नाही.

...मग रेमडेसिवीरने नुकसान होत आहे का?

 • होय. काही प्रमाणात असे म्हणता येईल. हे औषध प्रत्येकाला दिले जाऊ शकत नाही. ज्यांच्यावर घरात उपचार सुरू आहेत त्यांना तर रेमडेसिवीर दिलेच जाऊ शकत नाही. ज्यांना ऑक्सिजन सप्लाय देण्याची गरज आहे त्यांनाच सरकार आणि डॉक्टर हे औषध देण्याचा सल्ला देत आहेत. त्यातही हे औषध लक्षणे दिसल्याच्या 7 दिवसांच्या आतच द्यावे. डॉक्टर यासाठी 5 दिवसांचा कोर्स देत आहेत.
 • डॉ. बेहरा यांनी सांगितले, की मध्यमपासून गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर दिले जात आहे. पण, त्यांना मूत्रपिंड किंवा यकृताचा कुठलाही आजार असू नये. डॉ. पांड्या यांच्या मते, रेमडेसिवीर देण्यापूर्वी काही टेस्ट केल्या जातात. किडनी, लीव्हर योग्य काम करत असतील तेव्हाच रेमडेसिवीर देण्याचा सल्ला दिला जातो.

रेमडेसिवीरला पर्यायी औषधी म्हणून काय वापरले जात आहे?

 • डॉ. बेहरा म्हणाले की कोविड19 चे उपाचार एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. अर्थात या रोगावर निश्चित असे औषध नाही की ज्याचा वापर करता येईल. याची विशिष्ठ अशी उपचार पद्धती सुद्धा नाही. कोविड19 न्युमोनियाचा उपचार असेल तर तो ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन सॅचुरेशन 90 पेक्षा कमी झाल्यास सपोर्ट दिला जातो. फुफुसांच्या गंभीर उपचारात सॅचुरेशन 80 पेक्षा कमी होतो. कमी प्रकरणांमध्येच व्हेंटिलेटरची गरज असते. त्यातही अगदीच कमी प्रकरणांमध्ये लंग ट्रांसप्लांटेशन होत आहे.
 • टोसीलुजुमाब, प्लाझ्मा थेरेपी आणि स्टेरॉइडचा सुद्धा वापर होत आहे. टोसीलुजुमाब एक अँटी-IL6 ड्रग आहे. हे व्हायरल संक्रमण रोखण्यासाठी वापरले जाते. याचा फायदा सुरुवातीच्या 48-72 तासांत दिल्यास होतो. यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही. या औषधीने संक्रमण पूर्णपणे थांबणार याची सुद्धा शाश्वती नाही. कोणत्या लक्षणात कोणते औषध घ्यावे हे डॉक्टरच सांगू शकतील.

स्टेरॉइड्स सुद्धा चर्चेत, पण खरंच काम करतात का?

 • काही प्रमाणात हो म्हणता येईल. पण, प्रत्येक व्यक्तीचे शरीर, क्षमता एकमेकांपासून वेगळी असते. त्यावर डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा ठरतो. हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. झरिया यांनी सांगितले, की आपले शरीर एक केमिकल फॅक्टरी आहे. कुठलेही संक्रमण झाल्यास शरीरात अनियंत्रित केमिकल तयार होतात. वैद्यकीय भाषेत याला इनफ्लेमेशन असेही म्हटले जाते. हे नियंत्रित करण्यासाठी स्टेरॉइड्सचा वापर केला जातो. पण, औषधीने इनफ्लेमेशन नष्ट होते हे लक्षात ठेवायला हवे.
 • फुफुसांना नुकसान होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले तरच स्टेरॉइड्सचा वापर होतो. हा निर्णय डॉक्टरांवरच सोडा, स्वतः घेऊ नका. योग्य वेळी डेक्सामेथाझोन दिले तरी ऑक्सिजन घेण्यात मदत होईल. रुग्णाला व्हायरसशी लढण्याचा आणखी वेळ मिळतो.
 • बहुधा रुग्णांना स्टेरॉइड्सची गरज नसते. इतर औषधींनी सुद्धा त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात. ऑक्सिजनचा स्तर 91-92 असताना चुकीच्या वेळी स्टेरॉइड दिल्यास बरे होण्यात वेळ लागू शकतो. ऑक्सिजन लेव्हल 88-89 च्या जवळपास असल्यास स्टेरॉइड्सचा सल्ला दिला जातो.
 • डॉ. बेहरा यांच्या मते, स्टेरॉइड डेक्सामेथाझोन 10 दिवस रोज 6mg इतक्या प्रमाणात दिले जाते. यासोबतच प्रेडनीसोन आणि मिथाइल प्रेडनीसोन सुद्धा दिले जातात. पण, या औषधी केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांनाच दिल्या जातात. सोबतच, त्या घेण्यापूर्वी विविध प्रकारच्या टेस्ट करणे आवश्यक आहे. स्टेरॉइड्सने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. हायपरटेंशन किंवा डायबिटीजच्या रुग्णांना यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. त्यांच्यात हे औषध घेतल्यास इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, डॉक्टरांना सतर्क राहावे लागते.

रक्त पातळ करण्याचा देखील होत आहे उपचारात वापर?

 • हे रुग्णाच्या लक्षणांवर विसंबून असते. डॉ. झरिया यांनी सांगितल्याप्रमाणे, काही शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत असल्याची तक्रार करत आहेत. रक्त एकमेव असा द्रव पदार्थ आहे की जो शरीरातून बाहेर येताच घट्ट होतो. इन्फेक्शन झाल्यास शरीरामध्ये अंतर्गत बिघाड होतात. सर्वांनाच रक्ताच्या गाठी तयार होण्याचा त्रास होत नाही.
 • ज्या रुग्णांना रक्ताच्या गाठी होतात त्यांना अँटीकोगुलेंट्स (रक्त पातळ करण्याच्या औषधी) द्यायच्या की नाही हे डॉक्टर ठरवतात. अँटीकोगुलेंट्स क्लॉट्समुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करतात आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह नियमित करण्यातही मदत करतात.
 • डॉ. पांड्या यांच्या मते, इन्फेक्टेड रुग्णांच्या रक्ताच्या चाचणीत मार्करने कुठे क्लॉटिंग आहे की नाही हे नोंदवले जाते. या गाठी फुफुसात किंवा शिरांमध्ये कुठेही असू शकतात. अशात रुग्णांना ब्लड थिनर दिले जाते. ते सर्वांनाच दिले जात असे नाही. सोबतच ते किती वेळ द्यावे हे सुद्धा अनेक गोष्टींवरून ठरवले जाते.
बातम्या आणखी आहेत...