आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Is It A Sexually Transmitted Disease, Spread Through Homosexual Intercourse? Learn The A To Z Of Monkeypox From The Experts

विदेशात न गेलेल्या दिल्लीच्या तरुणाला मंकीपॉक्स:हा समलैंगिक संबंधातून पसरतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मंकीपॉक्सचे A ते Z

अनुराग आनंद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील मंकीपॉक्सने बाधित 4 लोकांचे प्रोफाइल सर्वात आधी समजून घ्या…

पहिला: केरळमधील कोल्लम येथील 35 वर्षीय व्यक्ती 12 जुलै रोजी यूएईच्या सहलीवरून परतला होता. यानंतर तो मंकीपॉक्स पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

दुसरा: केरळमधील कन्नूर शहरात 13 जुलै रोजी एक 31 वर्षीय व्यक्ती दुबईहून परतला होता. नंतर मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळले.

तिसरा: केरळमधील मलप्पुरम येथे 6 जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातीहून एक 35 वर्षीय व्यक्ती परतला होता, नंतर त्याच्यामध्येही मंकीपॉक्सचा विषाणू आढळला.

चौथा: दिल्लीत 34 वर्षीय रुग्ण परदेशात न जाता पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र, ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी मनाली येथे एका पार्टीत सहभागी होऊन परतली होती.

या चारही प्रकरणांमध्ये, संक्रमित पुरुष आहेत आणि सर्व 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. त्याचबरोबर परदेशात प्रवास न करता दिल्लीत केसेस सापडल्यानंतर लोकांमध्ये भीती वाढली आहे.

अशा स्थितीत, आज दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या, मंकीपॉक्स रोग म्हणजे काय? हा आजार सर्वात जास्त कशामुळे होतो? समलैंगिकांना हा रोग पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो का? त्याचप्रमाणे मनात निर्माण होणाऱ्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरेही आपल्याला मिळणार आहेत.

मंकीपॉक्स रोग म्हणजे काय?

संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या मते हा आजार मंकीपॉक्स नावाच्या विषाणूमुळे होतो. मंकीपॉक्स हा ऑर्थोपॉक्स विषाणू कुटुंबाचा एक भाग आहे. यामध्येही शरीरावर ‘देवी' सारखे पुरळ उठतात. वास्तविक, स्मॉलपॉक्स पसरवणारा व्हॅरिओला विषाणू देखील ऑर्थोपॉक्स कुटुंबाचा एक भाग आहे.

वास्तविक, मंकीपॉक्सची लक्षणे सौम्य असतात, ती ‘देवी’ सारखी गंभीर नसतात. फार कमी प्रकरणांमध्ये हा प्राणघातक ठरतो. आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, याचा ‘देवी’शी काहीही संबंध नाही.

थुंकी, शिंक, रक्त आणि शुक्राणूंद्वारे मंकीपॉक्स पसरू शकतो का?

डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या मते, मंकीपॉक्स हा एक संपर्क रोग आहे, जो प्रामुख्याने तीन प्रकारे पसरतो.

पहिले: त्वचा त्वचेच्या संपर्कात येऊन. याचा अर्थ जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येते.

दुसरे: शरीरातील द्रवपदार्थाद्वारे. म्हणजेच हा आजार संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या थुंकी, शिंक, घाम इत्यादींद्वारे पसरतो.

तिसरे: रॅशेच्या संपर्कात येऊन मंकीपॉक्स रोग पसरण्याचीही शक्यता असते.

रक्त आणि शुक्राणूंद्वारे मंकीपॉक्स पसरण्याच्या शक्यतेबद्दल आम्ही डॉक्टरांशी बोललो तेव्हा डॉ. लहरिया म्हणाले की, मंकीपॉक्स रक्ताद्वारे पसरल्याचा कोणताही पुरावा नाही. हा रोग शरीराच्या इतर भागातून बाहेर पडणाऱ्या सर्व प्रकारच्या द्रवपदार्थाने पसरतो.

पुढे जाण्यापूर्वी, जगातील कोणत्या 10 देशांमध्ये मंकीपॉक्स संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत ते जाणून घेऊया.

हा लैंगिक संक्रमित रोग आहे का, जो समलिंगी पुरुष लैंगिकतेमुळे पसरतो?

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमधील एका अहवालात असे दिसून आले आहे की मंकीपॉक्स संसर्ग झालेल्या सुमारे 98% रुग्ण हे समलिंगी पुरुष किंवा उभयलिंगी पुरुष आहेत. अशा परिस्थितीत मंकीपॉक्स हा लैंगिक संक्रमित आजार आहे का, असा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नाचे उत्तर आम्ही 2 तज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे...

पहिले तज्ञ म्हणतात : डब्ल्यूएचओच्या दक्षिण पूर्व आशिया मधील प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले की, 'पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये मंकीपॉक्सचे प्रमाण अधिक आढळले आहे.' या आजाराविरुद्धच्या लढाईत आपण संवेदनशील आणि भेदभावापासून मुक्त राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

दुसरे तज्ञ म्हणतात : संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात की, मंकीपॉक्सची बहुतेक प्रकरणे पुरुषांमध्ये आढळून आली आहेत, परंतु आपण त्याला आत्ताच लैंगिक संक्रमित रोग म्हणू शकत नाही. हा लैंगिक संबंधातून पसरणारा आजार आहे का? यावर संशोधन सुरू आहे. लहरिया सांगतात की, जेव्हा सेक्स करताना दोन व्यक्ती जवळ येतात तेव्हा हा आजार संपर्काच्या आजारामुळेही पसरतो.

मंकीपॉक्स हा कोरोना व्हायरसपेक्षा कमी धोकादायक आहे का?

डॉक्टर लहरिया मंकीपॉक्सला कोरोनापेक्षा कमी धोकादायक मानतात. यामागे त्यांनी दोन युक्तिवाद दिले आहेत.

पहिला युक्तिवाद: मंकीपॉक्स कोरोनापेक्षा कमी धोकादायक आहे कारण कोरोनामध्ये रिबोन्यूक्लिक अ‍ॅसिड म्हणजेच आरएनए व्हायरस असतो. हा व्हायरस त्याचे स्वरूप वेगाने बदलू शकते. या मुळे तो वेगाने पसरतो. त्याच वेळी, मंकीपॉक्समध्ये डीऑक्सीरिबो न्यूक्लिक अ‍ॅसिड (डीएनए) व्हायरस असतो. डीएनए एक स्थिर विषाणू आहे, जो वेगाने उत्परिवर्तन किंवा स्वत:मध्ये बदल करू शकत नाही. यामुळे, त्याच्या प्रसाराचा वेग कमी आहे.

युक्तिवाद दुसरा: लक्षणे नसतानाही कोरोना विषाणू इतरांना संक्रमित करतो. अशा परिस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्याच वेळी, मंकीपॉक्समध्ये, जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हाच संसर्ग दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. या कारणामुळे, व्यवस्थित काळजी घेतली तर हा रोग सहजपणे पसरण्यापासून रोखला जाऊ शकतो.

मंकीपॉक्समुळे पुन्हा महामारी होईल का?

संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या मते, मंकीपॉक्समुळे देशात कोणतीही महामारी नाही. या मागची 3 कारणे असल्याचेही त्यांनी सांगितले....

कारण पहिले: मंकीपॉक्स हा 50 वर्षे जुना आजार आहे. या रोगाविरूद्ध तीन लसी देखील आहेत. अशा प्रकारे, तो सहजपणे पसरण्यापासून रोखला जाऊ शकतो.

दुसरे कारण: गेल्या 13 वर्षांत सुमारे 7 वेळा WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. मात्र, साथीचा रोग केवळ कोरोनाला घोषित करण्यात आले आहे.

कारण तिसरे: मंकीपॉक्स हा एक झुनोटिक रोग आहे. म्हणजे प्राण्यांपासून माणसात पसरलेला रोग. असे रोग वेळोवेळी दिसून आले आहेत, परंतु कोरोनासारख्या मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार होण्यास कमी वाव आहे. त्यावर सहज नियंत्रण ठेवता येते.

WHO च्या जागतिक आरोग्य आणीबाणीचा भारतासाठी काय अर्थ आहे?

डब्ल्यूएचओने एखाद्या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करताच, याचा अर्थ असा होतो की हा रोग जगभरात वेगाने पसरत आहे. अशा स्थितीत त्याची भारतातील स्थिती चिंताजनक आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, आता भारत किंवा इतर देशांना हा आजार रोखण्यासाठी 3 टप्प्यांत निर्णय घ्यावे लागणार आहे.

प्रथम: रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रोटोकॉल आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे.

दुसरा: लोकांना जागरूक करून तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे.

तिसरा: संक्रमित रूग्ण ओळखणे आणि उपचार करणे.

सध्या देशात मंकीपॉक्स रोगाशी संबंधित चर्चा होत आहे, म्हणून त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि त्याच्याशी संबंधित इतर माहितीसाठी खालील ग्राफिक वाचा...

बातम्या आणखी आहेत...