आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Is Your Period Also Late After Getting The Vaccine? According To New Research, This Delay Is Temporary

कोरोना लस आणि मासिक पाळीचे कनेक्शन:लस घेतल्यानंतर तुमची मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते, नवीन संशोधनानुसार - हा विलंब तात्पुरता आहे

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या माहिलांची मासिक पाळी, लसीकरण न घेतलेल्या महिलांच्या तुलनेत एक दिवस उशीरा येत असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे. मासिक पाळी आणि लस यांचा हा संबंध समजून घेण्यासाठी नुकतेच अमेरिकेच्या ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीनेही एक संशोधन केले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, लसीकरणानंतर हे पूर्णपणे सामान्य आहे. यात घाबरुन जाण्यासारखे काही नाही.

अमेरिकन महिलांवर संशोधन केले
या अभ्यासासाठी, शास्त्रज्ञांनी हार्मोनल गर्भनिरोधक वापरत नसलेल्या 18 ते 45 वयोगटातील महिलांचे प्रजनन ट्रॅकिंग अॅपवरून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले.

संशोधनात सहभागी असलेल्या 2,403 महिलांपैकी 55% महिलांनी फायझर लस, 35% महिलांनी मॉडर्ना लस आणि 7% महिलांनी जॉन्सन अँड जॉन्सन लस घेतली होती. याशिवाय लसीकरण न झालेल्या सुमारे 1556 महिलांचाही या अभ्यासात समावेश होता.

शास्त्रज्ञांच्या मते, लसीकरणानंतर मासिक पाळी उशिरा आली तर घाबरू नये.
शास्त्रज्ञांच्या मते, लसीकरणानंतर मासिक पाळी उशिरा आली तर घाबरू नये.

संशोधनादरम्यान, महिलांच्या लसीकरणापूर्वी आणि नंतरच्या 3-3 पीरियड सायकल फॉलो केल्या गेल्या. यादरम्यान लसीकरण न झालेल्या ग्रुपच्या देखील 6 पीरियड सायकलवर लक्ष दिले गेले.

लसीकरणानंतर मासिक पाळी येण्यास होणारा विलंब तात्पुरता
पहिली लस दिल्यानंतर महिलांची पाळी 0.64 दिवस उशिरा आल्याचे शास्त्रज्ञांना आढळले. त्याच वेळी, जेव्हा दुसरी लस दिली गेली तेव्हा या महिलांची मासिक पाळी 0.79 दिवसांनी उशीराने आली. ज्या महिलांचे लसीकरण केले गेले नव्हते, त्यांची मासिक पाळी त्यांच्या सामान्य वेळेवर आली. लसीकरण केलेल्या गटात 358 महिला देखील होत्या, ज्यांचे मासिक चक्र 2.38 दिवसांनी वाढले.

संशोधकांच्या मते, 6 व्या पीरियड सायकलपर्यंत लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या महिलांच्या कालावधीतील फरक नाहीसा झाला होता. याचा अर्थ, लस दिल्यानंतर मासिक पाळीत बदल होणे तात्पुरते आहे.

लसीकरणानंतर मासिक पाळी येण्यास उशीर होण्याचे कोणतेही ठोस कारण नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
लसीकरणानंतर मासिक पाळी येण्यास उशीर होण्याचे कोणतेही ठोस कारण नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

लसीकरणानंतर मासिक पाळी का बदलते?
लसीकरणानंतर मासिक पाळी येण्यास उशीर होण्याचे कोणतेही ठोस कारण नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, लस आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्याचा थेट परिणाम महिलांच्या संप्रेरक-नियमन प्रणालीवर होऊ शकतो. याशिवाय, कोरोना महामारीच्या वेळी ताणतणाव हे देखील याचे कारण असू शकते.

बातम्या आणखी आहेत...